|
Jo_s
| |
| Monday, May 07, 2007 - 4:20 am: |
|
|
धन्यवाद दिनेश त्या झाडाला आत्ताची फळं नसली तरी जुनी वाळलेली काही ठिकाणी दिसतात. त्याना गोलाकार खवले आहेत त्यामुळे ती जरा फुटबॉल सारखी वाटतात. पण एकुण त्यांचा आकार अगदीच गोलाकार नाही. ती साधारण ३० मीमी एवढी असावीत. सुधीर
|
Saee
| |
| Monday, May 07, 2007 - 4:56 am: |
|
|
मी तिरफळाचा स्वाद अजुन घेतला नाही. पण सिंधुदुर्गात सगळीकडे बहुतेक बाजारांमधुन स्थानिक बायका वाटे घेऊन विकायला बसतात त्यामुळे आणि सातर्ड्यात खुप झाडे बघितल्यामुळे माहित आहे. आणि गिरी उपलब्ध नाही तर आता तसाच नवा शिलेदार तयार करा आणखी एखादा
|
Bee
| |
| Monday, May 07, 2007 - 5:38 am: |
|
|
तिरफ़ळ मीही नाही चाखले अजून. मला नागकेसर एकदा तरी भाजीत वापरून बघायचे आहे. पण इथे नागकेसर नाही मिळत. केसर मिळते.. दिनेश, पोपटाचे फ़ुल खरच नविन आहे मला..
|
Dineshvs
| |
| Monday, May 07, 2007 - 6:15 am: |
|
|
सुधीर, मग ती बारतोंडीच असणार. सई, असा नुसता विचार जरी केला, तर गिर्या रुसुन बसेल माझ्यावर. तिरफळे घालुन केलेली कटाची आमटी करुन बघ एकदा. छान लागते. बी, ती फुले तुला तिथे दिसायला हवीत.
|
Jo_s
| |
| Monday, May 07, 2007 - 6:59 am: |
|
|
दिनेश हा त्याचा फोटो, नेटवर सापडलेला
|
Bee
| |
| Monday, May 07, 2007 - 7:42 am: |
|
|
जो, मला हा फोटो चिनी मातीच्या कासवासारखाच दिसतो आहे हुबेहुब.. ती फ़ुले खरे वाटत नाही इतकी वेगळी आहे..
|
Dineshvs
| |
| Monday, May 07, 2007 - 8:21 am: |
|
|
सुधीर, बघितलं ? लॅटिन नावाचा हा फायदा असतो. शोधाशोध सोपी पडते. आता खात्रीही पटली.
|
Jo_s
| |
| Monday, May 07, 2007 - 9:13 am: |
|
|
चला नाव कळल, आता थोडी याची माहीती? दिनेश शिवाय कोण देणार. दिनेश तुला आमचा त्रासच आहेरे बाबा. अजून ही काहि नेहमी नदिसणार्या बुर्शी, वनस्पती इथे दिसतात. मिळतील तेव्हा फोटो टाकीनच. काही महीन्यान पुर्वी दिसलेल्या ९-१० इंची फुलपाखराचा फोटो पोस्ट केला होता.
|
Dineshvs
| |
| Monday, May 07, 2007 - 10:19 am: |
|
|
अरे त्रास कसला ? आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने नेटवर मराठीत कुठेच नसलेली माहिती, गोळा होतेय बहुदा. तो फ़ुलपाखरांचा फोटो बघितला होता मी.
|
Swa_26
| |
| Tuesday, May 08, 2007 - 6:05 am: |
|
|
वॉव... दिनेशदा... तो शेवग्याच्या फुलांचा फोटो काय सही आलाय... मस्तच. माझ्या घरी करतात ह्याच्या फुलांची भाजी, पप्पांची खास आवडती. गावी असताना दारातच मिळायची आता विकत आणावी लागते, एवढेच... त्या भाजीची चव शिवल्यांसारखी लागते.... आहाहा, तोंडात पाणी आले
|
Abhijit
| |
| Tuesday, May 08, 2007 - 10:20 pm: |
|
|
दिनेशदा, एक प्रश्न होता. मागच्या वर्षी गोव्याला गेलो असताना मंगेशीच्या देवळासमोर एक जबरदस्त रानमेवा पहिल्यांदाच खाल्ला. साधारण डोंगरी आवळ्यासारखा होता, काप करून आणि मीठ लावून वाडग्यातून विकत होते. (त्यामुळे मूळ फळ कसे दिसते याचा अंदाज आला नाही.) आवळ्यापेक्षा थोडा जास्त रसदार आणि चव एकदम स्ट्राॅंग, अगदी तोंडात फाईट मारणारी! गाडी सुटल्यानंतर खाल्याने याचे नाव कुठे विचारता आले नाही. काय असावे हे?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 09, 2007 - 12:52 am: |
|
|
अभिजीत, ती करमळं ( इंग्लिशमधे स्टारफ़्रुट ) किंवा बिमली असणार. येतातच आहेत भेटीला, हि मंडळी.
|
Zakasrao
| |
| Wednesday, May 09, 2007 - 5:26 am: |
|
|
दिनेशदा बाभळ आणि काटा चांगला स्मरणात आहे. पायात घुसला कि डोळ्यातुन पाणी अशी परीस्थिती बर्याच वेळा झालि आहे माझी. पण हाच काटा एक छान खेळ करण्यासाठी खुप उप्योगी पडायचा. एक मोठा वाळलेला काटा घ्यायचा. एखादी लग्न पत्रिका घ्यायची आणि त्याची एक छोटी पट्टी कापायची. तिला थोडस twist करुन छिद्र पाडायच काटा वापरुन आणि एखाद पोसव (ह्याला दुसरा शब्द माहित नाही आणि हे काय असत आणि कुठुन येत हे ही मला माहित नाही पण उसाच्या वर हे असत ते असाव) घेवुन त्यात ति पट्टी काट्यात खोचुन वार्याच्या दिशेला ते धरायच. वारा नसेल तेव्हा स्वत्: पळायच जेणेकरुन ते चक्र फ़िरेल. अगदी स्वस्त आणी मस्त अस खेळण. लहानपणी खुप खेळलोय. तुम्ही असा काहि प्रकार मलकापुरात केलाय का कधी?
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 09, 2007 - 5:58 am: |
|
|
झकासराव, आम्ही कागदाचे चक्र करुन खेळायचो. आणि वरुन लॉक म्हणुन बकरीची XX लावायचो.
|
Abhijit
| |
| Wednesday, May 09, 2007 - 6:04 am: |
|
|
धन्यवाद, दिनेशदा. तुमच्या लेखाची उत्सुकता ताणली गेली आहे!
|
Saee
| |
| Wednesday, May 09, 2007 - 8:04 am: |
|
|
देवबाभुळ आणि वेडी बाभुळ यात फरक काय दिनेश? मला नेहमी असं सांगितलं जातं की वाटेल तशी फोफावते ती वेडी बाभुळ. पण हे ठरावीक आकारमान किंवा पसारा तरी कसा ओळखायचा? आणि हा खरोखरच निकष आहे का वेडी बाभुळ ओळखायचा? आणि बकर्यांचा विषय काढलात तर बोर, समदड, चिंच, खैर असे खाऊ पण द्या. (बोट दिलं तर थेट खांद्यावरच बसण्यासारखा प्रकार आहे हा हे आधीच मान्य)
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 09, 2007 - 8:19 am: |
|
|
सई, या वेड्या बाभळीने आपल्याकडे उच्छाद मांडलाय. अगदीच वेडीवाकडी वाढते ही. पानांचा आकार चंद्रकोरीसारखा. फ़ुले पिवळ्या तुर्यात आणि शेंगा स्प्रिंगसारख्या वेटोळ्यात. आपल्याकडे ऑस्ट्रेलियामधुन आलीय हि. वनखात्याने तिच्या लागवडीचा अतिरेक केलाय. तसा हिचा काहिच उपयोग नाही. पक्षीही या झाडावर बसत नाहीत. लाकुड लवचिक असल्याने, जराश्या वार्यापावसाने मोडुन पडतात. याच्या फ़ुलोर्यामुळे काहिजणाना श्वसनाचा त्रास होवु शकतो. आपल्या भाग्य ने त्याचा छान फोटो आणि माहिती लिहिली होती. ( मायबोलीवर नियमित न आलेल्याना काय सांगायचे ?) वरच्या यादीतल्या काहि झाडांबद्दल लिहिनच, पण मी काढलेला फोटो, हा निकष असल्याने, काहि झाडे मला वगळावी लागणार आहेत.
|
Nalini
| |
| Wednesday, May 09, 2007 - 10:05 am: |
|
|
हेच बाभळीचे झाड जर सरळ सरळ ऊंच वाढले तर तिलाच रामकाठी म्हणतात गावाकडे. ह्या काट्याला लावलेल्या भिंगर्या घेऊन आम्हीपण खूप पळालोय. आम्हीपण शेळिची xx च वापरत असू. मला बाभळीच्या शेंगा गोळा करायला नेहमीच आवडायच्या.
|
Bee
| |
| Wednesday, May 09, 2007 - 10:28 am: |
|
|
सुबाभूळ पण आहे ना एक पण त्याची पाने वेगळीच असतात. शांताबाईंची बाभळीवर एक कविता होती शाळेत. आता आठवत नाही. बाबळीची पिवळी लोंब पाहिली होती पण ही गुलाबी रंगाची लोंब प्रथमच बघतो आहे.
|
Saee
| |
| Wednesday, May 09, 2007 - 10:28 am: |
|
|
तुमच्या bb वर नियमीत फिरकणं जमवते मी.. तेच खुप महत्वाचं आहे. (तशी तर अनेक प्रकारची माहिती, फोटो उपलब्ध आहेत पण तुम्ही सांगता तशी नाही.) आता दोघीतला फरक ओळखायला जमतं का बघते आणि ओळखल्यावर सांगतेही तुम्हाला.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|