किती छान माहिती आणि किती सुंदर फोटो आहेत!! सलाम, दिनेशदा. ( आणि लिंकसाठी अमेयचे आभार!!) भारतीय फुलझाडांची खूप छान माहिती इथेही वाचायला मिळाली मध्यंतरी. अर्थात तिथे इतक्या छान शैलीत नाही लिहीलेली ती.
|
Suyog
| |
| Friday, May 11, 2007 - 3:38 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
bee yog aani kundilini war lihiles tar wachayala khup aawadel mahitipan milel sadhya me reiki ch pustak wachatey tyamul yat interest nirman zalay thanks
|
Dineshvs
| |
| Friday, May 11, 2007 - 4:52 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोनू, सिमेंटच्या मोठ्या कुंडीतही कमळे वाढु शकतात. रॉबीन, उगाच गैरसमज पसरवु नकोस रे. अमेय, ईथेच राहणार आहे हे सगळे. सवडीने वाचता येईल. स्वाती, तुझ्याकडुन माझ्या माहितीत भर पडावी, अशी रास्त अपेक्षा आहे.
|
Ksha
| |
| Friday, May 11, 2007 - 8:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, कुंडलिनी ३ नसून साडे-तीन वेटोळे घालून मुलाधार चक्रात सुप्तरूपात राहते. (ज्याला २ नसून ४ पाकळ्या असतात). हे अतिशय गूढ शास्त्र आहे हे मान्य. पण या चक्रांची माहीती तू जिथून घेतोयस तो बहुतेक चुकीचा स्त्रोत आहे. असो. इथे ही चर्चा नको. सुरेख लिहीताय हो दिनेश
|
Gs1
| |
| Saturday, May 12, 2007 - 4:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे फूटबॉलएवढे काय आहे ? ..
आकाराचा अंदाज यावा म्हणून ....
![c1](/hitguj/messages/58489/125624.jpg)
|
Dineshvs
| |
| Saturday, May 12, 2007 - 6:03 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हे एक प्रकारचे गवतच आहे. मला वाटते पॅपिरायस असे नाव आहे याचे. याला जाडसर मोठा दांडा असतो. त्याचे पातळ काप काढुन त्याचा कागद करतात. पेपर हे नाव यावरुनच पडलय. माझा अंदाज खरा असावा.
|
Saee
| |
| Saturday, May 12, 2007 - 8:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जुन्या कर्नाटक हायस्कुलच्या आवारात आहे मोठा कदंब. सानेमॅडमचे आवडते झाड आहे ते. नाव आणि वृक्ष दोन्ही राजस. दिनेश, कदंबाचे फोटोही सुरेखच.
|
Ajjuka
| |
| Saturday, May 12, 2007 - 11:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सई, साने मॅडम ना भेटतेस? सहीच. त्यांच्यासारखं physiology आजही कुणी शिकवू शकत असेल असं वाटत नाही. आणि घाणेकर सरांना भेटतेस की नाही? त्यांच्याबरोबर पावसात वरंधा उतरायचा चालत, मग तिथून रायगड ला जायचं आणि मग त्यांच्या ओळखिच एक घर आहे गडावर (झोपडीवजा.. पावसात एका कोपर्यात गाय वासरू, एका कोपर्यात चूल, आणि एका कोपर्यात बसायची जागा अशी..) तिथे ताजं लोणी आणि गरमगरम भाकरी खायची... व्वा..
|
Saee
| |
| Monday, May 14, 2007 - 5:20 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सानेमॅडम आमच्या ऑफिसमधे पुस्तकांच्या कामानिमित्त बरेचदा येत असतात. आणि वैयक्तिक कामांसाठी आम्ही घरी जाऊन भेटतो त्यांना. घाणेकर सरांना अलिकडे वैयक्तिक भेटलेले नाही, पण व्याख्याने आणि प्रदर्शने चुकवत नाही. पण जे लोक त्यांच्या हाताखालुन गेले ते पक्के नशीबवान!
|
Nalini
| |
| Monday, May 14, 2007 - 8:20 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
चिंचऽऽऽऽ तोंडाला पाणी सुटलं माझ्या. उद्या लिहिते मी माझ्या काही आठवणी.
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:27 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा ते चेंडुफ़ळ आहे ते लहान असले की डार्क चॉकलेटी किंवा काळसर दिसते काय?(माझ रंगाच ज्ञान अगाध आहे इती आमच अर्धांग आणि ते बरचस सत्य आहे. ७ रंग सोडुन मला बाकिचे रंग कळत नाहित. त्यामुळे मी लिहिलेल रंगाच वर्णन चुकीच असण्याची शक्यता नाकारता येत नाही.) आणि टणक असते का? हे जर तेच असेल तर आम्ही शाळेत असताना ते एकमेकांच्या डोक्यात मारण्याचा उद्योग केला आहे. आणि हो त्या काटेरी फ़ळावरुन आठवल की लहान असताना साधारण अर्धा ते एक इन्च अस लांब आणि तेंड्लीसारखा आकार असलेले एक काटेरी फ़ळ होत. ती फ़ळं जर लांबुन फ़ेकुन मारली तर त्याचे छोटे छोटे काटे कपड्यामधे अडकायचे. त्याला आम्ही लांडगे म्हणत असु. ते कधी पाहिलय का तुम्ही? त्याच छोट झुडुप असत साधारण ४ फ़ुट पर्यंत उंचीच.
|
Bee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 4:37 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विदर्भात, ह्या विलायती चिंचेला 'गोरठ' चिंच म्हणतात. बहुतेक गोरठ चिंच हे हिंदी नाव असावे पण माझ्या तोंडी हेच नाव आता बसले आहे. ही चिंच गुळचट लागते. दिनेश, तुम्ही अळूचा उल्लेख केला. कालच जेवताना माझी एक कोकंणी कलीग मला म्हणाली की मराठी लोक अळूची भाजी करतात. अळूच्या पानांची तर आपण अळूवडी करतो ना.. मी भाजी कधी खाल्लेली नाही. तर ती म्हणाली, अळूचे कंद असतात त्याची भाजी करतात. तुम्ही जरा clear कराल का अळूची भाजी की कंद आणि चिंच नेमकी कुठे वापरली जाते. कोळाचे पोहे मला वाटतं कन्नड भागातली कृती आहे. विदर्भात, अळूच्या पानांना चमकूर्याची पाने म्हणतात. मला 'अळू' हे नाव मायबोलिवर आल्यावरच कळले.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अरे बी, अळूच्या पानांची पात्तळभाजी करतात ना आणि त्यात पानांच्या देठाचे तुकडेही करून टाकतात. कंदाचं माहित नाही. पण पातळभाजी य वेळा खाल्लीये.. आणि पुण्यातल्या मंगल कार्यालयांमधे पूर्वी किंवा अजूनसुद्धा.. जेवणात अळूचे फतफते नावाचं प्रकरण असतं.. ती अळूची पातळभाजीच असते. खोबरं, दाणे, गूळ घालून केलेली.. खास ब्राह्मणी पदार्थ... तू ये मुंबईत.. घालते करून... तोंड को पाणी सुट्या...
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आणि चिंच ही पुण्यात प्रत्येक आमटीत वापरली जाते. चिंच गुळाशिवाय आमट्या पूर्णच होऊ शकत नाहीत. पुण्यातले कोकणस्थ एकंदरीतच ज्यात त्यात साखर किंवा गूळ घालत असतात असं एका गिरगावातल्या कोकणस्थाने नाक वाकडं करत सांगितलं होतं मला.
|
Giriraj
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझी नवीन सासू मला आम्लपित्तावर 'गोरज चिंच' नावाच्या चिंचेची भुकटी पाठवते. ति आंबटगोड लागते. तो काय प्रकार आहे? चिंचा जास्त खाल्ल्या तर जीभ आणि गाल आतून सोलवटले जातात आणि डोकेदुखीही होते. migraine असलेल्यांना आंबट खौ नका म्हणून सांगतात!
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 15, 2007 - 5:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
झकास, हो बहुतेक तेच फळ. फुलुन खाली पडले तर ते फुटते. लांडग्याचे वर्णनही बरोबर आहे. गायींच्या शेपट्यानाही ते चिकटतात. अळुचे फ़तफ़ते लग्नाच्या जेवणात हवेच. जिलबीचा उरलेला पाक त्यात ओततात, म्हणुन ते जास्तच गोड लागते. अळुचे कंद म्हणजे अरवी. भारतभर हि भाजी खातात. मोठ्या अळुचे कंदही खातात. नायजेरियात त्याला कोकोयॅम म्हणतात. बी आणि गिर्या, तुम्ही म्हणताय ती गोरख चिंच. ती वेगळी असते. तिचे फळ वरवंट्याएवढे असते.
|
Meenu
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:42 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझी नवीन सासू >>> गिर्या नविन सासू हा काय प्रकार आहे ..? जुन्या सासुचं काय झालं ..? दिवे घेशीलच ..
|
Zakasrao
| |
| Tuesday, May 15, 2007 - 6:45 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कालच अळुची वडी खाल्ली. मस्त होती. अळुचे फ़तफ़ते ऐकुन आहे मी. अज्जुका तु पुण्यात कधी येनार आहेस? btw काहि अळु खाल्ल्यानंतर गळ्याला खाज सुटते ते कशामुळे? दिनेशदा तुम्ही जो फ़ोटो दिलाय तो फ़ुलल्यानंतरचा आहे. आणि ते खाली पडुन फ़ुटते हे बरोबर आहे. मी पाहिलय ते.
|
Bee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 7:04 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
धन्यवाद.. पण आमच्या वर्हाडात ही प्रथा नाही. अळू कधीमधीच केली जाते. लग्नात तर मुळीच नाही. इथे सध्या भारतातून अळूचे कंद अमाप आले आहेत. दरवेळी घ्यायला टाळतो पण ह्यावेळी मी ते विकत घेतले. आल्याप्रमाणे त्याचा आकार असतो. कंदावर थोडे मुळ असतात. माझा मित्र म्हणाला उकळून घे, साल काढ आणि सुकी भाजी कर. बटाट्याची भाजी आहे की अळूच्या कंदाची हे खाल्ल्याशिवाय ओळखायला येणार नाही. झक्कास, अळू जर कच्चा राहिला असेल तर तसे होते..
|
Saee
| |
| Tuesday, May 15, 2007 - 7:49 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
आमच्याकडे अंबाबाईच्या देवळात मीठ चोळलेले चिंचेचे मोठे मोठे गोळे विकायला असतात. आता स्वच्छतेच्या नावाखाली घेत नाही पण शाळेत असताना खायचो. शिवाय लहानपणी चटपटीत 'अल्लोळीबल्लोळी' करायचो. बिया काढलेली चिंच घ्यायची आणि गुळाबरोबर खलबत्त्यात जमेल तितकी कुटायची, अगदी एकजीव झाली पाहिजे. मग गोळा बनवुन आईस्क्रिमच्या काडीत अडकवून भरपुर वेळ चोखायची. स्वच्छ, बिनखर्चाचा, सुट्टी कारणी लागलेला homemade लॉलीपॉप!! आमच्याबरोबर मोठेही याचा आनंद घेत.
|