|
Cool
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:47 pm: |
| 
|
घोस्ट ट्री एकदम आठवला, गोरखगडाच्या ट्रेक मधे या झाडावर जावुन मी आणि गिरीने फोटो काढुन त्याचे नाव सार्थ केले होते दिनेश, त्यावेळि तुम्ही 'अर्जुन' वृक्षा विषयी काहीतरी सांगितले होते, 'अर्जुन' वृक्ष आणि घोस्ट ट्री सारखेच दिसतात का?
|
Karadkar
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:58 pm: |
| 
|
नाही हो दिनेश, ह्या देशतली मण्डळी कशाचा पण रस काढतात. त्यामुळे तेच हे फळ आहे हे नक्कि.
|
Bhagya
| |
| Thursday, May 24, 2007 - 12:55 am: |
| 
|
powder puff tree या नावाची गुलाबी फ़ुलांची झाडे इथे अनेक ठिकाणी आढळतात. आणि 'एक वेळ शिरिषाच्या फ़ुलाने हिरा कापला जाईल, पण मूर्खाची समजूत पटणे कठीण अशा अर्थाचे काही सुभाषित आहे का?
|
Bee
| |
| Thursday, May 24, 2007 - 1:31 am: |
| 
|
कित्येकदा सिताफ़ळाच्या बिया माझा जिभेवरून घसरून पोटात गेल्यात. मला तरी काही झाले नाही.. हो पण बियातील भाग कधी मी कचकच चावून खाल्लेला नाही. मला सगळ्यात जास्त त्रास होतो सफ़रचंदाच्या बियांचा. इतका उग्र वास येतो एखादी बी चुकुन दाताखाली आली की.. रामफ़ळ हे महागडे फ़ळ आहे.. सिताफ़ळाच्या तुलनेने.. पण एक रामफ़ळ दोन तीन व्यक्तीला पुरेसे आहे. रामफ़ळ सिताफ़ळ ही फ़ळं आकाराने मोठीच निवडावीत. सहसा फ़ळ लहान असले की ते मधुर असते.. पण इथे तसे नाही..
|
Bee
| |
| Thursday, May 24, 2007 - 3:56 am: |
| 
|
पर्जन्यवृक्षाचे हे नाव कशावरून आले तर ह्या झाडावर एक प्रकारचे किडे पोसले जातात. त्यांच्या अंगातून एक प्रकारचा द्रव झिरपत राहतो. त्यामुळे ह्या झाडाखाली नेहमी ओलावा असतो. म्हणून ह्या झाडाला पर्जन्यवृक्ष म्हणतात. सिंगापोरमधे रस्ते सजविण्यासाठी इथल्या सरकारनी ह्या झाडाचा खूपच छान उपयोग केला आहे. पर्जन्यवृक्षाची canopy बघायची असेल तर सिंगापोरसारखे दुसरे स्थळ नाही... आणि ती paint brush सारखी फ़ुले ती खूपच छान दिसतात.. शिरिषाची नि माझी चर्या - ओळख अगदी बालपणापासून आहे पण नावानी ओळख करून देणारे दिनेशभाई. माझ्या बालपणी कमालीच्या दीन परिस्थितीमुळे आम्ही शेण वेचून त्याच्या गोवर्या थापायचो. त्यावेळी त्या गोवर्यांमधे शिरिषाच्या शेंगा पण मिसळावयाचो. कारण गायीम्हशी ह्याच झाडाखाली रवंथ करत बसायच्या. त्या शेंगा मस्त जळत. मधेच एखादी शेंग त्यातील दामोख्यासहीत फ़ुटायची आणि जवळ जर कुणी बसले असेल तर त्याला चटका देखील बसायचा.. मला वाटतं शिरिष हा पर्जन्यवृक्षाच्या तुलनेने जरा कमी फ़ुलतो. आकाश जेंव्हा निळेशार अभ्ररहित असेल तेंव्हा ही गुलाबी फ़ुले आणि त्याचे हजारो तंतू वार्यावर मस्त उडतात.. .. पण एक सांगू का.. रस्ता जेंव्हा सामसूम असतो आणि तुम्ही त्यावरून जात असाल.. मधेच शिरिषाची वाळकी खुळखुळणारी शेंग वाजली की वातावरण कसे क्षणभंगूर.. जीवाला हुरहुर लावणारे होते..
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:20 am: |
| 
|
बी, तिथल्या बॅंडस्टॅंडवर पिवळ्या पानाचे पर्जन्यवृक्ष आहेत, बघितले असशीलच. अगदी शांत जागा असेल तर शिरीषाच्या शेंगातुन पैजणांचा आवाज येतो. नीट वाढलेला शिरिष भरभरुन फ़ुलतोही. त्याचा गंध झाडाखाली पसरलेला असतो. भाग्य, शिरीषाचे फुल अति नाजुक, म्हणुन हि म्हण आली असावी.
|
Zakasrao
| |
| Thursday, May 24, 2007 - 5:41 am: |
| 
|
दिनेशदा तुम्ही जे ज्ञान तुषार जे म्हणताय ना ते तुमचा नम्रपणा आहे. मला तर बोटावर मोजता येतील इतकीच झाडांची आणि पक्ष्यांची नाव माहित आहेत. तुम्ही जे रेन ट्री विषयी लिहलय ते वाचुन माझ्या डोळ्यासमोर कोल्हापुरच्या शाहु मार्केट यार्ड मधील उंच उंच झाडे आलीत. ती बहुतेक तीच असतील कारण त्यांच्या शेंगा खाली पडल्या की रस्त्याला चिकटुन जायच्या जर त्यावरुन एखाद वाहन गेल की. त्या शेंगाचा चेंडु करुन त्याला दग़डी बॉल असे नाव देवुन लहानपणी क्रिकेट खेळणारे मुलं मी पाहिलेत. त्या शेंगांचा बॉल कस करायचे हे आठवत नाही पण अस अलिकडे कोणी केलेल आठवत नाही.त्या बॉलने खेळताना खुप सावधगिरीने खेळाव लागायच. जर तो बॅटीवर न बसता पायावर बसला तर पाय धरुन खाली ओरडत बसणे ह्याशिवाय दुसर काहि करु शकत नाही माणुस. तुम्हाला अस बॉल करुन खेळायचे त्याविषयी काही माहित आहे का? त्या झाडाच नाव काय हा प्रश्न कधीच मनात आला नाही. आज अनायासे माहिती मिळाली. शिरिष पाहिला असेल पण नक्कि आठवत नाही.त्या शेंगा पाहिल्यासारख्या वाटतात. तुम्ही अलिकडे जोतिबाला गेला असाल तर तिथे वनीकरण खात्याने लावलेली झाडे पाहिलीत का? ती कोणती आहेत? सई तुम्हाला माहित असेल तर तुम्ही सांगा त्या चेंडु आणि झाडांविषयी.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:16 am: |
| 
|
कूल, हा कांडोळाच्या मोहराचा फोटो गोरखगडावरचाच आहे. ते झाड जरा उतारावर होते, म्हणुन तुमच्या दोघांची काळजी वाटत होती. तिथे अर्जुनही दिसला होता, पण त्यावेळी लिहायचे डोक्यात नव्हते, म्हणुन फोटो काढायचा राहिला. ( नेपती, धायटी, उंडी, सोनसावर अशी अनेक झाडे केवळ याच कारणासाठी राहिलीत. ) झकासराव, लहानपणापासुन पर्जन्यवृक्ष बघतोय, पण त्याचा चेंडु करतात ते मायबोलीवरच कळले. मी तर त्या चिकट गराला हातही लावला नाही कधी. तो शिरीषाच्या झडाचा फोटो, ज्योतिबाच्या डोंगरावरचाच आहे. त्याची फुले हिरवीच असल्याने खुपदा लक्षात येत नाहीत. तिथे लावलेली बाकिची झाडे बहुतेक निलगिरीची आहेत. मदर तेरेसाना कुणीतरी विचारले होते, कि तुम्ही जे कार्य करता आहात, त्याचे महत्व किती ? तर त्या म्हणाल्या, समुद्रातल्या एक थेंबा एवढेच माझे काम आहे. त्यावर तो प्रश्णकर्ता म्हणाला, जर तुमचे काम एवढे क्षुल्लक आहे, तर का करता ? त्यावर त्या म्हणाल्या, समुद्रातला एकही थेंब कमी न होवु द्यायची जबाबदारी माणसावर आहे. त्यांच्या कामाच्या मानाने मी करतोय, त्याची खिजगणती तरी होवु शकते का ?
|
Saee
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:22 am: |
| 
|
शिकेकईच्या शेंगांचेही चेंडू होतात त्यामुळे फक्त शेंगांवरुन असं काही सांगणं मुश्किल आहे. दिनेश, जंगली महाराज रस्त्यावर दोन्ही बाजुंना आहेत तेही रेन ट्रीच असावेत. मला ते कुणीतरी सिंगापूर चेरी सांगितले होते पण वर्णन तुम्ही केलेलं आहे. आणि रंकाळ्याच्या परिसरात कुठे दिसतील हो पांढरे शिरीष? उत्सुकता आहे मला बघायची.
|
Saee
| |
| Thursday, May 24, 2007 - 7:28 am: |
| 
|
दिनेश पुण्याच्या पुढच्या भेटीत चांदणी चौक टेकडीवर एक चक्कर आयोजित करा, उत्सुक मायबोलीकर इतर वृक्ष बघायला येतील आणि या टेकडीवर ढिगाने सोनसावर आहे, (बहुतेक कात्रज घाटातही), तिचे तुम्हाला फोटोही घेता येतील.. अर्थात ते इतरत्र कुठे आहेत ते तुम्हाला माहितीच असेल. पण तरीही..
|
Chioo
| |
| Thursday, May 24, 2007 - 8:54 am: |
| 
|
चेंडू. आम्ही त्याचे चेंडू करून खूप खेळायचो. कोल्हापुरात private highschool शेजारी त्याचे एक झाड आहे. त्याला साधारण होळीच्या सुमारास शेंगा लागतात. त्याचा गोळा ice-cream च्या लांब काडीवर किंवा कोणत्याही वाळक्या काटकीवर लावला की त्याने टिमकी फार छान जोरात वाजते. आणि त्याचे लहान चेंडू मारून आम्ही आपाधापी खेळायचो.
|
Shonoo
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:45 am: |
| 
|
माझ्या शाळेच्या पटांगणाच्या तिन्ही बाजूंनी रेन ट्री चे मोठ्ठाले वृक्ष होते. चाळीस्-पन्नास मुलं कवायत करू शकतील अशी एकेका झाडाची सावली होती. एक काळी पार्ल्यात ' शेणगल्ली' नावाने ओळखल्या जाणार्या गल्लीतही दुतर्फा हे वृक्ष होते. बारा महिने अगदी गार सावली असायची. इथे पेन्सिल्व्हेनिया मधे पण हे वृक्ष दिसतात २० ते २५ फूट उंच आणि जरा काटकोळेच असतात. एरवी लक्षात पण येत नाहीत पण जून च्या मध्यावर नाजूक गुलाबी फुलांनी डवरून गेले की एका क्षणात मला पार शाळेत नेऊन पोचवतात. सहसा बागेत मुद्दाम लावलेले आढळत नाहीत. हायवेच्या बाजूला जी no man's area असते तिथे चिकार दिसतात. भाग्या, त्या शिरीषाच्या फुलांबद्दलच्या श्लोकाचा उल्लेख साने गुरुजींच्या एका धड्यात होता ( बहुधा सुधेस पत्रे असावे). ते पुस्तक वाचायला हवे. या झाडाच्या नावात saman आहे का salmon याबाबत माझा नेहेमी गोंधळ असतो.
|
Vadini
| |
| Thursday, May 24, 2007 - 11:48 am: |
| 
|
पुण्यात एस.पी. कॉलेजच्या आवारात एक अश्या गुलाबी फुलांचे झाड आहे....म्हणजे १० वर्षांपूर्वी तरी होते.तो नेमका कोण? पर्जन्यवृक्ष की शिरीष ?
|
Dineshvs
| |
| Thursday, May 24, 2007 - 12:57 pm: |
| 
|
सई, रंकाळा चौपाटीच्या कडेनेच आहेत शिरिष. कात्रजचा घाट, त्याच्या भौगोलिक स्थानामूळे, वेगळ्या वृक्षानी नटलेला आहे. शोनू, मध्य अमेरिकेतलेच झाड ना ते. तिथे जोमाने वाढणारच. नावात Saman च आहे. वादिनी, गुलाबी फुले म्हणजे पर्जन्यवृक्षच.
|
Bhagya
| |
| Friday, May 25, 2007 - 2:30 am: |
| 
|
वा! अशोकाबद्दल वाचून तर फ़ारच छान वाटलं.... मी या वृक्षाबद्दल विसरलेच होते. रस्त्याच्या बाजूला, बंगल्याच्या समोर लावण्यात येण्यार्या mast tree ला चांदणीच्या आकाराची छोटी, हिरवी फ़ुले असणारा जो फ़ुलोरा येतो तो दिसायला अगदी देखणा असतो...फ़ुलदाणीत सजवावा. आणि दिनेशदा, मला वाटतं की exoraa ची फ़ुले आणि कळ्या टोकेरी असतात, शिवाय उंचीला हे झाड कमीच. एक अगदी देखणा अशोकवृक्ष नागपूरच्या महाराजबागेत भाजीझाडे विकतात त्या विभागाजवळ आहे. त्याची ही लाल पालवी आणि गोलाकार फ़ुले बघितलीयत. शिवाय या झाडाला सुंदर स्त्रीने लत्ताप्रहार करुन मगच वसंतोत्सव सुरु करायची प्रथा होती, असेही वाचल्याचे आठवते.
|
Supermom
| |
| Friday, May 25, 2007 - 3:10 am: |
| 
|
भाग्यश्री,मला असे पण वाचल्याचे आठवते की पूर्वी सुंदर स्त्रीने लत्ताप्रहार केल्यावरच अशोकवृक्षाला बहर येत असे.
|
Dineshvs
| |
| Friday, May 25, 2007 - 6:55 am: |
| 
|
भाग्य, सुपरमॉम, यात कसोटी कुणाची ? बिचार्या अशोकाची कि सुंदरीच्या सौंदर्याची ?
|
Bee
| |
| Friday, May 25, 2007 - 8:36 am: |
| 
|
लंकेत हनुमान जेंव्हा सितेला शोधायला जातो त्यावेळी तो एका झाडावर चढून आराम करतो. खाली त्याला सिता दिसते. ती आधी हनुमानाला पाहून घाबरते पण हनुमान खाली रामाची अंगठी टाकतो आणि हा आपला रक्षक अशी त्याची सितेला ओळख पटते. ते झाड अशोक. पण खूप जणांना ते उंचच उंच फ़ाटकाच्या दोन्ही बाजूला लावलेले झाडच खरे अशोक वाटते. तसे फ़ुलांचे गुच्छ मोठेच असतात पण अशोकाच्या फ़ुलांचा गुच्छ हा फ़ांदीच्या पसार्याहून कितीतरी मोठा आणि गोल असतो. त्यामधे मुंग्या खच्चून भरलेल्या असतात. सिंगापोरमधे अशोक कितीतरी ठिकाणी नुसता बघायलाच मिळत नाही तर तो फ़ुलांनी डवरून असतो. इथल्या कित्येक पार्क मधे अशोकाचे झाड असतेच असते. पण हा गुच्छ तोडायला गेलो तर मुंग्या सरसर अंगावर चढतात. कधीकधी मुंगळेही असतात. ह्या फ़ुलांना वास नसतो. ती दिसायलाच तेवढी सुरेख असतात. आपल्या भारतीय संस्कृतीमधे सुवासिक फ़ुलांचे जेवढे महत्त्व आहे तेवढे सुंदर फ़ुलांचे महत्त्व नाही. तरीही तगर आणि कण्हेर ह्यांनी कसे काय प्रिय स्थान प्राप्त केले कळत नाही.. तगरीला मंदसा सुवास असतो. पण घमघमाट नसतो...
|
Vadini
| |
| Friday, May 25, 2007 - 8:39 am: |
| 
|
शोनू, कालच मी एका जर्मन पुस्तकात चेरिमोयाचे छायाचित्र पाहिले. पण त्याचे बाह्यरूप तरी मला रामफळापेक्षा वेगळे वाटले.जर्मनमध्ये त्याला त्सिम्ट आप्फ़ेल असेही म्हणतात.शिवाय त्याला सालीवर जसे फोड आल्यासारखे दिसतात तसे रामफळाचे नसते. आतून कदाचित ते रामफळासारखे असेलही .
|
Nvgole
| |
| Friday, May 25, 2007 - 9:28 am: |
| 
|
दिनेश, आणखी एका सर्वांगसुंदर लेखाखातर मनःपूर्वक अभिनंदन! शेवग्याच्या फुलांना आमच्या विदर्भाकडे 'मुंगणा' म्हणतात. आणि हादग्याला 'हेटी'. दोन्हींची पांढरीशुभ्र फुले चवीने खाल्ल्या जातात. माझ्याकडे एक फुल येते. 'मे-फ्लॉवर' म्हणतात त्याला. मी जमल्यास इथे चित्र टाकेन. त्यालाही शिरीष म्हणतात का हे मला जाणून घ्यायचे आहे. तुमच्या समस्त लेखाची मुद्रित प्रत काढून घेत आहे. वाचून सविस्तर अभिप्राय लिहेन. तुमच्या लिखाणाचे उत्तम पुस्तक होऊ शकेल. तुम्हाला सृष्टी पाहण्याची दृष्टी आहे. तिचा प्रच्छन्न वापर करा. खूप लिहा.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|