अतिशय सुरेख लेख.... मनापासून धन्यवाद... एवढी सगळी माहिती असण आणि ती टायपून काढणे किती अवघड आहे हे आत्ता ह्या दोन ओळी टायपताना कळत आहे. पुन्हा एकदा धन्यवाद...
|
Dineshvs
| |
| Friday, May 25, 2007 - 5:10 pm: |
|
|
Nvgole मुंगणा आणि हेटी, छान नावे आहेत. BV कुठे आहेस ? तु वाचतो आहेस याचाच आनंद आहे रे.
|
Malavika
| |
| Friday, May 25, 2007 - 8:46 pm: |
|
|
दिनेश, शिरीषाची झाडे नागपूरला खूप आहेत. पश्चिम नागपूरात अभ्यंकर नगर नावाचा भाग आहे. तेथील मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूनी ही झाडे लावली आहेत. हे वृक्ष फुलांनी बहरले कि त्याचा मंद सुवास सुटतो. तुमचा लेख वाचून माझ्या बालपणच्या आठवणी जाग्या झाल्या.
|
Zakasrao
| |
| Saturday, May 26, 2007 - 4:37 am: |
|
|
दिनेशदा तुमची लेखमाला अगदी मस्त सुरु आहे. तुमचे लेख वाचल्यानंतर लक्षात येते की अरे हो हेच ते झाड ज्याविषयि दिनेशदानी लिहिलय. आपन रोज पाहतो पण आपल्याला ह्याच नाव काय हा प्रश्न कधीच पडला नाही. नाहि आपण कधी त्याच्याकडे लक्षपुर्वक पाहिले. आताशा मी रस्त्याने जाताना झाड दिसल की काळजीपुर्वक बघतो.त्याची फ़ुले,फ़ळे काही आहे का बघतो फ़ोटो काढण्याची इच्छा असते काहीवेळा पण माझ्याकडे तितका चांगला कॅमेरा नाही. (साधा आहे आणि त्यातुन फ़ोटो कसा आला हे रोल डेवलप केल्याशिवाय लक्षात येत नाहि.) असो तुमच्या लेखमालेला शुभेच्छा आणि धनयवाद तुम्हाला. आज मोहाच्या झाडाचे वर्णन वाचले. मला माहित नाहि कि हे झाड मी पाहिले आहे का पण मे महिन्याच्या सुट्टीत गावी गेल की बरेच वेगवेगळे वास अनुभवायला मिळायचे. त्यातला असाच एक धुंद करणारा वास होता तो कशाचा हे माहित नाही अजुन देखिल. पण तो वास आल कि मी सगळ्याना सांगत होतो कि इथे म्हऊ किंवा महु किंवा म्हव (याचा उच्चार असाच होतो गावाकडाच्या भाषेत) (मधमाशाचे पोळे) आहे. त्यानंतर आमची शोधाशोध सुरु व्हायची आणि बर्याच वेळा आम्हाला ते पोळे दिसायच. मग काय आमची गॅन्ग ते पोळ काढुन मध खावुन खुश. तो वास कशाचा? कोणत्या फ़ुलांचा असावा की त्या पोळ्याचा? कि त्या फ़ुलासाठी त्या मधमाशा त्या फ़ुलांच्या जवळपास पोळे बनवत असतील काय? मधमाशा जास्त करुन कोणत्या फ़ुलातुन रस शोषुन घेत असतील? काही माहिती आहे का तुम्हाला याविषयी? (माझ नाक जरा जास्तच sensitive आहे त्यामुळे मी असा काहि वास येतो अस सांगितल की सगळेजण पोळे शोधायला लागायचे.) दिनेशदा मी तुम्हाला मायबोलीवरुन एक मेल पाठवत आहे आज. संध्याकाळी चेक करा.
|
Giriraj
| |
| Saturday, May 26, 2007 - 5:46 am: |
|
|
ही मोहाची दारू अगदी क्षणात चढते.. साक्रीकडे मांगीतुंगी ला जातांना एका मित्राच्या शेतात मुक्काम केला होता तेव्हा एका मित्राने आदिवासी गड्याकडची ती दारू घेतली आणि पट्ठ्या पाचवा गिअर टाकावा तसा इंग्लिश मध्ये सुसाट सुटला ते ३ तास तरी अखंड बडबडत राहिला होता. त्यामुळे शेतावरची सगळी कामकरी मंडळी हैराण झाली होती त्याच्या ईंग्लिश्मुळे. काजूच्या मोहराचाही वास खूप धुंद करणारा येतो.
|
Dineshvs
| |
| Saturday, May 26, 2007 - 6:28 am: |
|
|
झकास, सगळ्यांच्या मनात झाडांबद्दल अशीच आस्था निर्माण होवो. हाच माझा हेतु आहे. तसे अनेक झाडांच्या मोहोराचे सुगंध आसमंतात भरुन राहिलेले असतात. नाकाच्या बाबतीत, मीही तसाच आहे. महु,म्हव किंवा मोहोळ हे शब्द मधमाश्यांच्या पोळ्यासाठीच वापरतात. मधमाश्या, आणि झाडे त्यांचा करुन घेत असलेला वापर हा वेगळाच विषय आहे. मोहाच्या झाडाला उत्तरेकडे महुआ म्हणतात. अनेक वनवासी लोकात, महुआ हे मुलीचे नाव असते. तिसरी कसम सिनेमात, अश्याच एका महुआ घटवारन चा उल्लेख आहे. ( आज घरी नाही, ईमेल मंगळवारीच बघु शकेन ) गिर्या, तु बघितलीस कि नाही चव ?
|
Jayavi
| |
| Saturday, May 26, 2007 - 9:24 am: |
|
|
दिनेश, लेखमाला अप्रतिम आहे. वरवरच वाचणं झालंय. सगळं शांतपणे पुन्हा एकदा वाचायचंय. असे अभ्यासपूर्ण लेख तूच लिहू शकतोस
|
Gobu
| |
| Saturday, May 26, 2007 - 9:35 am: |
|
|
दिनेश, मानल बुवा तुम्हाला! सही अभ्यास आहे ह तुमचा! वर्णनही अगदी सुरेख केलत तुम्ही!
|
Saee
| |
| Saturday, May 26, 2007 - 9:41 am: |
|
|
दिनेश, मोहाचे शास्त्रीय नाव madhuka indica आहे बहुदा. की दोन्ही प्रकार आहेत? 'गोईण' मधे डॉ. राणी बंगांनी सुरुवातीलाच मोहासाठी जवळपास पाचेक पाने खर्ची घातली आहेत. त्यावरुन आदिवासी या झाडावर किती अवलंबुन आहे ते कळतं. त्याखालोखाल उंबरही महत्वाचा वृक्ष आहे त्यांच्यासाठी. आता हे वाचून मलाही आता उत्सुकता आहे सर्व ऋतुतला मोह बघायची.
|
Ajjuka
| |
| Saturday, May 26, 2007 - 4:56 pm: |
|
|
गोळे, मे फ्लॉवर हे जमिनीवर येते. ते शिरीष नाही. लिलीच्या पानांसारखी पाने असतात त्याची. आणि त्याचा म्हणजे फुलाचा विस्तार बराच मोठा असतो. शिरीष आणि पर्जन्यवृक्षाचे फुल त्या मानाने छोटे असते. तसेच त्याचे ते तंतू नाजूक असतात. कापसासारखे. मे फ्लॉवर ह एक संपूर्ण inflorescance (स्पे चु भू द्या घ्या) असतो.
|
Ajjuka
| |
| Saturday, May 26, 2007 - 4:57 pm: |
|
|
चल गिर्या कधी जाऊया मोहाच्या दारूची चव घ्यायला?
|
Nvgole
| |
| Sunday, May 27, 2007 - 11:39 am: |
|
|
सोबतचे चित्र पाहा. त्यात उजवीकडले फूल मी मे-फ्लॉवर म्हणतो आहे ते आहे.
|
Ajjuka
| |
| Sunday, May 27, 2007 - 4:35 pm: |
|
|
माझ्याकडे होते ते मे फ्लॉवर साधारण अबोली रंगाचे आणि कमीतकमी ६-८ इंच व्यासाचा गोळा असावा एवढे होते. सरळ दांडा अगदी लिली सारखाच. आणि तशीच पात असे होते. तुम्ही म्हणताय ते मे फ्लॉवर मला तरी माहीत नाही.
|
Ajjuka
| |
| Sunday, May 27, 2007 - 4:43 pm: |
|
|
ही एक जवळपासची लिंक. म्हणजे माझ्याकडे होते त्याच्या जवळपासची दिसणारी. http://www.haikuhut.com/Short%20Stuff%20II/ShortStuffII.htm http://www.gardenorganic.org.uk/assets/organicweeds/t_repens2.jpg मे फ्लॉवर म्हणून सर्च केला तर निदान १०० वेगवेगळ्या प्रकारातली फुलं दिसतायत.
|
Mpt
| |
| Sunday, May 27, 2007 - 5:42 pm: |
|
|
अर्धवट फ़ुललेल्या Mayflower चा वरुन काढलेला photo .
|
Bee
| |
| Monday, May 28, 2007 - 1:41 am: |
|
|
सुमॉ, तो लत्तापहारचा आणि अशोक उमलण्याचा उल्लेख काजळमाया मधे विदूषक ह्या कथेत जी. ऐ. कुलकर्णींनी केला आहे.. काल मी ही कथा वाचत असताना तुझ्या पोष्टची आठवण झाली..
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 29, 2007 - 3:16 am: |
|
|
मालविका, कुठेतरी कुणीतरी हौसेने शिरीषाची झाडे जोपासलीत हे वाचुन बरे वाटले. सई मधुका इंडिका, मधुका लॉंगफ़ोलिया आणि मधुका लेटिफ़ोलिया तिन्ही नावे आहेत. अज्जुका वरती Mpt ने फोटो टाकलाय तेच माझ्या माहितीप्रमाणे मे फ़्लॉवर. Nvgole तो गुलाबी तुरा अर्धवट आहे. मला तो समुद्रशोकाच्या फुलासारखा दिसतोय. त्याचे फुल मोठे असते. पाने बदामासारखी आणि फळे वरुन चौकोनी आणि खाली निमुळती होत गेलेली असतात. रुईयाच्या कॉर्नरवर त्याचे झाड आहे. TIFR मधेही त्याची झाडे आहेत.
|
Nvgole
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:06 am: |
|
|
दिनेश समुद्रशोक हे नाव मी प्रथमच ऐकतो आहे. मी म्हणतो ते झाड कदंबासारखेच डेरेदार असते. एरव्ही हिरवेगार. फेब्रुवारीअखेरीस सर्व पाने झडू लागतात. झाड निष्पर्ण होते. मग समईतून ज्योत वर उठावी तशा गडद तांबूस काळ्या कळ्या फांदीफांदीच्या टोकातून आकाशाकडे सरळ वर फुटू लागतात. बोट बोट उंच झाल्यावर जेव्हा उमलतात तेव्हा लालसर गुलाबी कारंज्यासारखे फुल दिसू लागते. अक्ख्या झाडावर सर्वत्र समईच्या रंगकळ्या गुलाबी कारंजांगत उमललेल्या दिसतात. फुल एखादा दिवसच टिकते मग सुकून खाली पडते. मार्च एप्रिल महिन्यात ही बहार संपन्न होते. मग कोवळी पाने धरू लागतात. वडाच्या फुटव्यांसारखी. नंतर मे पर्यंत झाड हिरवे गार झालेले दिसून येते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:44 am: |
|
|
मग बहुतेक तेच झाड. हे फुल वजनदार असते. खाली पडताना बॅडमिंटनच्या फुलासारखे खाली कोसळते आणि फुटते. पण तरी शंका आहे, कारण समुद्रशोकाच्या कळ्या गुलाबी असतात. बाकि वर्णन जुळतेय.
|
Bee
| |
| Tuesday, May 29, 2007 - 5:45 am: |
|
|
इथे एक condominium आहे ज्याचे नाव आहे May Flower . मला नव्हत माहित की खरच हे एका फ़ुलाचे नाव आहे. मी असा विचार केला की मे महिन्यातील उमलणार्या फ़ुलांना May Flower म्हणत असतील. पण वरची चर्चा वाचून आता ह्या condominium च्या नावाचा उलगडा झाला.. खरच मस्त आहेत ही फ़ुले.. गोळे, वर्णन शैली छान आहे तुमची..
|