|
Jo_s
| |
| Saturday, May 19, 2007 - 4:02 am: |
|
|
वा, दिनेश कोकमं(रातांबे) बघून तोंडाला पाणी सुटलं. लहानपणी आई, मिठ साखरे बरोबर त्याच्या बरण्या भरून ठेवायची. मग ती कोळून झाली की सालं खायला मिळायची. आता सरबत रेडीमेड मिळतात. आणि ही फळं पहायलाही मिळत नाहीत. हल्ली सोलकढी मात्र सगळी कडे फ़ेमस होऊ लागली आहे.
|
Giriraj
| |
| Saturday, May 19, 2007 - 6:52 am: |
|
|
मी कोकम सरबत प्रथम कोकणातच पिलो.( 'प्यायलो' हा चुकीचा शब्द आहे )त्यावेळी त्यात जिरेपूड टाकुन दिले होते तेव्हा खूप छान लागले आणि मी त्याच्या प्रेमातच पडलो. मग मामांकडून थोडे सरनत आम्ही घेऊन आलो. नशिक वगैरे भागात तेव्हा ते व्यापारी तत्वावर मिळत नसे त्यामुळे कोकम सरबत तसे कुणाला माहीत नव्हते आणि मला माहीत असून मी पिलेलो (सरबत बरंका!)असल्याने मला मी कुणीतरी महान आहे असेच वाटायचे. आणी ते सरबत करायची रित म्हणजे कोकमें फ़ोडून ती गरांसकट एका बरणीत तितक्याच आकारमानाची किंवा वजनाची साखर घालून उन्हांत ठेवत.. याची चव खूप छान लागते बाजारातील सरबतापेक्षा!
|
acidity हा कायमचा त्रास असल्यामुळे जिथे जातो तिथे तू माझा सांगाती या नात्याने कोकम सरबत कायम सोबत असतेच. या कोकमाच्या पानाना पण साधारण कोकमासारखीच चव असते. लहानपणी खूप मजा यायची. सोलकढी तर आवडता प्रकार. माझ्या जर्मन भाभीला तर इतका आवडला की कसं करायचं वगैरे लगेच शिकून घेतलं. (नवर्याचा एकही आवडता प्रकार शिकली नाही. )
|
Runi
| |
| Sunday, May 20, 2007 - 2:18 am: |
|
|
मीपण आता स्टारफ़्रुट घेवुन खाणार. इथे Whole Foods मध्ये १-२ वेळा बघितले होते पण काय आहे ते कधी कळले नव्हते. आता नक्की घेइन पुढच्या वेळी.
|
Bhagya
| |
| Monday, May 21, 2007 - 1:41 am: |
|
|
बिमलीची फ़ळे मोठी झाल्यावर करमळे होतात असे मला वाटत होते, तो गैरसमज दूर झाला. कोकमाची फ़ळे म्हणजे, रातांब्यांचा फ़ोटो पण प्रथमच पाहिला. आणि कोकम आणि रातांबे एकच हे पण माहित नव्हते. उर्मिला पवार यांच्या 'आयदान' मध्ये रातांब्यांचा उल्लेख आहे. तो वाचून रातांबे म्हणजे रक्तासारखा गर असणारे आंब्यासारखे फ़ळ असे वाटले होते. हा गैरसमज दूर केल्याबद्दल धन्यवाद, दिनेशदा. खुपच छान लिहितोयस, अजून येऊ दे. आणि गिर्या, चेष्टा नाही, पण 'पिलो' जर बरोबर आहे, तर स्त्रीलिंगी उच्चार 'पिली' का? कारण मी लहानपणी 'पिली' म्हणायची आणि बरीच चेष्टा झालीय त्यावरून.
|
Bee
| |
| Monday, May 21, 2007 - 5:38 am: |
|
|
हीहीही.. मॅन्गोस्टीनचा फोटो आधी पाहून मला वाटल हीच का ती नेहमीच्या ओळखीतली पण माहिती नसलेली कोकमची फ़ळे. मी मॅंगोस्टीन कधीच विकत घेतले नाही. काल झिनझिनाट घ्यायला गेलो होतो पण एका पॅक मधे १२ झिनझिनाट होते. म्हंटले इतके आपण खाऊच शकणार नाही.. दिनेश, छान चालल आहे..
|
Shonoo
| |
| Monday, May 21, 2007 - 5:29 pm: |
|
|
राताम्ब्याची, पेरुची, आम्ब्याची, जांभळाची कोवळी पानं खोबर्याबरोबर वाटून 'आंक्र्या ताम्बळी ' म्हणुन एक कच्ची आमटी करतात उत्तर कन्नडा भागात. घरच्या अंगणात मिळणार्या गोष्टींचा पुरेपूर वापर करणारा प्रकार. गरम वाफाळत्या भातावर ही आमटी ओतून खाताना काय मजा येते. मुम्बैत हा प्रकार करायचा म्हणजे चार घरं पानं मागून गोळा करावी लागत. किंवा गावाहून कोणी येणार असेल तर आई पानं मागवत असे. तिथे कोकमांना 'भिरंडा सोल' किंवा नुसतेच सोल पण म्हणतात. त्या सारखेच एक वाटाम्ब्या सोल नावाचा प्रकार असतो. आम्बटपणा तसाच, पण रंग मात्र फारसा नसतो.
|
दिनेश, पपनसाला 'तोरंजन' हे कोकणातील आवडते नांव... या लेखात कागदी लिंबाचा (म्हणजे जे फक्त भरतात मी पाहिलं आहे ते पातळ सालीचे लिम्बू) त्याचाही समावेश व्हावा... इकडे अमेरिकेत सुध्दा जाड सालीची लिम्बे (ही शिवी नाही.. साल हा शब्द आहे...)
|
Sashal
| |
| Monday, May 21, 2007 - 8:42 pm: |
|
|
इकडे अमेरिकेत grapefruit , त्याचं juice (बहुदा चायनीज आणि in general, asians मुळे) बरंच popular आहे .. त्यात म्हणे negative calories असतात म्हणून मग वजन control करायला, कमी करायला ह्याचा उपयोग होतो .. पपनसाच्या बाबतीत हे खरं आहे की नाहि ह्याची कल्पना नाहि ..
|
Karadkar
| |
| Monday, May 21, 2007 - 9:05 pm: |
|
|
I think it's not grapefruit but it's Pamelo.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 22, 2007 - 3:18 am: |
|
|
शोनू, ती पानाची कढी मी लिहिली होती. विनय, छान नाव आहे, तोरंजन. मला माहित नव्हतं. महाळुंगाबद्दल कुणी खात्रीने लिहु शकेल का ? ग्रेपफ़्रुटचे फार कौतुक करतात. एअरलाईनमधे अगदी आवर्जुन त्याचा ज्युस असतो. पण फ़ार कडवट लागतो तो. पण ते फळ वेगळे.
|
Bee
| |
| Tuesday, May 22, 2007 - 4:12 am: |
|
|
विदर्भात लिंबाची झाडे कढीपत्त्याच्या झाडाप्रमाणे घरी असतात.. जर ऐसपैस अंगण असेल तर. शिवाय उन खूपच तापतेय ना आमच्याकडे म्हणून शरबताला लागतातच. आमच्याकडे ह्या दिवसात कुठे कुणाकडे गेलात तर लिंबाचे बडीशेप घालून केलेले शरबत देतात. मी इथे असे शरबत करून पाहिले होते पण काही खास जमले नाही. इथे ती चव येतच नाही. माझ्या राहत्या घरी ह्याचे झाड लावले होते पण ते नेमके फ़ाटकाच्या बाजूला झाले. पुढे चालून काटे रुतले असते. म्हणून उपटून टाकले. विदर्भात संत्री लिंबू मोसंबी ही फ़ळे आपसूक फ़ुलतात फ़ळतात डवरतात.. लिंबाच्या लोणच्याची साल जेंव्हा कथिया होते तेंव्हा ती साल पारदर्शक दिसू लागते आणि ते लोणचेची मस्त लागते.. माझी आई म्हणते लिंबाचे लोणचे ठेवले तर २० वर्षही टिकू शकते.. अबब!!!!!!!!!!!!
|
Saee
| |
| Tuesday, May 22, 2007 - 7:45 am: |
|
|
खरोखर पपनस सोलणे म्हणजे एक सोहळा असतो. फणसासारखा, पण जरा कमी कटकटीचा. मी पहिल्यांदा हे फळ चक्राताला (उत्तरांचल) खाल्लं तेव्हा माहितच नव्हतं की आपल्याकडे पण मिळतं. मग कोकणात बरीच खाल्ली. अशा वेगवेगळ्या चवी ठाऊक नव्हत्या. योगायोगाने मला नेहमी चांगलीच चव चाखायला मिळाली हे विशेष म्हणायला हवं आता. तुम्ही म्हणता तसं कोकणातल्या लोकांना मात्र या फळाचं तसं नावीन्य नाही. कोकमं, फणस, आंब्यासारखेच पपनस. नेहमीचे.
|
Swa_26
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:59 am: |
|
|
पपनस.... आह!! मस्तच... आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले. आमच्याकडे गणपतीच्या पुढे ठेवण्यासाठी पपनस लागते. आणि मला तर हे फळ खुप आवडते... आणि पपनस दादरला जाउन आणण्याची जबाबदारी माझीच असते घरी!! मग मी त्यातील २ फळे आणते, कारण प्रसादात वाटुन फार कमी वाट्याला येते ना!! पपनस खाण्यासाठी म्हणून मला all the way दादर भांडुप जायला काही वाटत नाही, तेही २ पपनसांचे वजन घेऊन!!
|
Shonoo
| |
| Tuesday, May 22, 2007 - 11:55 am: |
|
|
महाळुंगाला कोकणीत मावळिंग म्हणतात. citrus family तलंच फळ आहे ते. पण जाड साल असते आणि पाकळ्या आम्बट असतात. फारसा रस नसतो. त्याच्या फोडी मीठ ( अणि इतर काही मसाला) लावून सुकवतात त्यांना सुटकंची किंवा कंचीबोट्टे म्हणतात. तापातून उठल्यावर, किंवा एरवी सुद्धा तब्येत बरी नसेल, तोंडाला चव नसेल तर उकड्या तांदळाची पेज, त्यात 'धारभर तूप' आणि एक तुकडा सुटकंची खायला द्यायचा प्रघात आहे. असे खारवलेले तुकडे वर्षानुवर्षे टिकतात. गावाहून मुम्बै ला, आणि मुम्बै हून जगभरात पसरलेल्या नातेवाईकांकडे पसरतात सुटकंची चे तुकडे. माझ्या सासरी एक जाड सालीचं लिम्बाच्या जातीचं फळ पाहिलं. त्याला ते लोक डब्बकाइ म्हणतात. त्याचं पण फक्त लोणचं घालतात्- तिखट आम्बट, किंचीत तुरट असं ते लोणचं पण चांगलं टिकतं.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 22, 2007 - 5:04 pm: |
|
|
बघितलस विनय, किती मोठे कुळ आहे सायट्रसचे ते ? बी, लिंबु सत्री मोसंबी हि देशावरचीच फळे आहेत. कोकणात नाहीत ती फारशी. सई, तिकडे काय नाव आहे याचे ? स्वाती, ठाण्याला गावदेवीच्या देवळासमोर, कधीकधी मिळते ते. शोनू, आजच कळले ऑफ़िसमधे हे नाव. मी हे सुकलेले फळ, एका तामिळ घरात खाल्ले आहे. दहिभाताबरोबर ते छान लागते. आमच्या शेजारी एक कुर्गी कुटुंब रहात असे. त्यांच्या गावाहुन ते एक मोसंब्यासारखे दिसणारे फळ आणत. ते निखार्यावर भाजुन त्याची रसदार भाजी करत. त्याला पण छान चव यायची. मुंबई अहमदाबाद रेल्वेलाईनवर केशरी गर असलेली लिंबे मिळायची. त्याचे सरबत करतात. रंगाला संत्र्यासारखी असली तरी चवीला लिंबासारखी असतात ती. हि फळे जेव्हा खाल्ली त्यावेळी, नावं विचारायची राहुनच गेली.
|
Supermom
| |
| Tuesday, May 22, 2007 - 6:12 pm: |
|
|
दिनेश, पपनसाबद्दल खूप माहिती मिळाली. (खायची उत्सुकता पण जागृत झाली. ) माझ्या लहानपणी शेजार्यांच्या घरी रामफ़ळ म्हणून एक झाड होते. नन्तर ते कुठेच कधीच दिसले नाही. बाजारातही ते फ़ळ विकायला आलेले मी पाहिले नाही कधीच. त्या फ़ळाबद्दल तुम्हाला माहिती असेल तर लिहा ना. अन बुचाच्या झाडाबद्दलची माहिती वाचायची पण खूप इच्छा आहे.
|
Vadini
| |
| Tuesday, May 22, 2007 - 8:51 pm: |
|
|
supermom,रामफळाचे नाव वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. अजूनही पुण्यात काहीवेळेला विकायला दिसते.दादरलाही पाहिले आहे. त्याला रामफळ हे नाव कशावरून पडले असावे? सीताफळ आणि त्याचे मूळ एकच आहे का? असे प्रश्न अनेकदा पडले आहेत. अर्थात शास्त्रीय माहिती मात्र दिनेशच सांगू शकतील. दिनेश,तुम्हाला कुठल्याच विषयाचे वावडे नाही का हो?
|
Bee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:35 am: |
|
|
अरे हे काय.. रामफ़ळ तर कित्ती तरी ठिकाणी विपुल प्रमाणात विकायला मी बघितले आहे. आता तुम्ही जर बाजारहाट करायला बाहेर पडत नसाल वा जात असून नजर फ़िरवत नसाल तर तुम्हाला ते आढळणार नाही. मी रामफ़ळाला कधीच मुकलो नाही. दरवेळी मला खायला मिळते. इथे सिंगापोरमधे नाही मिळत पण देशात तर हमखास हंगामात मिळतेच मिळते. .. आणि मॉम विदर्भात तर विपुल प्रमाणात रामफ़ळ पिकते. गेल्या वेळी मी लोणारला गेलो. संपूर्ण तळे रामफ़ळाच्या झाडांनी घेरलेले आहे. तुला किती रामफ़ळ विकत घेउ आणि किती नाही असे होइल. तिथे स्वस्त दरात झाडावरचे रामफ़ळ विकतात. माझ्याकडे तिथल्या रामफ़ळांचा फोटो आहे. मी नंतर त्याचा आकार कमी करून इथे तुम्हाला नयनसुख देइन :-) रामफ़ळ आणि सिताफ़ळ ह्या दोघांमधे साम्य असे आहे की दोन्हीच्या बिया काळ्या असतात. बिया ह्या गरात दडलेल्या असतात. दोन्ही फ़ळांचा गर आंबटगोड असतो. त्याला एक प्रकारचा थंडावा असतो जसा श्रीखंडाला असतो. दोन्ही फ़ळ छान चमच्यानी खरडून खाता येतात. दोन्ही फ़ळांचा आकार जेमतेम सारखाच असतो. दोन्ही फ़ळ धान्यात छान पिकतात. झाडावर ती पिकतीलच असे नाही पण कोठारात ठेवली की छान दबली जातील अशी पिकतात. दोन्ही फ़ळांचे देठ मजबूत असते.. दोन्ही झाडांची पाने गळून फ़क्त काटक्या दिसतील अशी बेहंगामी स्थिती होते. रामफ़ळाचे झाडे थोडे जास्त उंच असत. पाने छान खाली वाकलेली असतात. पानांमुळे झाड छान दिसते. सिताफ़ळाची पाने मात्र ताठ अस्दतात. दोन्ही झाडांचे फ़ुलही सारखेच असते दिसायला. सिताफ़ळाचा वरतून डोळे असतात पण रामफ़ळ गोल गुळगुळीत असते. इत्यादी इत्यादी.. बाकी नावाचे कोडे मला ठावूक नाही..
|
Bee
| |
| Wednesday, May 23, 2007 - 1:57 am: |
|
|
आणखी एक माहिती म्हणजे सिताफ़ळ हे दिवाळीच्या सुमारास बहराला येते तर रामफ़ळ बरोब्बर रामनवमीला हजर.. रामनवमीला रामाला रामफ़ळ वाहतात. रेवडीचाही प्रसाद असतो. खरे तर दोन्हीचा मान असतो, रेवडीचा नि रामफ़ळाचा. पण सिताफ़ळ हे दिवाळीला लक्ष्मीला वाहतात. इथे रेवडी ऐवजी बत्ताशाला मान असतो. गौरीहाराच्या आत बत्ताशे नि लाह्या..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|