|
Zakasrao
| |
| Friday, June 29, 2007 - 5:07 am: |
|
|
दा ठान्कु. दुकानाच नाव कळाल असत तर बर झाल असत. बर ते ही जावु दे. पण भवानी मंदिराकडुन शिवाजी पुतळ्याकडे की उलटे हे जरा स्पष्ट करा. असो ह्या महिन्यात जाइन बहुतेक त्यावेळी बघु. गिरि स्व्-स्तुति अध्याय कळाला आता दुसर्याची कुस्तुति अध्याय कितवा ते हि लिहि पुढच्या वेळी कुस्तुस्ती केल्यानंतर. आणी हो तुला भेटलो त्यावेळी तो कोणी निगर्वी भेटणार होता मला त्याला आणला नाहिस का?
|
Dineshvs
| |
| Friday, June 29, 2007 - 4:57 pm: |
|
|
झकास शिवाजी पुतळ्याकडे गेले कि. तिथे एकच मिठाईचे दुकान आहे. आता मिठाईकडे बघु कि नाव बघु ? बाहेरच बोर्डावर लिहिलेले असतात, आजचे ताजे पदार्थ.
|
Abhijit
| |
| Friday, June 29, 2007 - 11:48 pm: |
|
|
" संगीत चिवडा " हे तर नव्हे ते दुकान? तिथे गुलकंद बर्फी पण ए - वन मिळते!
|
Lalu
| |
| Saturday, June 30, 2007 - 11:25 pm: |
|
|
"संगीत चिवडा" महाद्वार रोड वर आहे ना... दिनेश "पुरोहित" म्हणत असतील बहुतेक. ते भवानी चेंबर्स बिल्डिन्ग मधले.
|
Karadkar
| |
| Tuesday, July 03, 2007 - 5:50 pm: |
|
|
आज सकाळि येताना आमच्या इथल्या central expressway वर यावे लागले. bay area मधे रहाणार्यांना कळेल मी काय म्हणतेय ते. तर तिथे साधारण Whisman पसुन ते Rengstorff पर्यन्त डाव्या बाजुला पूर्ण पर्जन्यव्रुक्षाची झाडे आहेत. सध्य मस्त फ़ुलली आहेत. अभिजित, शिल्पा, MG पाहुन या जमत असेल तर.
|
Abhijit
| |
| Tuesday, July 03, 2007 - 8:02 pm: |
|
|
central expressway west or east?
|
Karadkar
| |
| Tuesday, July 03, 2007 - 8:37 pm: |
|
|
Central Expressway West (from Sunnyvale towards Mt. View)
|
Karadkar
| |
| Tuesday, July 03, 2007 - 9:56 pm: |
|
|
जॅकरांडा पण आहे तिथे एक! दिनेश, तुम्हाला धन्यवाद. ते दिसल्यावर कळले तरी काय आहे ते
|
Jo_s
| |
| Wednesday, July 04, 2007 - 8:25 am: |
|
|
वा, शाळेची आठवण झाली, आमच्या शाळेजवळच असच भेंडीसारखं झाड होतं, त्याच्या टणक फळांना लांब देठ होतं, त्यामूळे बरीच मुलं त्याच्या फळांचा दुसऱ्याच्या डोक्यात मारायला उपयोग करायची. दिनेश तीथेच काही फुल पडलेली असायची त्याच्या आतला भाग मखमली असायचा याच झाडाची आहेत का ही फुलं?
|
झकास शिवाजी पुतळ्याकडे गेले कि. तिथे एकच मिठाईचे दुकान आहे tumhala VIJAYBHUVAN baddal bolayche aahe ka ?
|
Nalini
| |
| Wednesday, July 04, 2007 - 11:34 am: |
|
|
भेंडीची कळी घेऊन आम्ही तिचा भिंगरी म्हणून वापर करायचो. पान गोल गुंडाळले कि एका बाजूने त्या नळीचे तोंड चेपायचे आणि त्या बाजुने पिपानी वाजवायची.
|
Dineshvs
| |
| Wednesday, July 04, 2007 - 4:44 pm: |
|
|
लालु बहुतेक पुरोहितच असणार ते. परत गेलो कि बघीन नीट. साधारण माहिम हलव्यासारखाच प्रकार असतो तो. Jo_s तेच फुल बहुतेक. मिनोती, झकरांदाची निळाई काय वर्णावी ! नलिनी, नगरमधे भेंडीची झाडे असतील असे वाटले नव्हते.
|
Nalini
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:31 pm: |
|
|
दिनेशदादा, नगर भागात बर्याच ठिकाणी आहेत भेंडीची झाडे. गाय किंवा म्हैस बर्याच दिवसांपासुन लागत नाही अशी ज्यांची तक्रार असे ते लोक आमच्या झाडाच्या भेंड्या तोडून नेत, गायीला/ म्हशीला खायला घालायला. माकडांना(वानरांना) ह्या भेंड्या, कळ्या, फूलं आवडीने खाताना मी खुपदा पाहिलय.
|
Zelam
| |
| Wednesday, July 04, 2007 - 5:35 pm: |
|
|
दिनेशदा धन्य आहे तुमची. बाकी मस्तच चालू आहे हे सदर. करमळीचं फूल खूपच आवडलं.
|
Bhagya
| |
| Thursday, July 05, 2007 - 4:06 am: |
|
|
दिनेशदा, या झाडांच्या वर्णनात हाफ़ सेंचुरी गाठल्याबद्दल अभिनंदन, ज्या वेगाने लिखाण पुढे जातंय त्या वेगानी सेन्चुरी पण लवकरच गाठेल. खुप विचार करूनही हे dillenia Indica हे झाड कधी बघितल्याचे आठवत नाही. असे झाड असेल हे माहितिपण नव्हते. धन्य आहे त्या मुलीची, एकच होते ते फ़ूल तोडावे? एवढे मोठे डोक्यात पण लावता आले नसेल. मी बरेच दिवसांपुर्वी एका फ़ुले येणार्या झाडाबद्दल विचारले होते, त्याचे नाव आहे the sacred Barna. इतकीच माहिती मिळाली.... याची पण फ़ुले खुप सुंदर असतात.
|
Zakasrao
| |
| Thursday, July 05, 2007 - 5:38 am: |
|
|
वा! दिनेशदा खुप मस्त आहे ते फ़ुल. पण तुम्ही मला सांगितल होत त्या फ़ुलाचा फ़ोटो पण मला नाही जमल अजुनही ह्या रविवारी जाणार आहे कोल्हापुरला बघु. एका मित्राला बोलुन ठवलय पण त्याला वेळ मिळायला हवा. तुम्हाला माझा फ़ोन नं देतो मेल मधुन तुमचा नं देवुन ठेवा. जर गेलो आणि ऐन वेळी नाव नाहीच आठवल तर विचारायला बर.
|
दिनेशदा खरच वाचुन तर माझाही संताप झाला.. इअतके सुंदर फ़ुल कुणाला असे तोडावे वाटतेच कसे? त्यासाठी या इकडच्या लोकांना मानावे लागेल.. सारवजानिक ठिकाणी आणि जंगलात सुध्दा कधी फ़ुले तोडत नाहित अगदी लहान मुल सुध्दा नाही. बाकि लेख आणि फोटो खुप सुंदर..!!!
|
Bee
| |
| Thursday, July 05, 2007 - 9:12 am: |
|
|
करमळ, अप्रतीम आहे खरचं.
|
Dineshvs
| |
| Thursday, July 05, 2007 - 3:46 pm: |
|
|
दोस्तानो, माझ्या छंदात तूम्हीही सहभागी होताहात हे बघुन छान वाटतय. पण फुलांकडे निव्वळ कलाकृति म्हणुन बघण्याची दृष्टी, खरेच अनेक लोकांकडे नसते. या फुलाचा फोटो मिळवायचाच असा ध्यासच घेतला होता. तोपर्यंत लिहायचेच नाही, या फुलाबद्दल असे ठरवले होते. झकासला पण विनंति केली होती. ( मला खात्री आहे आता नक्कीच स्वारी या फुलाचा मागोवा घेणार. लोपा, नलिनी, भाग्य, रचना, मिनोति मंडळीना वर्णनावरुन चित्र काढायची विनंती पण करणार होतो. नेटवरपण याचा फोटो नाही सापडला. ) हा वृक्ष दुर्मिळ नाही, याची फुले मात्र सहसा बघायला मिळत नाहीत.
|
Bhagya
| |
| Friday, July 06, 2007 - 12:23 am: |
|
|
काल मुद्दाम DC Cowen चे पुस्तक वाचले. त्यात ह्या करमळीच्या बद्दल छान माहिती मिळाली- पाण्याकाठी जर करमळीचे झाड असेल, तर त्याची फ़ळे पाण्यात पडतात व न बुडता तरंगतात. ही फ़ळे हत्तींना खूप आवडतात आणि त्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बिया जमिनीत रुजतात. पण पाण्याकाठचे झाड नसेल तर? या फ़ळाचे कठीण आवरण भेदून बियांना रुजण्यासाठी बाहेर येणे अशक्यच असते. त्यासाठी निसर्गाने एक युक्ती केली आहे. फ़ळ जमिनीवर पडले, की वाळून आक्रसते. मुंग्या- वाळवी फ़ळ भेदून, आतल्या बिया सोडून सगळा भाग खातात आणि मग जून्-जुलै मध्ये पाउस पडला, की या बिया रुजतात.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|