|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:29 am: |
|
|
मी आत्ताच गूगलला भेट दिली. तो म्हणतो आहे हे तिन्ही नावे म्हणजे Honey Dew, Rock Melon, Cantaloupe त्याचीच आहे. ह्यातील कुठलेही नाव तिथे लिहा.. आणि मग images वर टिचकी मारा तुम्हाला भक्कम छायाचित्र दिसतील.. खरबुजाचे.
|
Rajankul
| |
| Tuesday, April 17, 2007 - 7:55 am: |
|
|
मॅडम ते खरबुज आहे. काय म्हणावे या लोकांच्या सामान्य ज्ञानाला ला.खरबुज टरबुज फ़रक कळत नाही? bee साहेबांनी सांगितले ते वाचा की.
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 17, 2007 - 11:40 am: |
|
|
कधी कधी मला विदर्भ म्हणजे अज्ञाताच्या गर्भातला निर्गम प्रदेश आहे असे वाटते.... >>>. गिरी पोटभर हसलो रे. काय सॉलिड लिहिलयस. लाल चाफ़्याच्या फ़ुलांची माळ साखरेच्या माळेबरोबर गुढीला लावलेली असायची. त्या फ़ुलांची अंगठी करणे हा प्रकार आम्हीही केला आहे लहानपणी. हिरवा चाफ़ा पाहिलेल आठवत नाही पण घरी विचारुन बघतो. दिनेशदा फ़ोटो खुप छान आहेत सर्व. ते टरबुज, खरबुज आणि कलिंगड ह्यात माझाही गोंधळ आहे. कलिंगड पक्क माहित आहे पण मला वाटायच की दुसर्या भागात त्याला टरबुज म्हणतात. आता तर टरबुज आणि खरबुज कोण सांगेल बर व्यवस्थित? दिनेशदा तुम्हीच सांगा आता.
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:04 pm: |
|
|
झक्कास, हे बघ हे आहे कलिंगड उर्फ़ टरबूज - http://commons.wikimedia.org/wiki/Image:Water_melon.jpg ..आणि हे आहे खरबूज.. http://www.victoryseeds.com/catalog/vegetable/melons/honeyrock.jpg
|
Supermom
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:07 pm: |
|
|
माझ्या मते टरबूज व कलिंगड एकच. वरून हिरवे व आतून लालभडक. खरबूज म्हणजे जे वरून खडबडीत व आतून पिवळे, केशरी असते ते. टरबूज वरून अगदी गुळगुळीत असते. तसेच चाफ़्याची एक जात खरेच असते ज्याच्या पाकळ्यांचा रवाळ रंग(हा बी चा शब्दप्रयोग अगदी बरोबर आहे.) खरेच हाताला लागतो. मी हे बीची बाजू घेण्यासाठी वगैरे लिहीत नाहीय हं, नाही तर पुन्हा वादाला तोंड फ़ुटायचे. पण ही फ़ुले मी पण बघितली आहेत. फ़क्त त्याला हळदीकुंकवाचे फ़ूल वगैरे म्हणतात हे नाही माहीत.
|
Nalini
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:38 pm: |
|
|
कलिंगड/ टरबुज/ Watermelon खरबुज Cantaloupe मीही बर्याचदा(गावच्या आठवड्याच्या बाजारात) पेरुला जांब म्हणताना ऐकलय. मला वाटायचं की तो शब्द फक्त खेडेगावतच वापरत असतील.
|
Zakki
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:43 pm: |
|
|
माझ्या मते, हिरवा चाफा, हळदीकुंकू चाफा, सोनचाफा, पेरू, जांब, अमरूद, टरबूज, खरबूज, कलिंगड, बिलिंगड, वाटर्मेलन, हनिड्यू, पाणीड्यू, दगड, धोंडे, माती नि शेण हे सगळे एकच!! कितीदा सांगितले, ब्रम्ह सत्यं, जगन्मिथ्या. मग उगीच कशाला वादविवाद करता? फक्त फुलांचा वास घ्या नि फळे खा. नाव काही का असेना!
|
Supermom
| |
| Tuesday, April 17, 2007 - 12:47 pm: |
|
|
झक्कीकाका, हा आध्यात्मिक बी बी नाही हो. चुकून भलतीकडे पोस्टिंग केलंत तुम्ही.
|
तरी पण cantaloupe or rock melon म्हणजे honey dew नाही.
|
Nalini
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:13 pm: |
|
|
रचनाशी अगदी १००% सहमत. cantaloupe = nutmeg melon = muskmelon = netted melon = rockmelon honeydew melon = honey dew melon Varieties of melon इथे पहा..
|
Runi
| |
| Thursday, April 19, 2007 - 2:24 am: |
|
|
नलिनी पेरुला जांब हा शब्द मराठवाड्यातल्या गावांमध्ये पण वापरला जातो.
|
Ksmita
| |
| Thursday, April 19, 2007 - 2:40 am: |
|
|
चिबुड किंवा चकुत्र म्हणजे टरबूज का ? or cantaloupe ??
|
Dhumketu
| |
| Thursday, April 19, 2007 - 3:49 am: |
|
|
चिबुड म्हणजे टरबुज.. कोकणात काही ठिकाणी म्हणतात चिबुड....
|
Bee
| |
| Thursday, April 19, 2007 - 4:32 am: |
|
|
मराठी लिहायला जशी देवनागरी script आहे तशी कोकणी लिहायला कुठली script वापरली जाते? माझी एक गौड सारस्वत ब्राह्मण कलीग म्हणते की त्यांची फ़क्त बोलीभाषा आहे. साहित्य असे काही नाहीच. आजच्या युगात तरी फ़क्त बोलीभाषेवर अवलंबुन राहणे बिकट आहे. अशानी ती भाषा टिकणार नाही..
|
Bee
| |
| Thursday, April 19, 2007 - 4:32 am: |
|
|
BTW संस्कृतमधे पेरूला जम्बु म्हणतात त्यावरुन कदाचित जाम्ब हे नाव आले असेल.
|
Giriraj
| |
| Thursday, April 19, 2007 - 6:28 am: |
|
|
बी,तुला कोंकणीबद्दल म्हणायचे आहे की मालवणीबद्दल? कोंकणी ही गोव्यात बोलली जाते.. आणि महाराष्ट्राच्या कोकणात (काही भागात) मालवणी बोलली जाते (हिला लिपी नाही कारण ही बोली आहे) कोंकणी भाषेला राजभाषा म्हणून मान्यता आहे आणि ती दोन लिप्यांमध्ये लिहिली जाते. मरठीबहूल किंवा हिंदू बहूल भागात देवनागरी लिपी वापरतात तर गोव्याच्या दक्षीण भागात रोमन लिपी वापरली जाते.या भाषेत विपुल लिखाण होते... अगदी रमायण वगैरेही आहे त्यात! आता महत्वाचे... तुला हा प्रश्न इथेच विचारायची काय खाज आलेली?
|
Zakasrao
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:08 am: |
|
|
बी आणि नलिनी धन्यवाद लिन्क आणि फ़ोटो बद्दल. गिरी तुझ बी शी काय वाकड आहे रे? त्याला अस का बोलतोस? बी पुढच्या भारत वारी मधे एक महिनाभर कोकणवारी कर तुझे बरेच प्रश्न सुटतील. वाटल्यास गिरी ला घेवुन जा सोबत. दिनेशदा लिहा.
|
Giriraj
| |
| Thursday, April 19, 2007 - 7:30 am: |
|
|
माझं त्याच्याशी काहीच वाकडं नाही बुवा! तुझं होऊ नये ही सदिच्छा!
|
Mandard
| |
| Thursday, April 19, 2007 - 8:19 am: |
|
|
बी ही चर्चा दिनेश यांच्या बी बी पेक्षा संबंधीत बी बी किंवा नवा बी बी उघडुन करावी.
|
Bee
| |
| Friday, April 20, 2007 - 2:09 am: |
|
|
बरेच जण बहव्याला सोनमोहोर देखील म्हणतात. माझ्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहिले की ओळीने ८ / १० बहवे दिसतात. सध्या तर बहव्यांचे घडच्या घड लागलेले आहेत.. वारा सुटला की मस्त हिंदकळतात..
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|