Bee
| |
| Monday, April 16, 2007 - 2:14 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, तुम्ही असोल्या नारळाचा उल्लेख केला कैलासपतीच्या लेखात. नारळाच्या विविध जातींबद्दल लिना ना कधीतरी.. शेंद्री चाफ़ा पण असतो ना.. इथे सिंगापोरमधे खूप आहेत चाफ़्याची झाडे. प्रत्येक पाच पाच मिनिटांच्या अंतरावर दिसतात. दिनेश, तुम्ही pagoda tree म्हंटले आहे ना.. मी येत्या देसेंबर मधे बर्माला जात आहे. तेंव्हा हे झाड तिथे शोधन्याचा प्रयास करीन..
|
बी, असोला म्हणजे न सोललेला नारळ. ही काही जात नव्हे. भुईचाफ्याची आठवण काढलीत आणि पुन्हा अहान झालो. कोकणात आमच्या परसदारी हा उगवायचा. काढताना मुळाशी भरपूर पाणी टाकायचे आणि मग माती भुसभुशीत झाली की हळु खुडायचा. देखणी फुले असतात अगदी.
|
Giriraj
| |
| Monday, April 16, 2007 - 7:16 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
जरुळ म्हणजेच ताम्हणी परवाच्या साप्ताहीक सकाळमध्य त्यावर लेख आलाय!
|
Bee
| |
| Monday, April 16, 2007 - 7:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विदर्भात, चाफ़्याला हळदीकुंकवाची फ़ुले म्हणतात किंवा बहुतेक ती चाफ़्याची वेगळी जात असावी. ह्या चाफ़्याच्या पाकळ्या तळाशी हळदीच्या रंगाच्या असतात आणि वरती कुंकवाच्या रंगासारख्या होत जातात. आणखी एक म्हणजे पाकळ्यांना स्पर्श केला तर हाताला पाकळ्यांचा रवाळ रंग लागतो. माझ्या बहिणीची सासू, महादेवाच्या पिंडीला हे फ़ुल वाहत असे व त्या पाकळ्यांचा रंग कपाळाला..
|
Giriraj
| |
| Monday, April 16, 2007 - 9:50 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कधी कधी मला विदर्भ म्हणजे अज्ञाताच्या गर्भातला निर्गम प्रदेश आहे असे वाटते.... काहिही खपवतोस तू तर विदर्भाच्या नावावर! चाफ़्याचा रंग हातला लागत नसतो बन्ड्या.. तू चफ़्यावर बसलेले फ़ुलपाखरु पकडले असशील रे वैदर्भिय 'फ़ूला'! आणि माझ्या बहिणीची सासू कधीच चाफ़्याचा रंग कपाळाला लावताना दिसली नाही.. त्यावरून मला तरी तू कहितरी घोळ करतो आहेस असेच वाटतेय बघ! (ता.क. - माझी नववधू प्रिया माझ्या जवळच बसून आहे त्यामुळे ती वाट पाहण्याचा प्रश्नच नाही. अरे हो.. तु चफ़्याची कशी वाट लावली ते मात्र बिचारीला बघवले नाही आणि तिच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले आणि मी सूड भावनेने पेटून उठून शेवटी हे सगळे लिहिता झालो)
|
Itsme
| |
| Monday, April 16, 2007 - 9:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Giri ... सावर स्वताला Bee, पुण्यास आलास की university मधे ये, तुला हळदी - कुंकवाची फुले दाखवीन हो ...
|
Rajankul
| |
| Monday, April 16, 2007 - 10:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोधन्याचा प्रयास करीन..>>. prayaas chaa arth kaay ho BEE?( bee mhanaje sreelingi naa ?)
|
Bee
| |
| Monday, April 16, 2007 - 10:38 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
माझ्यावर जर विश्वास नसेल तर ठीक आहे. विदर्भात जर कधी आलात आणि कुणी निसर्गप्रेमी ओळखीचा असेल तर त्याला विचारा. तिथे मुंबई पुण्यात राहून विदर्भाबद्दल तुम्ही खात्रीपुर्वक नाही बोलू शकत. आरती, तू जे म्हणते आहेस ते हळदीकुंकवाचे झाड मलाही माहिती आही. प्रांतानुसार एखाद्या झाडाला वेगळे नाव पडू शकते. जसे विदर्भात पेरूला 'जाम्ब' म्हणतात. रजनकुल, प्रयास म्हणजे प्रयत्न. गिरिराज, तुझी नववधू प्रिया जी म्हणते तीच आता तुझ्यासाठी पुर्वदिशा ठरणार आहे असे दिसते
|
Ajjuka
| |
| Monday, April 16, 2007 - 12:26 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
विदर्भात खरंच पेरूला जाम्ब म्हणतात? मग जाम्ब ला काय म्हणतात? (असं एक फळ खरंच असतं...)
|
दिनेशदा, लेखमाला खूप आवडली! विदर्भात पेरुला 'पेरु' असंच म्हणतात. 'जांब' हा हिंदी शब्द आहे. आणि हिंदीचा विदर्भावरील प्रभाव लक्षात घेता मराठीतही हा शब्द वापरला तरी कुणाला फारसं वावगं वाटत नाही. चाफ्याला हळदीकुंकवाचं झाड म्हंटल्याचं मला तरी आठवत नाही.
|
Zakki
| |
| Monday, April 16, 2007 - 1:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पेरू ला 'अमरुद' हाहि हिंदी शब्द आहे.
![](/hitguj/clipart/happy.gif)
|
आता मधात पडून खरे सांगाले यानले काय पडले होते का बाप्पा? भल्ले लोक एकमेकाले भक्कम थापा मारीत होते यानी पटकन सांगी दीना ना खरा शब्द अमरूद! भैताड कहींके!
|
Bee
| |
| Monday, April 16, 2007 - 3:04 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अमरुद हे नाव खूप शुद्ध झाले. जसे टरबुजाला कलिंगड खूप कमी जण म्हणतात तसेच पेरूला अमरुद म्हणणारे हिंदी बांधव विदर्भात तरी खूप कमी आहेत. मृ, विदर्भात चाफ़ा तसा दुर्मिळच आहे. जितकी तगर आणि कण्हेर जिथेतिथे दिसते त्यापरिने चाफ़ा फ़ारसा आढळत नाही. निदान चाफ़्याचे जे अनेक प्रकार असतात त्यात फ़क्त लालपिवळ्या रंगाचा एकच प्रकार मी पाहिलेला आहे. म्हणून तू हळदीकुंक्वाचे झाड हे नाव ऐकले नसेल. पण खेडेगावी खरच ह्याला हळदीकुंकवाचे झाड म्हणतात. थापा नाही मारत.. उन्हामुळे चाफ़्याच्या पाकळ्या खूप गडद होतात.
|
Malavika
| |
| Monday, April 16, 2007 - 5:46 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, तुम्ही खूपच छान माहिती देत आहात. त्यात पुन्हा तुमची लिहीण्याची शैली अतिशय रसाळ आहे. भाषाही ओघवती. तुम्ही हे सगळे लेख संकलीत करुन त्याचे पुस्तक छापायला पहिजेच.
|
मी पण Couroupita guianensis ला नागचाफ़ा म्हणुनच ओळखत होते. सिद्धिविनायक मंदिराच्या मागच्या बाजुला ह्याची २-३ झाडे आहेत. पण पाकळ्यांचा रंग कडेला पांढरा आणि मधे गुलाबी असा पाहिल्याचा आठवतो आहे.
|
टरबुज आणि कलिंगड हे दोन वेगळे प्रकार नाहीत का?
|
Swa_26
| |
| Tuesday, April 17, 2007 - 4:55 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमर, exactly, मला पण हेच वाटतंय... मझ्या माहितीप्रमाणे, टरबुज हे बाहेरुन पान्ढरट पिवळे आणि आतुन पिवळे असते आणि कलिंगड हे बाहेरुन हिरवे आणि आतुन लाल असते..
|
Giriraj
| |
| Tuesday, April 17, 2007 - 5:10 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भ्रमरा ज्याला तुम्ही टरबूज म्हणताहात त्याला मी खरबूज म्हणून ओळखतो.
|
Bee
| |
| Tuesday, April 17, 2007 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
स्व२६ तू म्हणते आहेस ते खरबूज. खरबुजाच्या कवचावर नक्षी असते. ती सगळीकडून सारखीच हिरवट राखाडी रंगाची असते. पिकलेल्या खरबुजाला एक मस्त वास असतो. टरबुजाला मात्र वास नसतोच. खरबुजाच्या आतील मगज कषाय.. अर्थात फ़िकट भगव्या रंगाचा असते. Asia pacific countries मधे खरबुज आणि टरबुजाचे मगज अर्थात आतील जो भाग आपण खातो तो आणखी दोन रंगांमधे मिळतो. टरबुज लाल आणि पिवळ्या रंगाचे. खरबुज फ़िकट भगव्या आणि हिरवट पांढर्या रंगाचे. पण इथे फ़ळांमधे injection देऊन त्याचा रंग गर्द करतात आणि चव देखील गोड करतात. मला हा प्रकार इतक्यातच माहिती झाला त्यामुळे मी आधीच कापलेले फ़ळ घेत नाही. माझ्या मते Honey Dew or Rock Melon ह्या नावाने खरबुजाला english मधे ओळखतात.
|
नाही honey dew हा कलिंगडाचाच प्रकार आहे. खरबुजाला ईंग्रजी मध्ये cantaloupe म्हणतात..
|