|
Dineshvs
| |
| Monday, April 30, 2007 - 11:27 am: |
|
|
भाई, काय प्रतिक्रिया देऊ यावर ? माझे लेखन बरेचसे स्वतःच्या अनुभवावर आधारित असले तरी ईथल्या प्रतिक्रिया त्यात मोलाची भर घालताहेत, यापेक्षा मी म्हणेन कि माझ्या लेखनातले न्यून त्या भरुन काढताहेत.
|
Bhagya
| |
| Monday, April 30, 2007 - 10:06 pm: |
|
|
दिनेशदा, हे बरेचसे वृक्ष बघितलेत. पण नावे माहिती नव्हती. यात पुण्यात सगळीकडे दिसणारा जांभळा गुलमोहोर (बहुधा Jacaranda )पण लिहिणार का? Sydney जवळ एक जागा आहे, तिथे आठशे jacaranda लावलेत. ते बहरात आले, की jacaranda festival दणक्यात साजरा करतात. ही बघा लिंक्: http://www.jacarandafestival.org.au/ आणि cassia ची एक जात गुलाबी फ़ुलांची असते, ती लिहिलिय का पहिले? मला दिसली नाही.
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 01, 2007 - 1:42 am: |
|
|
भाग्य, जकरांदाचे माहेर केनया. त्याबद्दल लिहिणार आहेच. कॅशियाच काय अकाशिया पण आहे यादीत. तू वेळात वेळ काढुन ईथे नजर टाकतेस, याचे मला खुप कौतुक वाटतेय.
|
Ajjuka
| |
| Tuesday, May 01, 2007 - 1:12 pm: |
|
|
मस्त... मज्जा आली. सगळं आठवलं.. एक वेळ अशी होती की हे सगळं पाठ होतं माझं. Botany वाले होतो ना तेव्हा आम्ही त्यात वर Fergusson मधे Gardening चा कोर्स पण करत होते. पर्यायच नव्हता.. उन दिनोंकी यादे आपने ताज़ा करदी!!
|
Dineshvs
| |
| Tuesday, May 01, 2007 - 3:54 pm: |
|
|
अज्जुका, काय मजा आहे बघ ना, ज्याचा अभ्यास करायला मिळाला नाही, त्याचा ध्यास घेतलाय आता मी. आणि आता तुम्हा बॉटनी वाल्यांचा हेवा वाटतोय.
|
Bee
| |
| Wednesday, May 02, 2007 - 3:36 am: |
|
|
शिवण आणि टॅबेबुया हे दोन वृक्ष मला नविन आहेत. शिवण हा मला बराचसा भुईचाफ़्याचा प्रकार दिसतो आहे. सिंगापोरमधे असेच भुईचाफ़्याचे एक फ़ुल मी पाहिले आहे पण ही फ़ुले गुडघ्याभर झुडपाला धरतात. कुंती मी जास्त करून पार्क मधेच पाहिली आहे. मला कळत नाही इतकी चांगली फ़ुले आणि गंध असणार्या कुंतीला काटून छाटून तिचे कुंपन का करतात. बर्याचदा कुंतीचे एखादे अर्धवट कातरलेले फ़ुल दिसते. तेंव्हा समजून जातो की नुकतीच तिची कटाई झालेली आहे. कुंतीला एक गोलसर ढेरेदार आकार देता येतो म्हणून कदाचित हे झाड बागेत लावत असावेत. मी कुंतीचे अनेक आकार पाहिले आहे. जसे की कुंतीला हरिणाचा आकार, उंटाचा आकार आणि बरेचसे वेगवेगळे आकार. कुंतीची फ़ांदी ही मोरपिसासारखी लांबलचक असते आणि दोन्ही बाजूला अगदी समांतर पाने असतात. कुंतीचे फ़ुल तोडता येत नाही. तोडायचेच झाले तर पुर्ण फ़ुलांचा देठ तोडता येईल तो पण इतका अलगद असतो की जरा धक्का लागला की सगळी फ़ुले पाकळ्या तुमच्या चरणी..
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:43 am: |
|
|
बी, शिवण तिथे असायला हवा. कुंती मी कोकणात आणि वर्धा दोन्हीकडे बघितली. कुंतीचे झुडुप कायम हिरवेगार असते, पण त्याला फुले तशी कमीच येतात. वर्षभरात एकदोनदाच बहर येतो. म्हणुन त्याचा तसा उपयोग करत असावेत.
|
Ajjuka
| |
| Wednesday, May 02, 2007 - 6:09 am: |
|
|
....आणि आता तुम्हा बॉटनी वाल्यांचा हेवा वाटतोय. .... हो पण आता माझा बॉटनीशी काही संबंध उरला नाही. पण निदान तेव्हा आलेलं एक डोळसपण आहे जे टिकून आहे अजून..
|
Bee
| |
| Wednesday, May 02, 2007 - 6:33 am: |
|
|
इथे Botany चा विषय निघाला म्हणून -- शरदिनी डहाणूकरांचे तुम्ही उदाहरण घ्या. त्यांच्या लिखाणातही Botany चे फ़ारसे तपशील आढळत नाही. दुर्गा भागवत घ्या की आणखी कुठलेही लेखक मंडळी घ्या.. नजरेतून एखादे झाड जसे दिसते, ऋतुनुसार ते जसे बहरते, त्याचे फ़ायदे, त्या झाडामागच्या पुर्वपार दंतकथा ह्या गोष्टीच वाचायला खूप रसाळ वाटतात. शतायुषी नावाचा एक दिवाळी अंक दरवेळी मी विकत घेतो ह्याला कारण एकच की त्यात झाडांची आयुर्वेदीक माहिती बरीच असते. तसेच कालनिर्णय, त्यातही थोडीफ़ार झाडांविषयी माहिती असतेच. बारावीला असताना मला Botany, Zoology दोन्ही होते. पण Botany चा तो अभ्यास मला फ़ारसा आवडत नव्हता जरी मला झाडांची खूप आवड असली तरी.
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 02, 2007 - 8:32 am: |
|
|
बॉटनी चे सगळ्यात जास्त महत्व मला वाटते ते त्यातल्या वर्गीकरणासाठी. ते नाव घेतले कि जगात कुठेही त्याच झाडाचा संदर्भ देता येतो. स्थानिक नावे खुपदा गोंधळात टाकणारी असतात.
|
Bee
| |
| Wednesday, May 02, 2007 - 8:53 am: |
|
|
स्थानिक नावांचे मला अधिक अप्रूप वाटते कारण की त्या नावांची निर्मिती ही नक्कीच Botanical नावांच्या आधी झालेली आहे. झाडांची Botanical नावे उच्चारणे हे एक कठीणच काम आहे. इतके अवघड उच्चार फ़्रेन्च, जर्मन, स्विस भाषेतील शब्दांचेही नसतील कदाचित. मला फ़क्त एकच नाव सध्या आठवत आहे आणि तेही something like cesealphinia जे गुलमोहराचे आहे. म्हणजे गुलमोहोर हा सिजिअलफ़िनिआ ह्या वर्गात मोडतो. चुभुदेघे.
|
Shonoo
| |
| Wednesday, May 02, 2007 - 12:04 pm: |
|
|
मला नेहेमीच Taxonomy सगळ्यात आवडत असे. कॅरोल लिनियस ने establish केलेली binomial nomenclature पद्धत भारतात वापरतात. सर्व झाडांचे, प्राण्यांचे heirarchical वर्गी करण आणि शेवटी प्रत्येकाला डबल बॅरेल नाव. शिवाय नावांमधे लॅटिन चा भरपूर प्रभाव. एकदा का ही लॅटिन ची गुरुकिल्ली कळली की मजाच मजा. Acer palmatun म्हणजे पाम सारखी पाने असलेला acer अर्थात मेपल ट्री. तर Palm Acerifolia म्हणजे कॅनडाच्या ध्वजावर असलेल्या मेपल पानासारखी पाने असलेला, palm ट्री. मिरी नपुसक लिंगी म्हणून piper nigrum आणि जर स्त्रील्लिंगी असेल तर nigra . मग Forsythia, Poinsetta वगैरे explorers ची नावे अजरामर करणारी झाडांची नावे. नुस्त्या नावातच किती तरी इतिहास, भुगोल,भाषाशास्त्र, व्याकरण आणि scientific observation दडलेलं आहे. आजकाल information systems मधे सुद्धा CIM वगैरे मधे Taxonomy आणि nomenclature, information classification वगैरे विषयांची फार चलती आहे.
|
मुळात टॅक्सानॉमीची ही पद्धत देशोदेशीची नावे घोळात पाडणारी असतात म्हणून तर निर्माण झाली. तसेच स्थानिक मंडळी सब घोडे बारा टक्के अशा पद्धतीने ढोबळ नाव सांगतात. नेमकी तपशीलवार प्रजाती काय आहे त्याना माहीत नसते.उदा. सरडा आहे असे ढोबळ सांगतात. सरड्याचे शेकडो प्रकार असतात त्याना स्थानिक भाषेत नावही नसते. अरे हो दिनेश फक्त झाडे नव्हे तर प्राणिवर्गालाही ही द्विवर्ग नामपद्धती आहे. आणि ती देण्यासाठी लॅटीन मुद्दाम निवडलीय कारण ती मृत भाषा असल्याने आता तिच्यात स्थळ काळानुसार variations सम्भवत नाही. अर्थात त्या नावानाही काही अर्थ असतोच. त्याचे लॉजिक कळले की ते एकदम सोपे होऊन जाते...
|
Dineshvs
| |
| Wednesday, May 02, 2007 - 5:36 pm: |
|
|
या लॅटिन शब्दात, झाडाचा एखादा गुणविशेष सांगितलेला असतो. कधीकधी एखाद्या वनस्पतिप्रेमीचा गौरव असतो, तर कधी स्थानिक नावाचा. आपल्याकडे संस्कृत नावे खुप छान असतात, पण मराठी नावात सुसूत्रता नाही. एकमेकांशी काहिच संबंध नसलेल्या, खुरचाफा, सोनचाफा, नागचाफा, भुईचाफा आणि हिरवा चाफा, या सगळ्याना आपण चाफा म्हणतो !!!!
|
Bee
| |
| Thursday, May 03, 2007 - 7:42 am: |
|
|
अरे हे लॅटीन वर्गीकरणाविषयी मला माहितीच नव्हते. एकदा कुठेतरी वाचले की ज्यानी शोध लावला त्याचे नाव झाडाला द्यायचे. पण सर्वच संशोधक लॅटीनच कसे हे कोडे मला आज उलगडले :-) दिनेश, बकुळ वगैरे मस्तच.. खरच आता आराम करा.. एक अबोली रंगाची फ़ुले देणारी करदड असते.. एक काळसर लाल रंगाची, एक शेंद्री लाल पिवळी फ़ुले देणारी.. तर करदड बद्दल खरच लिहा दिनेश वेळ मिळेल तेंव्हा.. तुमच्या मर्जीप्रमाणे..
|
Ashdeo
| |
| Thursday, May 03, 2007 - 11:52 am: |
|
|
दिनेशदा बकुळ लेख त्या फ़ुलासारखाच सुरेख आहे...तुम्ही लिहीलेले सर्व लेख वाचले आणि एक निर्णय घेतला आहे...भविष्यात कधीकाळी स्वत:चे घर झाले तर घराभोवति काय झाडे लावायची हे तुम्हालाच विचारणार!
|
दिनेशदा!मस्त जमुन येतोय लेख...
|
Jo_s
| |
| Friday, May 04, 2007 - 7:23 am: |
|
|
व्वा,दिनेश मस्त माहीती मिळते आहे. सध्या पान गळी नंतर बरीच झाडं उजाड दिसत आहेत, पण वेताळ टेकडी परीसरात फोटोत दिसणारी काही झाडं मात्र हिरवी गार आहेत व त्याना ही फुलं आलेली दिसतात. ती कोणती आहेत कळू शकेल का. पानं जरा जाड आहेत व त्यावर थोडी लव आहे. फुलांना मंद सुगंध आहे आणि पाकळ्या दिड ते दोन मी.मी. जाड आहेत. झाडांची उंची ५ ते १५ फुट दिसते.
|
Saee
| |
| Saturday, May 05, 2007 - 10:56 am: |
|
|
मी मसाल्यातल्या तिरफळाबद्दलच बोलत होते दिनेश, माशाच्या कालवणात वापरतात ते. आंजर्ल्याच्या कड्यावरच्या गणपतीभोवती बकुळीची मोठी बाग आहे... दिनेश त्या भागाचा दौरा कधी आहे तुमचा? एक जादूमय परिसर वाट बघतोय तुमची. की जाऊन आलात? वर अश्विनी म्हणतेय तसं कोणती झाडे लावायची ते विचारणारच, पण सगळी झाडे मावतील (निदान त्या त्या परिसरात आढळणारी तरी सगळी) एवढी मोठी बाग होईल असं घर हा मुख्य मुद्दा! to create a no. 1 biodiversity park!
|
Dineshvs
| |
| Sunday, May 06, 2007 - 4:50 pm: |
|
|
Jo_s , मला तो बहुतेक बारतोंडी वाटतोय. Morinda pubescence याला फळे धरली आहेत का ? ती फ़ुटबॉलसारखी दिसताहेत का ? तरच ती बारतोंडी. मला हे झाड सापडले नव्हते. सई, म्हणुनच मला नवल वाटले. तिरफळं फारच कमी शाकाहारी पदार्थात वापरतात. मी खतखते आणि कटाच्या आमटीत वापरतो. तु तिरफळाचा स्वाद घेतलास कि नाही ? काहीजण वृक्षरोपण करणे गैर मानतात. पण माझ्या यादीतले बहुतेक सगळे वृक्ष आपल्या मातीतले असुनही दुर्मिळ झालेत. सगळीकडे वेडी बाभुळ, पेल्टोफ़ेरम, पर्जन्यवृक्ष आणि गुलमोहर. अतिरेक झालाय या मंडळींचा. दौरे खरेच आखायला हवेत आता. माझा सखा, सारथी, केअरटेकर दूर गेलाय, शिवाय मोकळाही नाही ना तो. BTW आज वसई, कोल्हापुर, आजरा, चंदगड, तिलारी, दोडामार्ग असा दौरा करुन आलो. खजिना रिता करीन आता सगळ्यांसाठी.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|