|
Dineshvs
| |
| Wednesday, August 15, 2007 - 3:38 pm: |
|
|
रुनि, केवड्याचे झाड आडवे पसरत जाते. त्यामूळे बन म्हणतात. समुद्राच्या भरतीच्या रेषेवर बाकिची झाडे नसल्याने, त्याचे चांगलेच फावते. हि बने बघायला तुम्हाला किनारी प्रदेशात जायला हवे. अगदी मुंबईतही हि बने आहेत. केवड्याचे पान ताजे असताना पांढरेशुभ्र असते पण शिळे झाले कि पिवळट छटा येत जाते. केवड्याला थोडीशी कडसर चव असते, म्हणुन शिजवता येत नाही. सुगंधासाठी खास वेगळी लागवड करतात. शिवाय केवड्याच्या फ़ुलोर्यातील पानानाच वास असतो, हिरव्या पानाना नसतो. पण भातात शिजवण्यासाठी जे पान घालतात, त्याच्या सगळ्याच पानाना छान वास असतो. केवड्यात साप असलाच तर तो सावलीसाठीच असणार, ( मला दिसला नाही कधी ) त्याला ना नाक ना कान, तो बिचारा कसा वास घेऊ शकणार. नलिनी, हे फळच मी खाल्लेय. यातले भाग पिकल्यानंतर सुटे होतात. व सहज खाता येतात. चव मात्र खास अशी नसते.
|
Ksmita
| |
| Wednesday, August 15, 2007 - 5:02 pm: |
|
|
गणपतीपुळ्याला प्रदक्षिणेच्या मार्गावर आहे केवड्याचे बन . मी बर्याच वर्षापूर्वी गेले होते सध्याचे माहीत नाही . गणपतीच्या दिवसात हमखास असायचा केवडा घरी आम्ही criss-cross दुमडून त्याच्या वेण्या करायचो केसात माळायला !!
|
Bhagya
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:37 am: |
|
|
वा! मागच्याच आठवड्यात screw pine leaf घातलेला मलेशिअन भात खाल्ला. त्यात ओल्या नारळाचे दुध पण घातले होते. हे screw pine leaf ओरिएंटल ग्रोसरीच्या दुकानात मिळेल बहुधा. केवडा आणि बुचाच्या नंतर अबोली आणि मरवा येणार का?
|
Mepunekar
| |
| Thursday, August 16, 2007 - 1:01 am: |
|
|
दिनेशदा तुम्ही लिहीलेल्या लेखांतुन फ़ारच सुंदर, सचित्र माहिती मिळतिये. अजुन एक विनंती,ह्या संपुर्ण माहिती वर एक पुस्तक काढायच मनावर घ्या
|
Dineshvs
| |
| Thursday, August 16, 2007 - 12:18 pm: |
|
|
स्मिता, अजुनही असेल तिथे. त्या डोंगरावरचे कुठलेच झाड तोडायचे नाही, असा दंडक आहे. शिवाय मुंबईला मनोरीला आणि राणीच्या बागेत आहेत हि झाडे. भाग्य ते वेगळे झाड असते, त्याला काटे नसतात. लागवडीसाठी छान आहे. तुझ्या झाडांच्या यादीत असु दे. mepunekar बाजारात या विषयावर काहि सीडीज उपलब्ध आहेत. त्यापेक्षा काहि वेगळे द्यायचा प्रयत्न करतो आहे. भाग्य पण खुप आग्रह करतेय. त्यामुळे मनावर घ्यायलाच हवेय.
|
माझ्या माहितीप्रमाणे, केवडा व केतकी या वेगळ्या वनस्पती आहेत. दिसायला दोन्हींची पानं सारखीच दिसतात, पण केवड्याचे कणीस पांढरेशुभ्र असते तर केतकीचे कणीस नाजुक, पिवळसर असते. त्यावरूनच 'केतकीवर्ण' हा शब्दप्रयोग आला असावा.
|
Dineshvs
| |
| Friday, August 17, 2007 - 5:29 am: |
|
|
बहुतेक तसेच असेल गजानन, Pandanus हे कुळ तसे बरेच मोठे आहे.
|
Bee
| |
| Friday, August 17, 2007 - 6:24 am: |
|
|
दिनेशभाऊ, अगदी खर आहे शरदीनी बाईंचे म्हणने. बालीतील लोकांची जीवनशैली खूप कलाकुसरीची आहे. ही लोक निसर्गाला मानतात. बाली नृत्यामधे मुकुट जर बघितले तर ते चाफ़्याच्या फ़ुलांचे असते. नृत्य करतात ती जागा पणतीच्या प्रकाशाने न्हावून निघालेली असते. रात्रीचं दाट चांदण आणि पणतीचा प्रकाश, बायकांच्या अंगावर फ़ुलांचे दागिणे आणि अतिशय कमनीय मोहक हालचाली असतात त्यांच्या नृत्यात. तेरड्याची फ़ुले देवाला वाहण्यासाठी आधी ही लोक छोटी सुपडी बनवितात मग त्यावर केळीचे पान ठेवात आणि मग तेरड्याची फ़ुले त्यात ठेवतात. हे खालील छायाचित्र मी बालीलाच टिपले आहे. आवडले ना?
|
Shyamli
| |
| Friday, August 17, 2007 - 6:43 am: |
|
|
दिनेशदा खरच मानलं पाहिजे तुम्हाला,एकतर एवढी माहिती आहे म्हणून,दुसरं म्हणजे हे सगळं सविस्तर लिहून काढता न कंटाळता आणि परत वर प्रत्येक संदर्भांचे फोटो. हा तेरडा प्रचंड आवडतो मला,आणि श्रावणात तर याचा फार उपयोग होतो.
|
Swa_26
| |
| Friday, August 17, 2007 - 8:34 am: |
|
|
खूप दिवसात इथे आले नव्हते.. पण खरोखर अफाट खजिना आहे दिनेशदा तुमच्याकडे!!
|
Dineshvs
| |
| Friday, August 17, 2007 - 12:55 pm: |
|
|
बी त्यांचे नृत्य बघितले आहे ना मी. त्यांच्या संगीतातही आपलेच राग असतात. खास करुन भुपाली, असे सुहासिनी मुळगावकरानी सांगितले होते. पण ते लोक तितकेच भावुकही असतात. श्यामली, तेरड्यासारखे साधेसे फ़ुल, पण परदेशात किती बैचैन करतो ना ? स्वाती, परत कुठे होता दौरा ?
|
Nalini
| |
| Friday, August 17, 2007 - 2:15 pm: |
|
|
काय पडलात ना ह्यांच्या मोहात? मला तर हे Red mushrooms पाहता क्षणीच खुप आवडले पण त्याना न घेताच परतावे लागले. अतिशय विषारी आहेत हे सांगायलाच नको. egg mushrooms आणि Boletus edulis ज्यांना ईथे steinpilz म्हणतात हे दोन्ही माझे आवडते आहेत. दिनेशदादा, Oyster Mushroom मागच्या वर्षीच्या मशरुम शोध मोहिमेत मोठ्या संख्येने मिळाले होते. ते दुसर्या फोटोतल्या मश्रुमसाखेच दिसतात. तसेच Shaggy Mane खायचे असेल तर वारुनी प्यायची नसते असे म्हणतात. बी, फोटो खुप छान आहे.
|
Runi
| |
| Friday, August 17, 2007 - 4:10 pm: |
|
|
दिनेश्दा मला तेरडा मी जर्मनीमध्ये होते तेंव्हा पण दिसला होता. दर्वर्षी साधारण याच सुमारास म्हणजे तिथल्या उन्हाळा (आणि पावसाळा) असतो तेव्हा. माझ्या घराशेजारी एक छोटा पाण्याचा ओहळ होता त्याच्या काठावर अगदी भरभरुन यायचा, रंग मात्र एकच दिसला मला लालसर थोडीशी अबोली छटा असलेला. मला तेरडा त्याच्या प्रसन्न रंगासाठीच आवडतो. माझ्या सोबतच्या जर्मन, रशीयन लोकांना सगळे म्हणजे खायचे आणि न खायचे असे म्शरुम ओळखु यायचे. त्यान्नी सांगीतले की लहान मुलांचा आवडता उन्हाळ्याच्या सुट्टीतला उद्योग म्हणजे घरातल्या कोणातरी सोबत जवळच्या जंगलात जाणे आणि मशरुम गोळा करणे. मीपण एकदा गेले होते अर्थात मला कुठले घ्यायचे किंवा नाही हे त्यांनीच सांगितले मी फक्त सांगकाम्यासारखे गोळा केले होते.
|
Nvgole
| |
| Saturday, August 18, 2007 - 4:44 am: |
|
|
दिनेश, मंदार म्हणजेच रुईची फुले हे मला खरोखरच माहीत नव्हते. तुमच्या लेखांमधून माहितीच्याच वृक्षराजींची नव्याने आणि संस्मरणीय ओळख होत असते हे तुमच्या लिखाणाचे वैशिष्ट्य आहे. हा निसर्ग आमच्या सभोवार प्रच्छन्न विखुरला असला तरी आम्हाला म्हणावी तशी त्याची ओळख मात्र नसते. त्यासाठी सृष्टी पाहण्याची दृष्टी असावी लागते. तुम्हाला ती आहे. तुम्ही पाहत आहात. आम्हाला दर्शन घडवत आहात. हेच दर्शन सर्वांसाठी उपलब्ध होण्याकरता एक पुस्तक अवश्य, व लवकरात लवकर प्रकाशित करा. जेव्हा ह्या सार्याचे पुस्तक कराल तेव्हा तुमच्या दरबारात उपस्थित होणार्यांनी पुरवलेल्या माहितीचा आणि तुमच्याशी केलेल्या प्रशोत्तरांचाही त्यात अवश्य समावेश करा. एक उत्सुकतावर्धक ज्ञानकोषच संपन्न होईल ह्याची मला खात्री आहे.
|
Disha013
| |
| Tuesday, August 21, 2007 - 7:44 pm: |
|
|
कित्ति वर्षांनी बघितलं कृष्णकमळ! कृष्णकमळ म्हणजे महाभारत, अगदी हेच आजी सांगाय्ची.माझ्या माहेरी लावलेला वेल मस्त पसरलेला. पण मग त्याच्या पसरलेल्या जंगलातुन घरात सरड्यांचा शिरकाव सुरु झाला. त्यामुळे काढुन टाकालेला वेल.
|
Runi
| |
| Tuesday, August 21, 2007 - 10:06 pm: |
|
|
दिशा आमच्या घरीपण कृष्णकमळाचा वेल होता त्याची आत्ता आठवण झाली.
|
Cool
| |
| Wednesday, August 22, 2007 - 7:12 am: |
|
|
दिनेश, नुकताच हिमालयातील Valley of flowers चा ट्रेक करुन आलो, तिकडे तेरडा, कृष्णकमळ आणि ब्रह्मकमळ यांची मनभरुन फुले बघायला मिळाली
|
Neelu_n
| |
| Wednesday, August 22, 2007 - 8:52 am: |
|
|
दिनेशदा तुमच्याकडे माहितीचा खजिनाच आहे. खुपच माहिती मिळाली विशेषत: केवळ ऐकुन असलेली झाड, फुल, फळ बघायला मिळाली. धन्यवाद तुमचे बी फोटो सुंदर आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 23, 2007 - 2:49 am: |
|
|
सुभाष, जिथे भेट दिल्याशिवाय या जगाचा निरोप घ्यायचा नाही, असे मी ठरवलेय, त्यापैकी एक जागा आहे ती. दिशा, रुनी हा फोटो मुंबईच्या मलबार हिल वरील उद्यानातला आहे. या कृष्णकमळासारखेच पण लालभडक रंगाचे फुल मी सिंगापुरला, ( जिथुन सेंटोसा साठी रोप वे सुरु होतो तिथे ) बघितले होते. अगदी तसेच फुल सिंहगडाच्या पायथ्याशी, एक टपरी आहे, ( जिथुन एस्टी सुटते तिथे ) बघितले होते. या फ़ुलाबद्दल मात्र फारसे काहि कळु शकले नव्हते.
|
Ksmita
| |
| Thursday, August 23, 2007 - 8:03 pm: |
|
|
वा वा !मस्तच क्रुष्णकमळ गुलमोहर ! लहानपणी आमच्या कॅलनीमधे दुतर्फ़ा गुलमोहर होते आम्ही सुट्टीत खूप खेळायचो लाल फ़ुलाच्या गुच्छ्यात पांढरी पाकळी शोधुन कोंबडा कोंबडीचा खेळ करायचो कित्येकदा ते कोंबडे म्हणजे पांढर्या पाकळ्या चक्क खाल्ल्याही आहेत किंचित खारट आंबट लागतात ! तसेच शेंगांचा तलवारीसारखा उपयोग करून लुटुपुटुच्या लढायाही खेळल्या आहेत
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|