|
Dineshvs
| |
| Thursday, April 12, 2007 - 5:06 pm: |
|
|
परागकण, आपला राज्यपक्षी आहे जंगली हिरवे कबुतर ( ते मी अजुन बघितले नाही. ) आणि राज्यप्राणी आहे, राक्षसी खार. भीमाशंकरला त्या खारी आहेत असे म्हणतात. पण मला दिसल्या नव्हत्या. गोव्यात मात्र अगदी बसमधुनहि दिसतात.
|
Runi
| |
| Thursday, April 12, 2007 - 6:47 pm: |
|
|
दिनेशदा हे मात्र मला कधीच माहित नव्हते कि असे राज्य पक्षी, झाडे, प्राणी असतात म्हणुन. कधीच कुठे ऐकले किंवा वाचले नाही. आम्हाला ते शाळेत शिकवल्याचे पण मला आठवत नाही. अशा दुर्मिळ माहितीची कार्यशाळा आयोजित करा ना तुम्ही वेळ मिळाला तर कधीतरी, तुमच्याकडुन यावर प्रत्यक्षात सेमिनार ऐकायला आवडेल. इथे लिहीत आहातच ते खुप छान झाले.
|
हिरवा चाफ़ा ह्याचाच प्रकार का? मी आमच्या गावी बघितले आहे त्याचे झाड..खुपच उग्र वास असतो फ़ुलांचा....
|
Bee
| |
| Friday, April 13, 2007 - 3:21 am: |
|
|
सिन्ड्रेला हिरव्याचाफ़्याचा वास मला तरी धुंद करून सोडणारा वाटला. हे झाड कितीही दूर असले तर परिसरातील लोकांना हवेच्या झुळकेबरोबर फ़ुलांचा वास पोहचतो. बहुतेक फ़ुल दिसू देत नसावे म्हणून निदान गंध तरी इतरांना लुटू द्यावा असे ह्या झाडाचे म्हणने आहे. सिंगापोरमधे हिरवा चाफ़ा विपुल प्रमाणात आढळतो. अगदी पाचपन्नास रांगाच्यारांगा दिसतात इथे. मी जर कॅबनी प्रवास करत असेल तर हमखास हे झाड आले तर कॅबची काच खाली सरकवतो. पण गाडी भरकन पुढे जाते. दिनेश, सोनचाफ़्याचे जे फ़ळ असते ते जर फ़ोडले की त्यातून अस्सल अबोली रंगाच्या बिया बाहेर पडतात. काय झक्कास वर्ण लाभला आहे ह्या बियांना. तितकाच तेजस्वी भगवा रंग फ़ुलांना लाभलेला आहे. ह्याची पाने मला आंब्याच्या पानासारखी वाटतात फ़क्त रंग फ़िकट असतो बाकी पाने तशीच असतात. माझ्याघरी हे झाड आता पुरुषभर उंचीचे झाले आहे. बहुतेक ह्या वेळी एखादी तरी कळी धरेल आता. छान आनंद मिळतो आहे ह्या लेखांच्या वाचनातून.
|
हिरव्या चाफ्यावरुन एक झकास गाणं आठवलं. लपविलास तु हिरवा चाफा सुगंध त्याचा लपेल का? प्रित लपवुनि लपेल का? लपेल हा शब्द लप्पेल असा म्हटला आहे ना माणिकबाईनी! दिनेशदा, विषयांतराबद्दल क्षमस्व!
|
Dineshvs
| |
| Friday, April 13, 2007 - 6:48 am: |
|
|
भ्रमर, विषयांतर नाही रे, पण तूम्हा सगळ्यांची गाणी माझ्यापुढे धावतेय. मी तर अजुन हिरव्या चाफ्यापर्यंत पोहोचलोहि नाही.
|
Shonoo
| |
| Friday, April 13, 2007 - 12:23 pm: |
|
|
दिनेश पोद्दार कॉलेज जवळची ती झाडे मलाही माहिति आहेत. हिंदु कॉलनीत, तळवलकरांच्या डोळ्यांचा हॉस्पिटल जवळ वगैर पण अगदी देखणी सोनचाफ्याची झाडं होती. तुम्ही काढलेला फोटो पण एकदम सुरेख आहे. माझ्या सासरी ( गोदावरी समुद्राला मिळते त्या भागात) सोनचाफ्याला जवळ जवळ वर्षभर फुलं येतात. मी कधीही गेले तरी आते, मामे, मावस सासवांकडून माझ्या साठी रोज ही फुलं येतात. सकाळी सकाळी फोटो पाहून एकदम माहेर आणि सासरची आठवण करून दिलीत. आमच्या नशिबी इथे भरभरून फुलणारे चेरी, मॅग्नोलिआ, फ़ोर्सिथिया सगळे आहेत पण एकालाही जरा म्हणून वास नाही. आणि प्रत्येक झाडाचा दिमाख दोन-ते-तीन आठवडे फक्त :-(
|
महाराष्ट्राचा राज्य पक्षी हिरवे कबूतरच आहे. मी नाही पाहिले अजून! तसेच राज्य प्राणी भीमाशन्कर खार आहे. तिला शेकरू,देवखार असे म्हणतात. ती बरीच मोठी असते. Great Indian Squirrel राज्यफळ आम्बा आहे आणि राज्य फूल जरुल नावाचे आहे. हे जरुल म्हनजे काय रे भाऊ?
|
थोडे विषयान्तर. रुपालीसाठी. राष्ट्रीय पक्षी प्राणी घोषित केलेले आहे. राष्ट्रीय पक्षी निळा नर मोर Pivo cristatus बोधचिन्ह तीन(खरे तर चार)सिंह,प्राणि वाघ Panthera Tigris ,फूल कमळ, वृक्ष वड Ficus bengalensis ,फळ आम्बा, राष्ट्रीय कॅलेन्डर चैत्राने सुरू होणारे शक वर्ष. २१ मार्च १,चैत्र धरून. राष्ट्रीय गीत वन्दे मातरम आणि राष्ट्रगीत जन गण मन anthem राष्ट्रीय खेळ हॉकी
|
Runi
| |
| Friday, April 13, 2007 - 3:29 pm: |
|
|
हुडा, मला 'राष्ट्रीय' पक्षी, फुल, प्राणी, झाड, खेळ माहित होते (म्हणजे आहेत अजुनही ) पण दिनेशदानी लिहीलेल्या 'राज्य' पक्षी, प्राणी बद्दल मात्र एक अक्षरही माहित नव्हते. मला राष्ट्रगीत आणि राष्ट्रीयगीत असा फरक माहित नव्हता. तु सांगितलास हे बरे केलेस.
|
जरुळ.. .. .. ..
|
Dineshvs
| |
| Friday, April 13, 2007 - 4:19 pm: |
|
|
अरे वा, रॉबीन छान माहिती आहे कि, पण किती सर्कारी माणसाना हे माहित असेल रे ? मला तरी तुझे जारुळ, तामणीसारखेच दिसतेय.
|
Karadkar
| |
| Friday, April 13, 2007 - 6:33 pm: |
|
|
हा नंतरचा जो चाफा आहे ना तो खास ट्रॉपिकल भागातला. फिजी मधे एक गमतीशीर रीत आहे ह्या चाफ्यासंदर्भात - जर हे फ़ुल मुलाने किंवा मुलीने डाव्या कानावर लावले असेल तर ती व्यक्ती एकटी आहे आणि उजव्या कानावर लावले असेल तर ती व्यक्ती comited relationship मध्ये आहे!!!
|
Psg
| |
| Saturday, April 14, 2007 - 5:48 am: |
|
|
दिनेश, सर्वच चाफ़्याच्या फ़ुलांचे फोटो सुंदर आलेत.. गुलाबी चाफ़ा तर फ़ारच मोहक आहे!
|
हूँ... म्हणजे मिनोती आपल्या मंगळसूत्रासारखा प्रकार आहे. मात्र आपल्या मंगळसूत्राला गुलामगिरीचे लोढणे म्हणायचे अन फिजीतले मात्र कौतुक करायचे!! असो...
|
Swa_26
| |
| Saturday, April 14, 2007 - 6:28 am: |
|
|
दिनेशदा, मी मागच्याच महिन्यात एका घरी सोनचाफ्याची फुले अशी बाटलीत भरलेली पाहिली. मस्त वाटत होती... ते तुरटीचे द्रावण असते काय.... करुन पहायला हवे... लाखेऐवजी मेणाचे सील चालेल का त्याला??
|
Dineshvs
| |
| Saturday, April 14, 2007 - 3:31 pm: |
|
|
मिनोति, आपल्याकडे पुर्वी शिरिषाच्या फुलांचा असा कानावर माळण्यासाठी उपयोग करत असत. स्वाती, मुंबईच्या हवेत मेणाचे सील टिकणार नाही. पण बघ प्रयत्न करुन. फुले मात्र अगदी ताजी हवीत.
|
दिनेश सहीच वर्णन आणि फ़ोटो. सोनचाफ़्याचा वास अगदी जसाच्या तसा आठवला. बकुळीविषयी पण लिहा ना. आजकाल ते झाड पण फ़ारसे दिसत नाही. btw अशी बाटली सील केली की वास कसा येणार पण?
|
Upas
| |
| Saturday, April 14, 2007 - 7:49 pm: |
|
|
दिनेशदा पारिजतकाच्या सड्याविषयी पण लिहीणार आहात ना? हे सगळं वाचताना आठ्वणींचा सुगंध दरवळू लागलाय... :-)
|
Dineshvs
| |
| Sunday, April 15, 2007 - 4:45 pm: |
|
|
रचना, वास नाही येणार, पण फुले टिकतात. पुर्वी रेडिओच्या बाजुला, गणपतिच्या बाजुला अश्या बाटल्या ठेवत असत. बकुळीच्या झाडाखाली आत्ताच जाऊन आलो. उपास, आहे ना यादीत, पारिजातक. पण आता मी खुपच वेगात लिहितोय, आम्हाला वाचायला वेळ द्या, असे काहि निरोप आलेत. म्हणुन आता दोन तीन दिवस रजा घेतोय.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|