|
Jayavi
| |
| Friday, April 06, 2007 - 12:43 pm: |
|
|
माझ्या आईच्या घरी होतं रायआवळ्याचं झाड. इतके मस्त लागायचे ना!! दिनेश.....खूप खूप छान लिहितो आहेस.
|
Itsme
| |
| Saturday, April 07, 2007 - 4:46 am: |
|
|
माझ्या बघण्यात पण राय आवळे खोडाला नाही लागत, त्याचे घोस च्या घोस असतात पण खोडाला नाही बघीतले कधी.
|
Dineshvs
| |
| Saturday, April 07, 2007 - 5:52 am: |
|
|
Itsme अभिरुची मधे आपण ज्याचे लोणचे खाल्ले, तेच राय आवळे ना ? बाकिची बहुतेक फ़ळे कशी फ़ांद्याच्या टोकाना लागतात. हे मात्र उभ्या खोडाना आणि आडव्या फांद्यानाहि लागतात. आता तुम्हा सगळ्याना घेऊन, मी वृक्षओळख अशी एक सहल काढीन म्हणतोय.
|
दिनेश, माझ नाव आताच नोंदवुन ठेवा!
|
Tanya
| |
| Sunday, April 08, 2007 - 3:54 pm: |
|
|
दिनेशदा... आता माझा वेंधळेपणा म्हणा किंवा शहरात राहिल्यामुळे वृक्षवल्लींची नीट ओळख, माहिती नसल्यामुळे म्हणा, पण आम्ही इतके दिवस इथे सिंगापुरमध्ये 'कांचन' वृक्षाच्या पानांची, दसर्याला आपट्याची पाने समजुन पुजा करत होतो. माझ्या सासुबाईंनीदेखिल तुम्ही दिलेला माहितीपुर्वक लेख वाचला आणि आम्ही खो-खो हसयला लागलो, आमच्या अज्ञानावर! तुमचे लेख वाचुन मला तर वाटते की कोकणात आणि सिंगापुर येथे आढळणारी बरीचशी झाडे, त्यांची कुळं, जाती-प्रजाती, यात बरीचशी साम्यता आहे. खरतर इथे इथल्या govt. ने एवढ्या वृक्षांची छान देखभाल केलीय आणि त्यातील बर्यांच वृक्षसंपदेची माहिती मला तुमचे लेख वाचुन मिळते त्याबद्दल तुमचे मन:पुर्वक आभार!
|
Dineshvs
| |
| Sunday, April 08, 2007 - 5:32 pm: |
|
|
Tanya तसे बघायला गेलो तर कोकणातले आणि सिन्गापुरचे हवामान सारखेच आहे. त्यामुळे आपल्याकडची अनेक झाडे तिथे बघितली मी. अलिकडे काहि झाडांचा अतिरेक झाल्यामुळे, हि अस्सल देशी झाडेच दुर्मिळ झालीत. त्यांची सगळ्याना आठवण करुन देण्यासाठी हा खटाटोप करतोय. आणि दसर्याला कांचनाची पाने, मुंबईच्या बाजारात विकायलाच असतात. पानाच्या मोठ्या आकारामुळे देणार्या आणि घेणार्याला देखील, कसा घसघशीत दागिना दिल्याघेतल्यासारखे वाटते.
|
Upas
| |
| Sunday, April 08, 2007 - 6:16 pm: |
|
|
दिनेश खूप छान झालेत लेख सगळेच.. जामाचं झाड अगदी ठरल्यासार्खं मे महिन्याच्या सुट्टीत बहरतं.. शेकड्याने जाम येतात झाडाला.. आमच्या खिडकीतून समोरच एका जुन्या बंगल्यात अजून आहे हे झाड गिरगावात.. मस्त मजा येते खायला कोवळे तसेच तयार जाम.. पोपट सुद्धा बरेच येतात ह्या झाडांवर जाम खायला.. ते सगळं आठवून एकदम बालपण दे गा देवा आठवलं.. दिनेशदा, हे सगळं विषयवार एकत्रित करून लेखसंग्रह प्रकाशित करण्याचा विचर आहे का? खूप आवडेल..
|
Bee
| |
| Monday, April 09, 2007 - 2:21 am: |
|
|
दिनेश, कांचन म्हणजेच कचणार नाही का? इथे हा वृक्ष भारतापेक्षा अधिक बहरतो. अ.जनमधील गर्भरेशमी हिरवा रंग नीट दिसत नाही.. परत फोटो घेतलाच तर हा रंग जरूर यायला हवा
|
Kashi
| |
| Monday, April 09, 2007 - 3:40 am: |
|
|
Tanya kharach ga...mi pan kanchanchi pane..aptyachi mhanun dasryala watale hote..
|
Itsme
| |
| Monday, April 09, 2007 - 7:15 am: |
|
|
म्हणजे मी फ़क्त आडव्या फांद्यांना लगलेलेच बघितले आहेत आसे म्हणावे लागेल. एक mark मिळणार म्हणजे मला . नुसती वुक्ष ओळख नाही दिनेश, पक्षि ओळख पण जरुरी आहे. काल वसंतगडावर पहाटे फेरफटका मारतान इतके सुंदर - सुंदर पक्षी दीसले, पण बरेच 'नावाने' ओळखु नाही आले. आणि नेहमी प्रमाणेच 'दिनेश हवे होते' असे वाटले.
|
कचनार हे झाडाचे नाव हिन्दीत आहे असे दिसते. मन्ना डे आणि आशा भोसले यांचे एक ड्युएट आहे 'कच्ची कली कचनारकी, कैसे समझेगी बाते प्यारकी..' असे काहीसे ते गाणे आहे..
|
Dineshvs
| |
| Monday, April 09, 2007 - 4:04 pm: |
|
|
Itsme तूम्हाला जे ठसके लागतात ना, ते माझ्यामुळेच. रॉबीन, मी त्या गाण्याचा उल्लेख केलाय.
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:02 am: |
|
|
असे आहे का.. मला कांचन पेक्षा कचनार हे नाव अधिक आवडले. ह्या वृक्षाची गुलाबी जांभली फ़ुले मला खूप आवडतात...
|
दिनेश करवंद! लहानपणि गावाला गेल की सकाळी गुरांना पोचवायला सड्यावर जात असु. येताना मुद्दाम वाकडी वाट करुन घाटितुन खाली यायचो कारण त्या वाटेवर असलेल्या करवंदाच्या जाळ्या. सकाळीच ही करवंद थंड लागत.. एक आगळिच मजा यायची खाताना. मनुकेसारखी लागणारी करवंद मी खाल्ली आहेत. हिरव्या करवंदाचे लोणचे तर झकास!
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:16 am: |
|
|
विदर्भात करवंद विकायला येतात पण ते खूप आंबट असतात. एक दोन करवंद खाल्लीत की दात आंबतात. पिकलेली करवंद मी फ़क्त एकदाच खाल्लीत. फ़ुले तर प्रथमच बघत आहे. पुर्वी मी आलूबुखार म्हणजे प्लम फ़ळालाच पिकलेली करवंद म्हणून ओळखत होतो. करवंदाचे लोणचे मी मेसवर खाल्लेले आहे पण मला आपले पारंपारीक लोणचेच अधिक रुचकर लागते. दिनेश, खूप मजा येत आहे. झाडांची काही कमी नाही तेंव्हा आता तुम्ही लिहित रहा.. आम्ही वाचत राहू आणि वेळोवेळी अभिप्राय पोहचत राहू. इतर गडीही हेच म्हणत आहेत..
|
Bee
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:18 am: |
|
|
मामाचा वाडा करवंदी वगैरे गाणे आहे म्हणजे घरोघरी करवंद लावल्या जाते का.. सहज म्हणून ही ओळ आठवली मला..
|
Zakasrao
| |
| Tuesday, April 10, 2007 - 6:59 am: |
|
|
दिनेशदा तुमच्या सहलीत माझ नाव नोंदवुन ठेवा आताच परत हाउसफ़ुल व्हायला नको. मी आयुष्यात पहिल्यांदा करवंदाच्या फ़ुलाचा फ़ोटो पाहिलाय. मला माहित नव्हत की करवंदाना फ़ुल येतात ते कारण आम्हि परिक्षा झाल्यावरच जात होतो गावी. कच्ची कधी खाली नाहीत पण पिकलेले भरपुर खाल्लेत. गुर चरायला सोडुन बेभान होउन हा डोंगरचा मेवा खायचा आनंद वेगळाच. सोबत जांभळ आणि रायवळ आंबे. करवंद काढणे जास्त सोपे कारण हाताला येणार्या उंचीवर असतात. जांभळ काढण अवघड खुप उंच आणि सरळसोट झाड. अरेच्चा फ़क्त फ़ोटो बघुन मी तर लिहितच सुटलोय. असो दा करवंदांचा फ़ोटो हवाच. शिवाय जांभळे आंबे हवेत. नवीन माहिती मस्त मिळतीय. येवु दे अजुन. ता. क. मी जिथे आता राहतोय तिथे हिरवी जांभळे आणि कैर्या दिसत आहेत. कोणाला यायच आहे का खायला? स्वत: काढाव लागेल मात्र. भरपुर पक्षी आहेत पण कावळे, साळुंक्या सोडुन दुसरे ओळखत नाही मी त्याना.
|
बी, मामाचा वाडा चिरेबंदी रे. करवंदी असायला मामाला जाळीत रहावं लागेक करवंदाच्या!
|
Giriraj
| |
| Tuesday, April 10, 2007 - 11:33 am: |
|
|
कित्ति रे हुश्शार तू बी!! कसं काय बरं सुचतं तुला इतकं इन्श्टंट?? तुझ्या पायांचा फोटो पाठवून दे पाहू झकाश्या,कुठे राहतोस रे? आणि समोर न येता लांबूनच या म्हणतोस म्हणजे तू लिम्ब्याचा एखादा भावबंद तर नाही ना??
|
Supermom
| |
| Tuesday, April 10, 2007 - 2:42 pm: |
|
|
दिनेश, नेहेमीसारखेच सुन्दर फोटो. करवंदांच्या नावाबरोबर लहानपणीच्या सार्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या मावशीकडे हे झाड होते. कोवळ्या हिरव्यागार करवंदाची गूळ, मीठ, मिरच्या व खोबरे घालून सुरेख चटणी आई करीत असे.मला ही करवंदे फ़ार आवडतात. आता मोठ्या जाऊबाई सासरी ही आवड जपतात. सध्या त्या बर्याच आजारी आहेत. तर मागच्या वेळी मी भारतात गेले तेव्हा मोठ्या दिरांनी खास मला आवडते म्हणून बाकी अनेक गोष्टींबरोबर ही चटणी स्वत करून ठेवली होती. अगदी भरून आले तेव्हा. अन गुलाबी,लालसर करवंदांची पण एक जात आमच्या विदर्भात नेहेमी सीझनमधे विकायला येते. बायका यांचे गजरे(फ़ुलांचे नव्हे) लाल करवंदांचे गजरे केसात माळतात. या रंगीत करवंदांचा गुळांबा या दिवसांत आवर्जून करतात. पानात फ़ारच खुलून दिसतो हा रंग.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|