|
Dineshvs
| |
| Friday, July 06, 2007 - 2:07 am: |
|
|
वा भाग्य, छान माहिती दिलीस. झाडाखाली फळे असली कि त्याला किटक लागलेले असतातच. गायी पण खातात हि फळे. आता तुलाही ओळखु येईल हे झाड.
|
Jo_s
| |
| Saturday, July 07, 2007 - 8:48 am: |
|
|
धन्यवाद दिनेश, काय सुंदर फुल आहे्, तुझ्या कष्टांमूळे आम्हाला पहायला मिळतय, माहीती मिळत्ये ते वेगळच. दिनेश रोज सकाळीही झांडाना त्रास करत फुलं काढणारे दिसतात, ओरबाडून काढतात अगदी. श्री. धामणसकरांनी यावर एक छान कविता लिहिली आहे. मला नीट आठवत नाही, पण ती साधारण अशी आहे. पहाटेची वेळ, झाडांवर वेलींवर अनेक तारे फुलले आहेत थोड्याच वेळात काही श्वापदं त्या झाडांवर हल्ले करतील हातांनी आणि काठ्यानी त्याना ओरबाडतील व ते सारे तारे त्यांच्या परडीत गोळा झालेले असतील आणि सकाळ होताच एक वदंता त्या झाडांच्या दुखऱ्या मुळांपर्यंत पोहोचेल की या झाडांना हल्ली फुलच येत नाहीत...
|
Dineshvs
| |
| Saturday, July 07, 2007 - 4:22 pm: |
|
|
Jo_s फ़ुले म्हणजे झडांची केवळ जाहिरातबाजी. त्यातही स्वार्थ आहेच, हे सगळे माहित असुनही, फ़ुले तोडणे हि कल्पनाच मला सहन होत नाही. फुलदाणीतल्या पुष्परचनाही कृत्रिम वाटायला लागल्या आहेत हल्ली. आपल्या भावजीवनातुन फुलेच नाहिशी व्हायला लागलीत आताश्या. नाहीतर उंडीचे फुलणेही काव्यविषय झाला असता. हि फुले तुम्हा कविमंडळींच्या रोजच्या बघण्यातली नाहीत म्हणुन, नाहीतर एकेका फुलावर अनेक कविता झाल्या असत्या. मी बापडा ते नाही करु शकत.
|
Jo_s
| |
| Sunday, July 08, 2007 - 9:11 am: |
|
|
खरय दिनेश आपल्या जिवनातून फुलेच नाही तर भावही नाहीसे व्हायला लागलेत. सगळच कृत्रीम वाटतं हल्ली. पुर्वी सदिच्छा व्यक्त करायला बुके लागत नसत; गुड मॉर्नींग, आफ्टरनून इ. सगळच कृत्रीम. ग्रिटीगज ची गरज नव्हती. चेहेरा,छोटीशी कृती तुमच्या सदिच्छा पोहोचवत असत. हल्ली ही निरनीराळी फुले पहाण्यात येत नाहीत हेही तितकच खरं. आणि दोन वर्षा पूर्वीची आणि आताची वेताळ टेकडीची अवस्था पाहून, जे थोडे सोर्स शिल्लक आहेत ते ही लवकरच नाहीसे होतील अशी भिती वाटते. सुधीर
|
Dineshvs
| |
| Sunday, July 08, 2007 - 4:02 pm: |
|
|
आज एका भर रहदारीच्या हायवेपासुन केवळ दहा फ़ुटांवर हे वैभव बघितले. तसे आम्हाला हे दुर्मिळ नाही, पण कॅमेरात पकडणे शक्य झाले नव्हते आजवर.
|
Anilbhai
| |
| Sunday, July 08, 2007 - 5:00 pm: |
|
|
आ हा हा, २ दिवसापुर्वी बहामाच्या झु मधे बघितले मोर. अगदी जवळुन पिसारा फ़ुलवुन नाचणारे.
|
Shyamli
| |
| Sunday, July 08, 2007 - 5:32 pm: |
|
|
आहा!! काय सुंदर, हा नुसता दिसण सुधा किती आनंद देणारं आहे त्याच्या पाठीमागे दोस्तपण दिस्तोय याचा
|
दिनेश, खुपच मस्त माहिती मिळतीये तुमच्या लेखांतून, धन्यवाद. मोराचा फोटो पाहुन आठवलं, पुण्यात असताना, पर्वती च्या मागे, वाघजई टेकडीवर जेव्हा फ़िरायला जात असु, तेव्हा तिकडे रोज भरपुर मोर दिसायचे. एकदा पावसाळ्यात मस्त पिसारा फ़ुलवुन रमलेला मोर पण दिसला.
|
सगळी फ़ुलं खूप सुंदर आहेत .
|
Jo_s
| |
| Monday, July 09, 2007 - 4:15 am: |
|
|
वा दिनेश मस्तच आहे हा फोटो, पुण्यात आलास तर वेताळ टेकडीला अवश्य भेट दे, तिथे ६०-७० मोर आहेत. इतर पक्षीही भरपुर आहेत. गेल्या पावसाळ्यात निरनिराळ्या रंगांचे चतुरही होते. हे मी काढलेले काही फोटो.
|
Jo_s
| |
| Monday, July 09, 2007 - 4:32 am: |
|
|
|
Avv
| |
| Monday, July 09, 2007 - 4:36 am: |
|
|
मोर, काय विषय आहे हा! शब्दांचे तोकडेपण जाणवुन देणारा. गुजरात राज्स्थानात आजही मोर खूप दिसतात. अहमदाबाद शहरातही आजसुद्धा घरांच्या गच्चीवर सहजपणे दिसतात. इतक्या सुरेख अवर्णनीय सौंदर्य असणार्या मोराच्या डोळ्यातले भाव मात्र अगदी क्रुर असतात. हे मोर ख़ारे दाणे अगदी आवडीने खातात! आता सप्टेंबराक्टोबरमध्ये त्यांची पिसे गळून अगदी भुंडे होतात ते. मोर नाचत असतो आणि आजूबाज़ूच्या लांडोरी अगदी निर्विकारपणे दाणे टिपत असतात. बघण्यासारखे असतो तो निर्विकारपणा.
|
Cool
| |
| Monday, July 09, 2007 - 6:37 am: |
|
|
पुण्याजवळ शिरुर तालुक्यात (?) मोराची चिंचोली नावाचे गाव आहे तिकडे झुंडीने बघायला मिळतात मोर. बर्याचश्या संस्था या चिंचोलीसाठी 'निसर्ग यात्रा' सुद्धा आयोजीत करतात.
|
Phdixit
| |
| Monday, July 09, 2007 - 7:28 am: |
|
|
वा दिनेशदा मस्तच, एक एक फुल , झाड त्याची वैशिष्टे एक्दम सुंदर मांडले आहेत. जो मस्त फोटो टिपले आहेत. Cool कधी जायचे चिंचोलीला ??
|
Bee
| |
| Monday, July 09, 2007 - 7:45 am: |
|
|
दिनेश, नागणी सुंदर आहे दिसायला. वळख करून दिल्याबद्दल आभारी आहे.. मला पावसाच्या पाण्यात भिजलेली पाने, फ़ुले, कळ्या खूप खूप आवडतात.. नागणी, इथे पावसात न्हालेली दिसते आहे.
|
Dineshvs
| |
| Monday, July 09, 2007 - 5:40 pm: |
|
|
जो छान आहेत फोटो. कूल मी वाचलय मोराच्या चिंचोलीबद्दल. फार पुर्वी कर्नाळ्याला दुरंगी मोर होता. काहि पिसे पांढरी तर काहि निळी. नंतर तसा मोर कधीच पाहिला नाही. घाटातुन झाताना गाडीसमोरुन झपकन जाणारा मोर खुप वेळा बघितलाय मी. वरचा फोटो काढलाय त्या भागात, साप, मुंगुस, घोरपडी सहज दिसतात. मोर तसा सहज माणसाळतो. वरच्या फोटोतल्या मोरांशी दुसर्या दिवशीच दोस्ती झाली होती. पहिल्या दिवशी दहा बारा होते, मला बघुन उडुन गेले. दुसर्या दिवशी फोटो काढु दिला. पण त्यांची माझी वेळ रोज जुळवता येत नाही. खरे तर एवढा मोठा पक्षी उडत असेल असे वाटत नाही. पण तो उडताना बघणे म्हणजे पर्वणीच असते.
|
Nalini
| |
| Monday, July 09, 2007 - 8:16 pm: |
|
|
पहारेकर्यांची अदलाबदल.
|
Nalini
| |
| Monday, July 09, 2007 - 8:17 pm: |
|
|
|
Bhagya
| |
| Monday, July 09, 2007 - 11:40 pm: |
|
|
मोर छानच. मुक्त नाचणारे मोर कमीच पहायला मिळतात. सतत निसर्गाच्या जवळ राहणार्याला काय कमी? नलूचा पांढरा मोर तर खुपच सुंदर. आणि मिरची पोर्तुगीजांनी आणली? हे मात्र नाहितच नव्हतं. तशी त्यांची पिरि पिरि नावाची मिरची (आणि त्याच नावाचं चिकन) प्रसिद्ध आहे. ही मिरची आणि थाई रेड चिली दिसायला सारख्याच. काही म्हणा, पण भारतीयच फ़क्त तिखट मिरच्या खातात ही माझी समजुत अगदी खोटी ठरलीय गेल्या काही वर्षात. मसाल्याचा विषय सुरु केल्याबद्दल धन्यवाद दिनेशदा. मिरी पांढरी आणि काळी बघितलीय, पण अशी लाल प्रथमच बघितली. आणि मिरी एकच, पण साल असतानाची काळी आणि साल काढल्यावरची पान्ढरी या दोन्हीची चव अगदी वेगळी जाणवते.
|
Ksmita
| |
| Tuesday, July 10, 2007 - 1:07 am: |
|
|
वा मस्तच सुरु आहे लेखमाला ! बरेच दिवसानी आले इकडे बलसाडला लिलमरी खाल्ल्याचे आठवत आहे पूर्वी . मी विसरुनच गेले होते हे लोणचे आता बघतेच इकडे कुठे मिळतेय का ते ! नाहीतर दिनेश तुम्ही लिहा रेसिपी please !! jo_s,nalini मस्त फ़ोटो आहेत मोरांचे
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|