|
Ksmita
| |
| Friday, July 13, 2007 - 11:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो , इथे प्रथम आले तेव्हा दालचिनीची अशीच चिरुटे किंवा रोल मला मिळाली होती पहिल्यांदाच पाहिल्याने नवलही वाटले पण ती कशी असतील , चव कशी असेल या शंकांनी तशीच पडून होती नंतर समजल्यावर तीच दालचिनी वापरू लागले पण strong flavour साठी आपलीच दालचिनी बरी काळसर चपटी कपचीसारखी असते ती ! लहानपणी आई खास कर्नाटकातून हिरवी वेलची मागवत असे व सालीसकट त्याची पूड करून हवाबंद करत असे मस्तं वास असायचा ....!
|
Phdixit
| |
| Saturday, July 14, 2007 - 4:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा !!!! दिनेशदा एकदम अप्रितम फोटो
|
Nalini
| |
| Monday, July 16, 2007 - 6:06 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदादा, फोटो खुपच मस्त आहे. कालच एका चॅनलवर लवंग, दालचिनी(खरी), वेलची, हळद, जायफळ, मिरी ह्यांची माहिती देत होते. सगळे बघताना खुपच ओळखीचे वाटत होते. भाषा समजत नव्हती पण सगळे कळत होते, केवळ तु दिलेल्या माहितीमुळे. माहिती सांगणारा कृष्णवर्णीय मुस्लिम होता? कोणत्या देशातला असेल बरे?
|
Dineshvs
| |
| Monday, July 16, 2007 - 6:33 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नलिनी, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, श्रीलंका, टांझानिया आणि त्रिनिनाद या देशात मसाल्याची पिके घेतात. यापैकी एका देशातला असणार. मी काढलेले मसाल्यांच्या झाडाचे फोटो, कुर्टि, फोंडा, गोवा, इथल्या सहकारी स्पाईस फार्म मधले आहेत. तिथे केशर सोडुन बहुतेक सगळी मसाल्यांची पिके घेतात. माहितीही देतात. शिवाय जेवणही.
|
Bhagya
| |
| Tuesday, July 17, 2007 - 12:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
इथे canberra त खूप लोकांकडे तमालपत्राचे झाड असते आणि कुठल्याही पदार्थात ते आवर्जून हे bay leaf टाकतात. बाकी त्याची साल म्हणजेच खोटी दालचीनी हे मात्र माहित नव्हते. आणि हळदीचा फ़ुलोरा फ़ारच देखणा दिसतोय. ओल्या हळदीची चव.. अहा! बाकी हे फुल मला आणि मुलांना माहित आहे..पण आपली अळी मिळी गुपचिळी.
|
Chioo
| |
| Tuesday, July 17, 2007 - 8:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कोकोचं फूल का? कोकोपासूनच chocolate बनवतात ना?
|
नाही माहित कसले फ़ुल ते तुम्हीच सांगा आता...!!!
|
Karadkar
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
I think its cacao flower
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 17, 2007 - 4:47 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे वा, चिऊ, आणि मिनोति ला १०० पैकी १०० गूण. पण आता थोडे दिवस मला लिहायला जमणार नाही. मग परत सुरु करू.
|
Shonoo
| |
| Tuesday, July 17, 2007 - 5:56 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश हळदी चं झाड कसं लावतात? सुकं हळकुंड लावून उगवेल का? की न्यू जर्सी मधल्या दुकानातून ओली हळकंडं आणावी लागतील?
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 17, 2007 - 6:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुके हळकुंड करताना हळद शिजवुन सुकवलेली असते, म्हणुन ती उगवणार नाही. ओली हळद लावली तर जगेल. त्याला बरेच कंद फ़ुटुन ते पसरत जाते. आले पण तसेच लावता येते.
|
Jo_s
| |
| Wednesday, July 18, 2007 - 4:22 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो मला आठवतय आल अस मातित खोवून ठेवलं तरी त्याला झाडं येतात आणि माती खाली आलंही वाढत रहातं. सोनटक्याची मुळंही अशीच दिसतात आणि याच प्रकारे वाढतात.
|
Bee
| |
| Wednesday, July 18, 2007 - 5:06 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला ह्याची पाने चाफ़्यासारखी दिसत आहेत आणि त्या टोकदार कळ्या कुंदाच्या कळ्यांप्रमाणे दिसत आहेत.. काय budding वगैरे केले की काय दिनेश एकदा लहानपणी मी कण्हेर आणि तगरीचे budding केले होते मुर्खासारखे
|
Nalini
| |
| Wednesday, July 18, 2007 - 11:17 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हा फोटो मी कुंडीत लावलेल्या अद्रकाचा.
|
Mvrushali
| |
| Wednesday, July 18, 2007 - 7:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नलिनी,सुरेख आलंय ग आलं,कसं लावलंस जरा डिटेल्स देणार का प्लीज?जमल्यास " घरची बाग " बीबी वर सॉरी दिनेश,तुमच्या पानावरची जागा वापरली...
|
Chioo
| |
| Friday, July 20, 2007 - 9:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे व्वा.. पहिला अंदाज बरोबर आला की. या दुसर्या फोटोतली पाने चाफ़्यासारखीच वाटताहेत. साधारण अशा पानांचे झाड मी कोल्हापुरात दाभोळकर कॉर्नरजवळ बघितले आहे. त्याची फुले खालून नीट दिसत नाहीत पण फार मस्त वास असतो त्याला. तिथल्या प्रदूषित हवेतही लपत नाही. पांढरी, चाफ़्यासारखीच फुले असतात.
|
Dineshvs
| |
| Saturday, July 21, 2007 - 1:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नलिनी अद्रक अजुन जोमदार असायला हवे होते. मला वटते दुसरा फोटो जरा कठिणच आहे ओळखायला. निदान पानावरुन तरी कल्पना यायला हवी होती. ती फ़ुले कॉफ़ीची आहेत.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:40 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झांजरोळी गावात जायचा रस्ता
![rasta](/hitguj/messages/58489/128687.jpg)
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:41 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
समोरचा कडा. .. ..
![kaDaa](/hitguj/messages/58489/128690.jpg)
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 25, 2007 - 9:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जलाशयाची दृष्ये
![jl2](/hitguj/messages/58489/128696.jpg)
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|