|
Dineshvs
| |
| Monday, June 25, 2007 - 4:31 pm: |
| 
|
लोपा, बर्याच दिवसानी ! या फोटोनी, तूला चित्रासाठी प्रेरणा मिळेल ना ?
|
Bhagya
| |
| Tuesday, June 26, 2007 - 1:43 am: |
| 
|
ही कळलावी पुण्याहून मुम्बैला जाताना खंडाळा- लोणावळा इथल्या झाडीत पाहिल्याचे आठवते. नागपूरला पण पावसाळ्यात येते. मला वाटतं, इथल्या अंजीरांची पाने अशीच मोठाड असतात. मुठेईवढी त्यांची फ़ळे असतात. आणि पिंपळाची सळसळ आणि टाळ्या.... खुपच छान लिहिलय दिनेशदा. लोपाशी सहमत.... हे एक पुस्तकच झालेय छानसे. दिनेशदा, पारिजात झालाय का लिहून?
|
Bee
| |
| Tuesday, June 26, 2007 - 6:09 am: |
| 
|
दिनेशदा, मी नंतरचे बरेच लेख आज वाचलेत. छान. मधेच थांबलात का विश्रांती घेतली आहे. अजून सुचत असेल तर लिहा ही विनंती. मलाही लिहावसं वाटतं पण लेख होईल इतकी माहिती जवळ नसते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, June 26, 2007 - 4:41 pm: |
| 
|
भाग्य, तिथली अंजिरे खासच असतात. आता लिहीनच. पारिजात व्हायचाय अजुन. बी, माझ्या लेखाला पुरक असे लिहीत जा. सगळ्याचे छान संकलन करु मग.
|
Ksha
| |
| Tuesday, June 26, 2007 - 7:25 pm: |
| 
|
दिनेश, एक छोटीशी सुधारणा. कोलकत्त्याचे वडाचे झाड हे जगातले सगळ्यात मोठे "वडाचे" झाड आहे. सर्वात मोठ्या झाडाचा मान कँलिफोर्नियामधील (Sequoias & coast redwoods) झाडाकडे जातो. सुधारणा नाही ही खरंतर, फक्त तुमच्या शब्दांचा "हेच सगळ्यात मोठे झाड" असा अर्थ निघत होता म्हणून .. बाकी एव्हढं लिखाण एकत्र करताय ही चांगली गोष्ट आहे. राहून राहून "माधव चौधरीं"ची आठवण आल्याशिवाय राहत नाही. चालू द्या
|
Bhagya
| |
| Wednesday, June 27, 2007 - 1:21 am: |
| 
|
दिनेशदा, थोडे विषयांतर... इथली अंजीरे खासच असतात, पण चव आपल्याकडच्या अंजिरांची जास्त चांगली वाटते. अंजिरे विपुल होणार्या प्रदेशात इटली, ग्रीस आणि स्पेन प्रामुख्याने येतात. तिथले हवामान त्यासाठी पोषक असते. यातल्या काही जातीत फ़ळांत पाण्याचे प्रमाण थोडे जास्त असते, पण फ़ळे मोठी आणि पानेही खूप मोठी असतात. पण एकूणच जी विविधता आपल्याकडे झाडांत आणि फ़ळांत आढळून येते, ती मला कुठेही दुसरीकडे आढळली नाही. ईथे queensland ला सगळ्या तर्हेची फ़ळे जसे की पपई, आंबा, पेरु, केळी यांची लागवड होते, पण चव भारतीय फ़ळांची नाहीच. पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने चव फ़िकी वाटते. तसेच भाज्यांचेही आहे. पालक, वांगी, कोबी सगळी पांचट. कदाचीत भारतासारखे हवामान असलेल्या देशांत भाजीपाला व फ़ळे जास्त चवदार असावा.
|
Zakasrao
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:03 am: |
| 
|
इथे फ़िडबॅक मध्ये वाचताना अंजिराचा उल्लेख आला तो वाचुन काल खाल्लेल्या natural मधील अंजिर ice cream आठवल. अहाहा! त्यानी फ़क्त त्यात फ़्लेव्हर न घालता अंजीर घातले आहे. मस्त लागते. दिनेशदा तुम्ही सांगितलेल काम होइना. आता मीच जाणार आहे त्यावेळी बघतो.
|
Cool
| |
| Wednesday, June 27, 2007 - 5:50 am: |
| 
|
माझ्या माहितीप्रमाणे माझ्या नगर जिल्ह्यातील संगमनेर जवळ एका गावात (नाव विसरलो नेमके )काही एकर पसरलेले एक वडाचे झाड आहे. आम्ही दुर्गभ्रमणाच्या निमित्ताने एकदा अलिबाग जवळील खांदेरी (जिकडे परवा पावसात दोन बोटी बुडाल्या) या जलदुर्गावर गेलो होतो. त्या खांदेरीत संपुर्ण बेटावर एकच वडाचे झाड भरुन राहीले आहे. कुठे सुरु होते कुठे संपते काही कळत नाहि. याचा एक फोटो खाली देत आहे

|
दिनेशदा तुमचे लिखाण फोटो सारे काही प्रेरणादायी आहे. वडाचे झाड मी बेंगलोर जवळ देखिल खुप मोठ्थे (काही एकर) पाहिल्याचे आठवतेय. सगळेच लेख मस्त आहेत
|
Bee
| |
| Wednesday, June 27, 2007 - 6:02 am: |
| 
|
लग्नाचे भलेमोठे ७ मंडप बसतील इतके मोठे वडाचे झाड अंबाशी ह्या खेडेगावात आहे. हे गाव विदर्भात बहुतेक वाशिम की अकोला जिल्यात येते.
|
Phdixit
| |
| Wednesday, June 27, 2007 - 6:19 am: |
| 
|
दिनेशदा वडाच्या झाडाचे तेला बद्दल उल्लेख केला म्हणुन लिहीतो, आगदी मागच्या वर्षि पर्यंत आमच्या घरी ह्या प्रकारचे तेल करण्याचा कार्यक्रम असायचा आणी मला बरेच वेळा आई वडाच्या कोवळ्या पारंब्या घेउन येण्यासाठी सांगायची. पावसाळ्याच्या दिवसात माका, ब्रह्मी गारवेल, आणी वडाच्या पारंब्याना येणारा कोवळा फुटवा तेल करण्यासाठी वापरला जातो. ह्याच्या जोडीने आई जास्वंदाचे ही तेल तयार करायची. >>>>>>कुल त्या गावाचे नाव पाम्नेर ना ??
|
Avv
| |
| Wednesday, June 27, 2007 - 9:10 am: |
| 
|
खूप छान लिखाण होते आहे. अजिबात बोअर होत नाहिये. तुमच्या फोटोमुळे आमच्या बाल्कनीत येणारे सुन्दर मॉव्ह रन्गान्ची फुले असणारे झाड करन्जाचे आहे ते कळले. लिहित रहा. तुम्ही आणि ज्योतिष्यवाले नक्षत्रव्रुक्षांबद्द्ल का नाही लिहित? डहाणूकर मॉडमचे एक पुस्तक आहे. पण ते थोडे तुटक वाटते. कदाचित तुम्ही तो विषय पुढे नेऊ शकाल. तुमचे अभिनंदन!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, June 27, 2007 - 3:43 pm: |
| 
|
Ksha बरोबर आहे, सगळ्यात मोठे वडाचे झाडच म्हणायचे होते मला. बघतो सुधारता येते का ते. भाग्य, आपल्याकडेही छान अंजिरे होतात. भुमध्य समुद्राच्या परिसरात छान अंजिरे होतात. त्यात इरण, पण आले. झकास, कोल्हापुरात अंजिराचा हलवा पण मिळतो. कूल, बहुतेक पारनेरचे झाड आहे ते. अगदी फालतु उल्लेख करतो पण गीता मेरा नाम नावाच्या सिनेमात, साधना, फ़िरोज खान ( फ़रदीन खानचे बाबा ) आणि हेलनवर ( सलमान खानची सावत्र आई ) वर एक गाणे चित्रीत झालेय, ते अश्याच एक भल्यामोठ्या वडाच्या छायेत. Phdixit हे तेल खरेच डोक्याला थंडावा देते. बी, वडाला वाव मिळाला तर ते असे पसरते. पण खुपदा खालुन रस्ता, पार वैगरे असतो. मग असा विस्तार होत नाही. Avv आभार
|
Nalini
| |
| Wednesday, June 27, 2007 - 6:04 pm: |
| 
|
मी खुप उंबरं खाल्लीत. माझ्या माहेरी खुप मोठे उंबराचे झाड आहे. बाजुलाच भली मोठी विहिरपण आहे. माझ्या पहाण्यात आहे की उंबराच्या झाडाखाली श्री दत्त गुरुंचा फोटो किंवा मुर्ती ठेवलेली असते आणि एक महादेवाची पिंड पण असते. मी लहानपणी एक गोष्ट ऐकली होती की आमच्या शेजारच्या वस्तीवरच्या एका आजींना उंबराचे फूल दिसले होते. आणि चक्क फुलाची एक पाकळी खाली गळाली होती आणि त्या आजी त्यावर बसल्या होत्या. त्यांच्या मळ्यात देवीचे मोठे मंदिर आहे त्यामुळे बहुतेक देवीच्या कृपेने त्यांना एकटिलाच ते फूल दिसले असावे अशी चर्चा होती. त्या आजींना पाहिल्यावर मी माझ्या आजीला विचारले होते कि ह्यांना बसायला फुलाची पाकळी कित्ती मोठी असायला हवी, नाही? माझ्या आजीने मला डोळ्यानेच दापले. मी आजीला हे पण विचारायचे की तु दररोज ह्या झाडाची पुजा करतेस मग तुला का नाही दिसले फूल, त्या आजींसारखे. जेव्हा माझी मोठी बहिण ११ वी ला गेली तेव्हा तिने सांगितले की उंबरात आणि अंजिरात खूप फुलं असतात आणि ती सगळी फळातच असतात. दिनेशदादा, उंबराचे एवढे उपयोग आजवर माहित नव्हते.
|
Zakasrao
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:18 am: |
| 
|
झकास, कोल्हापुरात अंजिराचा हलवा पण मिळतो>>>> कुठे लवकर सांगा. चव घ्यावी म्हणतोय. BTW उंबर आणि अंजिर ह्यात बरेच जण गल्लत करतात. नेमका फ़रक काय हे जरा स्पष्ट झाले तर बर होइल. माझ्या मेव्हण्याची बायको आहे ती उंबरालाच अंजिर म्हणते आणि अंजिराला काय ते माहित नाही. पण हा मात्र तिला बावळट म्हणतो त्यामुळे.
|
Cool
| |
| Thursday, June 28, 2007 - 7:30 am: |
| 
|
उंबर आणि अंजिर ह्यात बरेच जण गल्लत करतात >> मी पण त्यातलाच .. जरा कुणितरी सांगा बरं
|
पिकलेल्या उंबराची साल लाल-गुलाबी असते तर अंजिराची पर्पल / फिकट हिरवी अशी असते. (आजपर्यंत पाहण्यात आले त्यावरून) आणि अर्थातच चवीत फरक असतो. BTW, उंबराला हिंदीत (किंवा गुजरातीत) काय म्हणतात?
|
Giriraj
| |
| Thursday, June 28, 2007 - 12:39 pm: |
| 
|
उंबर्- फ़ळ खूप पिकले तरी थोडा कडकपणा(अंजीराच्या तुलनेत) टिकवून ठेवते. फ़ळाची साल लालसर रंगाची असते. फ़ळात पाणी कमी असते. किडे खूप असतात अंजीर्- फ़ळ मऊ आणि लिबलिबित असते. रंग जंभळटपणाकडे झुकणारा लालसर असतो. पाण्याचा अंश खूप असतो आणि त्यामुळीच सालही थोडीशी परदर्शक असल्यासारखी दिसते. (उंबराची आणि माझी साथ अनेक वर्षे टिकून होती. बालपणी एक उंबर आमच्या वाड्यात माझ्याच वयाचा होता. पुढे प्रत्येक नव्या घरात उंबर असायचाच. सुट्टीमध्ये झाडाव्र बसून पुस्तक वचायला खूप मजा येत असे. तसेच खूप उंबरे लागली की गोळा करून नेमकी चांगली उंबरे खाण्यात भरपूर TP होत असे. त्यात झाडाची उंची विसेक फ़ूटापेक्षा जास्त नसते त्यामुळे चढणेही अगदी सोप्पे असते आणि घरच्यांचा मारही बसत नाही. जांभळावर चढले तर मात्र हमखास मार खावा लागतो स्वस्तुतिपुराण अध्याय १०१ समाप्त!)
|
Dineshvs
| |
| Thursday, June 28, 2007 - 4:02 pm: |
| 
|
सगळ्या अजाण बालकांसाठी अंजिराबद्दल लिहिले आहे. झकास भवानी मंडपाच्या बाजुने. मोठ्या दरवाज्यातुन बाहेर पडल्यावर, उजव्या हाताला एक मोठे मिठाईचे दुकान आहे तिथे, अंजिर, अननस वैगरेचा हलवा मिळतो.
|
Dhumketu
| |
| Friday, June 29, 2007 - 4:44 am: |
| 
|
जांभळाच्या झाडावरून पडले की माणूस मरतो असे लहानपणी ऐकले होते. बहूतेक त्याच्या फ़ांद्या मजबूत नसतात आणी कधीही तुटू शकतात असेही ऐकले होते. कदाचीत तेच करण असेल. आमच्या मागच्या घराच्या अंगणात जांभळाचे झाड आहे.. लहाणपणी आवळा, रामफ़ळ, कडुलिंब अश्या अंगणातील झाडांवर चढणे व्हायचे.. पण जांभळावर चढणे होत नसे.. त्यावर आमच्यातला एक पट्टीचा चढणारा आरीफ़ म्हणून एक चढत असे. तो चढेल तेव्हाच न फ़ुटलेली जांभळे मिळायची... :-आनंद
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|