Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 4:35 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Runi मारुति चितमपल्लींच्या चकवा चांदणं या पुस्तकात तो उल्लेख आहे, त्यानी कोणती लाकडे ते लिहिलेले नाही, पण ओली नसावीत बहुतेक. या पुस्तकात असे अनेक उल्लेख आहेत.
|
Aaftaab
| |
| Friday, August 03, 2007 - 5:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
"दिनेशोच्छिष्टम जगत सर्वम" असं म्हणावसं वाटतय हे सगळं वाचून.. hats off दिनेशदा!!
|
Dineshvs
| |
| Friday, August 03, 2007 - 9:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आफ़ताब, कौतुकाने आणि प्रेमाने लिहिले असले तरी एवढी माझी योग्यता नाही.
|
Disha013
| |
| Friday, August 03, 2007 - 8:14 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा,आज सगळं सगळं वाचलं पहिल्यांदाच. परिचीत झाडाफ़ुलांची अपरीचीत असलेली कित्ती कित्ती माहिती मिळाली! सागरगोट्या समुद्रातुन येतात ही आमची पण समजुत होती. आज सागरगोट्यांचा फ़ोटो बघुन लहान्पणचे दिवस आठवले. फ़ेरीवाल्याचा किस्सा सहीच.
|
Bhagya
| |
| Friday, August 03, 2007 - 10:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझी पण तीच समजुत होती. आणि हा फोटो मुलांना दाखवला तर त्यांना घरट्यात असलेली अंडी वाटली. बाकी मारुती चितमपल्लिन्च्या पुस्तकातील अनेक गोष्टी अद्भुत असल्या तरी त्यातून मिळणारे ज्ञान इतरत्र सहसा वाचायला मिळत नाही. ही लेखमाला पण तशीच होतेय..फ़ोटो, लेख सगळंच दुर्मीळ.
|
Sayuri
| |
| Friday, August 03, 2007 - 11:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
फारच माहितीपूर्ण आणि रंजक लेखमाला आहे. त्यातही प्रत्यक्ष पाहिलेली झाडं-पानं-फुलं असली तर वाचायला अजून मजा येतेय. बिट्टीचं झाड आमच्या सोसायटीत होतं. त्या पिवळ्या फुलांच्या नळीसारख्या देठात मध असतो ना?ते फुल हातात घेऊन पाहिलं तर हमखास एक तरी मुंगी त्या देठात दिसायची. गुंजांचं झाडही असंच आठवणीतलं. मुलुंड पूर्व स्टेशनहून गणपतीच्या देवळात जायला (रेल्वे रूळांना समांतर अशी) जी वाट होती (पूर्वी) त्या वाटेवर गुंजांचा वृक्ष असल्याचं आठवतंय..
|
Sayuri
| |
| Friday, August 03, 2007 - 11:57 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि या गुंजा विषारी असतात असं ऐकलेलं...खरं की खोटं?
|
Ksmita
| |
| Saturday, August 04, 2007 - 11:59 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बदकाचे फ़ूल आज इथे पाहीले http://esakal.com/esakal/08052007/Satara359E90D9C4.htm तुमच्या लेखाची आठवण झाली म्हणून इथे टाकली लिंक
|
Ksmita
| |
| Sunday, August 05, 2007 - 12:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बदकाचे फ़ूल
|
Ksmita
| |
| Sunday, August 05, 2007 - 12:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सागरगोट्याची माहिती वाचून मस्त वाटले लहानपणी सुट्टीत बिट्ट्या सागरगोटे खूप खेळायचो . ठराविक खेळ झाल्यावर म्हणजे सात बिट्ट्या वा गोटे असतिल तर पख्खई , दुख्खई ...... सहाखई नंतर प्रतिस्पर्ध्यावर काही तरी चढवायचो त्यासाठीहि वेगवेगळे प्रकार होते उदा . २ बोटांच्या चिमटीत सगळे गोटे उचलणे किंवा एक गजगा वर टाकून खाली पोळी लाटायची actionकरणे आणि वर फ़ेकलेला गजगा झेलणे वगैरे .हे सगळे नीट पार पडल्यावर पुन्हा पख्खई , दुख्खई .... सुरु पण आपण मात्र दुसर्यावर काहितरी चढवले म्हणून आपले पारडे खेळात वरचढ मला कोणी तो नेमका शब्द सांगू शकेल का ? काही केल्या आठवत नाहीये . Sorry ,जरा विषयांतर होतय
|
Jo_s
| |
| Sunday, August 05, 2007 - 5:52 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश छानच माहीती मिळत्ये, सागरगोट्यांच झाड, फळ पहील्यांदीच पाहीलं. सागर गोटे खेळतात, तसच ते घासले तर चांगलेच तापतात आणि चटकेही देता येतात..... गुंजांच झाड लहानपणी पवईच्या बागेत पाहीलं आहे काही वेळा, तिथून गुंजा गोळा करून आणायचो.पुढे त्यांचा उपयोग काही नाही पण एक अप्रुप वाटायचं.
|
Dineshvs
| |
| Sunday, August 05, 2007 - 10:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सायुरि, मला कुठे उल्लेख नाही सापडला गुंजा विषारी असल्याचा. पण त्या खायचाही उल्लेख नाही सापडला. स्मिता, हेच फुल माझ्या आईच्या आठवणीतलं, शिवाय केनयामधेही पाहिलं होतं मी. Jo_s आपले बालपणीचे खेळ कसे झाडांशीच निगडित होते नाही. करवंटी ऐसपैस असो कि विटी दांडु असो कि बेचकी असो. सगळ्या वस्तु आपल्या आपण तयार करायच्या. खर्चही नाही शिवाय नवनिर्मितीचा आनंद.
|
खोकल्यावर किंवा घसा बिघडलेला असेल तर गुंजेचा सुकवलेला पाला खातात. किंवा मुखशुद्धी म्हणून पण खातात. खूप छान लागतो. आम्ही लहानपणी डोळ्यांत कचरा गेल्यावर गुंज डोळ्यांत सरकवायचो. आणि मग ती हळूहळू बाहेर पडायची. त्याने कचरा बाहेर निघतो असे ऐकलेले. त्या एकदम गुळगुळीत असल्यामुळे डोळ्यात टोचायच्या नाहीत. तसेच कुंकवाच्या करंड्यातल्या कुंकवात या गुंजा ठेवल्या जात. विषारी असल्याचे मीही यापूर्वी ऐकले नाही.
|
Jo_s
| |
| Monday, August 06, 2007 - 7:23 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो, दिनेश लहानपणी असेच सगळे खेळ होते. झाडं लावणॆ वगैरेही खूप छान उद्योग होता. झाडं आणि मातीतून जे मिळतं ते आताच्या पिढीला मिळण आणि कळणं मात्र कठीण आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, August 06, 2007 - 2:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
गजानन, मसाला पानात घालतात तो पाला, पण तो वेलीचा, झाडाच्या गुंजांबद्दल मलाही माहित नाही. आज एक नविन गोष्ट कळली. पपनसाला तोरंजन म्हणतात, असे विनय ने लिहिले होते, आज कळले कि तो आणि नारिंगे हे दोन शब्द आपल्याकडे, मेक्सिकन भाषेतुन आलेत. तिथे नारिंख आणि तोरंख असे शब्द आहेत.
|
Nalini
| |
| Monday, August 06, 2007 - 6:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ह्या बदामाचा अगदी लहानपणापासून आनंद घेत आलोय. फ्रॉकची ओटी करुन सगळे बदाम गोळा करून आणले की सामुदायिक बदाम फोडायचा कार्यक्रम पार पाडायचो आम्ही. आई ह्याच बदामंचा शिरा करायची आमच्यासाठी. जावयासाठी तर बदाम फोडून डब्यात घालून द्यायची. हा बदाम फोडताना आडवा धरून फोडला तरच तो संपुर्ण निघतो नाहीतर त्याचा भुगाच खायला लागतो. ह्या झाडाचे गळलेली पाने नकोसे करून सोडतात, झाडाखाली कितीही झाडा, ढिगभर पाने निघतात.
|
Runi
| |
| Monday, August 06, 2007 - 7:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा लहानपणी हे बदाम खुप खाल्ले आहेत. आमच्याकडे याला लाल फळे यायचि. पिवळे फळ मात्र मी बघीतले नाही. मी अजुन पर्यंत याला खरे बदामच समजत होते. नलिनी मला तर खुप कमी वेळा यातला पुर्ण बदाम काढता आलाय.
|
दिनेश, हे मस्त चाललं आहे.. सागरगोट्यांनी खेळायच्या खेळाला कोकणात तरी 'अचीपची' असा शब्द आहे. सागरगोटे नाही सापडले तर गुळगुळीत झालेले खडे (पाण्याच्या प्रवाहात सापडतात) पण खेळ तोच.. गुंजा विषारी असल्याचं मीही ऐकलंय. पण ते कदाचित भीती घालण्यासाठी सांगितलं असावं... (मुलांनी उगीच तोंडात काहीतरी घालू नये म्हणून) दिनेश, 'काजरा', 'कवंडाळ' पण येऊ देत... (की आलाय आधीच?)
|
Bee
| |
| Tuesday, August 07, 2007 - 6:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, माझ्या एका मंगलोर भागातून आलेल्या कलीगने आज फ़णसाच्या पानात केलेल्या इडल्या आणल्या होत्या. त्या इडली द्रोणाचे छायाचित्र मी इथे टाकतो आहे. मागे तिने हळदीच्या पानात केलेले मोदक आणले होते. दोन्ही मेनूला त्या त्या पानांचा गंध येत होता. तुम्ही ह्या कृतीबद्दल इथे कधीच बोललात नाही. अजुन कुठली पाने वापरता येतात आणि कुठल्या मेनूकरिता?
![droN](/hitguj/messages/58489/129562.jpg)
|
सागर गोटे आम्ही ही खेळायचो पण ते कुठे असते काय असते ते आत्ता कळले.. तसेच गिट्टीच्या बिया ही खेळाय्चो(पिवळ्या कन्हेरीचा एक प्रकार). मस्त चालु आहे लेखमाला.. दिनेशदा.. मी इथे कोको च्या फ़ुलाबद्दल वाचले त्याच्या दुसर्याच दिवशी आम्ही कॅटबरी world बघ्यला गेलो तीथे त्याचा पुर्ण ईतीहास वाचला..
|