|
Kashi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 3:10 pm: |
|
|
कीती वर्शात खाल्ले नहीत करवंद...... देशाबहेर रहाण्याचे तोटे...इथे मुस्तफ़ामधे कधितरी दिसतात.. छान पकींग केलेले...पण किंमत बघुन..खवेसे वाटत नहि...
|
Runi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:29 pm: |
|
|
दिनेशदा पहिल्यांदाच करवंदांच्या फुलांचा फोटो बघितला. मला ती फुले कुंदाच्या फुला सारखी वाटली. बाकी मी कोकणातली नसल्याने कधी अशी जाळी बघायला मिळाली नाही. जी काही करवंदे खायला मिळाली ती फक्त बाजारातुन विकत आणलेली. आणि दिनेशदा, सुमॉ खरच??? करवंदांचे गजरे माळतात. मी कधी बघितले नाही. पण कल्पना एकदम छान वाटली. तुमच्याकडे फोटो असेल असा एखादा जुना, घरातल्या कोणी तरी असा करवंदे माळलेला तर टाकाल का प्लिज?
|
Dineshvs
| |
| Tuesday, April 10, 2007 - 4:55 pm: |
|
|
दोस्तानो, तूमच्या या प्रतिक्रियानी माझ्या लेखनाला परिपुर्णता येतेय. या झाडांच्या ईतर अवस्थांचे पण फोटो अवश्य टाकत जाईन.
|
Supermom
| |
| Tuesday, April 10, 2007 - 5:45 pm: |
|
|
रुनी, सध्या फोटो नाही इथे माझ्याकडे. पण यावर्षी भारतात जाणार आहे. तेव्हा जरूर काढून आणेन असा फ़ोटो. अन हा रंग इतका सुन्दर असतो ना ग करवंदांचा.थोडा पांढरट, थोडा गुलाबी, अन थोड्या भागात लालही. दिनेश, बुचाच्या फ़ुलांबद्दल लिहा ना थोडेसे. किती सुरेख, वेडावणारा गंध असतो या फ़ुलांचा. मी लहान असताना आम्ही नागपूरला होतो. तेव्हा आमच्या घरासमोर श्री. अरुण दातेंच्या काकांचे घर होते. त्यांच्याकडे ही झाडे होती. नुसता सडा पडलेला असे. गल्लीतल्या मुली ती फ़ुले वेचून गजरे गुंफ़ीत असत. मी फ़ारच लहान असल्याने केसही छोटेच होते तेव्हा. तर आई एकच टप्पोरे फ़ूल खोचून देत असे नेहेमी. माझ्या लहानपणीच्या प्रत्येक फ़ोटोत ते एकच फ़ूल आहेच केसांमधे. माझा ट्रेडमार्कच आहे जणू तो.
|
Runi
| |
| Tuesday, April 10, 2007 - 8:57 pm: |
|
|
(दिनेशदा तुमची जागा वापरल्याबद्दल क्षमस्व.) सुमॉ, हो नक्की आणा फोटो. बुचाच्या झाडावरुन मला एकदम माझे बालपण आठवले. आम्ही रहात होतो तिथे रस्त्याच्या दोन्ही बाजुला बुचाची झाडे होती. मस्त सडा पडलेला असायचा नेहमी. आजुबाजुच्या मुली त्या फुलांची लांबसडक वेणी करायच्या, नुसतीच फुले गुंफुन, सुई दोरा न वापरता. मला कधीच नीट जमली नाही अशी वेणी करायला, नेहमी खुप सैल होवुन सगळी फुले निसटुन जायची. मग कुणी तरी करुन दिलेली वेणी लावायचे मी.
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:40 am: |
|
|
नक्की लिहिन बुचाच्या झाडाबद्दल. आणि रुनि हे अंगण सगळ्यांचेच आहे. कुणीहि यावे, लिहावे.
|
Bee
| |
| Wednesday, April 11, 2007 - 2:45 am: |
|
|
काशी, मला इथे मुस्तफ़ा मधे कधीच जांभूळ दिसले नाहीत. नंतर कधी तुला आढळलेत तर मला प्लीज सांगशील का? धन्यवाद! द्रौपदीची कथा मस्त वाटली वाचायला.. गदीमांचा संदर्भही छान..
|
Nalini
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:32 am: |
|
|
जांभूळ! तोंडाला पाणी सुटले. आता कळले की याला उरफटे(उलटे) फळ का म्हणतात ते. कौठ आणि जांभूळ ऊलटे फळ आहे म्हणून उपवासाला चालत नाही. कौठ मात्र महाशिवरात्रीला आवर्जुन खातात, ते का बरं? हे झाड फारच कुचके असते म्हणजे अगदी सहज मोडणारे. पावसाच्या पहिल्या सरीनंतर ३-४ दिवसातच संपुर्ण झाड हिरव्या रंगाचे पातळ बदलून जांभळ्या रंगाचा शालू पांघरते. पावसाळी वादळात सर्वात जास्त फांद्या मोडतात त्या ह्याच्याच म्हणून जांभळाच्या झाडाखाली कधीच आसरा घेऊ नये. झाडावर चढल्यावर अगदी मोठी फांदीसुद्धा बिनभरोश्याची. जांभळं खायची तर ती तोडलेलीच कारण पडलेले, पाडलेले जांभळं क्वचितच खाण्यायोग्य सापडतात. जांभळं काढण्यासाठी आंबे उतरवायला जशी आकडी वापरतात तशी आकडी वापरली जाते. जांभळाच्या लाकडाच्या चौकटी, तुळ्या घराला वापरू नयेत असेही म्हटले जाते. दिनेशदादा, मागच्या वर्षी भारतात गेले होते तेव्हा खुप जांभळं खाल्ली. मी आणि माझा दिड वर्षाचा भाचा दिवसातून पाच सहा वेळा फिरायला निघायचो. पोटभर जांभळं हादडूनच घरी परत यायचो. येरव्ही कडेवरच घे म्हणून हटून बसणार हे पिल्लू मी जांभळं खायला चालले म्हटलं की माझ्या पुढे लुटूलुटू पळायचं.
|
Swa_26
| |
| Wednesday, April 11, 2007 - 10:52 am: |
|
|
दिनेशदा... मस्तच चालु आहे ही लेखमाला. मी पुर्वी जेव्हा माहिमला रहायला होते तेव्हा तिथे माझ्या आजोबांनी लावलेले एक जामचे आणि एक जांभळाचे झाड होते. (म्हणजे अजुनही ती झाडे तिथेच आहेत, पण मी नाहीय तिथे...) त्या झाडाचे जाम खाल्ल्यावर आजतागायत तसा जाम खायला मिळाला नाहि असे वाटते. आणि जांभुळ तर असा छान की खाली पडला तर फुटायचाच... खुप छान गर आणि छोटी बी... जांभळाची बी उगाळुन चेहर्याला लावल्यास चेहर्यावरील डाग जातात म्हणे... तुमचे लेख वाचुन बालपणीच्या आठवणी ताज्या झाल्या.
|
Giriraj
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:03 am: |
|
|
बी उगाळुन चेहर्याला लावल्यास चेहर्यावरील डाग जातात म्हणे.....>>>> त्याच्या कोण तोन्डी लागेल? ~D
|
Swa_26
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:15 am: |
|
|
Moderator mode on... गिरी, इथे TP नको, विषयाला धरुन बोला... Moderator mode off... मला ते बी type करतानाच इथल्या 'बी' ची आठवण झालेली.... पण आता फळाच्या बी ला दुसरा काहीच शब्द आठवेना...
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 11, 2007 - 1:46 pm: |
|
|
नलिनी, तूम्ही कौठ म्हणता का ? मुंबईला कवठ म्हणतात. संस्कृतमधे कपित्थ म्हणतात. त्याबद्दलली लिहिनच. पण हे झाड फक्त कोरड्या हवेतच वाढते. कोकणात ही झाडे नाहीतच. त्यामूळे फळही माहित नाही, या लोकाना. स्वाती, बघना आपल्या खुपश्या आठवणी एखाद्या झाडाशी किंवा गाण्याशी निगडीत असतात. सुपरमॉम, बुचाचे झाड मात्र कोकणातहि आहे बरं का. तूम्हा सगळ्यांच्या काही सुखद आठवणी मी जागवतोय, याचा मलाही खुप आनंद होतोय.
|
Suyog
| |
| Wednesday, April 11, 2007 - 3:52 pm: |
|
|
syzigium jambolanum as medicine aahe homeopathy ch I have seen good results with it to control sugar level even if p.p.sugar level was too high this has been really effective it stimulates insulin production n helps the body to control sugar aayurvedat jambhalachi powder waparatat
|
Dineshvs
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:01 pm: |
|
|
आभार सुयोग. मधुमेहावर अशी अनेक औषधे बाजारात आहेत. पण कुठलेही औषध घेतले आणि आहारावर नियंत्रण नाही ठेवले, तर काय परिणाम होणार, नाही का ?
|
Runi
| |
| Wednesday, April 11, 2007 - 5:24 pm: |
|
|
धन्यवाद दिनेशदा. जांभळाचा मोहोर मी पहिल्यांदाच बघतेय, नेहमी झाडावर लागलेली जांभळेच बघितलीयेत. माझी आजी आजोबांना खूप जांभळे खायला लावायची. त्यांना मधुमेह होता. ती म्हणायची की आंब्याच्या मोसमा नंतर जांभळे येतात कारण गोड आंब्याने वाढलेल्या शरीरातल्या साखरेवर जांभळाचा उतार पडतो. आमच्याकडे पण कौठाला कवठ म्हणतात. कच्च्या कवठाची चटणी खुप छान लागते आणि पुर्ण पिकलेले कवठ नुसते खायला मस्त लागते. पुर्ण पिकले नसेल तर ते थोडेसे आंबट, तुरट लागते तेव्हा थोडासा गुळ तोंडी लावला की खुप छान चव लागते. आमच्या शाळेबाहेर चिंचा, बोरे, जांभळांसोबत कवठ पण असायचे विकायला. बोलताबोलता मी परत शाळेतल्या बाकावर जावुन पोहचले की
|
Nalini
| |
| Wednesday, April 11, 2007 - 6:28 pm: |
|
|
दिनेशदादा, त्याला कवठच म्हणतात पण ग्रामिण भागात सगळेच उच्चार बदलेले असतात ना. मीही त्याला कौठ असेच म्हणत आलेय. असेच म्हणण्याची जास्त सवय झालीय. कवठाची चटणीपण मस्त लागते.
|
Bhagya
| |
| Wednesday, April 11, 2007 - 11:45 pm: |
|
|
दिनेशदा, अत्यंत सुंदर लिखाण. अगदी संकलीत करुन ठेवावे असे. मला माहिती नसलेल्या बर्याच गोष्टी या लिखाणातून कळल्या. ह्या उलट्या जांभळाची गोष्ट मी वाचलीय. आणि मी नसताना वृक्ष सहल काढली तर.....मी आल्यावर पुन्हा एक काढावी लागेल. पण नलू, कवठ हे उलटे फ़ळ असल्याचे आजच कळले. आणि त्याच्या चटणी बद्दल तर एकमत. तिखट मिरच्या, गूळ, जीरे आणि मीठ टाकून वाटलेली चटणी एकदम फ़र्मास.
|
Bee
| |
| Thursday, April 12, 2007 - 6:13 am: |
|
|
अंगावर जर पित्त उठले असेल तर कवठ एकदम रामबाण उपाय आहे. अंगावर पित्ताच्या गुथा येतात.. त्या खूप खाजवितात. हैराण करून सोडतात.
|
Kashi
| |
| Thursday, April 12, 2007 - 7:06 am: |
|
|
बी जांभळ नही रे...करवंद मिळतात मुस्तफामधे.....
|
Paragkan
| |
| Thursday, April 12, 2007 - 2:55 pm: |
|
|
'राजवृक्ष' असा काही प्रकार असतो हे माहीतच नव्हतं आजवर. सर्व लेख नेहमी प्रमाणेच वाचनीय!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|