|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:45 am: |
|
|
जलाशय आणि धबधबा
|
दिनेश, रस्त्याचा फोटो महान.... !
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 3:36 pm: |
|
|
अरे, इथे संदर्भ द्यायचा राहिला, या जागेचे वर्णन इथे आहे. /hitguj/messages/75/128684.html?1185368342#POST974264
|
Runi
| |
| Wednesday, July 25, 2007 - 7:00 pm: |
|
|
दिनेशदा खुपच सुंदर आहेत फोटो. फोटो बघुन वाटते की आत्ता गाडी काढावी आणि लगेच सुटावे. मला पहिल्या फोटोतला हिरवा रंग खुपच आवडला. तसा पावसाळ्यात दिसणारा हिरवा (पोपटी) रंग मला भारताबाहेर कधी आढळला नाही. आणि वर्णनपण एकदम टु द पॉइंट दिले आहे, कधी जाण्याचा योग आला तर खुपच उपयोग होइल याचा.
|
Bee
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:22 am: |
|
|
दिनेश, खरच खूप भाग्यवान अहात तुम्ही इतके सुंदर रस्ते तुम्हाला चालायला मिळालेत. माझ्या डोळ्याचे पारणे कधी फ़िटतील.. येऊ का तुमच्या भेटीला खरच एकदा
|
Dhumketu
| |
| Thursday, July 26, 2007 - 4:34 am: |
|
|
आजच लोकसत्ता च्या व्हिवा मधे झांजरोळी चे आले आहे.. लिंक :-आनंद
|
Dineshvs
| |
| Thursday, July 26, 2007 - 3:07 pm: |
|
|
रुनि, बी भारताबाहेर जितके भटकलो तितके भारतात नाही भटकु शकलो, पण आपले ते आपले ना. बी, ये की. सगळे भेटु. आनंद आता पर्यटकांच्या झुंडी जाणार का तिथे ? त्या गावातले लोक इतके साधे आहेत. कुणी उच्छाद मांडला तर ठाम विरोधही नाही करु शकणार.
|
Karadkar
| |
| Thursday, July 26, 2007 - 5:50 pm: |
|
|
दिनेश, एक प्रश्ण, बिट्ट्या आणि गजगे ह्या झाडांची माहीती लिहिणार का? मी गजग्याची झाडे कधी पाहीली नाहीयेत नेहेमी विकत घेउनच खेळले. पण बिट्ट्या कायम वेचुनच कधि विकत नाही घेतल्या!
|
Dineshvs
| |
| Friday, July 27, 2007 - 5:59 am: |
|
|
मिनोति जरुर लिहिन. पण हे झाड आपल्याकडे खुप दिसते. तिलाच पिवळी कण्हेर किंवा गोविंदवृक्ष असेही म्हणतात. याची फळे अत्यंत विषारी असतात. केरळमधे तर आत्महत्या करण्यासाठीच हि फळे वापरतात. आज मसाले आणि कोको पासुन सुरवात केलीय.
|
Jo_s
| |
| Friday, July 27, 2007 - 7:19 am: |
|
|
दिनेश छानच आहेत सगळे फोटो, बिट्ट्या माहीती आहेत पण गजगे म्हणजे काय? सागरगोट्यानाच म्हणतात का गजगे?
|
Dineshvs
| |
| Friday, July 27, 2007 - 10:41 am: |
|
|
कोकोच्या फ़ळाचा फोटो. मिनोती, गजगे म्हणजेच सागरगोटे ना ? याचा काटेरी वेल असतो. मागे नलिनीने याचा फोटो पोस्ट केला होता.
|
Nalini
| |
| Sunday, July 29, 2007 - 4:28 pm: |
|
|
मिनोती, तुला फोटो मिळाले का? आजच पाठवलेत. दिनेशदादा, तुझ्या स्मरणशक्तीला दाद नाही.
|
Karadkar
| |
| Tuesday, July 31, 2007 - 4:04 pm: |
|
|
Nalu, I got the photos! Thank you sooooo much!
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 2:37 am: |
|
|
नलिनी सागरगोट्याचा फोटो मला पण पाठव. आणि तो वापरायची उदार मनाने परवानगी पण दे.
|
Kandapohe
| |
| Wednesday, August 01, 2007 - 5:54 am: |
|
|
दिनेश, जायफळाला जे लाल कव्हर असते त्याला जायपत्री म्हणतात ना? ही जायपत्री मसाल्यात सुद्धा वापरतात तसेच विड्याच्या पानात जर घातली तर सुंदर वास येतो. हिरड्या बेहड्यावरून एकदम लहानपणची आठवण झाली. आमच्या घरात कायम एक काष्टौशधांची पिशवी असे. त्यात हिरडे, बेहडे, मुरुडशेंग, रिठा, चिंचोके, सागरगोटे, सांबरशिंग, समुद्रफेस असे सारे असायचे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, August 01, 2007 - 6:39 am: |
|
|
हो KP त्यालाच जायपत्री म्हणतात. फोटोत दिसते आहे माझ्या ती. आणि विड्यात घालायची ती वासाबरोबरच औषधासाठीही. आपल्या त्रयोदशगुणी विडा खरोखरच गुणी असतो. त्यातले कंकोळ, कस्तुरी, कापुर सगळेच घटक औषधी. अगदी पान, चुना आणि काथ खाल्ला तरी तो विडा गुणकारी असतो. एकतर तुरट चव शिवाय अल्कली, यामुळे मासाल्याचे जड जेवण पचवायला तो हवाच. पण सगळा घात केला तो तंबाखुने. आणि या पिशवीतली औषधे आजही संग्रही ठेवावीत अशीच आहेत. उपयोग माहित करुन घेतले, कि बारिकसारिक तक्रारीवर गोळ्या वैगरे घ्याव्या लागत नाहीत.
|
Deepa_s
| |
| Thursday, August 02, 2007 - 8:49 am: |
|
|
दिनेशदादा, कण्हेरी च्या फ़ुलाला केकच्या कच्च्या मिश्रणासारखा वास येतो ना?
|
Ashdeo
| |
| Thursday, August 02, 2007 - 10:22 am: |
|
|
प्राण्यांच्या बाबतीत आपले म्हणणे एकदम खरे आहे. आमच्याकडची मांजरं त्यांना बरं वाटत नसेल तर दुर्वा खातात. त्यांना हे ज्ञान उपजतच असतं.
|
Dineshvs
| |
| Thursday, August 02, 2007 - 3:55 pm: |
|
|
दीपा, उपमा एकदम सही. Ashdeo आजच्या पोस्टमधे आणखी अनोखा किस्सा आहे.
|
Runi
| |
| Thursday, August 02, 2007 - 7:04 pm: |
|
|
दिनेशदा, कण्हेरीच्या पोस्टमध्ये तुम्ही जो माकडांच्या शेकोटीचा उल्लेख केलाय तो खरच गमतीदार आहे. मला माहित नव्हते. त्याबद्दल एक विचारायचे होते, माकडे एखाद्या विशिष्ट प्रकारचे लाकुड वापरतात का किंवा एकदम ओली लाकडे जी पेटत नाहीत
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|