Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through June 08, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through June 08, 2007 « Previous Next »

Bee
Wednesday, June 06, 2007 - 2:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, अति सुंदर आहेत ही फ़ुले.. मी कधीच नाही बघितले ह्याचे झाड.. असे वाटते फ़ुलदाणीत कुणी कृत्रिम फ़ुले ठेवलीत की काय..

Dineshvs
Wednesday, June 06, 2007 - 7:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, जलरंगासाठी आदर्श मॉडेल आहेत हि फुले.

बी मुंबईत वरळीला, दादरला हि झाडे आहेत खुप. पण फ़ुलांसाठी नेमका ऋतु गाठायला हवा.


Saee
Wednesday, June 06, 2007 - 5:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कडूनिंबाच्या चर्चेवरुन एक सुचवावंसं वाटलं दिनेश. झाडांच्या प्रकारात पर्जन्यमानाचाही मोठा वाटा आहे. जर तोही उल्लेख केलात तर माहिती आणखी परिपूर्ण होईल. जसे कडूनिंब कमी पर्जन्यमानाच्या प्रदेशात उत्तम वाढतो. कूलने आणि तुम्ही याचे नगरचे उल्लेख दिले आहेत तशीच मी ती फलटण, माण या दुष्काळी भागात विपुल प्रमाणात पाहिली. याउलट ती कोकणात वाढत नाहीत, अगदी वेल्हे - महाबळेश्वर - खंडाळा - मावळ या अतीपावसाच्या भागातही कडूनिंब फार फोफावलेला दिसत नाही. जेमतेम तग धरतो.

तसेच सदाहरीत झाडांचे वैशिष्ट्य संगायचे तर या झाडांची पाने तेलकट किंवा चकचकीत म्हणू या, तशी असतात. शिवाय बळकट, जाड आणि मोठी असतात. पानांची दिशा खालच्या बाजूला असते. जास्त पाणी ओघळून जाण्याची सोय. सदाहरीत झाडे ही अतीपर्जन्यमानात दिसतात. (पाणी भरपुर देऊन जोपासले जात असेल तर इतरत्रही अर्थातच दिसतात.) पानगळीच्या झाडांची पाने तुलनेने बारीक, संयुक्त आणि कोरडी असतात. हे माझं निरिक्षण, कुठेतरी वाचून त्याप्रमाणे पडताळण्याचा प्रयत्नही केला. ते सोपं गेलं. तुम्ही नीट विषद करालच.


Saee
Wednesday, June 06, 2007 - 5:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आंबा, जांभूळ, फणस, भेर्ली माड ही सदाहरीत झाडांची ठळक उदाहरणे तर पांगारा, पळस, काटेसावर ही पानगळीची म्हणता येतील. माझ्याकडे पर्जन्यमान आणि जंगलांचे प्रकार असा एक छोटा तक्ता आहे, त्याची बरीच मदत होते मला.

Dineshvs
Wednesday, June 06, 2007 - 5:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई, मला पाठव तो तक्ता. मलाही उपयोगी पडेल तो.

Bhagya
Thursday, June 07, 2007 - 1:43 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरिपुष्पाची झाडे बर्‍याच डोंगरदर्‍यात मी पण बघितलीत. पण तेव्हा नाव माहीत नव्हते.
या झाडांची फ़ुले आणि कळ्या फ़ारच सुंदर दिसतात.

नत्र म्हणजे काय?


Dineshvs
Thursday, June 07, 2007 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नत्र म्हणजे नायट्रोजन
( तसेच स्फ़ुरद म्हणजे फ़ॉस्फ़ोरस आणि पालाश म्हणजे पोटॅश. )


Giriraj
Thursday, June 07, 2007 - 6:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गोव्यात प्रतापसिंह राणे यांच्या घराच्या परीसरात खूप झाडे आहेत गिरीपुष्पाची आणि तिही अहगी रांगेने... खूप मस्त वाटते तो नज़ारा पहायला!

Saee
Thursday, June 07, 2007 - 6:36 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नक्की दिनेश. गिरीपुष्पाला उंदराचे प्रतिबंधक असल्यामुळे 'उंदीरमारी' असेही एक नाव आहे. लोक या झाडाच्या नावाने नाके मुरडतात (विशेष करुन पर्यावरणप्रेमी), कारण त्याचा प्रसार झपाट्याने होतो आणि या परदेशी वनस्पती आपली झाडे हळूहळू नष्ट करतील की काय अशी भिती त्यामागे आहे. ते जरी खरं असलं तरी निदान ही झाडे निदान त्या त्या जमिनीवर छत्र धरतात, मुळे माती धरुन ठेवतात आणि गिरीपुष्पाचा तर नत्रासाठी प्रचंड उपयोग होतोच होतो. माझ्या नवर्‍याने शेतीसाठी आणि जिवंत कुंपण म्हणुन त्याचे प्रयोग करुन पाहिलेले आहेत आणि ते यशस्वी झालेत. हे झाड पटकन वाढत असल्याने इतर धिम्या झाडांना वाढताना स्पर्धा म्हणुनही हे मदतीला येते. (झाडे जितकी एकमेकांच्या जवळ लावू तितकी ती सुर्यप्रकाश, पाणी, जीवनसत्वे जास्त मिळवण्यासाठी एकमेकांशी चढाओढ करतात आणि त्यांची उत्तम वाढ होते. अरुण देशपांडेंनी अंकोलीला हे तत्व वापरुन फर कमी कालावधीत आवार हिरवेगार केले होते.)

Dineshvs
Thursday, June 07, 2007 - 8:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सई हे नाव नव्हते मला माहित. परदेशी वाण असला तरी उपयोगी आहे म्हणून, जोपासला पाहिजे. आता तूला उंदीरकानी, हि वनस्पति माहित आहे का ?
गिर्‍या, त्या परिसरात तुझ्याबरोबर केलेला फेरफटका अजुनही आठवतोय. हा लेख लिहिताना तुझीच आठवण काढत होतो.


Saee
Thursday, June 07, 2007 - 9:31 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही. कोणती आहे ती?

तुम्ही नत्र, स्फुरद आणि पालाशचा उल्लेख केलात त्यावरुन नभोवाणीचं 'उत्तम शेती' आठवलं. एकदम nostalgic वगैरे.. सकाळच्या शाळेच्या वेळी आणि पुढे कॉलेजला निघायच्या तयारीत एकीकडे रेडिओवर हा कार्यक्रम सुरू असे आणि त्यात पिकाला यांच्या किती मात्रा द्यायच्या वगैरे सांगत. तेव्हा यांची ओळख झाली. अजुनही कार्यक्रम सुरू आहे पण मुद्दम उठून ऐकला मात्र जात नाही. आश्चर्य म्हणजे लहान असताना ज्या 'आमची शेती आमची माणसं'ला मी नाकं मुरडे, आज तोच कार्यक्रम किंवा 'मेरे देश की धरती' मी आवडीने आणि लक्षात ठेऊन पहाते...:-) संध्याकाळचं 'माझं घर माझं शेत' ऐकण्यासाठी बर्‍याचदा वेळेत घरी पोचण्याचा आटापिटा करते:-) कारण त्यात तर किर्तनं, लोकसंगीतही ऐकवतात!
हा बदल बर्‍याच जणांच्यात झाला असेल.


Dineshvs
Thursday, June 07, 2007 - 4:49 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उंदीरकानी साठी वाट बघावी लागेल. पण फारसा सस्पेन्स नाही बरं का ?

मला लहानपणापासुन आमची माती आमची माणसं आवडतो.


Dhumketu
Friday, June 08, 2007 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

परवाच एक आत्या कोल्हापूरला जाऊन घरी आली होती.. ती म्हणत होती की देवळाच्या बाहेर उकडलेले आणी तिखट मिठ लावलेले रायआवळे मिळाले. ते तसेच म्हणजे उकडुन आणी फ़क्त तिखट मिठ लाऊन तयार करतात का? का कुठली वेगळी पद्धत असते?
:-आनंद


Zakasrao
Friday, June 08, 2007 - 4:48 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा कोल्हापुरात मी हे बेलाच झाड पाहिलय.सत्यनारायण असेल तर त्याच झाडाची पाने तोडुन आणलीत. ते उंच झाड आणि हातला पान येत नसतील तर त्या मालकाना सांगुन त्यांच्याकडुन तोडुन घेतली आहेत मी. त्यानीहि कधीहि कुरकुर न करता तोडुन दिली आहेत. त्यांच्याच घरुन नेहमी गोमुत्र आणतोय. ते सगळ्याना ह्या बाबतीत मदत करतात न कुरकुर करता अजुनही. मोहिते म्हणुन आहेत. खुप शेती आहे. पण निगर्वी लोक. असे आता फ़ार कमी लोक भेटतात.

Giriraj
Friday, June 08, 2007 - 5:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासा,मला भेट एकदा! .. .. ..

Bee
Friday, June 08, 2007 - 8:39 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पार्वतीच्या 'अर्पणा' नावाबद्दल मी असे वाचले आहे की तिने अन्न पाणी वनात आली तेंव्हाच त्यांचा त्याग केला होता. नंतर तिने फ़ळ पाने ह्यांचे सेवन करणेही सोडून दिले. ती फ़क्त कंदमुळे खाऊन जगत होती. म्हणून 'अपर्णा'.

बेलाचे फ़ळ खूप जुना खोकला असला तर त्यातील मधासारखा दाट चिकट रस चमचाभर रोज चाटण केला तर बरा होतो. तसेच बद्दकोष्ठता असलेल्या व्यक्तीने हा रस ग्रहण केला तर बद्दकोष्ठता नष्ट होते. मुखदुर्गंधीवर बेलाची पाने चघळून खावी.

बेलाचे पान पाच पानांचेही असते. पण असे पान फ़ुटणे दुर्मिळ..


Zakasrao
Friday, June 08, 2007 - 10:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासा,मला भेट एकदा! >>>>..
का रे तु काय बेल घालत फ़िरतो काय?
तुला ऑर्कुट वर आमंत्रण दिलय की घरी येण्याच.
कधी येतोस बोल?


Dineshvs
Friday, June 08, 2007 - 12:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

धुमकेतु, तिथे आवळ्याच्या चकत्या विकताना बघितल्या. तिथल्या हवेत त्या काळ्या पडत नाहीत. उकडलेले आवळे मी नाही बघितले.

बी, बेलाचे खुप औषधी उपयोग आहेत. मुंबईच्या बाजारात रोज खंडीभर बेलाची पाने येतात. एवढी पाने मिळण्याइतकी बेलाची झाडे, आहेत याचेच मला कौतुक वाटतेय.

झकास, गिर्‍याला भेटच एकदा. बरेच गैरसमज दूर होतील. ( तूझे आणि त्याचे स्वतःबद्दलचे )


Bee
Friday, June 08, 2007 - 2:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कौतुक मलाही वाटते खूप पण त्यासोबत एक कळत नाही की बेल, कडूनिंब ह्यांचे इतके गुण असूनही लोक त्यांचा वापर दैनंदीन जीवनात का करीत नाही. इथे ही झाडे दिसणे खूप दुर्मिळ आहे. पण देशात विपुल प्रमाणात आहे. साठवून तरी किती ठेवायचे.. किती सोबत आणायचे..

Karadkar
Friday, June 08, 2007 - 3:48 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सत्यनारायणाच्या पुजेला बेल? ऐ. ते. न. वरदशंकराच्या पुजेला बेल आणि सत्यनारायणाच्या पुजेला तुळस असे असते ना?

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators