|
Dineshvs
| |
| Wednesday, May 09, 2007 - 11:16 am: |
|
|
नलिनी, बाभळीच्या शेंगेचा काही वेगळा उपयोग करतात का तुमच्याकडे ? ओमानमधे त्या शेंगा धुपाबरोबर जाळतात. बी, इकडे ती शोभेसाठी लावतात. पण तुमच्याकडे ती नैसर्गिकरित्या असणार. अशीच लालपिवळी पण असते. आणि, सई तुला तर प्रत्यक्ष गुरुजनांकडुन सगळी माहिती मिळालीय. उलट तुच माझ्या माहितीत भर घालायला हवीस.
|
Saee
| |
| Wednesday, May 09, 2007 - 11:40 am: |
|
|
हो, खरं आहे, पण ज्या बारीक सारीक शंका त्यांना विचारणे राहून गेले किंवा प्रत्यक्ष झाडासमोर आल्यावर ज्या अडचणी येतात त्या मी तुम्हाला तितक्याच सहजपणे विचारू शकते. लिहीता लिहीताच एकीकडे तुम्ही न कंटाळता आमच्या शंकांचंही निरसन करताय हे खुपच कौतुकास्पद आहे.
|
Nalini
| |
| Wednesday, May 09, 2007 - 12:21 pm: |
|
|
दिनेशदादा, वेगळा काही उपयोग नाही करत त्याचा आमच्याकडे. मला त्या शेंगाचा आकार खुप आवडतो तसेच त्या शेंगा हलवल्या की नैसर्गिक खुळखुळा होतो. बी, सुबाभळीची पानेच काय झाडपण एकदम वेगळे असते. शिवाय त्याला काटे नसतात. त्याच्या शेंगाही मोठ्या असतात आणि झाडावरच फुटतात त्या. त्यामुळे एका झाडाखाली असंख्या सुबाभळी उगवतात. त्याचाही पाला जनावरं, शेळ्या आवडीने खातात. ह्याला वाढपण चांगली असते. सई, लिहीकी तू पण.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 09, 2007 - 4:26 pm: |
|
|
मध्यंतरी ऋषीखाते सुबाभुळीचा खुप प्रसार करत असे. पण आता त्याची तेवढी क्रेझ उरलेली नाही. याला सुबाभुळ नाव देणेही गैरच होते, कारण याचे कुळही फार वेगळे होते.
|
सहीच दिनेश.. बकुळ माझी आवडती. बाभळी पण. एक कविता आठवली बाभळीवरची. हिरवी हिरवी गार पालवी काट्यांची वर मोहक जाळी, लव लव करीते लोलक पिवळे. फ़ांदी तर काळोखी काळी.
|
दिनेश, बाभळी आणि बोराच्या काट्यात साम्य आहे का? "ज्या गावच्या बाभळी त्याच गावच्या बोरी" ह्या प्रचलीत म्हणीवरुन तसं वाटलं निसर्गाच्या ठेव्याची माहिती संकलित करण्याचा तुमचा हा उपक्रम खुप आवडला.
|
Dineshvs
| |
| Thursday, May 10, 2007 - 3:20 am: |
|
|
विकास, बोरीचे काटे छोटे आणि बाभळीचे मोठे. तसे काहि साम्य नाही. पण मुद्दाम न लावताही सहज वाढणारी काटेरी झाडे, हा कॉमन फ़ॅक्टर.
|
Saee
| |
| Thursday, May 10, 2007 - 5:26 am: |
|
|
सौ. कोकिळा मस्तच. नलिनी, तेथे पाहिजे जातीचे, येरागबाळ्याचे ते काम नोहे! btw तु आणि मी काहीतरी बोलत होतो, त्याचं काय झालं?
|
Nalini
| |
| Thursday, May 10, 2007 - 10:24 am: |
|
|
सई, मेल केलिय तुला.
|
Giriraj
| |
| Thursday, May 10, 2007 - 10:53 am: |
|
|
कामाशिवाय जास्त वेळ येऊ नये! बायकी गप्पा मारू नयेत! तो पक्षी कोकिळा आहे की कोकिळ? नक्की कोण ओरडतं?
|
Dineshvs
| |
| Thursday, May 10, 2007 - 12:44 pm: |
|
|
गिर्या, श्रीयुत कोकिळच गातात. ते काळे असतात. सौ. मात्र नुसता कर्कश कलकलाट करतात. हे मी कोकिळ पक्षी दांपत्याबद्दल म्हणतोय रे. आणि सई आणि नलिनीशी पंगा घेऊ नकोस. दोघींचा मार खाशील. मी नाही वाचवु शकणार, तूला मग.
|
सौ. मात्र नुसता कर्कश कलकलाट करतात. >>>>हूँ... म्हनजे तिकडेही हाच प्रकार आहे म्हणायचा!!
|
Bee
| |
| Friday, May 11, 2007 - 2:40 am: |
|
|
कमळ.. कुंडलीनी योगामधे असे सांगितले आहे की आपल्या शरिरात सात चक्र असतात. ही सात चक्र सुप्त अवस्थेत असतात. ती जेंव्हा उमलतात तेंव्हा तुम्हाला ब्रम्हानंदाचा अविष्कार होतो. ही सात चक्र म्हणजे मुलाधार चक्र, स्वाधिष्ठान चक्र, मणिपूर चक्र, अनाहत चक्र, विशुध्द चक्र, आज्ञा चक्र आणि सहस्रार चक्र. प्रत्येक चक्र हे कमळाच्या आकाराचे असते. प्रत्येकाचे स्थान वेगळे असते. प्रत्येकाचा रंग वेगळा असतो. रंग साधासुधा नसून तो चकाकतो. प्रत्येक चक्राचा आपला एक नाद असतो. प्रत्येक चक्राला विशिष्ट गंध असतो... आणि प्रत्येक चक्राच्या पाकळ्यांची संख्या देखील वेगळी असते. मुलाधार चक्राला फ़क्त दोनच पाकळ्या असतात. तर सहस्रा, अगदी आपल्या नावाप्रमाणे, त्याला एक हजार पाकळ्या असतात. ही साती चक्र पाठीच्या कण्यापासून वरती मेंदूपर्यंत एका पाठोपाठ एक असतात. विज्ञानाने देखील हे सिद्ध केले आहे की पाठीच्या कण्याला grey areas असतात. पण योगाने ह्या grey areas खूप पुर्वीच अधिक चांगल्या प्रकारे अभ्यासिल्या आहेत. कुंडलीनी ही सर्पाच्या आकाराची तीन वेटोळे घातली दिव्य शक्ती असते. ही ७ चक्र उमलली म्हणजे कुंडलीनी शक्तीचे दर्शन होते... असो.. हा विषय एक फ़ार मोठे शास्त्र आहे. अत्यंत गुढ असे शास्त्र आहे. खालील चित्रामधे हे पहा सहस्र चक्र. सर्वात वरचे चक्र सहस्र आणि सर्वात खालचे मुलाधार चक्र. 'चक्र ध्यान' म्हणून ध्यानाचा एक प्रकार आहे. हे चक्र ध्यान लागले की एक एक चक्र हळूवारपणे उमलत जातात. मी उमलणे हा शब्दप्रयोग केला कारण प्रत्येक चक्र कमळासारखे असते. योगामधे प्राणायाम हा पद्मासनामधे करावयाचा असतो. कपालभाती, उज्जेयी, भस्रिका जवळपास सर्वच श्वसनाचा क्रिया पद्मासनामधे करावयाच्या असतात. पद्मासन हे कमळाच्या फ़ुलावरून शिकलेले आसन आहे. जेंव्हा आपण पद्मासनामधे बसतो तेंव्हा आपले तळपाय हे कमळाच्या पाकळ्याप्रमाणे दिसतात. एकदा बसून बघा पद्मासनामधे. हा खरच केवढा मोठा अभ्यास झाला. मला योगा म्हणून खूप प्रिय झालेला आहे. आमचे पुर्वज एक अजब रसायन होते. त्यांनी जे काही आमच्यासाठी शोधून काढले आहे त्याचा अवलंब केला तर जीवनाचे कल्याण होईल हे नक्की. असे म्हणतात विष्णूची नाभी ही कमळाच्या पानावर मधे जो खोलसर भाग असतो तशी दिसायची. प्रत्येक कमळाच्या पानाला नाभी असेलच असे नाही. काही पाने बरीच विसस्त्रुत होऊन पसरत जातात आणि मधे नाभी निर्माण होते. त्याला नाभीकमळ म्हणतात. मानस सरोवर, हे हिमालयामधे आहे, तिथे ब्रम्हप्रहरी म्हणजे पहाटेच्या ३ वाजतात कमळ उमलून त्याचा शुभ्र स्फ़टीकासारखा प्रकाश तळ्यात पसरतो. खरच काय अवर्णणीय असेल तिथला आसमंत.. कमळाबद्दल खूप काही लिहिता येईल.. दिनेशनी आधीच लिहिले आहे. पण कमळ हा खरच एक मोठा विषय ठरू शकतो.. चिनी लोकांमधे आणि दाक्षिणात्य भारतीयांमधे lotus soup फ़ार प्रसिद्ध आहे. कमळाचे खोड हे पिवळसर रंगाचे असते. त्याच्या चकत्या करून त्याचे सुप करतात. ह्या चकत्या अननसासारख्या दिसतात. त्यांच्यामधेही पतंगीच्या आकाराचे छिद्र असते. म्हणजे आतून कमळाच्या खोडाचा काही भाग पोकळ असतो. दिनेश, खरच खूप सुंदर सुंदर वाचायला देताहात तुम्ही.. मनापासून धन्यवाद!
|
Bee
| |
| Friday, May 11, 2007 - 4:10 am: |
|
|
.... Mooncake festival असतो, चिनी लोकांचा, ह्यामधे मूनकेकच्या पोटात कमळबीकाचे सारण भरून हे केक केले जातात. केकवर चायनीज कॅलीग्राफीचे सुंदर नक्षीकाम केले जाते. असे म्हणतात पुर्वी शत्रुपासून सुरक्षित संदेश पोहचविण्याचे काम मूनकेक करत असतं. त्या प्रित्यर्थ Mooncake festival ची प्रथा सुरू झाली. इथे हा सण उदंड साजरा केला जातो. कमळबीजाचे ते सारणही चवदार असते. red bean, Kaya bean, lotus bean हे प्रकार मी इथेच चाखले आहे.
|
Dineshvs
| |
| Friday, May 11, 2007 - 4:51 am: |
|
|
बी, छान लिहिले आहेस. अध्यात्म, योग या क्षेत्रात मला अजिबात गति नाही. त्यामुळे हे सगळे माझ्या डोक्यातही आले नसते. काही वनस्पति आपल्या संस्कृतीमधे ईतक्या खोलवर रुजल्या आहेत, की त्या सगळ्या संदर्भांचा एका छोट्याश्या लेखात समावेश करणे अशक्यच आहे. त्यामुळेच मी माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणीना कायम आव्हान करत असतो, की त्यानी पुरक माहिती अवश्य पुरवावी.
|
Saee
| |
| Friday, May 11, 2007 - 7:32 am: |
|
|
बी, पूरक माहिती छान दिलीस. उत्पल आणि कमळ, उत्पल दत्त डोळ्यासमोर उभे राहिले आणि खुद्कन हसूही आलं. दिनेश, छानच. गिरी, हलवायाच्या घरावर तुळशीपत्र म्हणतात बरं याला. (तुझे संकटमोचन दिनेशही मदतीला येणार नाहीत यातच खतरा कितना ते समज!)
|
Radha_t
| |
| Friday, May 11, 2007 - 8:18 am: |
|
|
वा यश हा ही अभ्यास केलास की काय त्तू .. छान माहिती दिलीस
|
Shonoo
| |
| Friday, May 11, 2007 - 12:05 pm: |
|
|
खारला रामकृष्ण मिशन च्या आवारात एक छोटा सिमेंटचा 'जलाशय' असायचा. त्यात छोटुकली गर्द निळी कमळाची फुलं असायची. मिशन च्या अंगणात दाट झाडी असे, त्यातून muted उजेड त्या जलाशयावर पडत असे. बरेचदा नुसतं ती बाग बघण्याकरता आम्ही त्या आश्रमात जात असू. कधी काळी temperate climate मधे स्वत:च्या मालकीची जागा असली तर मी पण तश्शीच कमळं लावणार आहे.
|
अध्यात्म, योग या क्षेत्रात मला अजिबात गति नाही>>>>> गोव्यातल्या माणसाला या क्षेत्रात गती कशी असेल? अहो, ते तत्वचि वेगळे!!
|
दिनेशदा खास! आता प्रींट घेऊनच वाचन करीन सगळं
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|