|
Nvgole
| |
| Tuesday, May 29, 2007 - 10:02 am: |
|
|
हो. हो. वजनदार तर असतेच. घरंदाज, गर्भरेशमी, मुलायम स्पर्श असतो. पण त्यामुळेच, असल्या बहारदार फुलाच्या झाडाला समुद्रशोक म्हणायचे अगदीच जीवावर येते हो.
|
Bee, May Flower नावाच्या बोटी वरून Pilgrims आले होते अमेरिकेला, आणि नंतर पुढे ते इथेच राहिले.. त्यावर एक इंग्रजी विनोद देखील आहे... April showers Bring May Flowers.... What do May Flowers Bring? .. .. Pilgrims..
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:32 pm: |
|
|
कदाचित ते समुद्र अशोक असे असेल. याचे फळ खुपच वेगळ्या आकाराचे असते. विनय बांबुची फुले पण अशीच बदनाम आहेत.
|
Cool
| |
| Tuesday, May 29, 2007 - 6:19 pm: |
|
|
कडुनिंबाविषयी वाचुन बरे वाटले. आमच्या ग्रामीण भागातील सर्वांच्याच या कडुनिंबाविषयी अनेक आठवणी असतात. कडुनिंबाशी निगडीत एक गोष्ट म्हणजे पार. कडुनिंबाचा पार म्हणजे त्याभोवती बांधलेला ओटा. माझ्या मामाच्या घरी दारासमोर खुप मोठा पार होता, लहाणपणी सुट्टित दुपारचे जेवण, वामकुक्षी, संध्याकाळचे खेळ सगळे सगळे या पाराच्या साक्षीने. पंचमीचा झोका लिंबाच्या झाडावर चढतो तसा इतर कुठे चढेल असे वाटत नाही (काय नलीनी, आठवतेय का काही). या झाडाचे आयुष्य भरपूर असते. दात घासण्यासाठी लिंबाच्या काडीचा उपयोग अनेक वेळा केलेला आहे. हा खुपच औषधी असतो. जखम झाल्यास याची वाळलेली साल जाळुन तिची राख आजोबा आम्हाला लावत असत. या विषयी थोडी अधिक माहीती कडुनिंब या लिंकवर आवश्य वाचा नावात 'कडु' असले तरी हा बहुगुणी वृक्ष आहे (शेवटि सच हमेशा कडवा होता है नाही का?)
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 1:24 am: |
|
|
कूल, कडुनिंब तुमच्याकडे जसा बहरतो, तसा आणखी कुठेच बघितला नाही. शंकर पाटलांच्या जौळ (CBDG) या कथेत, लिंब विजेला धर्जिणा असल्याचा उल्लेख वाचला होता. त्या कथेतले वृद्ध गृहस्थ, लिंबावर वीज पडेल याच्या काळजीत असतात.
|
Bee
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:41 am: |
|
|
अरे तुम्ही असे पुर्वी पुर्वी का म्हणता... आजही खेडेगावात लहानशा शहरात कडूनिंबाला तितकेच महत्त्व आहे जितके पुर्वी होते. मी खुद्द कडुनिंबापासून बनवलेले मंजन वापरतो. माझ्या घरी केसांना लावायच्या तेल हे कडूनिंबाच्या बियापासून माझी ताई बनवते. विदर्भात तर कडूनिंबाची खूप झाडी आहेत. सरकारचाच हा उपक्रम होता. ह्या झाडांना एक पट्टी पांढर्या चुन्याची आणि त्याखाली गेरूची तांबडी पट्टी मारली जाते. ती झाडे सरकारची आहे असा त्याचा अर्थ होतो. मग त्यांना कुणी कापत नाही. मला तर नारळाच्या झाडापेक्षा कडूनिंबाचे झाड खर्या अर्थाने कल्पवृक्ष वाटते. दिनेश, ती अबोली रंगाची फ़ुले आणि ती इवलाली फ़ळे मला वाटत सोनचाफ़्याची आहे. मी मागे मायबोलिवर लिहिले देखील होते की सोनचाफ़्याच्या फ़ळांना खूपच छान रंग असतो आणि आकार देखील. कर्णफ़ुलांची उपमा एकदम चपखल बसली आहे..
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:59 am: |
|
|
बी, बरोबर आहे. पण शहरात आता त्या दातुन विकणार्या बायका कमी दिसतात. ती फळे कनकचंपाची. सोनचाफ्याची वेगळी असतात. आपले मसाल्यातले चक्रीफ़ुल पण याच कुळातले. असे कुळ वैगरे कळले कि साम्यस्थळे दिसु लागतात.
|
Dhumketu
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:04 am: |
|
|
आमच्या दारात कडुलिंब होता. मस्त पसरलेला होता. पण दारात असलेला चांगला नसतो म्हणून कापला. खरे खोटे कय माहीत.. पण बरीच वर्षे थांबलेले काम मार्गी लागले १ महिन्यात... रामफ़ळाचे झाडही होते. पण तेही कालौघात गेले. अजुन रायआवळा, सिताफ़ळ आहे. (म्हणुनच मागे एक पोस्टले होते की रायआवळा खोडाला लागत नाही) आंब्याचे झाडही जोम धरायला लागले आहे. लहानपणी ह्या सर्व झाडांवर सुरपारंब्या खेळायचो.. मागेच मुसलमान राहतात त्यांच्याकडे जांभळाचे झाड आहे. लहानपणी बख्खळ खाल्ली तीही.. ह्या आणी आसपासच्या झाडांवरून अजुनही सकाळ सकाळ कोकीळ साद घालतो तो भर दुपार पर्यंत.. अबोली आणी गुलबक्षीची ही झुडपे होती. अबोली ची वाळलेल्या बिया पाण्यात टाकल्या की तटातटा फ़ुटतात.. तो एक खेळच असायचा.. बाजूला एक जोशी काकू राहतात. त्यांच्याकडे पेरू आणी आंब्याचे झाड होते. ते आम्ही उन्हाळ्यात चोरायचो (चिंटू सारखेच ).. एका काठीच्या शेवटी ब्लेड लावायचे आणी एक प्लास्टीकची पिशवी लटकावायची.... आणी मग हळूच छपरावरून आंबे पेरु चोरायचे. वर कोणी आले तर हे दिसु नये म्हणून चोरलेली फ़ळे खालच्या पाणी भरलेल्या पिंपात टाकायची...
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:34 am: |
|
|
शंकर पाटलांच्या जौळ (CBDG) या कथेत, लिंब विजेला धर्जिणा असल्याचा उल्लेख वाचला होता. त्या कथेतले वृद्ध गृहस्थ, लिंबावर वीज पडेल याच्या काळजीत असतात???? ???? मला तर एक कथा अशी आठवते कि एक म्हातारा आहे. तो पायाळु असल्यामुळे त्याला विजेची भिती वाटते. कारण पायाळु लोकाना वीज अंगावर पडते अशी एक श्रद्धा होती पुर्वी. आणि जौळ ह्या नावाची एक कथाकांदबरी वाचल्याच आठवतय ति जयवंत दळवी यांची होती. त्यावर एक चित्रपट आला होता मराठी त्याच नाव माझ घर माझ संसार अस काहितरी असावं ( CDBG) पण त्यात सासु रिमा लागु होती. तिचा मुलगा अजिंक्य देव(??) आणि हिरोइन कोण ते आठवत नाही. मस्त होता तो चित्रपट. समज गैरसमज ह्यातुन किती वाइट घडु शकत ह्याच छान चित्रिकरण होत. सासु सुन ह्या नात्यामधला बरचस वास्तववादी चित्रिकरण होत. BTW दिनेशदा तुमची मेल मिळालि. वाढदिवसाच्या शुभेच्छा मेल मधुनहि पाठवल्या आहेत.
|
Swa_26
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:12 am: |
|
|
दिनेशदा... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा... मेल केलीच आहे.
|
Bee
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:37 am: |
|
|
दिनेश, मला दातून कसे करायचे आणि त्यानी कसे दात घासायचे हे खरे तर कुणा अनुभवी माणसाकडून शिकायचे आहे. मी दादरला कडूनिंब आणि बाभाळीचे दातून विकत घेतले आहे. तेंव्हा मला खूपच आनंद झाला होता की असे दातून विकत मिळतात. मी उसाचे तयार पेर पण विकायला पाहिले आहे. सोनचाफ़्याच्या बियांचा रंगही असाच दिसतो. मी कधी पार्क मधे गेलो तर नक्की फोटो काढून दाखवीन तुम्हाला हवे तर..
|
Bee
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:38 am: |
|
|
विदर्भात तर कित्येक घरी कडूनिंबाची झाडी लावतात.. धुमकेतू तुमच्या कडचा रिवाज वेगळा दिसतो..
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 7:59 am: |
|
|
झकास, शंकर पाटलांची तीच कथा. त्यात तो शेतातल्या घराजवळचा लिंब तोडायची तयारी वैगरे करायच्या सुचना देतो. ती दुसरी कथा, डोंबिवली मधे घडलेल्या एका सत्य घटनेवर आधारित होती. बहुदा मुग्धा चिटणीस होती त्या सिनेमात CBDG याच कथाभागावर नाटकही निघाले होते. धुमकेतु, झाडे आणि बालपण याचे अतुट नाते आहे. हेच नाते जपले तर शैशवही जपता येते. बी, ते लोक काड्या चावुन चावुन त्याचा ब्रश करतात. स्वाती, केक सगळ्यानी वाटुन खायचा ना ?
|
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!!! आज काय बेत केला ते आम्हाला नक्कि कळवा
|
Nalini
| |
| Wednesday, May 30, 2007 - 10:14 am: |
|
|
सुभाष, अगदी ह्याच आठवणी लिहायला आले होते बघ. अगदी खरय, पंचमीचा झोका हा कडुनिंबाच्या झाडावर चढतो तसा कुठेच नाही. आमच्या अंगणात तर दोन मोठे कडुनिंब आहेत. उन्हाळ्याच्या दिवसात ह्या झाडाखाली मस्त झोप येते. जनावरांची उन्हाळ्यातली दावण सुद्धा कडुनिंबाच्या झाडाखालीच असते. कडुनिंबाचा पाला गळुन गेला कि मग त्याच्या काड्या हि गळतात. त्या गोळा करुन आम्ही खेळातले घर झाडायचा घोळ(झाडू) बनवत असू. निंबोळ्या पिकायची आणि आंबे पिकायची एकच वेळ. ह्या पिकलेल्या निंबोळ्या खेळातल्या आंब्यांची जागा घेत. निंबोळ्या पिकायला सुरवात झाली की माश्याही धुमाकुळ घालायला लागतात. पार म्हणजेच ओटा हा तर दारासमोरच्या एका तरी कडुनिंबाला असायलाच हवा. माझ्या मामाच्या गावी कडुनिंबाच्या ओट्यावर महादेवाची पिंड आहे. तिथेही खुप खेळलोय आणि खेळताखेळता भांडलोय. कडुनिंब न म्हणता गावी त्याला सगळेच जण लिंबाचे झाड म्हणतात, का ते माहित नाही. दिनेशदादा तू ज्याला बकवानिंब म्हटलस, त्याला आम्ही बकवान म्हणतो. त्याची फळ गोल टपोरी असतात आणि लांब देठ असतात त्याला. त्याची फूलं खुपच देखणी असतात.
|
Nalini
| |
| Wednesday, May 30, 2007 - 10:25 am: |
|
|
अश्याच थोड्या चिंचेच्या आठवणी. चिंचऽऽऽऽ, तोंडाला पाणी सुटल्या शिवाय रहात नाही. कस असतं ना की आवडत्या प्रकाराचे नाव काढले की तोंडाला हमखास पाणी सुटते पण चिंच अशी की न आवडणार्याच्या तोंडाला ही पाणी सोडते. न खाणार्यांचे तर चिंच न खाताच चिंचेचे नुसते नाव जरी काढले तरी दात आंबताना मी कित्येकदा पहिलेत. चिंचेचा कोवळा पाला मग चिंचेचे फुलं, कोवळ्या चिंचा मग कच्च्या चिंचा, गाभोळ्या आणि मग पिकलेल्या हे सगळेच माझ्या आवडीचे. चिंचेच्या झाडावर चढुन चिंचा तोडण्याची मजाच निराळी. जर चिंचा खुपच आंबट असल्या तर त्या झाडाला अगदी हाताला लागतील अश्या चिंचा सापडतात. जर का त्या कमी आंबट असतील तर मग झाडावरच चढुन तोडायला लागतात. सगळ्याच चिंचा एकदम पिकत नाहीत त्यामुळे फक्त गाभोळ्या आणि पिकलेल्याच चिंचा तोडायला आधी झाडाची फांदी हलवायची. चिंचांच्या एकमेकीवर आदळल्यावर येणार्या आवजावरुन समजायचे कि चिंच कच्ची, गाभोळी की पिकलेली. आमच्या घरी एक चिंचेचे झाड आहे त्याची कोवळी चिंच जर खाल्ली तर आयोडेक्स प्रकारातलं काहितरी खातोय असच वाटतं. तिच चिंच पिकली की खुप गोड लागते. कोण जास्तित जास्त आणि मोठ्यात मोठे आकडे तोडणार ह्याची शर्यत लागयची आम्हा बहिण भावंडात. चिंचेचे झाड शक्यतो घरासमोर, शेताच्या बांधावर किंवा पाटाच्या कडेला पहायला मिळतात. चिंचा गाभोळल्या की त्या दरम्यान काही लोक झाड पहायला येतात. झाडावरच्या चिंचांकडे पाहुन त्या झाडाचा सौदा ठरतो. ५०० रु. ते २००० रु. पर्यंत एका झाडचे पैसे ठरतात. चिंचा पिकल्या की ते लोक येऊन झाडावरच्या सगळ्या चिंचा झोडुन पाडतात. मग त्या गोळा करुन पोते भरुन घेऊन जातात. त्या लोकांनी विकत घेतलेल्या सगळ्या झाडांवरच्या चिंचा तोडुन झाल्या की त्यांच्या अंगणात चिंचा फोडायचे काम सुरु होते. आसपासचे मुलं बायका दुपारच्या वेळेत चिंचा फोडायला येतात आणि चिंचोके गोळा करतात. फोडुन झाले कि ते चिंचोके आधोलिने मोजले जातात व त्याप्रमाणात त्यांना त्याचे पैसे मिळतात. मग ह्याच चिंचा पुढे विक्रीसाठी पाठवल्या जातात. चिंचेचे झाड जर शेताच्या बांधावर असेल तर त्याच्या वसव्यामुळे(सावलीमुळे) झाडखालचे पिक चांगले येत नाही. दुसरे कारण असे की चिंचेचा पाला उचलुन काढणे शक्या नसते आणि ह्या पाल्यामुळे हि पिक जळुन जाते. एवढ्या चिंचा असतानाही शेतकर्यांच्या घरात भाजीत चिंच घातलेली पहायला मिळणार नाही. आई मला आवडते म्हणून चिंच घालून वेगळे वरण करायची. घरात जर चिंचा ठेवलेल्या असतील तर त्यांचा उपयोग दिवाळीत पितळेचे भांडी घासायला हमखास होतो. आम्ही लहान असताना चिंचेत दही लावायचो. संपुर्ण चिंच म्हणजे जिची साल कुठेही फुटलेली नाही अशी चिंच घ्यायचो. त्याचे थोडेसे टरफल फोडून त्यात पुर्ण भरेपर्यंत दुध घालायचो आणि भिंतीला टेकुन उभी करुन ठेवायची. थोड्यावेळात ते दही होउन चिंचेच्या कडेला जमायचे. मग ते टरफल फोडून हे दही चोखुन खायचे. चिंचोके तर दररोज चुलीतल्या निखार्यात भाजायचो. आजी ओरडायची अग किती चिंचोके फोडता दिवसभर? अश्याने दात किडतील ना लवकरच. आता दंत वैद्याची appointment घेताना खाल्लेले चिंचोके आठवतात. आजोळच्या चिंचेच्या झाडावर भरलेली पोपटांची शाळा पाहायची संधी मी एकाही संध्याकाळी सोडलेली नाही.
|
Suyog
| |
| Wednesday, May 30, 2007 - 3:50 pm: |
|
|
शंकर पाटलांच्या जौळ (CBDG) या कथेत, लिंब विजेला धर्जिणा असल्याचा उल्लेख वाचला होता. त्या कथेतले वृद्ध गृहस्थ, लिंबावर वीज पडेल याच्या काळजीत असतात???? अशा वर्णनाचा एक धडा होता बाल्भारति पुस्तकात
|
Malavika
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:04 pm: |
|
|
दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 30, 2007 - 4:51 pm: |
|
|
नलिनी, तुझ्यासारख्यांचा मला हेवा वाटतो. तुम्हाला लहानपणापासुन निसर्गाच्या कुशीत रहायला मिळाले. झाडांचे मुलानी शोधुन काढलेले उपयोग तर अफलातुनच असतात. आमच्या घरी विरजण मोडायचे असले तर आई चिंचेचा वापर करुन विरजण लावत असे. पण तुझी कल्पना मस्तच. ( तूम्हाला अगदी खेळायलाही दूध मिळायचे आणि कोकणात अगदी माझ्या आजोबांच्या काळापर्यंत दूध दुर्मिळ होते ) पण त्यामानाने देशावरच्या जेवणात चिंचेचा वापर कमीच. खास चिंचगुळाचे प्रकार हि ब्राम्हणांची खासियत.
|
Supermom
| |
| Wednesday, May 30, 2007 - 5:10 pm: |
|
|
दिनेश, वाढदिवसाच्या अनेक उत्तम शुभेच्छा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|