|
Supermom
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:25 pm: |
|
|
नलिनी, खरच ग तुला कित्ती माहिती आहे गावाकडची. अन तू नेहेमी म्हणतेस की 'त्यात काय? मी गावात राहिले आहे म्हणून.' पण तुला खरं सांगू का? या गोष्टींची आवडच असावी लागते. माझ्या बाबांच्या घरी आजोबा असताना खूप शेती होती. पण इतक्या भावंडांमधे फ़क्त बाबांनाच ती आवड कायम राहिली. अन चिंचांबद्दल इतकं छान लिहिलंयस. वाचता वाचताच मिटक्या मारल्या मी. लहानपणी शाळेच्या ट्रिपबरोबर आग्रा, फ़त्तेपूर सिक्री भागात गेलो होतो. तिथे आतून लालभडक गर असलेल्या चिंचा मिळत होत्या. मीठ लावून भरपूर खाल्ल्या. अगदी आपल्या चिंचांसारख्याच, फ़क्त आतून लाल होत्या. या लाल चिंचा आईने तिच्या लहानपणी पण खूप खाल्ल्यात. म्हणजे महाराष्ट्रात पण मिळत असाव्यात. अन हिरव्यागार चिंचेचा ठेचा,भरली वांगी नि भाकरी. अहाहा, कधी एकदा भारतात जाते असं झालंय आता.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:50 pm: |
|
|
सुयोग, तिच ती कथा. नाव जौळ होते ना ? आभार मालविका आणि सुपरमॉम. त्या लाल चिंचा आमच्याही शाळेच्या बाहेर मिळायच्या. पण त्याची झाडे आपल्याकडे नाही दिसली कुठे. नलिनीला लिहायला वेळ नाही म्हणुन, नाहीतर तिच्याकडे अश्या अनेक आठवणी आहेत.
|
Bhagya
| |
| Thursday, May 31, 2007 - 12:29 am: |
|
|
आला...माझा cassia आला. exactly दिनेशदा, मी हीच कथा शिकले होती आणि ही cassia ची पहिली ओळख. नंतर याचीच एक जात बाबांनी अंगणात लावली होती. यात java cassia आणि burmese cassia ( latin नावे माहीत नाहीत ) ची फ़ुले अत्यंत देखणी असतात. काल मुद्दाम लायब्ररीत जाऊन DC Cowen या लेखकाचे Indian flowering trees and plants हे पुस्तक आणले. त्यात या cassia ची इतकी सुंदर रंगीत चित्रे आहेत. घर घेईन तेव्हा बहावा, cassia आजूबाजूला लावीन असे ठरवले होते, पण इथे त्या जाती नाहीतच. बकाणा मात्र आहे... पण दुष्काळात कसा लावणार? बकाण्याची ओळख आईने करून दिलेली. जितकी झाडे आणि फ़ुले माहित आहेत, ती तिचिच कृपा. आणि SM , सकाळी सकाळी भरीत भाकरी बद्दल बोलु नकोस ग! नलू, सुभाष, सुंदर लिहिलयत रे! कडूलिंब आणि चिंच!
|
Swa_26
| |
| Thursday, May 31, 2007 - 11:55 am: |
|
|
दिनेशदा, त्या कथेचे नाव 'वळीव' होते बहुतेक.
|
Dhumketu
| |
| Thursday, May 31, 2007 - 2:14 pm: |
|
|
माझ्याकडे आहे बहुतेक ते बालभारतीचे पुस्तक.. मला सगळी १-१० पर्यंतची पुस्तके गोळा करायची आहेत.. आई आणी बायको शिव्या घालते अश्या विचाराला..पण कधीतरी "हम होंगे कामयाब".. असो. मला ती वळीव ही कथा खुप आवडायची.. त्यात त्या म्हातार्याची वळीवाचा पाउस आल्यामुळे कशी धांदल उडाली ते दिले आहे.. त्यातच ओढा ओलांडताना बायकोने दिलेली अंगठी कुठेतरी गहाळ होते. त्यात हुरहुर हा शब्दही ईतक्या खुबीने वापरला आहे, की कथा वाचल्यानंतरही तो म्हातारा हुरहुर लाऊन जातो.
|
Cool
| |
| Thursday, May 31, 2007 - 4:15 pm: |
|
|
धुमकेतु अरे कुठे गायब झला आहेस धुमकेतु सारखा. फोन सुद्धा लागत नाही तुझा, जरा मला फोन कर पटकन
|
Suyog
| |
| Thursday, May 31, 2007 - 10:17 pm: |
|
|
मी इथे लोस अन्जलिस बर्बन्क्मधे बागेत रोज हा नीळा गुलमोहर पाहते तेवा मलाही ताम्बद्या गुलमोहराची आठवण येत होती
|
Zakasrao
| |
| Friday, June 01, 2007 - 5:11 am: |
|
|
हो हो स्वाती आणि धुमकेतु बरोबर ति वळीव नावाची कथा. दिनेश दा तुमच लिहिलेले बरोबर आहे. त्यात दोन्ही उल्लेख आहेत. दिनेश दा आज लिहिलेल केनियातिल वर्णन एक्दम खास आहे. फ़ोटो टाका असेल तर. आणि हा जो फ़ोटो तुम्ही टाकलाय तसली फ़ुल पाहिल्यासारख वाटतय. त्याचा जो रंग आहे त्याला लॅव्हेंडर म्हणतात ना? ह्या रंगातली इलिमिनेटर किंवा अव्हेंजर खुप छान दिसते. काय रे गिरी तुझ काय मत आहे.
|
Bhagya
| |
| Friday, June 01, 2007 - 10:55 am: |
|
|
झकास, कुठे फ़ुले आणि कुठे मोटरसायकल रे? काहिच्या काहिच!
|
Swa_26
| |
| Friday, June 01, 2007 - 12:07 pm: |
|
|
हो ना भाग्या, काहिच्या काहीच. काय पण ही आजकालची मुले...
|
Supermom
| |
| Friday, June 01, 2007 - 12:08 pm: |
|
|
झकास आणि आम्ही असे काही statements केले की म्हणणार, 'या बायकांना फ़ॅशनचा फ़ारच सोस बुवा...' घोर अन्याय!!!!!!!!!!!!!!!!!!!!
|
Dineshvs
| |
| Sunday, June 03, 2007 - 4:42 pm: |
|
|
आजच्या भटकंति मधे पावनखिंड बघुन आलो. हा खास वरुन काढलेला फोटो. मलकापुर विशाळगड रस्त्यावर, हि जागा आहे. व्यवस्थित मार्गदर्शक पाट्या आहेत. मुख्य रस्त्यापासुन, एक कच्चा रस्ता आहे. पण त्यावर फक्त जीप, सुमो वैगरे जाऊ शकतील. तसे ते अंतर फार नाही. तिथुन अगदी थोडेच खाली उतरावे लागते. तिथे पाण्याचा एक ओहोळ आहे. बाजीप्रभुंच्या इतिहासाची सचित्र माहिती आहे. अगदी खिंडीत उतरायला लोखंडी शिड्या आहेत. ( फोटोत दिसताहेत ) पण आता पाऊस सुरु झाल्याने तिथे जाणे जरा अवघड होईल. तिथले पाणी अगदी दिवाळीपर्यंत असते, त्यामूळे त्यानंतरच बेत आखावा लागेल. क्षिप्रा, आरती, सुभाष आणि गिर्या. क्षमा असावी.
|
Dineshvs
| |
| Sunday, June 03, 2007 - 4:49 pm: |
|
|
त्या आधीच्या मलकापुरच्या एका डोंरावरच्या चढाईत हा सरडा दिसला. मी आधी कधीहि हा प्रत्यक्षात किंवा टिव्ही वर बघितला नव्हता. त्याच्या गळ्यावरच्या तो पंखा त्याने उघडला होता. त्यावर खुप सुंदर नक्षी होती. आम्ही बघितले त्यावेळी तो, तो भाग फ़ुलवुन धावत होता. आधी मला वाटले एक फुलपाखरु त्याने धरलेय कि काय. पण तो एकाजागी थांबला. व तो पंखा त्याने मिटुन घेतला. त्याने मला व्यवस्थित फोटो काढु दिले पण पंखा मात्र उघडला नाही. त्याला शुक शुक, यु यु, चुक चुक सगळ्या प्रकारे पुकारुन बघितले. पण त्याने फोटोसाठी तसा परफ़ॉर्मन्स दिला नाही. ( आता वाटतेय छोट्या मामेभावाला शर्ट पसरुन नाचायला लावायला हवे होते. )
|
Bee
| |
| Monday, June 04, 2007 - 4:19 am: |
|
|
दिनेश, छान माहिती, सुंदर चित्र! हादग्याची फ़ुले पोपटांना खूपच आवडतात. खूप वस्ती नसलेल्या ठिकाणी हादग्याची फ़ुले आलेल्या झाडावर पोपटांचे थवे दिसतात. मला तर हादग्याची फ़ुले पोपटाच्या आकारासारखीच दिसतात. बर दिनेश, एक विषयांतर करू का? नुकतीच मला माहिती मिळाली की chinese wok म्हणजे चिनी कढया खूप प्रसिद्ध असतात. त्यांनीच कढईचा शोध लावला. इथे मी शोधल्यात पण कळले की त्या cast iron पासून बनवलेल्या असतात. मी बिडाचा तवा जेंव्हा बघितला तेंव्हा मला असेच लोखंड दिसले होते. म्हणजे तवा पडला तर तो फ़ुटण्याची शक्यता आहे. पण अन्न शिजवण्यासाठी cast iron उत्तम. तुम्हाला काही खास माहिती आहे का ह्या विषयावर.. मी एक कढई विकत घेणार आहे. पण त्यावर लावलेले वार्निस.. तो चंदेरी रंग कशामुळे जाईल..
|
Giriraj
| |
| Monday, June 04, 2007 - 10:32 am: |
|
|
झकासा,मला लाल रंगतली खूप आवडते... नारंगी रंगातही हवी होती.. पण मला त्या फ़ुलांच्या रंगाचा ड्रेस घातलेली (की नेस्लेली?) श्यामकांता पहायला खूप आवडते बी,त्या कढईत पाणि तापवून आंगोळ करत जा.. कढईचा रंग हळू हळू तुला चढेल आणि पुन्हा वरच्या सरड्याशी तू छान स्पर्धा करू शकशिल (कढई दिवे घे!)
|
आंगोळ करत जा>>>> आंगोळ नाही बाबा आंघोळ! छ्या, हे खानदेशी लोक काही केल्या सुधरायचे नाहीत...
|
Dineshvs
| |
| Monday, June 04, 2007 - 5:13 pm: |
|
|
बी, आपली चर्चा झाली होती मला वाटते, तव्याचे ग्रीस काढायच्या बाबतीत. रॉबीन, रोज कुठे करतात बाबा ते ? मग शब्द कसा परिचयाचा असणार ?
|
Bee
| |
| Tuesday, June 05, 2007 - 2:01 am: |
|
|
... मी शोधून काढीन ते पेज.. धन्यवाद दिनेश.
|
Zakasrao
| |
| Tuesday, June 05, 2007 - 3:17 am: |
|
|
आम्ही असे काही statements केले की म्हणणार, 'या बायकांना फ़ॅशनचा फ़ारच सोस बुवा...' >>> असतोच ना पण. तुम्हीही म्हणा बघु ह्या पोराना गाड्यांचा सोस फ़ार बुवा. पण हे स्टेटमेंट चुकिच ठरण्याची शक्यता जास्त. तस ते वरच वाक्य चुकीचे ठरेल का कधी? (अगदी अपवाद सोडुन बरं पण असे हाताच्या बोटावर मोजण्याइतके.) दिनेशदा मस्त सुरु आहे लेखमाला. मी माझ्या एका ओर्कुट वरच्या मित्राला तुमच्या ह्या लेखमालेची लिंक दिली आहे.
|
Bhagya
| |
| Wednesday, June 06, 2007 - 12:18 am: |
|
|
lignum vitae ची देखणे चित्र cowen च्या पुस्तकात बघितल्याचे आठवतेय... या सगळ्या पुस्तकात वॉटर कलर मध्ये केलेल्या इतक्या सुंदर प्लेटस असतात! पण इतकी विस्तृत, इतक्या झाडांबद्दलची माहीती या ग्रंथांत पण सापडली नाही. आने दो!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|