|
Bee
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:28 am: |
|
|
भाग्या, नाही हा हजारी मोगरा नाही. हिंगनघाटवरून माझ्या आत्यानी हजारीमोगर्याची कलम आणली होती. हजारी मोगर्याचा गुच्छा इतका दाट असतो की एक फ़ुल तोडायचे म्हणजे दुसर्या फ़ुलाच्या पाकळ्या ओरबाडल्या जाईल अशी भिती असते. ह्या मोगर्याची फ़ुले उन्हामुळे फ़िकट कथिया रंग धारण करतात. त्याचे ह्याच रंगाचे वेगवेगळे शेड्स नंतर बदलत जातात. एकाच गुच्छात बरीच फ़ुले असल्यामुळे हे वेगवेगळे रंग छान दिसतात. ह्या मोगर्याच्या प्रत्येक फ़ुलाला बर्याच पाकळ्या असतात. गौतम बुद्धानी ज्या वृक्षाखाली अंतिम निद्रा घेतली तो शाल्व. बुद्धाची जी एक हात कानाला टेकवून झोपलेली प्रतिमा आपण बघतो ती नेहमी एका वृक्षाखाली असते. मी कधी पाहिलेला नाही शाल्व. ह्याचे नाव मला खूप आवडले. आम्रपाली चित्रपटात हा वृक्ष कदाचित घेतला असावा.. वर सईने शाल्मलीचे नाव काढले म्हणून शाल्वची आठवण झाली..
|
Dineshvs
| |
| Thursday, April 26, 2007 - 6:16 am: |
|
|
भाग्या, हजारी मोगर्याची पाने मोठी असतात. नावानुसार गुच्छ भरगच्च असतो. एकेका फुलातहि बर्याच पाकळ्या असतात, वास मोगर्यासारखाच पण जरा कमी येतो. या फुलांचा पुष्पकोष आणि देठ लाल किरमिजी रंगाचे असतात. बी, तुझ्या प्रतिक्रियाही वाचनीय आहेत.
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 3:55 am: |
|
|
सईची मागणी लगेच पुर्ण केलीत हो दिनेश. मस्त जमला आहे सावर वरचा लेख. शाल्मली हे नाव मला ठावूक नव्हतं. सई धन्यवाद! होळीला काही भागात सावरची फ़ुले पाट्यावर वाटून किंवा पाण्यात खदखद उकळून त्याचा दाट रंग काढतात आणि तो चेहर्याला लावतात. मी काटेसावरीचा कापूस अजून पाहिलेला नाही पण त्याबद्दल ऐकलेले आहे.. दिनेश, आता ह्यानंतर गुलमोहोर येईल ना.. कपडा तयार करताना फ़ुलांचे पानांचे नैसर्गिक रंग वापरण्याचे एक तंत्र आहे. ह्यात कुठली फ़ुलझाडे वापरण्यात येतात ह्यावर कुणाला काही माहिती असेल तर प्लीज इथे लिहा..
|
Swa_26
| |
| Friday, April 27, 2007 - 6:04 am: |
|
|
दिनेशदा, मस्तच चालु आहे हि लेखमाला... काल मी आणि आजी हाच सावरीचा कापुस निवडत बसलेलो, माझ्या वहीनीने ती नाशिकला गेलेली तेव्हा आणलेला... पण त्यातली ती सरकी काढायचे काम कंटाळवाणे आहे. ('बी' म्हणायचे टाळलेय, नाहीतर गिरी धावत येईल लगेच...) केवळ त्या सावरीचा मृदुल स्पर्श मिळतो म्हणुन मी आजीबरोबर बसते...
|
Saee
| |
| Friday, April 27, 2007 - 6:37 am: |
|
|
बी, इतकं सगळं वाचतोस, सांगतोस तर त्या सगळ्याचा वेगवेगळ्या उपमा वापरताना उपयोग कर. कोणत्या गोष्टीचं वर्णन कोणत्या शब्दात करतो आहेस हे ध्यानात घेऊन लिहीत जा. 'बरबटलेला' हा शब्द प्रयोग अख्ख्या महाराष्ट्रात एकाच अर्थाने वापरतात. मुळात इतकी संपन्न भाषा आपली, दिनेशच्या bb वर नियमीत बागडतो आहेस आणि त्यातुन दुर्गा भागवत तुझ्या आवडत्या लेखिकांपैकी एक वगैरे. तरीही फुलांनी बरबटलेली फांदी असे भयानक शब्दप्रयोग वाचून डोळे पांढरे होतात रे. सॉरी दिनेश, विषयांतर करावं लागलं. पण मला सावर आणि तिरफळाच्या बुंध्यातला फरक सांगा.
|
Dineshvs
| |
| Friday, April 27, 2007 - 6:43 am: |
|
|
सई, हे तिरफ़ळ म्हणजे मसाल्यातले तिरफ़ळ ना ? काटेहि बारिक असतात. पण तु बहुतेक दुसरे कुठलेतरी झाड म्हणत असावीस. या झाडाचे काटे बोथटच असतात. याचा आणखी एक उप्योग म्हणजे याचे ताजे तोडलेले खोडहि जळु शकते. असेच काजु आणि आंब्याचे खोड जळते.
|
Giriraj
| |
| Friday, April 27, 2007 - 7:44 am: |
|
|
स्वाति सावरी तर माझी खूप आवडती.. इथे लिहिलंय बघ मी सावरीबद्दल... http://bhaigiri.blogspot.com/2006/03/blog-post.html
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 8:04 am: |
|
|
स्वाती, तुला काय धमकी दिलीय का गिरीनी माझे नाव लिहायचे नाही म्हणून.. गिरीबिरीला घाबरायचे म्हणजे खूपच भ्याडपणा झालाय हा दिनेश, कढीपत्ता हो.. कडीपत्ता नाही बघा तुमचाही typo झालाच की नाही आगावूपणाबद्दल क्षमस्व सई, मला अजूनही असे वाटते की बरबटलेला हा शब्द फ़ारशा चुकीच्या अर्थाने मी वापरलेला नाही. मी इथे फ़ांदी फ़ुलांनी इतकी भरगच्च झाली की ती बरबटलेली दिसायला लागली अशा अर्थानी घेतला आहे. इथे बरबटलेली हा शब्दप्रयोग बहरण्याची अतिशयोक्ती दाखविण्यासाठी मी घेतला आहे. हाताला कणिक लागणे हे ठिक आहे पण हात जेंव्हा कोपरापर्यंत कणकेनी माखतात तेंव्हा हात बरबटले असे आपण म्हणतो. इथे हात किंवा कणिक घाण आहेत असा त्याचा अर्थ आपण घेत नाही. फ़ुलांच्या सड्याला प्रत्येक बाई 'फ़ुलांचा सडाच' म्हणेल असे नाही. एखादी फ़ुलांचा केरही म्हणायची. ह्याचा अर्थ तिला निसर्गसौंदर्याची जाण नाही असा होत नाही. असो.. तरीही हा शब्दप्रयोग चुकीचा झाला आहे असे सर्वांचे जर मत असेल तर परत मी हा शब्दप्रयोग फ़ुलांसंबंधी करणार नाही.
|
Dineshvs
| |
| Friday, April 27, 2007 - 8:44 am: |
|
|
स्वाति, बघ गिर्या आलाच कि नाही धावत. तसा तो ईथेच असतो म्हणा. वा वा बी, तुझा वेगळा शब्दार्थांचा बीबी आहेच ना, तिथे शब्दाना तु दिलेले अर्थ लिहित जा.
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 9:06 am: |
|
|
दिनेश, प्रांजळपणे मी तो शब्द का वापरला हे लिहिले आहे. ते स्पष्टीकरण कुणाला पटणार नाही म्हणून शेवटी एक खास वाक्यही लिहिले आहे. कृपया माझ्या वरील पोष्टमधील शेवटचे वाक्य परत एकदा वाचून घ्यावे. कुठला 'माझा वेगळा शब्दार्थाचा बीबी'? असे काही नाही. तुमचा हा बीबी मला परका कधीच वाटला नाही...
|
Swa_26
| |
| Friday, April 27, 2007 - 9:58 am: |
|
|
गिरी, खरंच खुप छान लिहिलंयस तू कालपण तो कापुस पिंजताना त्याची अगदी गादी नाही पण उशी तरी करावी असा एक विचार मनात येउन गेला. बी, अरे मजेत लिहिले होते रे ते... धमकी वगैरे कसली? मागे एकदा मी 'बी' चा उल्लेख केला तर गिरीने लगेच पळत पळत येउन त्यावर प्रतिक्रिया दिलेली. दिनेशदा... माझ्या वतीने चांगले फटकवा ह्या गिरीला, धमकी वगैरे देतो म्हणजे काय???
|
Bee
| |
| Friday, April 27, 2007 - 10:03 am: |
|
|
स्वाती मीही मजाच केली तुझी..
|
Giriraj
| |
| Friday, April 27, 2007 - 10:06 am: |
|
|
मला कश्याला कोण घाबरेल.. मला तर गल्लीतले'बी' कोणी घाबरत नाही
|
Swa_26
| |
| Friday, April 27, 2007 - 10:41 am: |
|
|
दिनेशदा... तुमच्या BB वर येऊन सगळे TP करतायत बघा... (मी पळते इथुन..)
|
Dineshvs
| |
| Friday, April 27, 2007 - 4:52 pm: |
|
|
जाऊ दे स्वाति, लहान आहेत.
|
wow दिनेश मस्त लिहिताय. पण मागे पडले मी
|
Anilbhai
| |
| Saturday, April 28, 2007 - 4:33 pm: |
|
|
तरीच इतके दिवस दिसली नाहिस. जास्त नाही ना लागलं.
|
Upas
| |
| Sunday, April 29, 2007 - 10:36 am: |
|
|
कुठे धड-पडली होतीस.. दिनेशदा मस्त चाल्लय एकदम.. :-)
|
Dineshvs
| |
| Sunday, April 29, 2007 - 2:55 pm: |
|
|
का रे शब्दाचा किस काढता ? काहि कुणी कुठे धडपडले नाही. भाई, उपास सगळे वाचताय तर ! अजुन हुरुप आला. रचना अधुनमधुन थोडे थांबत जाईन. पण विषय अत्यंत जिव्हाळ्याचा असल्याने, अजुन भरपुर लिहायचे आहे. ईथे असेलच ते. कधीही सवडीने वाचता येईल.
|
Anilbhai
| |
| Monday, April 30, 2007 - 11:04 am: |
|
|
बस क्या दिनेश भाय. आप पोष्ट करे और हम ना पढे, ऐसा हो सकता है क्या?.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|