|
Bee फणसाच्या पानात इडल्या आणल्या असल्या तरी फणसाचे पान हे त्या कृतीत नसावे. ते चांगलं जाड असतं म्हणून पेज प्यायला त्याचा चमचा (खोलपी) म्हणून वापरही होतो. हळदीचे पान ही मात्र खासियत आहे. ते मोदकांपासून माश्यांपर्यंत, बर्याच कृतीत येतं...
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Bee विनयने लिहिलच आहे. मला वाटते इडलीच्या बीबी वर चर्चा झाली होती त्याची. आता तू आणि नलिनी आहातच, तर खायच्या चारोळ्यांबद्दल लिहा. हे झाड तूमच्याकडेच फार दिसते. खरे बदाम खरे तर जंगली झाड आहे. आता ओले बदाम मुंबईतही मिळतात. बाह्यरुप असेच असते, रंग मात्र हिरवा. त्याचे वरचे आवरण मात्र खाण्याजोगे नसते. ( खाऊन बघितलेय, हे लिहायला नकोच. ) आतला बदाम मात्र सहज दातानी फोडता येतो. नलिनी या पानाना शिवुन, माझा अंगणात शिंपि पक्षाने घरटे केले होते. त्यांचे हिशेब इतके पक्के, कि पिल्लु उडेपर्यंत पान पिकले नव्हते.
|
Sayuri
| |
| Tuesday, August 07, 2007 - 3:48 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
तुमच्या लेखांनी मन परत परत भूतकाळात जातं... बदामाचं झाड एक असंच न विसरण्यासारखं. आणि त्याची भसाडी पानं नंतर लाल केशरी होत असल्यान जास्तच अप्रूपाचं झाड होतं ते. अनंताचा सुगंध विसरणं या जन्मात शक्य नाही.
|
Nalini
| |
| Tuesday, August 07, 2007 - 4:15 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पानाना शिवुन, माझा अंगणात शिंपि पक्षाने घरटे केले होते. >>ह्यावरून आठवले. ह्या झाडाची तु म्हणतोस तसे पाने शिवून तेलमुंग्या घर करून रहातात. तसेच चिकुच्या झाडावरसुद्धा ह्या मुंग्या नेहमी घरं करतात. रुनी, संपुर्ण बदाम फोडायच्या नादात खुपदा अंगठ्यावर मार बसायचा.
|
Shonoo
| |
| Tuesday, August 07, 2007 - 5:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी कशाला त्या 'खॉट्ट्याच' फोटो टाकून जळवतोयस? नारळाच्या झावळीतला हीर घेऊन त्याचे छोटे तुकडे करायचे आणि मग चार फणसाची पानं एकत्र टोचून असे 'खॉट्टे' ( काही लोकं 'हिट्टं' पन म्हणतात) करायचे. असे खॉट्टे करायला जमणं पण एक कला आहे. नाजून काम. माझ्या मावशीने केले तर इडलीचं पीठ जरा सुद्धा बाहेर ओघळत नसे. पुर्वी वस इ वरून येणार्या भाजी विक्यांना सांगितलं तर ते ही पाने आणून देत असत. नाहीतर कोणाच्या अंगणात फणसाचे झाड आहे ते हेरून त्यांच्या कडनं ही पानं मागून आणायची. माझ्या सासरहून येताना सासूबाई नेहेमी दीड्-दोनशे पानं काढून आणवून माझ्या माहेरी पाठवतात. नशीब मला कधी ' तू इथे करून दाखव' म्हटलं नाही :-) आमच्या घरी मोठं बदामाचं झाड होतं त्यावर बदाम खायला नेहेमी राघू येत असत आणि ओरिओल फक्त लपाछपी खेळत. त्या बदामाच्या रसाचे डाग कपड्यांना पडले तर काय खरपूस मार मिळतो!
|
Bee
| |
| Wednesday, August 08, 2007 - 1:53 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विनय, दिनेश, शोनू धन्यवाद! मी काल लगेच खाली जावून चार लांबुळकी पाने घेतली आणि चार काड्या शोधल्या. कलीगला लगेच इडलीचा द्रोण करून देखील दाखविला. ती एकदम खूश झाली माझ्यावर. इथे फ़णसाची झाडे खूप आहेत. मी शनिवारी ह्या द्रोणात इडल्या करून बघणार आहे. मला तरी हा द्रोण करणे कठिण वाटले नाही पण प्रत्यक्षात इडली जेंव्हा रुचकर खायला मिळेल तेंव्हा काय ते खरे..
|
Jo_s
| |
| Wednesday, August 08, 2007 - 5:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
व्वा, अनंत मस्त सुगंध दरवळला, फुलांनी भरलेले झाडतर काय मस्त दिसत. वास तर छानच असतो. पण हल्ली फर्शी कुणी लावलेली दिसत नाहीत ही झाड.
|
Bee
| |
| Wednesday, August 08, 2007 - 11:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोनू, दिनेश, विनय -- फ़णसाच्या पानात इडली करण्यामागचा उद्देश पानाचा अर्क इडलीत उतरावा असा काही आहे का?
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 08, 2007 - 12:00 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, तसे काही नसावे. इडली करण्यातली कल्पकता असावी ती. मुंबईला किंग्ज सर्कलला मिळते अशी इडली.
|
Bee फणसाच्या पानाला तसा विशेष वास (अर्क) नसतो... तेव्हा तसं नसावं.. तू करून बघितल्यास इडल्या की सांग...
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 08, 2007 - 1:16 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आभार नलिनी, करेक्ट केले आता. नव्या लॅपटॉपमूळे अश्या टायपोज होताहेत.
|
नवा ल्यापटॉप? मग जुना कुठे आहे? कुठे फेकून दिला आहेस तिथली जागा सांग...
|
Prajaktad
| |
| Friday, August 10, 2007 - 10:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बुचाच्या फ़ुलांनी किती आठ्वणी जाग्या केल्या म्हणुन सांगु?... शाळेच्या जवळच बुचाचे झाड होते...दोन्ही हात गच्च भरुन फ़ुल गोळा करायची मग,ति तशिच धरुन सायकल चालवत घरी जायचे.त्याच्या वेण्या तयार करणे तर, उद्योगच असायचा.
|
Nvgole
| |
| Tuesday, August 14, 2007 - 8:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, तुमच्या दरबारात हजेरी लावतांना नेहमीच फार फार छान वाटते. बुचाच्या फुलांचा मंद सुगंध अक्षरशः वेड लावतो. मी काढलेले एक प्रकाशचित्र सेवेस हजर करत आहे. स्वीकार व्हावा. मोठ्या वृक्षाची बारकीशी फुले, गर्द अंधारात शुभ्रतेचे साम्राज्य पसरवतात.
![](/hitguj/messages/58489/130045.jpg)
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 14, 2007 - 9:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नरेंद्र आभार, मला अश्याच एका फोटोची गरज होती. खुपदा पांढर्याशुभ्र फुलांचा फोटो काढणे अवघड जाते.
|
Bhagya
| |
| Tuesday, August 14, 2007 - 10:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बुचाची फ़ुले...दिनेशदा, परत लहानपण जागे झाले.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 15, 2007 - 1:10 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नागपंचमीसाठी खराखुरा नागोबा घ्या.
![Nagoba](/hitguj/messages/58489/130104.jpg)
|
Nalini
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
![](/hitguj/messages/58489/130113.jpg)
|
Runi
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश्दा, मी केवड्याचे बन कधी बघितलेले नाही. फ़क्त डोक्यात माळलाय. मी डोक्यात माळलेला केवडा पिवळा होता. ती केवड्याची पाने असतात का? आणि केवड्याच्या बनात साप असतात असे मी लहानपणी खुपदा ऐकलय, ते खरे आहे का? अजुन एक प्रश्न, केवडा सुगंधी असतो तर त्याचे पान भात शिजवतांना घालत नाहीत का वासासाठी? नलिनि तो फोटो कसला हेपण संग ना, मला ओळखु नाही आला.
|
Nalini
| |
| Wednesday, August 15, 2007 - 2:49 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रुनी, अग हे केवड्याचेच फळ आहे. गुगलच्या कृपेने सापडलेले. मी पण कवड्याचे बन कधी पाहिले नाही.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|