|
Deepa_s
| |
| Friday, April 20, 2007 - 9:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
व्वा दिनेशदादा, अगदी कालच बहावा पाहिला आणि तो अजुन तुमच्या यादीत कसा आला नाही याचं आश्चर्य केलं. माझ्यासाठी उन्हाळा म्हणजे बहाव्याचे घोस मोगर्याचा सोस सोनसावरीचा सडा सरबतातला बर्फाचा खडा
|
Swa_26
| |
| Saturday, April 21, 2007 - 8:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, काल इथे बहाव्याचे वर्णन वाचले आणि काल घरी जातानाच त्याची भेट झाली. मला काल ट्रेनमधे बसायला जागा मिळाली नाही म्हणुन मी दरवाज्यातच उभी राहिले आणि विक्रोळीला येताना गोदरेजच्या campus मधे ही झाडे दिसली आणि लगेच तुमची आठवण झाली. ... काय सही दिसत होती त्याची ती फुले.... काल मला बसायला न मिळाल्याचा पहिल्यांदाच आनंद झाला, नाहितत बहावा कसा भेटला असता? आणि तुम्हालाही credit अशासाठी कि तुम्ही ओळख करुन देताय म्हणुन तो बहावा आहे हे कळले मला...
|
Dineshvs
| |
| Saturday, April 21, 2007 - 11:02 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, तिकडे तुला हे बहुतेक वृक्ष दिसतीलच. दीपा, सोनसावर कुठे बघितली ? ती कोकणात दिसत नाही, कात्रजच्या घाटात झाडे आहेत तिची. स्वाती, अगदी आठवणीने या झाडांची ऋतुनुसार बदलती रुपे बघत रहा. तूला या रेल्वेलाईनच्या परिसरातच खुप झाडे दिसतील, आणि रेल्वेने कल्याणच्या पुढे गेलीस तर खुपच अनोखी झाडे दिसतील.
|
दिनेश, तू कैलाशपतीच्या वासाला धुन्द दरवळ असा शब्द वापरलाय. कैलाशपतीच्या फुलांचा वास तिखट असतो असे वाटते.पुण्याला कमला नेहरू पार्क आणि विद्यापीठात आहेत ही झाडे. अमलताश!!. मी जळगावला असताना तिथल्या पोलीस अधीक्षकांच्या बंगल्याचे नाव होते अमलतास. मला तर त्या नावाचा अर्थच तेव्हा कळत नव्हता. अम लतास म्हणायचे की अमलतास हा ही प्रश्न होताच शेवटी कोणी तरी ते मेळघाटातील एका फुलझाडाचे नाव असल्याचे सांगितले. पण पहायला नाही मिळाले. अर्थात जवळ असले तरी मला कळणे शक्य नव्हते कारण मला झाडे ओळखू येत नाहीत. शेतकरी कुटुम्बातील असूनही आणि तीन वर्षे botany शिकूनही!! शिक्षणाचा अन जीवनाचा संबंध आहेच कुठे? आता कळतेय बहावा म्हनजेच अमलताश. म्हणजे काखेत कळसा अन गावाला वळसा!! आता मात्र तुझे पुस्तक लवकर आले पाहिजे असे वाटते. इथल्या एका डॉक्टरानी असेच झाडाचा परिचय करून देणारे सचित्र पुस्तक छापलेय. पण ते फारच महाग आहे. कारण ग्लॉसी कलर प्लेट्स आहेत त्यात...
|
झाडे ओळखू आली नाहीत की वाईट वाटते आणि मनाला त्रास होतो.ती झाडे अनोळखी माणसासारखी परकी आणि त्रयस्थ वाटू लागतात. दिनेश तू तर जगन्मित्रच आहेस . तुझा अन झाडांचा देखील परिचय असने साहजिकच आहे.. पक्षांच्या बाबतीत हीच स्थिती आहे तिथेही आमची मजल कावळा, चिमणी, पोपट,घार,गिधाड यापलिकडे नाही.मग मला पक्षांचे तपशीलवार वर्णने करून लेख लिहिणार्या पक्षी मित्रांचा हेवा, असूया आणि म्हणूनच रागही येऊ लागतो... हल्ली मला तुझा ही 'राग' येऊ लागला आहे...
|
Dineshvs
| |
| Sunday, April 22, 2007 - 4:11 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रॉबीन, झाडानी फक्त असावं रे. ओळख असावी नसावी. फ़ुलांच्या वासांचे नेमके वर्णन करणे कठिण जाते. बहुतेक फ़ुलांचा वास युनिक असतो. तो कश्यासारखा तेहि सांगता येत नाही. मला माणसं नाही रे ओळखता येत. ( ती तूला येतात. )
|
थोडे विषयान्तर आहे... गोव्यात 'देखणी' नावाचा एक लोकनृत्याचा की लोकगीताचा प्रकार आहे.त्याची कॅसेट पाहिजे होती. भालचन्द्र नेमाडे गोव्यात प्राध्यापक असताना त्यानी देखणी नावाचा मराठी काव्यसंग्रह लिहिलाय... माझ्याकडे बर्याच भाषेतील कॅसेट आहेत. पण चांगल्या गोवन कॅसेट मिळाल्या नाहीत कधी. नुसते आपले कुठला तरी फर्नान्डीस आणि रिमिक्स टाईप गाणी. नाही तर आपलं 'आगबोटीचो कप्तान आयलय गो.. असं काही तरी.. . धड पोर्तुगीज संस्कृतीही नाही आणि गोवनही नाहीत.. मला वाटते 'घे घे घेघे घे रे सायबां.. ही धून देखणीची आहे. याबाबत काही माहिती?
|
Bee
| |
| Monday, April 23, 2007 - 2:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मुचकुंद एकदम सुरेख.. दिनेश.. सर्व चित्र खरच खूप मस्त आले आहेत.. दिनेश, सोनटका की सोनटक्का.. त्याबद्दल लिना ना..
|
Karadkar
| |
| Monday, April 23, 2007 - 6:32 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रकाश संत (उर्फ़ डाॅ. भा. गो. दिक्षित) यांच्या घराचे नाव अमलताश आहे. त्यांच्या घराच्या वास्तुशांतीची पत्रीका द्यायला ते घरी आलेले असताना त्यांना विचारलेले आठवतेय. समोरच्या इंजीनीरिन्ग काॅलेज मधे कुठे आहे झाड ते पण सांगीतलेले आठवतेय सरांची फ़ार आठवण झाली आज
|
Dineshvs
| |
| Monday, April 23, 2007 - 5:36 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Bee अरे माझी कुवत ती काय असणार आहे ? तरीपण प्रयत्न करेन. रॉबीन त्या क्षेत्रात अजुन डोकावलो नाही रे. तु येशील तेव्हा घेऊन जाईन तुला, त्या दुकानात. मिनोति, त्यांच्या पुस्तकात अनेक झाडांचा उल्लेख येतो. तो सगळा भागच सुंदर वृक्षानी नटलेला आहे.
|
Bee
| |
| Tuesday, April 24, 2007 - 3:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, पांढरा पळसही असतो पण तो अत्यंत दुर्मिळ आहे. पळस, गुलमोहोर आणि पांगिरा एकाच सुमारास फ़ुलतात. पळसाचे झाड हे खरे तर गावकुसाबाहेरच अधिक छान जोपासल्या जाते. तसे गुलमोहोराचे नाही. गुलमोहोर खास घरासमोर वाढणारा आहे. भर उन्हात फ़ुललेले पळस डोळ्यांना बघवत नाहीत इतकी आग ओकतात म्हणूनच की काय त्यांना Flame of the forest म्हणतात. विदर्भात जाताना मी दरवेळी दादरहून कोलकत्त्याला जाणारी गीतांजली घेतो ह्याला कारण म्हणजे आगगाडी बाहेरून दिसणारी पळसाची झाडे खूप सुंदर दिसतात. भर वेगानी गीतांजली पळत असते आणि मधेच एखादा फ़ुललेला पळस पाहिला की डोळ्यांचे पारणे फ़िटते. संपूर्ण पाने झडून फ़ुलांनी टचटचलेली पळसाची फ़ांदी संपूर्ण वैराण रानमाळ सुशोभित करते.. उन्हाच्या धगीने वाळून गेलेले गवताचे पाते, काळ्या भुईला पडलेल्या भेगा, मोहरलेली आंबराई, फ़ुललेला पळस.. दुरवर जळत असलेले मृगजळ.. शेतात नांगर चालविणारी बायामाणसे.. आपल्यासह पळणारी बाभळीची झाडे.. सर्व बघता बघता कधी अकोला येते माहित देखील पडत नाही. १२ तासांचा प्रवास मी फ़क्त आजूबाजूला दिसणार्या निसर्गावर फ़िदा होऊन पुर्ण करतो..
|
Bhagya
| |
| Tuesday, April 24, 2007 - 6:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा! बरेच दिवसांनी इथे आल्यावर खजिनाच मिळाला... या माहितीची मराठीतच सी डी करता येइल का?
|
वा! बी सुरेख 'सुटलायस'
|
Shonoo
| |
| Tuesday, April 24, 2007 - 3:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
साने गुरुजींच्या एका लेखात ( शाळेत धडा म्हणून असलेल्या ) पळसाबद्दल एक सुरेख उल्लेख आहे रक्तवर्ण फुलला पळसाचा पार्थ सावध नसे पळ साचा रक्तवर्ण फुलांनी डवरलेल्या पळसासारखी पार्थाची अवस्था युद्धात झाल्याचं वर्णन आहे मूळ ओळी बहुतेक मोरोपंतांच्या असाव्यात. आय आय टी च्या आवारात आणि पव इ विहार परिसरात चिकार पळस आणि पांगारे असत. वानखेडेच्या जवळ एक दोन बहाव्याची झाडं होती. गाडीत जागा मिळत असली तरी ती झाडं बघण्याकरता मी दारात उभी रहात असे. किती सुरेख आठवणी जागवल्या तुमच्या लेखांनी!
|
Bee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 2:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
वा दिनेश पांगीर्याचे वर्णन वाचून मी रानात जावून पोहचलो आहे. बघा तुमच्या लेखणीची कमाल मीरीची वेल असते हे म्या पामराला आज कळले. पांगीरा.. माझ्या ऑफ़ीसच्या खिडकीतून खाली लवून बघितले की पांगिर्याच्या रांगा दिसतात. अतिशय दाट पसारा असतो फ़ांदीचा म्हणून ह्या झाड्याच्या आत सतत काळोखाचे साम्राज्य असते. त्यात फ़ुलांचा रंग काळसर लाल.. दिनेश म्हणतात नुसता लाल रंग पण मला मात्र हा रंग काळसर लाल वाटतो. पाकळ्यांचा आकार तलवारीसारखा. म्हणून कुठेतरी वाचले आहे पांगिर्याची तलवार चालवून.. पण आता आठवत नाही कुठे वाचले ते. पाकळ्या ह्या मखमली (Velvet) असतात. पानांना सौंदर्य नाहीच. सगळे सौंदर्य फ़ुलांना बहाल केले आहे. एखादी फ़ुलांनी बरबटलेली फ़ांदी बघितली की ती तोडून फ़ुलदानीत ठेवावीशी वाटते..
|
Saee
| |
| Wednesday, April 25, 2007 - 11:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
खुप खुप मजा येतेय. मुळात विज्ञानशाखा आणि त्यातुन बॉटनी घ्यायला हरकत नव्हती असं आता वाटायला लागलं आहे दिनेश, हे सगळं वाचताना महाजनसरही आठवायला लागतात. तेही एकदम मजा आणतात झाडांबद्दल बोलताना. btw आता रांगेत पुढे शाल्मलीचा नंबर आहे का दिनेश? थोडेसे त्या रंगाकडे वळलाहात म्हणुन विचारलं बहर नसताना माझी सावर की तिरफळ अशी नेहमी पंचाईत होते... लक्ष देऊन निरखावं लागतं. घरासमोरच्या रस्त्यावर आम्ही ४ वर्षापुर्वी बहावा लावला. तेव्हाच समोरच्या मैत्रिणीने गुलमोहोर लावला. आज तो ४० फुट आभाळात आणि आमचा बहावा जेमतेम १५ फुट. कारण रस्त्यावरची सगळी जनावरं बहाव्याची चव घेतल्याशिवाय पुढे होत नाहीत, पाने, कोवळ्या फांद्या आणि सालही खातात. जरा नवी पालवी फुटतेय तोवरच चट्टामटा होतो की पुन्हा नव्याने याचे जीव धरण्याचे प्रयत्न सुरु... फार संरक्षण दिले नाही कारण तो सर्वांसाठी लावलाय. पण या सगळ्यातुन तो एवढा वर आलाय ही किती कौतुकाची गोष्ट! हे समाधान त्या समोरच्या गुलमोहोराला लागू नाही! उद्या हा बहावा बहरेल, लगडेल, फुलांनी आणि पक्षांनीही तेव्हा कित्ती मज्जा येईल
|
Supermom
| |
| Wednesday, April 25, 2007 - 12:43 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, तूही खूप छान वर्णन करतो आहेस. पण बरबटलेली म्हणू नकोस रे बाबा.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 25, 2007 - 4:42 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सई, आहेना शाल्मली यादीत माझ्या. बहावा नक्कीच जीव धरेल. शेवटी बहावा आपला ना, त्याची चवढव आपल्या मुक्या प्राण्यानाही माहित आहे. पण तु मोठी नावे घेऊन मला घाबरवते आहेस. या ऋषीतुल्य माणसांच्या ज्ञानाशी, माझ्या तोकड्या माहितीची तुलनाच होवु शकत नाही.
|
Runi
| |
| Wednesday, April 25, 2007 - 8:28 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, लिखाण बरेच पुढे गेलेले दिसतय मी नव्हते ३-४ दिवस वाचायला तर. आज वाचुन काढले लिखाण आणि प्रतिक्रीया पण. तुमच्या अंगणात लिखाण आणि त्यावरील प्रतिक्रीया दोन्ही अगदी वाचनीय असतात. अजुन नावे घेत असाल तुमच्या यादीमध्ये तर ब्रम्ह्कमळ घेणार का? याची फुले मध्यरात्री उमलतात त्यामुळे शाळेत असताना रात्री उशिरा पर्यन्त वाट बघत जागायचो आम्ही, थोडक्यात छोटीशी कोजागिरीच साजरी व्हायची वाड्यातले सगळेजण एकत्र आल्यामुळे. बाकी हुडा च्या मताशी अगदी पुर्णपणे सहमत, सरड्याची धाव कुंपणापर्यन्त प्रमाणे मला फक्त अगदी थोडीच तोंडओळख आहे झाडे, फुले, फळे इ. ची. इतके छान वर्णन शाळेच्या पुस्तकात का नसते की असते? पण शाळेत असताना अभ्यासात उत्साह, ज्ञान संपादन या बाबतीत एकुणच आनंद होता माझ्या बाबतीत. आता वाईट वाटतेय कि किती तरी गोष्टी स्वतःच्या आळसामुळे शिकल्या नाहीत. पण आत्ता माहित पडतेय तुमच्यामुळे हे मात्र खुपच छान आहे. बी तू पण छान लिहिलयस, सुमॉ च्या मताशी सहमत. ते पोस्ट edit करुन प्लिज बरबटलेली च्या ऐवजी डवरलेली, बहरलेली, फुललेली किंवा असे काही करणार का? रुनि
|
Bhagya
| |
| Thursday, April 26, 2007 - 5:08 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, हा कुडा म्हणजेच हजारी मोगरा का? अशीच दिसणारी, पण हजारी मोगरा असे नाव असलेली झाडे रामटेकला खिंडसीच्या guest house पाशी पाहिल्याची आठवतायत...
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|