Dineshvs
| |
| Thursday, March 08, 2007 - 4:37 pm: |
| 
|
त्या जादुगाराचे मात्र कौतुकच आहे. त्याचा हा फोटो. तितकासा स्पष्ट नाही. पण बिचारा अगदीच साधासुधा होता.

|
Badbadi
| |
| Friday, March 09, 2007 - 4:16 am: |
| 
|
दिनेश, ठीक आहे. मी विचारलं कारण आम्ही तिकडे गेलो होतो तेव्हा तिथल्या जादूगाराने सेम प्रयोग करून दाखवला होता!!!
|
Bee
| |
| Monday, March 12, 2007 - 1:31 am: |
| 
|
दिनेश, खूपच मधुर आहे हे गीत. खरे तर मला ती एक कविता वाटली नंतर गीत. तुमची त्याबद्दलची माहिती आता तो सिनेमा बघावाच असे म्हणते आहे.. धन्यवाद प्रिय मित्रा.
|
Bhagya
| |
| Tuesday, March 13, 2007 - 4:30 am: |
| 
|
जादूगाराच्या त्या आणि अजून एक्-दोन प्रयोगांचे मलाही कौतुक वाटले. त्याबद्दल आणि एकूणच त्या दिवशीच्या सगळ्या कार्यक्रमाबद्दल लिहिण्यासारखे बरेच आहे. पण उद्या-परवा नवीन जागेत शिफ़्ट व्हायचे आहे, म्हणून पुढच्या आठवड्यात लिहिणे होईल. दिनेशदा, बिया बघितल्यास का? त्यातल्या ऑस्ट्रेलियन फ़ुलझाडांच्या जरा युनिक आहेत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, March 13, 2007 - 6:20 pm: |
| 
|
भाग्य जरुर लिही. पण आम्हाला भेटुन तुला काय वाटले तेहि अवश्य लिही. बिया आणायला परवा जातोय. तु जी खटपट करुन त्या मागवल्यास ना, त्याबद्दल काय वाटते ते सांगायला शब्दच नाहीत माझ्याकडे.
|
Badbadi
| |
| Thursday, March 22, 2007 - 10:59 am: |
| 
|
दिनेश, सुंदर फोटो... माझ्या घरी दुसर्या रंगाची जास्वंद आहे आणि इथे ऑफिस मध्ये तर अनेक रंगाच्या आहेत.
|
Dhumketu
| |
| Thursday, March 22, 2007 - 12:01 pm: |
| 
|
मी आजवर "तुमची दाद आपला संवाद" हे "तुमची दारु आपला संवाद" असे वाचत होतो. आज ईथल्या लिंकवर क्लिक करताना मला कळाले.
|
Kashi
| |
| Thursday, March 22, 2007 - 2:46 pm: |
| 
|
dinesh photo khup chan aahet..!!
|
Bhagya
| |
| Friday, March 23, 2007 - 12:54 am: |
| 
|
वा! दिनेशदा, किती सुंदर जास्वंद आहे! याच्यासाठी पेंटींग शिकावं....
|
Jayavi
| |
| Friday, March 23, 2007 - 3:56 am: |
| 
|
अहा......... किती सुरेख फ़ोटो आहेत.. सकाळी सकाळी एकदम फ़्रेश वाटलं
|
Dineshvs
| |
| Friday, March 23, 2007 - 4:52 pm: |
| 
|
नुसते फोटो बघुन खुष कसले होताय. प्रत्यक्ष बघायला या की.
|
Sheshhnag
| |
| Saturday, March 24, 2007 - 5:53 pm: |
| 
|
नमस्कार दिनेश, तुमचे ओमन आणि केनया, नायजेरियाचे वर्णन वाचले. खूपच प्रवाही लेखन करता तुम्ही. मला दुबईत जॉब मिळण्याची शक्यता आहे. काही विशेष माहिती दुबईबद्दल देऊ शकता का? प्लिज.
|
Dineshvs
| |
| Sunday, March 25, 2007 - 4:42 pm: |
| 
|
शेषनाग, मला ईमेल करणार का ? नेमक्या प्रश्नाना, सविस्तर उत्तरे देऊ शकेन.
|
Bee
| |
| Monday, March 26, 2007 - 5:18 am: |
| 
|
छायाचित्र आणि वर्णन दोन्ही छान झाले आहे उत्तम! सोबत देशाची आठवण झाली आणि इथे जीव व्याकूळ होऊन गेला..
|
ईमेल पाठवला आहे. चेक करा. BTW तुम्ही ओमानप्रमाणे दुबईवरही लिहा ना. फार सुंदर प्रवासवर्णन करता तुम्ही.
|
Bee
| |
| Tuesday, March 27, 2007 - 1:39 am: |
| 
|
दिनेश, आता रोज पहाटे हे सर्व वाचायला मिळेल. वेगळी फ़ुले झाडे बघायला मिळतील. तुमच्या गोड मधुर शैलीत नविन माहिती मिळेल. मी अगदी हरखून गेलो आहे..
|
Giriraj
| |
| Tuesday, March 27, 2007 - 2:24 am: |
| 
|
'काजूच्या ' बी'यांबद्दल माहिती आहे रे.. उगीच काही गैरसमज करून घेऊन उत्साहाने वाचायला जाशील आणि म्हणशील की 'बी,बी' म्म्हणत मझ्याबद्दल एक अक्षरही लिहिलं नाही म्हणून
|
Jayavi
| |
| Tuesday, March 27, 2007 - 3:24 am: |
| 
|
अहा..... Interesting माहिती आहे!!! सगळं नव्यानंच कळतंय. दिनेश.... खूप छान लिहितो आहेस.... carry on! आम्ही वाचतोय.
|
Zakasrao
| |
| Tuesday, March 27, 2007 - 6:08 am: |
| 
|
दिनेशदा कोकणात भरपुर मिळणारी करवंदं जाम्भळं बिब्बे असेच काहितरि नाव असलेले एक फ़ळ ह्याविषयी लिहा. ज्याला बिब्बा घालणे म्हणतात तोच हा. पण ह्याच फ़ळ गोडसर असत. विकत मिळत पन्हाळा वै. ठिकाणी. तुम्ही पाहिले असतील मलकापुर बाजुला असतात. मला जायला आता वेळ मिळत नाही. मिळाला तरि दर्या खोर्यातुन भटकायला नसतो आता वेळ. त्यामुळे बरच मिस करतोय. गेला आठवडा झाल एकदम ताजा झाडावरुन काढलेला मध खुप मिस करतोय. १० वर्ष झाले असतील खाउन असा मध. फ़ोटो हवेतच शिवाय रसरशीत पिकलेल्या ला पिवळ्सर काजुचा एक फ़ोटो त्याच्या बीसहीत हवा. मला वाटतय बिब्बा काजुसारखाच पण छोटा असतो आणि त्याची बी (काळा बिब्बा)बाहेर असतो. आठवत नाहिये. तुम्ही कधी मसाइ च्या पठारावर गेलाय का? पान्डव लेणी पाहिलीत का? जर हो असेल तर त्यावर ही लिहा. हा सगळा भाग unexpolred आहे.
|
Zakasrao
| |
| Wednesday, March 28, 2007 - 6:56 am: |
| 
|
जियो दिनेशदा. कमाल केलीत. लेख वाचता वाचता फ़णसाचा वास नाकाला आला. ह्यावर्षी खाल्लाच पाहिजे.
|