Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through April 02, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through April 02, 2007 « Previous Next »

Paragkan
Wednesday, March 28, 2007 - 3:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! नवी लेखमाला .. फळांची .. छानच!

Robeenhood
Wednesday, March 28, 2007 - 3:43 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,
तू मलकापूरच्या प्रवासात कोल्हापूरहून मलकापुरला जाताना डाव्या बाजूला ज्योतिबाचा डोंगर आहे असे म्हटले आहे. मला जो दाखविण्यात आला तो उजव्या बाजूला होता असे वाटते. अर्थात मी एकदाच गेलो आहे. पण डाव्या बाजूला नदी असल्याने डोंगराचा प्रश्न येत नाही असे वाटते...

बाकी मलकापूर आणि तिथले वातावरण स्वप्नवतच खूपच लव्हेबल!!
तुझे नातेवाईकही देवमाणसे अन तुझे लिखाणही फारच चित्रदर्शी...

माझ्याभोवतालची किडकी माणसे पहातो तेव्हा मला असे वाटते अशी माणसे असू शकतात? कदाचित समृद्धीचा परिणाम असू शकेल....


Dineshvs
Wednesday, March 28, 2007 - 5:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, सगळ्यांच्या मदतीनेच तर हा संकल्प पुर्ण करायचा आहे.
पराग, नुसती फळे नाहीत. एकंदरच झाडाबद्दल लिहायचे आहे. सगळ्यांकडुन माहितीची भर पडली, तर हवीच आहे.
रॉबीन, उजव्या हातालाच ज्योतिबा. गोव्याहुन कोल्हापुरला जाताना तो डाव्या बाजुला दिसतो.
अगदी वरपर्यंत गाडी जाते. छान आहे परिसर.


Bhagya
Wednesday, March 28, 2007 - 11:32 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! हा तर अगदि आवडीचा विषय.
दिनेशदा, वेळ मिळाला तर mangosteen, rambuten आणि अशा थाई फ़ळांवर पण लिहि ना. कारण ही फ़ळे म्हणजे एक मेजवानीच आहे. मी बघितलीत फ़क्त, खाल्ली नाहीत अजून.

आणि निसर्गातून माणूस प्रेरणा घेतो हे तर खरच आहे....
बार्सिलोनाचा architect Antony Gaudy याने मानवी हाडांपासुन आणि खडकाळ, रुक्ष डोंगरांपासुन प्रेरणा घेऊन design केलेल्या इमारती जगप्रसिद्ध आहेत.

ही लिंक बघण्यासारखी आहे...
http://www.greatbuildings.com/architects/Antonio_Gaudi.html

Bee
Thursday, March 29, 2007 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, फ़णसाचा भाऊ, दुरियान आहे ना.. इथे त्याला फ़ळांचा राजा म्हंटले जाते. पण वास भयंकर आहे. फ़्रीजमधे दुरियान ठेवले असता इतर वस्तुंनाही दुरियानचा वास लागतो. असे म्हणतात it smells like hell, and tastes like heaven! मला आपला हापूसच राजा वाटतो.

भाग्य, ही फ़ळं मी चाखली आहे. कारण इथे मलेसिया, थाईलंड भागातून ही फ़ळं येतात. पण दिनेशसारखी माहिती मला कुठे आहे..


Dineshvs
Thursday, March 29, 2007 - 7:27 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, मला वाटले, तु त्याच्या चवीबद्दल लिहिशील. सिंगापुरमधे दुरियानची झाडे आहेत.

Tanya
Thursday, March 29, 2007 - 9:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा.... खुप दिवसांनी इथे आले, आणि interesting लेख वाचायला मिळाले. as usual मस्तच!
तुमच्या विविधरंगी लिखाणाने शब्दश: तुमचा बीबी रंगेबिरंगी केलात, आणि आम्हांला सातत्याने नविन, माहितीपुर्वक लेखांची मेजवानी मिळत आहे, त्याबद्दल मन:पुर्वक धन्यवाद!


Bee
Thursday, March 29, 2007 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सिंगापोरमधे दुरियानची झाडे फ़ारशी दिसत नाहीत कारण इथे जागेचा प्रश्न आहे पण ह्या फ़ळासाठी इथले हवामान पोषक आहे. आमचा शेजारी असलेल्या मलेशियात दुरियन विपुल प्रमाणात पिकतो. सुरवातीला मी फ़णस म्हणून एक दुरियान विकत आणला मग इथल्या train station मधे जेंव्हा clock in करुन शिरलो तेंव्हा मला अडवन्यात आले की तुम्ही दुरियान घेऊन आत जाऊ शकत नाही. ह्यावरुनच काय ते ओळखावे की दुरियानचा वास किती भयंकर असतो. म्हणजे खूप उग्र असतो.

हे फ़ळ मधुर असते, चवीला पिकलेल्या आंब्यासारखे गोड. मात्र चव घेताना जो वास येतो तो ही चव मारुन टाकतो. आता नाक दाबून तर कुणी चव घेणार नाही ना :-)

इथे दुरियानची मागणी छान आहे. लोक हौसेनी विकत घेतात. मला वाटते, ही चव इथल्याच लोकांना अधिक छान लागते. दुरियनची गरे बर्‍याच ठिकाणी विकत मिळतात.


Mrinmayee
Thursday, March 29, 2007 - 6:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, लेख फार फार आवडले. खूप छान माहिती देताय. (आम्ही नावालाच बॉटनी शिकलो असं वाटायला लागलं! )
कधी सर्पगंधा (Rauvolfia serpentina) बद्दल लिहिता आलं तर बघाल का? वेबवर शोधलं तर काय सगळ्याच गोष्टींची माहिती मिळते आजकाल. पण इथे वाचण्यात जी खरी मजा आहे ती तिथे नाही.


Dineshvs
Thursday, March 29, 2007 - 6:40 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Mrinmayee आता मला एखाद्या झाडाचे शास्त्रीय नाव नाही सापडले, तर हक्काने विचारणार बरं का !!

Bhramar_vihar
Friday, March 30, 2007 - 5:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, खरच छान उपक्रम सुरु केलात. धन्यवाद! फणसात तुम्ही पाव असा उल्लेख केलात. आमच्याकडे कोकणात त्याला माव म्हणतात!

Bee
Friday, March 30, 2007 - 9:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मुरुडशेंगेचे फ़ुल इतके सुंदर असेल नावावरुन तरी वाटले नाही कधी. त्यावरची माहितीही छान आहे. दिनेश, तुम्ही वर्तमानपत्रात लिहायला सुरवात करा खरचं.. इतक्या नियमितपणे चांगले लिहू शकणारी व्यक्ती क्वचित मी पाहिली असेल.

Swa_26
Friday, March 30, 2007 - 10:57 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, खरंच खूप छान लिहिताय तुम्ही...

पण मला एक कळत नाहीय, तुम्हाला हा सगळा वेळ कुठुन मिळतो?? तुम्ही ज़ॉब कधी करता?? रेसिपीज कधी शोधता? हे सगळे लिहिता कधी आणि त्याहिपेक्षा हे सगळे शोधता कधी?

तुम्हाला खरेतर super दिनेशदा म्हणायला हवे :-)

त्यामानाने आम्ही म्हणजे खुपच आळशी... बघा ना आता गावी फिरताना बरीच अशी सुंदर झाडे, फुले मीही पाहीलीत, पण तुमच्यासारखी सौंदर्यदृष्टि आणि माहिती करुन घेण्याची ओढ नव्हती कधी वाटली. (आता मात्र ती उत्सुकता खरोखर सगळीकडे पाठलाग करणार हे नक्की)


Mrinmayee
Friday, March 30, 2007 - 12:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, कधीही मदतीला तयार आहे. पण Taxonomy च्या परिक्षेत कसा अभ्यास केला हे आता आठवावसं पण वाटंत नाही. :-)
भारतात Bombay presidency, Calcutta Presidency, Madras Presidency असे भले थोरले ग्रंथ आहेत सगळ्या हर्बेरियम मधे गोळा केलेल्या झाडांच्या वर्गवार माहीतीचे. काही नवीन वनस्पती नसतीलही त्यात. पण बर्‍यापैकी अपडेट होत असतो त्यातला डेटा.


Dineshvs
Friday, March 30, 2007 - 7:10 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

स्वाती, आवडत्या विषयात शिक्षण घेणे जमले नाही, निदान लिहिणे तरी जमतेय का ते बघतो.
समोर पाने गळुन गेलेले एखादे झाड दिसल्यावर
शुष्को वृक्षः तिष्ठत्यग्रे |

असेहि म्हणता येते, किंवा

नीरस तरुरिह विलसति पुरतः |

असेहि म्हणता येते. काय म्हणायचे, ते आपण ठरवायचे.


Bee
Monday, April 02, 2007 - 2:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश माहिती आणि फोटो दोन्ही सुंदर! कौशीची फ़ुले आशा भोसलेंना खूप आवडतात असे तुम्हीच नाही का मागे एकदा बोलला होतात... मला काहीतरी अस्पष्टसे आठवते ह्या विषयाबद्दल की आपण चर्चा केली होती..

Supermom
Monday, April 02, 2007 - 3:08 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, बर्‍याच दिवसांनी इकडे आले. सुरेख फोटो आणि माहिती.

बी, दुरियानचा वास तुला का नाही आवडला? मला तर सिंगापूरला असताना सिम लिम स्क़्वेअर च्या मागे जे ओपन मार्केट आहे तिथला तो वास खूप आवडत असे. दुरियन खायचे राहूनच गेले पण वास अगदी खूप पिकलेल्या फ़णसासारखा वाटत असे. लोक दुरियन खायला आवडीने बसले असत. एखादा छोटासाच फ़णस कापला अन त्यात जर एकच मोठ्ठा गरा असला( गरे चे एकवचन कळले नाही मला) तर जसे दिसेल, तसे काहीसे ते फ़ळ आतून दिसत असे.

असेच सिंगापूरला असताना खाल्लेले मक्याचे, राजम्याचे आईस्क्रीमही खूप स्मरणात राहिलेय. आधी ती कल्पना कशीतरीच वाटली होती पण तिथल्या घामट हवेत ते थंड, पिठूळ आईस्क्रीम खाणे नंतर आवडू लागले होते.

अन एकदा खूप तहान लागली होती म्हणून एका दुकानात शुगरकेन ज्यूसची पाटी पाहून घाईघाईने विकत घेतलेला ज्यूस म्हणजे चक्क साखरेचे पाणी निघाले होते.

सॉरी दिनेश. विषयांतर झाले. पण दुरियान वाचून सिंगापूरच्या- मला अत्यंत आवडलेल्या देशाच्या आठवणी जाग्या झाल्या.


Dineshvs
Monday, April 02, 2007 - 3:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, बरोबर मी आशा भोसलेच्या व्यक्तीमत्वाशी कौशीची तुलना केली होती. आपले तोंड घट्ट बंद करुन, जगाला आनंद देण्याचे व्रत दोघीनी घेतले आहे ना, म्हणुन.

सुपरमॉम, मला अशी अवांतर माहिती हवीच आहे. त्याशिवाय माझे लेखन अपुर्ण राहिल. मी देखील सिंगापुर आणि बॅंकॉक ला ते दुरियान बघितले. पण खाण्याचे धाडस झाले नाही, कारण अपप्रचार आधीच कानावर पडला होता.
दुरियानमधे तीन ते पाच उभे कप्पे असतात. प्रत्येक कप्प्यात दोन ते तीन गरे असतात. त्यातहि अनेक उपजाती आहेत.

आणि पुढच्यावेळी मुंबईत आलात कि, ठाण्याला मिळणारी, आले, लिंबु, मिरची, फ़णस, जांभुळ या स्वादांची आईसक्रीम्स खायला विसरु नका.


Bee
Monday, April 02, 2007 - 4:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कधी आली होतीस? भेटायचे नाही का मग? पुढल्या वेळी आलीस तर अवश्य भेट हो..

फिनाईलचा वास कसा खूप लोकांना आवडत नाही कारण तो नाकात जातो इतका उग्र असतो.. पण काहींना फ़िनाईलचा वास खूप आवडतो म्हणे. तसेच ह्या दुरियानचे आहे. बहुतेकांना आवडत नाही. म्हणजे सुमॉ तू अपवाद झालीस :-)


Giriraj
Monday, April 02, 2007 - 6:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला घाणेरीचा गंध खूप आवडतो आणि त्याला 'घाणेरी' का म्हणतात ते कळतच नाही :-)

बी,तू कोणते फ़िनाईल वापरतोस त्याव्र ते अवलंबून असते रे.. विविध फ़ूलांच्या सुगंधाचीही फ़िनाईल मिळतात बरं आमच्या भारतात! :-)आता आलास की दोन चार बाटल्या घेऊन जा...


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators