Ajjuka
| |
| Tuesday, May 15, 2007 - 8:14 am: |
|
|
पुण्यातच होते गेले चार दिवस.. उद्या जाईन परत. ही ही..
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 15, 2007 - 10:51 am: |
|
|
बी धन्स. अज्जुका पुढच्या वेळी तुला वेळ असेल तर नक्की... सई तुम्ही कोल्हापुरच्या आहात काय?
|
Saee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 11:58 am: |
|
|
त्या काटेरी चेंडूंच्या मधला गोळा कसला आहे?त्याचं बोटॅनिकल नाव काय? त्याचा उपयोग काय? (काही आहे तरी का?) हो झकासराव. आपण माझे गाववाले आहात हेपण आत्ताच कळलं
|
Shonoo
| |
| Tuesday, May 15, 2007 - 12:44 pm: |
|
|
कदम्बाचे एक मोठे झाड पार्ल्यात कॉलेजच्या अंगणात होते, लायब्ररीच्या मागच्या बाजूला. शिवाय जुहू बस डेपो च्या कडेला याची दोन्-तीन झाडं होती. केमिस्ट्री लॅब च्या मागे ते दुसरं चेंडूसारख्या फळांचं झाड होतं. त्याला आम्ही लोथार म्हणत असू :-) अशोक आणि कदम्बाची झाडं साहित्यात इतकी लोकप्रिय असूनही मुम्बै मधे बागांमधून क्वचितच दिसतात याचं मला नेहेमीच वाईट वाटत असतं. माझ्या सासरी, गोदावरी जिथे समुद्राला मिळते त्या भागात चिंचेचा कोवळा पाला आणि फुलं घालून बरेच प्रकार करतात त्यातल्या त्यात कोळम्बी ची 'पुलुसु' नावाची डिश एकदम झकास लागते. त्या सुमारास कोणी इकडे येणारं असेल तर सासूबाई ती पानं सुकवून पाठवतात. पण फार दिवस झाले की त्यांचा स्वाद कमी होत जातो. आंध्र प्रदेशात पण अरवी (अळकुड्या) 'चामलदुम्पा' म्हणून ओळखतात. ते लोक सहसा पानांचा वापर करत नाहीत. गदिमांच्या एका पुस्तकात त्यांच्या रेलवे ने केलेल्या प्रवासाचा उल्लेख आहे. त्यात सर्व मित्रांनी 'बाभूळ झाड उभेच आहे' अशी ओळ वारंवार म्हटल्याचं लिहिलंय. कोणाला ती कविता माहिति आहे का?
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 15, 2007 - 1:09 pm: |
|
|
सई, ते बहुतेक Cyperus papyrus आहे. जर ते तेच असेल तर त्यापासुन आजही एक सोनेरी रंगाचा कागद करतात. त्यावर चित्रे काढता येतात. शोनू, खुपदा कदंबाची झाडे जोडीनेच असतात. आणि लोथार हे नाव का ? पुर्वी मॅड्रेक आणि लोथार अशी कॉमिक्स मिळायची.
|
हो, नार्डा नावाची जादूगार मॅन्ड्रेकची बायकोही असे. काय योगायोग सईचे लोथर वाचून मलाही त्याच लोथरची आठवण झाली... तो मला वाटते नीग्रो होता... नवीन सासू काय प्रकार असतो? म्हणजे हा दरवेळी नवीन सासू आणतो की काय? शीतलला जुन्या सासू बद्दल माहीती आहे नाही. मामा ठाकूर काय भानगड आहे? आम्हा नाशिककराना तुम्ही अंधारात ठेवले. तुमच्याकडेही बघावे लागेल....
|
Shonoo
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:51 pm: |
|
|
तो लोथार तुळतुळीत टक्कल वाला होता ना? मी कॉलेजात असताना शाकाल नव्हता! म्हणून लोथार :-) नव्या बायको शिवायच नवी सासू. ऐ ते न! पुणेकरांचा काही भरोसा नाही :-)
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:45 pm: |
|
|
बिच्चारा माझा गिर्या, काहितरी लिहुन जातो आणि असा वादात सापडतो. अलिकडेच लग्न झालेय ना म्हणुन नवी नवरी तशी नवी सासु. बाकि काही नाही.
|
Shonoo
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:21 pm: |
|
|
Linneaus बद्दल, त्याच्या युनिव्हर्सिटीबद्दल इथे वाचा http://travel.nytimes.com/2007/05/13/travel/13Footsteps.html
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:07 am: |
|
|
अज्जुकाकडे जेवनाचे निमंत्रन मिळाले आहे, ही संधी मी सोडणार नाही :-) दुर्गा भागवतांचे एक छोटेखानी पुस्तक आहे, त्याचे नाव आहे 'कदंब'. पैस मधेही त्यांनी ह्या झाडाचे संदर्भ घेतले आहेत. मी कदंब वाचले नाही.. पण मिळवण्याचा प्रयत्न चालला आहे. विदर्भात, हरतालिकेला खूप महत्त्व आहे. श्रावणातील हिरव्या वनस्पती शिवाला अर्पण करण्याची प्रथा आहे. ह्यात चिंचेची १०८ पाने शिवलिंगावर वाहिले जाते. माझ्या बालपणी आम्ही बहिणींकरिता चिंचेची १०८ पाने मोजण्याचे कष्ट आवडीने घेत होतो.. ही १०८ पाने मोजणे म्हणजे फ़ार जिकरीचे काम आहे. कारण चिंचेची पाने किती लहान असतात. चिंचेच्या झाडाखाली रात्री भूत असते हे राहूनच गेले दिनेश :-)
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 16, 2007 - 2:27 am: |
|
|
संपूर्ण जेवण??? वेडा की काय तू... फक्त अळूचे फतफते मिळेल..... ही ही ही
|
Bee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 3:15 am: |
|
|
शोभतेस हो पक्की सदाशिव पेठी नि पुणेरी :-)
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 16, 2007 - 4:14 am: |
|
|
संपूर्ण जेवण??? वेडा की काय तू... फक्त अळूचे फतफते मिळेल..... >>>>>>"मसालेभात तु घेवुन ये दोघाना पुरेल इतका" हे सांगायच विसरलीस काय? माझ्या मना बन दगड आणि TP नको करु. सई तुमच आडनाव हेच तुमच गाव दाखवतय का? मस्त येरिया आहे तो. वारणेच खोरं छान हिरवा निसर्ग. माझ मुळ गाव पन्हाळा तालुक्यात आहे पण आता घर आणि आई बाबा आणि लहान भाउ कोल्हापुरमधे आणि मी माझ्या पत्नीसहीत पुण्यात. गिरी, कुठे लपुन बसलाय?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:30 am: |
|
|
Bee चिंचेवरच्या भुतांचा उल्लेख केलाय मी. पण खरं सांगु. ( मायबोली सोडली तर ) मला कधीच कुठे भुतं दिसली नाहीत.
|
Swa_26
| |
| Wednesday, May 16, 2007 - 5:57 am: |
|
|
नवीन सासु? ऐ. ते. न. .... दिनेशदा, त्या अळुच्या कंदाची 'दम अरवी' म्हणून एक रेसिपी पाहीलेली टि. व्हि. वर... दम आलूसारखीच, पण अळकुड्या वापरून. चांगली वाटत होती बघायला तरी.... घरी करुन पहायला हवी.
|
Saee
| |
| Wednesday, May 16, 2007 - 7:25 am: |
|
|
मॅंड्रेक आणि लोथर? थे ssss ट दिवाळी आणि मे महिन्यांच्या सुट्टीत गेले मी!! दिनेश, तुमची काहीतरी गफलत होतेय हो. मला तर तो मधला गोळा चक्क गिरिश सोनारसारखा दिसतोय! झकासराव, कोल्हापूर bb वर बोलू या की, नाहितर मेलवर पण चालतंय..
|
Jo_s
| |
| Wednesday, May 16, 2007 - 9:05 am: |
|
|
मधेच आळू कुठून आला आळू च्या पानांची भाजी करतातच, ते खाजू नये म्हणून त्यात चिंच घालतात काही जण चुक्याची पानंही त्यात घालतात, त्याच्या देठांची ही चिंच किवा दही घालून कोशींबिर भरीत या प्रकारातला पदार्थ करतात. आळू वडी तर प्रसीध्द आहेच. अळकुड्याही छान लागतात. त्या नुसत्या उकडून मिठ लाउन खाता येतात किंवा भाजी करुन ही खातात.
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 16, 2007 - 10:44 am: |
|
|
सई मेल चेक करा. मायबोलीवरुन पाठवली आहे.
|
Supermom
| |
| Wednesday, May 16, 2007 - 12:14 pm: |
|
|
मॅंड्रेक आणि लोथार... अगदी लहानपणीच्या आठवणी कशा धावत आल्या. बाबा नेहेमी आमच्या आवडीची सारी कॉमिक्स आणायचे. आधी वाचायला मिळावीत म्हणून आम्हा बहिणींची जी भांडणे होत की बस. या वर्णनाबरोबर फ़ॅंटम, फ़्लॅश गॉर्डन सारे आठवून गेले. दिनेश, राय आवळ्याच्या झाडाचा फ़ोटो सुरेखच. माझी मावशी यवतमाळला रहात असे. तिच्या घरी मोठी बाग होती. त्यात कोपर्यात हे झाड दिमाखात उभे होते. मावशी त्यांचे लोणचे नि चटणी फ़ार सुरेख करत असे. आता ते घरही गेले नि मावशीही. पण आठवणी मनात पक्क्या आहेत. तसेच नागपूरला माझ्या आईची आत्या साध्या आवळ्याचे लोणचे फ़ारच सुरेख करीत असे. आवळे ती काहीतरी वेगळ्या पद्धतीने उकडते असा काहीसा संदर्भ ऐकल्याचे आठवते. कसे ते नाही माहीत. पण इतके चविष्ट लोणचे मी कुठेच खाल्ले नाही. दिनेश, ही लेखमाला इतकी सुरेख लिहिताय तुम्ही. माझी आईपण रोज वाचते आहे. फ़ार आवडतात तिला तुमचे लेख. ती म्हणते की तिच्याही लहानपणीच्या सार्या आठवणी जिवंत होतात हे सारे वाचून. ती पुण्याला परत आली की नक्कीच भेटेल तुम्हाला (आता तुमच्या मित्रमंडळीत वयोवृद्ध लोकांचीही भर पडणार म्हणजे)
|
Shonoo
| |
| Wednesday, May 16, 2007 - 3:26 pm: |
|
|
Mandrakes चा उल्लेख harry potter मधे पण आहे. गूगल केल्यास फार मनोरंजक माहिती मिळावी.
|