|
Supermom
| |
| Monday, April 02, 2007 - 12:05 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
बी, अरे मी २००३ मधे होते सिंगापूरला. मला या देशाच्या खूप गोष्टी आवडल्या. त्याचं चिमुकलेपण, कायदा आणि सुव्यवस्था, सुरक्षितता, तिथले मार्केट्स जरी लहान असले तरी सगळ्या वस्तू तिथे मिळतात. याशिवाय आपले खायचे सगळे पदार्थ तिथे अगदी सहज मिळतात हे पण फ़ारच छान आहे. सिंगापूर बर्याच लोकांनी बघितलय म्हणा पण मला माझ्या नजरेतून जे दिसलं त्यावर काहीतरी लिहायची इच्छा होतेय आता. दिनेश, आलं, मिरची याचं आईस्क्रीम? पुढच्या वेळी आलो की जरूर ट्राय करू. बी, तशीही मी म्हणजे अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे.
|
Bhagya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 2:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, गिरि आपल्या GTG चा वृतांत टाकलाय.... वाचा आणि बाकिच्यांना पण दाखवा. /hitguj/messages/34/124353.html
|
Kashi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 5:12 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
kay sundar pink ranga aahe...!!!!!! Dineshji tumhala khup dhanyawad..sundar photo ani mahiti baddal...
|
Bhagya
| |
| Wednesday, April 04, 2007 - 11:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, हा पांढरा जाम माहित आहे, कारण मुंबईत स्टेशन च्या बाहेर बायका विकायला घेऊन बसतात. पण मला त्याची चव फ़ारशी लागली नाही, कारण तू म्हणतोस तसा तो लवकर काढलेला असावा. पाणी मात्र भरपूर होते. आणि ही गुलाबी जामची फ़ुले फ़ारच सुंदर दिसतायत. आणि हे झालं की एक लेखमाला (वेळ झाल्यास) food spots in Munmbai ह्या थीमवर करणार का? जसे रुस्तम चे आईस्क्रीम, विठ्ठल भेळवाला, श्रीकृष्ण बटाटवडा अशी? म्हणजे लोकांना कुठे काय खायचे ते कळेल, कारण आतापर्यंत मला आले मिरचिच्या स्वादाचे आईस्क्रीम मिळते हेच माहित नव्हते.
|
Bee
| |
| Thursday, April 05, 2007 - 2:05 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
मला वाटतं हा फ़िकट पोपटी जाम सिंगापोरमधेही मिळतो. पण तो इथे आकारानी मोठा असतो आणि त्याचा रंग सफ़रचंदासारखा असतो. पण पुर्ण लाल कधीच नसतो. अजून एक वाटतं की मुंबईला ज्या घारापुरच्या लेण्या आहेत तिथे पण खडकावर बसून काही आयाबाया जाम विकतात. मला खूपदा हा आवळ्याचाच एक प्रकार वाटला. त्याची चव पण थोडी आंबटसर असते. मी जे फ़ळ म्हणतो आहे ते हेच की तो आवळ्याचा न्यारा प्रकार आहे नक्की माहिती नाही. दिनेश, ह्यावेळी तुमच्या लिखाणाला छायाचित्रांनी देखील उत्तम साथ दिली आहे.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 3:31 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
भाग्य, डहाणु, घोलवड परिसरात याची झाडे आहेत. त्या लाईनवर हि फळे भरपुर. तुझी फ़ूड जॉईंट्सची कल्पना चांगली आहे. नक्कीच विचार करेन. पण आपल्या वेळचे किती शिल्लक आहे कुणास ठाऊक ? मी लिहिलेय ती आगळीवेगळी आईसक्रीम्स ठाण्याला राममारुती रोडवर मिळतात. बी, ते आवळेच असणार.
|
आपल्या वेळचे किती शिल्लक आहे कुणास ठाऊक ? बास काय दिनेशदा??? आणि त्यावेळचे वाचुन तर आणखी मजा येईल. कदाचित खंतही वाटेल
|
Farend
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पूर्वी खंडाळा घाटात सुद्धा ही जाम फळे मिळायची.
|
Zakasrao
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:58 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
सुन्दर फ़ोटो. त्यासोबत सुन्दर वर्णन. मी ही फ़ळे पाहिली आहेत अस आठवत नाही.
|
Tanya
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:24 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा... इथे जाम मिळतात ते फिक्कट गुलाबी रंगाचे असतात,पण त्यांची चव आपल्याइथे मिळण्यार्या जामएवढी चांगली नसते. तुम्ही ठाण्यातल temptation ice creme parlour बद्दल लिहिलत का? तेच असेल तर त्यांच शहाळ्याच आणि जांभळांच ice creme देखिल छान लागत. मुरडशेंग हल्ली बाळगुटीमुळे चांगलीच परिचयाची आहे, पण त्यांच संस्कृत नाव अजिबात ठाऊक नव्हत. तुम्ही फोटोदेखिल किती सुरेख काढता.
|
Psg
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:56 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश डीटेल महिती, सुरेख छायाचित्र! वाचनिय आहे ही लेखमाला
|
temptation ice creme parlour >> मस्त आहे हे पार्लर. कधी सुजाताच्या मस्तानी ची आठवन झाली की ठान्याच्या वास्तवात मी या पार्लर मध्ये जायचो. तान्या त्यांना हेच पार्लर म्हणायचे असेल कारण राममारोती वर चे पार्लर असे त्यांनी लिहीलेय. शहाळ्याच आईस्क्रीम तर नाही पण त्या चविच्या जवळपास जानार ३१ चे (बस्कीन रॉबीन्स) Nutty coconut पण आहे. (मला फारसे आवडले नाही पण).
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 4:53 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
Tanya आणि केदार तेच दुकान, म्हणायचे होते मला.
|
Runi
| |
| Thursday, April 05, 2007 - 5:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा, आमच्या ज्ञानात चांगली भर पडतेय. खुपच सुंदर महिती लिहीत आहात तुम्ही. हे जाम नावाचे फळ रायआवळा नावाने पण ओळखले जाते का? मी लहान असतांना आमच्या घरी याचे झाड होते आणि आम्ही त्याला रायआवळे म्हणायचो, ते झाड पपई च्या झाडासारखे सरळ्सोट होते. तुम्ही जसे जाम चे वर्णन केलय (चव, रंग आणि आकार) तेच याला पण लागु पडते. माझ्या आईची एक मैत्रिण कोकणातली होती, तिने आम्हाला याचे रोप कोकणातुन आणुन दिले होते. बाकी अशी वेगवेगळ्या चवीची ice creams असतात हे मला इथे वाचुनच कळले, पुढच्या वेळी भारतात गेल्यावर नक्की खायला हवेत हे सगळे फ़्लेवर्स. रुनि
|
Ksmita
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:21 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश अतिशय उत्तम लेखमाला खूप खूप धन्यवाद लहानपणी कोकणात मे महिन्याच्या सुट्टीतल्या आठवणी ताजा झाल्या दिवसभर हुंदडताना अशी बरीच झाडे फ़ुले बघण्यात आली होती. हापूस आंब्यामुळे जरा जांबांकडे दुर्लक्ष व्हायचे पण परतीच्या प्रवासात भरपूर जांब घ्यायचो... तहानलाडू म्हणून छान उपयोग व्हायचा
|
Shonoo
| |
| Thursday, April 05, 2007 - 6:23 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश हे सगळं विकिपेडिआ मधे पण द्यायला हवं. इतकं अभ्यासपूर्ण आणि नेटकं लिहिताय ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचेल. विशलिस्ट घेत असाल तर बाहवा, पेल्टोफ़ोरम, जॅकरांडा, बकुळ, ग्लिरिसिडिआ, सुरंगी, गोव्यातच दिसणारे गुलाबी शंकासूर माझ्या नावाखाली नोंदवून ठेवा.
|
Dineshvs
| |
| Friday, April 06, 2007 - 4:01 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रुनि राय आवळे वेगळे. ते खोडालाच लागतात. हे जाम फांद्याना लागतात. स्मिता हो तहानलाडुच म्हणायला हवे याना. आणि, शोनू, जरुर लिहिन, फक्त फोटो मिळवायचे आहेत. ( मी स्वतः काढलेले फोटो, हि माझीच मी घालुन घेतलेली अट आहे ना. )
|
Dhumketu
| |
| Friday, April 06, 2007 - 4:34 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
रायआवळे म्हणजे छोटे आवळे ना? ते खोडाला कुठे लागतात?
|
Dineshvs
| |
| Friday, April 06, 2007 - 5:11 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो धुमकेतु, राय आवळे म्हणजे छोटेच आवळे. च्यवनप्राश वाले ते डोंगरी आवळे. छोटे आवळे, बिमलि, छोटी करमळे हे सगळे भाईबंद. आणि ते खोडालाच घोसानी लागतात. आणतोय सगळ्याना भेटीला. आपट्यासारखीच पाने असलेली एक भाजी असते कोरल, नावाची. हि पावसाळ्याच्या सुरवातीलाच मिळते. या भाजीची जुडी वैगरे नसते. फ़ुलपुडीप्रमाणे याची पाने, पानात बांधुन मिळतात. चवदार लागते ही भाजी. मुंबईत दादर, बोरिवली, डोंबिवली ईथे मिळते.
|
कोरलची भाजी खाल्लीये. मस्त लागते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|