|
Runi
| |
| Wednesday, May 16, 2007 - 4:30 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुमॉ, माझी आई पण साध्या आवळ्याचे खुपच मस्त लोणचं करते. ती सगळे आवळे तेलावर वाफवते. तसे चवीष्ट लोणचे मी दुसरीकडे कधी खाल्ले नाही. आई ग नुसत्या आठवणीनेच तोंडाला पाणी सुटले.
|
Supermom
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:02 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रूपाली, ते आवळे ती तेलात उकडते असा काहीसा उल्लेख मी लहानपणी ऐकलाय. पण ते जरा विचित्र वाटल्याने मी लिहिले नव्हते. आता तुझे वाचून वाटते की सेमच पद्धत असावी. हे लोणचे मात्र अगदी 'अहाहा..' लागते. लहानपणी मी आत्याच्या घरी गेले की जेवणात खास माझ्यासाठी असायचेच हे लोणचे.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:40 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुपरमॉम, आईना माझे लेखन आवडते, हा तर माझा गौरवच आहे. थोडेसे तेल कढईत घालुन त्यात आवळे टाकुन झाकण थेवुन वाफ़ देतात. अशीच लिंबे पण वाफवतात. याने लोणचे लवकर मुरते.
|
Runi
| |
| Wednesday, May 16, 2007 - 6:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो दिनेशदा, तुम्ही म्हणालात अगदी तसेच आवळे वाफवते माझी आई लोणच्यासाठी, पण लिंबंही अशी वाफावतात हे नव्हते माहीत मला.
|
Bhagya
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:49 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा! दिनेशदा, खूप दिवसांनी आल्यावर इतके सुंदर वाचायला मिळाले की उपाश्याला आवडता खाऊ मिळाल्यासारखेच झालेय. लाल चिंच राहीली ना! राय आवळे, आवळे, पेरू, चिंच, आमली, कैर्या.... लोकांच्या झाडावर दगड मारून चोरल्यास अधिक चविष्ट लागतात असा स्वानुभव आहे. फ़्लोरिडाला pompano beach या भागात गुलमोहोर, हिरव्याकंच कैर्या लगडलेली आंब्याची झाडे, चिंच, जांभूळ, पेरु, चिकू अशी सगळी झाडे दिसतात. तशीच इथे Queensland ला. सगळं आयुष्य खर्ची घातलं, तरी मला सगळ्या झाडांची माहिती वाचण्याचा कंटाळा येणार नाही. मागच्या डिसेंबर ला मी New Zealand ला अगदी वेगळी झाडे बघितली... माओरी भाषेत त्यांचे नाव 'पोहुतुकावा' ( christmas tree in english) . तर ही झाडे सगळीकडे अगदी उत्सव असावा तशी फ़ुललेली होती. शिरिषासारख्या पण लालभडक फ़ुलांनी डवरलेली, कळ्या पांढरट. . पण पाने आणि बुंधा एकदम वेगळा. तशीच तिथली नारळाच्या झाड़आंसारखी असणारी देखणी silver ferns , दुर्मीळ अशी rock daisy . प्रत्येक प्रदेशात वेगळी झाडे दिसतात. तुझ्यासारखे चांगले लिहिता येत नाही, म्हणून तुझ्याच पानावर हे लिहिलेय.....पोहुतुकावाचा हा फोटो.
![flowers](/hitguj/messages/58489/125813.jpg)
|
Bhagya
| |
| Wednesday, May 16, 2007 - 11:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि आई वाचतेय....पण ही माहिती पुस्तकरुपाने किंवा सी डी म्हणून उपलब्ध झाली तर कितीतरी वाचतील, हो ना? मी राणी बंग चे 'गोईण' वाचलेय...पण त्यात एकही चित्र नाही, त्यामुळे नुसते वर्णन वाचून झाडे कशी असतील त्याचा अंदाज येत नाही.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 17, 2007 - 2:12 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भाग्य पटतेय. हे माध्यम अश्या लेखांसाठी अत्यंत उपयोगी आहे. रंगीत फोटो आणि माहिती, मराठीत एकत्र उपलब्ध नाही. आणि कितीही लिहिले तरी चित्राशिवाय झाडाची कल्पना येत नही. मी पण शक्यतो फुलाचा वा फळाचा नैसर्गिक अवस्थेतला फोटो द्यायचा प्रयत्न करतोय. पण तरिही संपुर्ण झाड कसे दिसते, याचा फोटो टाकायला जमत नाही प्रत्येकवेळी. हे मला कदंबाच्या झाडाबद्दल फार जाणवले. या झाडाचे सौंदर्य एका फोटोत पकडताच येत नाही. आणि लॉंग शॉट घेतला तर, झाड कसले तेच कळत नाही. खुपदा आपलीच झाडे परदेशात अगदी वेगळेच रुप घेऊन येतात. आपल्यापैकी अनेकजण अनेक देशात आहेत, त्यानी अशी माहिती दिली तर किती छान ना ! मला जितके माहित आहे तेवढे लिहितोच आहे. अजुन बरेच लिहायचे आहे.
|
Bee
| |
| Thursday, May 17, 2007 - 6:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, हा काळा मोगरा इथे सिंगापोरमधे खूप खूप ठिकाणी आढळतो. मला ह्याचे नाव.. ह्या झाडाची ओळख आता तुमचा लेख वाचून झाली. मी ह्याची फ़ळे योगाच्या वर्गात खाल्ली आहे. पुर्वी मला वाटायचे हे झाड इथले कडूनिंब असावे. नंतर फ़ळ चाखून पाहिले तेंव्हा हा गैरसमज दूर झाला. पण मी ह्या झाडाचा फ़ुलोरा कधीच पाहिला नाही. चहुबाजुने ह्या झाडाला घेर असतो. दिसायला खूपच छान दिसतो. चांदराती तर ह्या झाडाचा नजाकत आणखीणच वाढते. खास करून ज्या झाडाची सावली पहावी.. खूप सुंदर दिसते! आता भर पहाटे फ़ुलोरा हुडकायला हवाच.. अति आंबट फ़ळ मला कुठले वाटत असेल तर अंबाडीचे बोंड!!! पानेच केवढी आंबट.. फ़ळ तर त्याहून अधिक आंबट.. पण अंबाडीची पाने, बोंड दोन्ही सुंदर रूप धारण करून जन्माला आले आहे..
|
Giriraj
| |
| Thursday, May 17, 2007 - 9:21 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुपरमॉम,तुझी आई अतिसुपरमॉम आहे म्हणजे! बी,अरे बालाका, त्याला काळा मोगरा नाही रे म्हणत... दिनेशनी तो शब्द उपरोधाने वापरलाय रे... काही अतिफ़ेकू लोकं काहीही माहिती नसतांना कसे छातिठोकपणे बाता लगावतात याचेच उदाहरण म्हनून त्यांनी तसे म्हटलेय रे... (की तुलाच कल्पून म्हटलेय बरे??? ) दिमाग का दही आणि मेंदूचा मोरावळा कसा करतात?? आणि तो मेंदू जर दूरदेशी असेल तर परस्पर मोरावळा कसा करावा??
|
Abhijit
| |
| Thursday, May 17, 2007 - 11:37 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Yes, Dinesh-daa, this is it! फोटो बघून अगदी कन्फर्म झाले आहे. (आणि जिथे आम्ही हे विकत घेतले ते शान्तादुर्गेचे देऊळच होते.) मनापासून धन्यवाद! हा " झिनझिनाट " गोवा सोडून भारतात इतर कुठे भेटेल?! आणि अमेरिकेत?
|
Karadkar
| |
| Thursday, May 17, 2007 - 11:54 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आजच Star Fruit म्हणजेच झिनझिनाट खाल्ले. आमच्या हाफिसात मिळाले. whole Foods मधे वगैरे मधे मिळेल रे अभिजीत.
|
करमळं! आमच्या समोरच्या बंगल्यात झाड आहे. लहानपणी तिथे जाउन यथेच्छ खायचो. विशेषत: हिरवी. पाणी सुटलं नुसत्या आठवणिने!
|
Abhijit
| |
| Friday, May 18, 2007 - 6:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
काय सांगतेस? तुझ्या तोंडात साखर (की अजून दोन करमळं?) पडो!! वीकएंडला जाऊन बघतोच..
|
Bee
| |
| Friday, May 18, 2007 - 7:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला हे फ़ळ फ़क्त star fruit ह्या एकाच नावानी माहिती आहे. इथे विपुल प्रमाणात मिळते पण मला काही खास असे आवडले नाही. जरासे तुरट वाटले चवीला. पण मी खूपदा नाही खाल्लेले..
|
Bee
| |
| Friday, May 18, 2007 - 9:29 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, तुमचा चंदनावरचा लेख मी आज वाचला. तुम्ही खरच पाकिस्तानात जाऊन आलात? कसे वाटले.. तिथले अनुभव वाचायला आवडेल. चंदनाच्या झाडांवर साप असतात असे मी खूपदा ऐकले आहे.. खर आहे का हे?
|
Dineshvs
| |
| Friday, May 18, 2007 - 9:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Bee तु स्टारफ़्रुट कच्चे खाल्लेस बहुतेक. आणि फक्त पाकिस्तानात तयार झालेले सरबत रे. पाकिस्तानात नव्हतो, गेलो मी, ते प्यायला. चंदनावरच्या सापांचा उल्लेख केलाय मी, माझ्या लेखात.
|
दिनेश मस्त चाललंय.. जमेल तसं वाचतोय... पण लेख उत्तम आहेत. कधीतरी वाटतं, कोकणात एकादी जमीन घेऊन, या झाडांची लागवण करावी.. नुसती बघायला म्हणून...
|
मायबोली च्या मुखपृष्ठावरती "झिनझिनाट" आल्याबद्दल अभिनंदन दिनेशदा.
|
Ksmita
| |
| Friday, May 18, 2007 - 9:25 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा वा मस्तच सुरु आहे लेखमाला प्रिंट घेऊन वाचत बसणार आता कालच आवळा लोणचे केले आणि आज इथे आवळ्याची माहिती वाचली झाडे पाहिली .... काय योगायोग !! Thanks for all this information !!!
|
Dineshvs
| |
| Saturday, May 19, 2007 - 1:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विनय, मागच्या पिढीने जी झाडे लावली, त्याची फळे आज आपण खातोय. आपण पुढच्या पिढीसाठी काय ठेवणार आहोत ? अमेय आताच बघितले ते. आभार. हा गौरव माझा नाही तर या झाडांचा आहे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|