|
Dineshvs
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:10 am: |
| 
|
सुपरमॉम, बीने रामफळाबद्दल लिहिलेच आहे. मी पण घालीन त्यात भर. बुचाच्या झाडाचे आहे लक्षात. वादिनी, जगात इतके ज्ञान आहे, कि त्यातले चार तुषारही माझ्या ओंजळीत पकडता आलेले नाहीत.
|
Hems
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:17 am: |
| 
|
दिनेशदा , खजिना मोकळा केलायत की हो ! ' मनोरंजक माहिती ' असं म्हणता येईल या लेखांबद्दल. मला तर शरदिनी डहाणूकरांची शैली आठवली हे वाचून. तुम्ही त्यांना खूप मानता हे माहिती आहे म्हणून आवर्जून सांगतेय तुम्हाला !
|
Bee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:45 am: |
| 
|
बरे झाले माझे तिन्ही मजकूर लागोपाठ आले नाहीत.. तर वनचरांनो ही बघा छायाचित्रे.. ती कन्या माझी लाडकी पुतणी आहे.. तिला खूप आनंद झाला ही फ़ळ बघून..

|
Bee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 3:47 am: |
| 
|
वरील झाडी लोणारच्या काठालगत आहे. तिथे पुष्कळ झाडी आहेत रामफ़ळाची.. त्यानंतर फ़णसाची.. चुका, पालक, मेथीचे वाफ़े पण होते तिथे..
|
Saee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:18 am: |
| 
|
दिनेश, मला त्यांनी पपनसच सांगितले म्हणुन तर कळले ना!
|
Vadini
| |
| Wednesday, May 23, 2007 - 9:19 am: |
| 
|
वाह बी, मला पडलेल्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुमच्याकडून मिळाली- धन्यवाद. पुण्या-मुंबईला मात्र रामफळ स्वस्त मिळत नाही. दिनेश,तुमच्याकडे असणार्या चार ज्ञानतुषारांपैकी एखादा सुद्धा खूप माहिती देवून जातो- त्यासाठी तुम्हाला धन्यवाद !
|
Saee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:48 am: |
| 
|
बी, रामफळाचे फोटो छान. बाजारात फार कमी दिसतात त्यामुळे खुप वर्षात खाल्ली नाहीत. कोल्हापूरला कपिलतीर्थात बर्याचदा दिसतात. दिनेश, ghost tree खरंच भितीदायक दिसते. फारच वेडेवाकडे आकार असतात याचे. ताडोबाच्या जंगलात याचे एक खुप मोठे झाड आहे. अक्राळविक्राळ रुप आहे त्याचे. रात्रीच्या वेळी बघितलं तर पाचावर धारणच बसणार.
|
Mukund
| |
| Wednesday, May 23, 2007 - 11:52 am: |
| 
|
वदिनी.. तुझ्या वरच्या पोस्टींगला अनुमोदन... दिनेश... मी मायबोलिचा चार वर्षे सभासद आहे पण कुठल्याच बीबीवर आपली प्रत्यक्ष गाठ पडली नाही(एक दोनदा अंताक्षरी बीबीवर थोडक्यात चुकामुक झाली)... त्यामुळे सांगायचे राहुन गेले..... तुमच्या अफ़ाट ज्ञान भांडाराला मानाचा मुजरा! काल मायबोलिचे मुखपृष्ठ प्रथमच पाहीले व तुमचा हा व्रुक्षवल्लीचा सुंदर खजीना सापडला व तो सगळा एका दमात वाचुन काढला. ही सगळी माहीती मायबोलिकरांना एका ठिकाणी फोटोंसकट उपलब्ध करुन दिलीत त्याबद्दल तुमचे आभार मानायला शब्दच नाहीत. तुमच्या इतकी अष्टपैलु व्यक्तीमत्व असलेली व्यक्ती मायबोलिवरच काय पण प्रत्यक्षात पण भेटणे मुष्कील आहे.संगीत,साहीत्य,नाटके,चित्रपट,स्वयंपाक,ट्रेकींग,वनस्पतीशास्त्र... तुमच्या ज्ञानाची झेप खुप मोठी व सखोल आहे. पुढच्या भारत भेटीत तुम्हाला भेटायला जरुर आवडेल.
|
Vadini
| |
| Wednesday, May 23, 2007 - 12:16 pm: |
| 
|
मुकुन्द,आता माझे तुमच्या पोस्टिंगला अनुमोदन !
|
Shonoo
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:05 pm: |
| 
|
रामफळे दक्षिण अमेरिकेत चिरिमोया cherimoya नावाने फार प्रसिद्ध आहेत. संयुक्त राज्यांमध्ये चिरिमोया ज्यूस बर्याच मेक्सिकन दुकानात आणि रेस्टॉरंट्स मधे मिळतो. पण फळ मी इथे कधी खाल्लं नाही. एक मेक्सिकन मित्र कामामिनित्त हैदराबाद, दिल्ली मुम्बै इथे गेला होता. तो म्हणाला होता I almost OD'ed on that Indian cherimoya. Too bad you cant find it in the US.
|
दिनेश, तू कॊमर्सचा . तुला टेक्सॊनॊमीत एवढी गती कशी? आम्ही तीन तीन वर्षे बॊटनीचा अभ्यास करून आज ओंजळीत काहीच नाही.. टेक्सॊनॊमी तर फारच दूरस्थ वाटते..तू ही नावे रेफरन्स पाहून देतो की ही सगळी नावे पाठ आहेत? आम्ही नर्मदेतल्या गोट्यासारखे कोरडे ते कोरडेच किंवा मुक्ताबाईने म्हटल्याप्रमाणे चौदाशे वर्षे तप करून चांगा कोराच राहिला....
|
रामफळाचे नाव ऐकले की मला श्रीदत रामफल या ब्रिटीश कॊमनवेल्थच्या सेक्रेतरी जनरलची आठवण येते... उगीचच .हे गयानाचे होते. जसे कोफी अन्नानचे नाव पुन्हा पुन्हा येत राहते तसे हे रामफल... मला सीताफळापेक्षा रामफळ चांगले वाटते. सीताफळात मेक्यानिकल एडवान्टेज कमी होतो म्हणजे टाकलेल्या श्रमापेक्षा फायदा कमी होतो. फारच क्लिष्ट फळ ते. त्या बिया साम्भाळून गर खा. बिया गुळगुळीत असल्याने सटकन घशात जाण्याची भीती..त्यामानाने गरही फार मिळत नाही . त्यातील पेलिसेड टिश्यूच्या खरखरीत गरही बेचव असतो...
|
Karadkar
| |
| Wednesday, May 23, 2007 - 4:47 pm: |
| 
|
गेल्या आठवड्यात माझि चांगलीच चंगळ झाली. cherimoya देसी दुकानात मिलाले आणि दुसर्या दिवशी office मधे पण. आणि अमच्या office च शेफ़ इतका चांगला आहे की त्याने रहिलेल्या cherimoya चे sorbet करुन अम्हाला खाउ घातले.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:22 pm: |
| 
|
अरे मित्रानो, मी अगदी सामान्य कुवतीचा, माणुस आहे. थोडीफार स्मरणशक्तीची देणगी आहे. ज्या क्षेत्रात उच्च शिक्षण घेतले, त्याची आवड कधीच निर्माण झाली नाही. रॉबीन हे सगळे आवडीतुन आले. कदाचित पारंपारिक पद्धतीने अभ्यास केला असता, तर आवडीची नावड झाली असती. हा विषयच इतका सुंदर आहे ना, कि इथे सगळेच लिहिते झालेत. आणि यातुन मलाच नविन माहिती मिळतेय.
|
Nalini
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:28 pm: |
| 
|
सिताफळाच्या बिया ह्या विषारी असतात. रामफळाच्या पण विषारी असतात का?
|
बी ची माहिती अचुक आहे.... रामफ़ळ साधारन फ़ेब्रुवारि ते एप्रिल च्या दरम्यान येतात...आमच कुलदैवत " राम " त्यामुळे आम्हाला राम जन्मानंतरच हे फ़ळ चाखता येत , .. घरच रामाच मंदिर आहे.. रामनवमिला डझनाने रामफ़ळ देवापुढे येतात... राम जन्माचा मोठा उत्सव असतो...त्याबद्दल लिहिल कधितरी.
|
हुडा, हाच प्रश्ण मी दिनेशदांना विचारणार होते. झाडाच्या इतक्या सुंदर माहिती बरोबर देखणे फोटो तर आहेतच पण त्याबरोबर टॅक्सॉनोमिकल नॉमेन्क्लेचर!!!! बॉटनी शिकूनही समोर झाड ओळखायचं झालं तर हळूच बॉंबे, मद्रास किंवा कलकत्ता प्रेसिडेन्सीची फ्लोरे (फ्लोराचं मराठी अनेकवचन!) उघडावे लागतात!!!!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 23, 2007 - 5:44 pm: |
| 
|
मिनोति, Cherimoya च्या गराचा रंग कसा असतो ? मला ते वेगळे फळ वाटतेय. रामफळाचा फ़िकट अबोली असतो. नलिनी, तुझ्या आवडीच्या या फळांबद्दल लिहायचे आहे. खुप अद्भुत माहिती आहे, माझ्याजवळ. ( जाहिरात, जाहिरात ) म्रिणमयी, मलाही मी अभ्यास केलेल्या क्षेत्रातले काहि विचारले तर बघुनच सांगावे लागेल.
|
Karadkar
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:00 pm: |
| 
|
चेरिमोया वरुन सीताफळाच्या रंगाचे पण तितके खवले नसतात. साधरण texture रामफळासारखेच असते. पण रंग अगदी हिरवा - सीताफळासारखा. गराचा रंग आणि चव अगदी रामफ़ळासारखी.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 23, 2007 - 6:12 pm: |
| 
|
मग ते वेगळे फळ असणार. वरती शोनूने लिहिले आहे कि त्याचा ज्युस मिळतो. पण रामफळाचा ज्युस निघणार नाही. खुप घट्ट गर असतो त्याचा. मला वाटते चेरिमोया, मी आधी उल्लेख केलेल्या काटेफणसाच्या जवळचे असणार. त्याचा रस निघु शकतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|