|
Cool
| |
| Friday, June 08, 2007 - 6:56 pm: |
|
|
आमच्या नेवाश्याच्या द्यानेश्वर मंदिराच्या परिसरात (द्यानेश्वरीचे जन्मस्थळ) कवठाची भरपुर झाडी बघायला मिळतात. इतरत्रही कवठाचे प्रमाण बर्यापैकी आहे. (वड पिंपळ याच्या नंतर भुताच्या कथा या कवठाच्या बाबतीत प्रचलीत असतात
|
दिनेश, येव्हढ्या भ्रमंतीला आणि लिखाणाला वेळ कसा मिळतो? रानमेव्यावरच जगता कि काय? खूपच वाचनिय आहे. धन्यवाद.
|
Dineshvs
| |
| Saturday, June 09, 2007 - 3:15 am: |
|
|
सुभाष, आपण गेलो होतो त्यावेळी तेच तर शोधत होतो मी. विकास, भटकंती आत्ताची नाही, आयुष्यभरातली. आणि लिखाणाची आता सवय झालीय. त्याला फारसा वेळ लागत नाही.
|
अरे कूल, तु नेवाशाचा आहेस? माझी आईचं लहानपण तिथेच गेले. मी गेलेली आहे बर्याचदा नेवाशाला. मस्त ठिकाण आहे.
|
Zakasrao
| |
| Saturday, June 09, 2007 - 7:55 am: |
|
|
कराडकर सत्यनारायणाच्या पुजेला बेल,फ़ुले,तुळस,केवडा आणि मध्यभागी कमळ अस घालतात. हे सर्व तो भटजी कथा सांगत असताना जो कोणी ओउजेला बसला आहे त्याने घालुन छान गोलाकार सजावट करायची असते. दिनेशदा मी नृसिंहवाडीची बर्फ़ी खाल्ली आहे. मला तर आवडली होती. आणि तिथला पेढा पण. महाशिवरात्रीच्या दुसर्या दिवशी कवठ आमटीत घातलेल असायच.
|
Dhumketu
| |
| Monday, June 11, 2007 - 7:17 am: |
|
|
सई ने मध्ये जंगली महाराज रोडवरच्या झाडांचा उल्लेख केला होता. आज पाहीले तर दिनेश यांनी जो फ़ोटो शिरीष झाडाच्या फ़ुलांचा दाखवला आहे त्या रंगाचीच फ़ुले त्याला आहेत. बालगंधर्वाची मागची नदीकिनार्याची बाजू तर ह्या झाडांनीच भरलेली आहे. तसेच सारंग (सहकारनगर) ते पद्मावती हा रस्ताही ह्या झाडांनी भरलेला आहे. मला जमले तर मी जवळून फ़ोटो काढून टाकीन.
|
दिनेशजी,वरिल सगळ्या झाडान्शिवाय आणखी एक नेहमी रस्त्याच्या कडेला दिसणारे झाड म्हणजे 'करंजे'.याचे ही औषधी उपयोग बरेच आहेत जंतुनाशक म्हणुन.कृपया याबद्दल हि लिहा.
|
Dineshvs
| |
| Monday, June 11, 2007 - 10:24 am: |
|
|
धुमकेतु, बहुतेक तो शिरीषच. धनश्री, हे झाड माझ्या यादीत पुढच्या क्रमांकावर होतेच. ह्या झाडाची पाने, सुंदर चमकदार असतात. आता दोन दिवसानी, लिहीनच.
|
Avikumar
| |
| Monday, June 11, 2007 - 5:43 pm: |
|
|
दिनेशदा, कवठाची फ़ारच उपयुक्त माहिती दिलीत तुम्ही. विशेष म्हणजे, चटणी पाहून तोंडाला पाणी सुटले. आमच्या घरी कवठ फ़क़्त महाशिवरात्रिलाच येतो आणि फ़क़्त गुळ टाकुन खाल्ला जातो. त्यामानाने ही चटणी तर फारच भारी वाटली. नक्की येईन खायला तुमच्याकडे एकदा! पुण्याच्या स.प. कोलेजच्या पार्कींगमधेही एक कवठाचे अगदी वेडेवाकडे पसरलेले खुप मोठे झाड आहे. तिथुन जाताना एखादा कवठ डोक्यात पडला तर काय याचे आम्हाला नेहमी टेन्शन असायचे.....
|
Bhagya
| |
| Tuesday, June 12, 2007 - 1:17 am: |
|
|
कवठ... फ़क्त शब्दच पुरेसा आहे. म्हणतानाच तोंडात चव येते. करंजाची मला पण माहीती हवी आहे. बर्याच वर्षांपुर्वी विदर्भात अदासा इथल्या गणपतीला जाताना हाडशंख (तिथल्या बाईने हेच नाव सांगितले होते) या नावाचे झाड पाहिले होते. गुलमोहोरासारखी, पण पांढरी-पिवळट आणि खूप केसर असणारी फ़ुले या झाडाला लागली होती. हाडांच्या दुखण्यावर या झाडाचा औषधी उपयोग होतो अशीही माहीती मिळाली होती. फ़ुलांचा फ़ोटो नेट वर शोधते आहे, सापडल्यास टाकीन. दिनेशदा, या नावाचे झाड माहीत आहे का?
|
Dhumketu
| |
| Tuesday, June 12, 2007 - 5:32 am: |
|
|
मी फ़ुलांचा रंग चुकीचा पाहीला. (आज परत नीट पाहीले) तो गुलाबीच आहे.. त्यामुळे जंगली महाराज रोड वरची झाडे सई ने लिहील्याप्रमाणे रेन ट्रीच असावीत. :-आनंद
|
Zakasrao
| |
| Saturday, June 16, 2007 - 5:15 am: |
|
|
हे करंज्याच्या शेंगा पाडण्याचा उद्योग मी लहानपणी केला आहे. त्याच तेल काढतात त्यामुळे ह्या शेंगा काढुन विकल्या तर त्यातुन पैसे मिळतात हि मौलिक माहिती मला चुलत भावाने दिली होती. तो माझ्यापेक्षा लहान आहे ३ वर्षाने आणि मी शाळेत असतानाची हि गोष्ट आहे.
|
Dineshvs
| |
| Saturday, June 16, 2007 - 6:52 pm: |
|
|
भाग्य ते झाड बहुदा पाचुंदा किंवा वरुण असणार. हाडाच्या दुखण्यावर हाडमोडी म्हणुन एक निवडुंग असतो, तोही वापरतात. झकास, कोल्हापुरात अजुनही बाजारात या बियांचे ढिग विकायला असतात.
|
Bee
| |
| Monday, June 18, 2007 - 2:23 am: |
|
|
दिनेश, हे फ़ुल कसले आहे हे ओळखण्याचे मी अनेक प्रयास करतो आहे. १) पहिल्यांदा ही मला एक वेल वाटते आहे. अर्थात फ़ुल वेलीचे आहे असे वाटते आहे. पण असे फ़ुल असलेली वेल मला माहिती नाही. २) फ़ुल पषुपतीनाथाचे वाटते आहे. पण त्याची फ़ांदी इतकी नाजूक नक्कीच नसेल तेंव्हा हे फ़ुल canon ball tree चे नाही. ३) शेवटचे म्हणजे, मला हे फ़ुल कापसाचे वाटते आहे. कारण ती जी हिरवी बोंड आहे तशी बोंड बहुतेक कापसाची असते. तुम्ही छायाचित्र जर उलट सुलट करून इथे पोष्ट केले असेल तर नक्की कापसाचे फ़ुल असेल हे.. आता सांगा पाहून ह्यातलं काही बरोबर आहे का?
|
Zakasrao
| |
| Monday, June 18, 2007 - 4:18 am: |
|
|
हे फ़ुल कधी पाहिलय असही आठवत नाहिये.
|
Chioo
| |
| Monday, June 18, 2007 - 8:06 am: |
|
|
माझा एक अंदाज. अंजीराचे फुल आहे का? मी एकदा मलकापूरला गेले होते तेव्हा गुलाबीसर शेंगदाण्याच्या आकाराची फळे खाल्ली होती. त्याचा गर छोट्या जांभळाइतकाच होता. पण थोडासा आंबटसर. मस्त लागत होती. कोल्हापुरातही कधीकधी अंबाबाईच्या देवळात मिळतात. पण चव थोडी पाणचट वाटते. त्याला 'नेरली' म्हणतात ना?
|
Dineshvs
| |
| Monday, June 18, 2007 - 4:36 pm: |
|
|
बी, आज उत्तर मिळाले असेल. झकास, मी सांगितलेले फुल तरी बघितले का ? चिऊ, अंजीर फायकस कुटुंबातले. त्या कुळात फुलांचा कुळाचारच नाही. ती फळे नेरलीच. ताजी असली तर चवीला छानच लागतात. पण लगेच खराब होतात. ( मग ती पाणचट लागतात. )
|
Giriraj
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:04 am: |
|
|
बहुतेक उंबराचे फ़ूल असावे!
|
Giriraj
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:12 am: |
|
|
गोरख चिंचेचे फळ
|
Giriraj
| |
| Tuesday, June 19, 2007 - 5:14 am: |
|
|
गोरख चिंच्-तुलनात्मक अभ्यास
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|