|
Bee
| |
| Tuesday, July 10, 2007 - 2:03 am: |
|
|
लोणारला एकदा जाऊन पहा किती मोर आणि लांडोर दिसतात. मोराला जंगल.. रान जास्त पसंत आहे. माझ्या घराजवळ एक रान आहे तेथून पहाटेच्या वेळी सारखी केकावली ऐकायला येते. म्हणजे अकोल्याच्या घरी, इथल्या नाही.
|
Jo_s
| |
| Tuesday, July 10, 2007 - 3:31 am: |
|
|
फदी, दिनेश, स्मिता धन्यवाद नलीनी फोटो मस्तच आहेत पांढरा मोर खासच दिनेश मोर उडताना फारच छान दिसतो, मला आधी वाटायच तो जुजबी अवश्यक तेवढच उअडतो, पण एकदा सलग बरच अंतर उडताना पाहीला.
|
Dineshvs
| |
| Tuesday, July 10, 2007 - 4:10 pm: |
|
|
नलिनी, छान फोटो. पण मी असे ऐकलेय कि मोर शेतीचे, खास करुन मिरची आणि कांद्याच्या शेताचे फार नुकसान करतात. बी, तुला खोटे वाटेल पण मोर अगदी जवळुन पहिल्यांदा मी सिन्गापुरलाच, म्युझियमच्या जवळ बघितला. स्मिता, छुंद्यासाठी कैरीच्या किसाला मीठ आणि हळद लावुन जे पाणी सुटते ना, त्यातच ओल्या मिर्या आणि लिंबाच्या फोडी घालुन मुरवतात. त्यात बाकि काहीच घातलेले नसते.
|
कित्ती गोड दिसते आहे लवंग, नेहेमी वाळकी पाहयची सवय असते, आणि इतकं छान फ़ुल गोंडस अस असत लवंगीचं!! खूप छान माहिती दिनेश. मी जवळपास सगळ्या लेखमाला वाचल्या आहेत तुमच्या. खूप आवडल्या. सहज एक विचार मनात अला. ह्या लवन्गीच्या पानांमधे लवंगेसरखि चव असते का?
|
Bee
| |
| Wednesday, July 11, 2007 - 2:35 am: |
|
|
दिनेश, बहुतेक संतोसामधे बघितला असेल... बालीमधे लवंगीचे उत्पादन खूप आहे. म्हणून खूप ठिकाणी भारतात जशी कडूनिंबाची झाडे दिसतात तशी इथे लवंगीची झाडे दिसतात. कच्च्या लवंगीची चव, पानांची चव वाळलेल्या लवंगीसारखीच लागते. नाकातली बेसर कशी दिसते तशा आकाराची असते लवंग. खालील छायाचित्र बालीत घेतलेले आहे..
|
Jo_s
| |
| Wednesday, July 11, 2007 - 5:43 am: |
|
|
गुलबाक्षी च्या बिया काळ्या मिरी सारख्या दिसतात. अगदी लहान पणी मला दोन्ही एकच वाटायच्या.
|
लवंग आणि दागिना यावरून एक लोकगीत आठवले... काय बाई पुण्याची तारीफ लवंगा निघाल्या बारीक सायबाचा बंगला चुन्यानी रंगला, वगैरे... यातील लवंगा निघाल्या बारीक म्हनजे त्याकाळी पुण्यात नाकात घालायच्या बारीक लवंगाची फ्याशन आली होती म्हणे म्हणून जानपद स्त्रियाच्या गाण्यात असे शब्द आले...
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 11, 2007 - 4:31 pm: |
|
|
Marathifan पानाची चव तुरट असते. लवंगेसारखी नसते. बी हो तिथेच बघितला मोर. हा फोटो शेतातला आहे का ? शेतात सहसा लवंगाना फुले येऊ दिली जात नाहीत. Jo_s मिरीमधे भेसळीसाठी पपईच्या बियाही वापरतात. रॉबीन, इथे लवंगांचा संदर्भ दागिन्याशीच आहे ना ? बायकांशी तर नसेल ?
|
दिनेशदा, धन्यवाद. तुमचे सगळेच लेख अप्रतिम असतात पण हा विशेष आवडला. जायफ़ळाच झाड बघायचि झुप इछ्छा होति. Pharmacognosy हा विषय चार वर्षे शिकले चारहि वर्षे लवंग, जाय्फ़ळ इत्यादि अभ्यासात असायचे पण प्रत्यक्ष झाडाचा किंवा फ़ळांचा photo कुठल्याहि textbook मध्ये नाहि सापडला. एक शंका आहे, आम्हाला course मध्ये जायफ़ळ stimulant म्हणुन शिकवल गेल आहे आणि आपल्याकडे (आयुर्वेदात?) मात्र त्याचा झोपेशि संबंध लावला गेलाय हे कस काय?
|
Swa_26
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:39 am: |
|
|
दिनेशदा.... तुमचे लेख अप्रतिम झालेत. आणि योगायोग पहा, मी आता गावी गेलेली तेव्हा तिथे जायफळाचे झाड पाहिले आणि त्याचे फोटो पण काढलेत. हे फळ उकलल्यावर कसले गोड दिसते न!! बाहेरुन पीचसारख्या फळाचे आवरण आणि आत जावित्रीच्या लाल काड्या पांघरून घेतलेले जायफळ पाहिले आणि अगदी डोळ्यांचे पारणे फिटले!!! यानंतर वेलची येणार का दिनेशदा? त्याचेपण झाड पाहिले मी तिकडे
|
Dineshvs
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:18 pm: |
|
|
मराठमोळी, जायफळाचा औषध म्हणुन वापर फारच कमी होतो. त्याची मात्रा किती आहे यावर त्याचे परिणाम अवलंबुन असतात. श्रीखंडात वैगरे जास्त पडले तर डोळ्यावर झाप येते. कमी प्रमाणात ते पचनाला मदत करते. अतिवापर मात्र धोकादायक ठरु शकतो. आपल्याकडे पाककृतित परंपरेने ठरवलेले प्रमाण अगदी योग्य असेच असते. स्वाती, येतेय येतेय, आली पण वेलची.
|
Nalini
| |
| Thursday, July 12, 2007 - 4:54 pm: |
|
|
दिनेशदादा, माझा वेलचीबद्दल मोठा गैरसमज होता. एका काकांसोबत शेतीविषयी छान गप्पा रंगल्या होत्या. मी त्यांना सांगितले की आमच्या घरी वेलचीचे खुप मोठे झाड आहे पण त्याला आलेल्या वेलच्या कोवळ्या असतानाच गळून पडतात. मग त्यांनी मला झाडाचे वर्णन करायला सांगितले. मी सांगितलेले वर्णन असे होते... साधरण माझ्या उंचीएवढे झाड आहे. त्याचे पान किंवा फांदी तोडली तर त्यातुन खुप चिक वहातो. शिवाय ती फांदी तोडून कुठेही टाकली तरी तिथेच रुजायला सुरवात करते. हे सगळे ऐकल्यावर काका मला म्हणाले कि तुमच्याकडे वेलचीचे झाडच नाही, तु म्हणतेस ते वेगळेच झाड आहे. मग त्यांनी मला वेलचीच्या झाडाचे फोटो दाखवले. आता ह्यानंतर दालचीनी का?
|
Dineshvs
| |
| Thursday, July 12, 2007 - 5:16 pm: |
|
|
नलिनी, आता मला उत्सुकता आहे कि, तुझ्याकडे ते कसले झाड आहे ? आणि एक बातमी, मला नाही वाटत भारतात कुठेही खर्या दालचिनीचे झाड असेल. खोट्या दालचिनीची झाडे आपल्याकडच्या जंगलातही आहेत !!!
|
Zakki
| |
| Thursday, July 12, 2007 - 7:41 pm: |
|
|
दालचिनीचे झाड मी नुकतेच व्हिक्टोरिआ बेटावरील फुलपाखरांच्या म्यूझियम मधे पाहिले. त्यांनी, फुलपाखरांच्या सोयीसाठी, तर्हतर्हेची झाडे मुद्दाम लावली आहेत. त्यात हे झाड होते. खर्या दालचिनीचे होते की खोट्या माहित नाही, पण शेवटी, 'ज़िंदगी ख्वाब है, ख्वाबमे, झूठ क्या और भला सचहि क्या!' नाहीतरी साखरे ऐवजी स्प्लेंडा, फॅट फ्री दूध, खोट्या लोकरीचे ( Acrylic )स्वेटर, अल्कोहोल नसलेली बीअर, असल्याच गोष्टी आजकाल प्रचलित आहेत.
|
'ज़िंदगी ख्वाब है, ख्वाबमे, झूठ क्या और भला सचहि क्या!' >>>>> भले! (किंवा बल्ले बल्ले). हे गाणे मोतीलाल नावाचा महान नट हातात बाटली घेऊन अन नवटाक झोकून फूटपायरीवरून झोकांड्या खात म्हणत जातो!! आता याना दालचिनी खरी की खोटी हे ओळखण्याइतकेही भान राहू नये..? छे! छे!! हे भारतीय जिथे तिथे लाज आणतात मग ते अंजनगाव सुर्जीचा बस अड्डा असो अगर व्हिक्टोरिआ बेटाचे म्युझियम असो!! म्हणा मायबोलीवाल्यानो 'जिन्दगी ख्वाब है..." हो क्की नाहि रे दिने sssss श..................?
|
Bee
| |
| Friday, July 13, 2007 - 7:50 am: |
|
|
दिनेश, मी बालीली खूप उंचावर गेलेलो त्यावेळी मला लवंगाची झाडे दिसली. पण जायफ़ळ नाही पाहिले मी तिथे. आपली वेलची जायफळ घालुन केलेली कॉफ़ी, म्हणजे खास आपली निर्मिती आहे. तुर्कस्तान किंवा अरब जगतात वेलची आणि कॉफ़ी उकळुन जो काहवा नावाचा प्रकार करतात, तो मात्र आपल्या घश्याखाली उतरणे कठिण असते. >>> खरच का? मग ब्रांडचे नाव माहिती असेल तर द्या ना.. तुम्ही काढ्याचा उल्लेख नाही केला. आपल्याकडच्या काढ्यात जायफ़ळ टाकतात ना..
|
मग ब्रांडचे नाव माहिती असेल तर द्या ना.. >>>> ब्रांडसाठी बोवाजीना भेटा त्या तिकडे पलिकडे.. तो पहा तिकडून आवाज येतोय.. 'जिंदगी ख्वाब है.. और ख्वाबमे..
|
Dineshvs
| |
| Friday, July 13, 2007 - 5:11 pm: |
|
|
विशाळगडावरुन टिपलेला हा स्पॉटलाईट.
|
Ksmita
| |
| Friday, July 13, 2007 - 5:50 pm: |
|
|
केवळ अप्रतिम !! सकाळीच मस्त treat मिळाली या फ़ोटोची फ़ोटो save हि करून ठेवला आहे
|
वेलचीच झाड बघुन वाटलेच नाही याला वेलची येत असतिल. तमालपत्र आणी दालचिनीचा काही संबध असेल असे ही वाटले नाही..गंमतच आहे सगळी.. निर्सग बडा किमयागार.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|