Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through March 08, 2007

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through March 08, 2007 « Previous Next »

Robeenhood
Thursday, January 18, 2007 - 6:06 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

(तुम्हि खरोखरच वाचता आहात का कथा?)>>>
म्हणजे काय?
त्या कथेत सगळ्या खलनायकी पात्राना नगर जिल्ह्यातील आडनावे दिलीत. सासरकडच्या माणसांचा सूड उगविण्याची ही न्यारीच रीत म्हनायची...
(दिनेशच्या बी बी चा वापर केल्याबद्दल क्षमस्व!)


Bhagya
Friday, January 19, 2007 - 12:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलु, मी तुझ्या CDs आजच पोस्ट केल्यात. तुला त्या मिळतीलच. त्याबरोबर एक पत्र पण आहे, त्यात उशिराचा खुलासा पण केला आहे. आणि तुला मेल पण केली आहे ग. नक्कि उत्तर दे.
मी या वेळेला बरेच दिवस सुट्टीवर होते... आता परत जाते आहे सुट्टीवर पुढच्या आठवड्यात.

दिनेशदा, या 'आनंद ओवरीत' आलं की काही तरी सुंदर वाचायला मिळतंच. तुझ्या लहानपणाच्या आठवणी इतक्या छान आहेत.....


Dineshvs
Friday, January 19, 2007 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कथा पुर्ण झाल्याशिवाय ईथे पोस्टच करता येणार नाहीत.
आणि एखादेच छानसे लिहुन लेखनसन्यास लिहिणार्‍या मंडळीनी, महिन्या दोन महिन्यातुन, एकदातरी लिहिलेच पाहिजे,
असाहि नियम करायचा हट्ट, धरणार आहे मी, Admin कडे.


Zakasrao
Tuesday, January 23, 2007 - 11:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा
आताच तुमचे सर्व archieve वाचुन काढले. गुलमोहरवरचे तुमचे लिखाण वाचुन ठरवलेच होते कि तुमचे रंगबेरंगी वाचायचेच.
तुम्ही खुपच छान लिहिता. सर्व details तुमच्या इतक्या लक्षात कसे काय राहतात? असो.
मलकापुर वरचा लेख मस्त आहे. माझ्या मावशीचे गाव तिकडेच आहे. (पैजारवाडीपासुन वर पन्हाळ्याच्या दिशेने एक वाट जाते तेथे एक छोटे गाव आहे. मी माझ्या बर्‍याच उन्हाळ्यच्या सुट्ट्या तेथेच घालवल्या आहेत. तीकडे climate मस्त आहे. असच येवु दे.


Dineshvs
Tuesday, January 23, 2007 - 4:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, मायबोलि वर ईतके जण त्या भागातले मिळाले, कि आईचा ईतक्या दिवसांचा सल निघुन गेला.
ती हवा, अजुन तशीच आहे. अजुनहि तिचे हिलस्टेशन झालेले नाही.


Bhagya
Tuesday, January 23, 2007 - 10:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मलकापूरच्या आठवणी अप्रतीम..... अजून खूप वाचायला मिळेल याचा आनंद आहे.

Jayavi
Wednesday, February 14, 2007 - 4:59 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहा..... किती सुरेख! खरंच इतकं सुरेख चित्र 'तो'च काढू जाणे :-)

Ameyadeshpande
Friday, February 16, 2007 - 7:15 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, मलकापूरचं बालपण मस्त उतरलंय. डोळ्यासमोर उभं रहातं सगळं अगदी.

९वीत NCC मधे असताना १० दिवस shivaji trail trek camp च्या निमित्तानी पन्हाळा ते विशाळगड आणि परत पन्हाळा असा डोंगरवाटांतून पायी प्रवास केला होता. तेव्हा वाघबीळ हा पहिल्या दिवशीच पडाव होता. पुढे पांढरपाणी, गजापूर, विशाळगड असे टप्पे होते(त्यातच पावनखिंडही पाहीली होती. परतीच्या वाटेवरती एके दिवशी दुपारी मलकापूर लागलं होतं. दुपारच्या सुमारास तिथे पोचलो होतो. तिथेच मग एका शेतातल्या शेतपंपावरच्या पाण्यापाशी थांबून जेवणं केली होती.

मस्त लिहिलंय.


Limbutimbu
Monday, February 26, 2007 - 4:54 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>>> आपण खानदानी जादुगार असुन, करतोय ती केवळ हातचलाखी आहे, असे त्याने प्रारंभीच सांगितले होते.
हातचलाखी हे अस म्हणायलाच लागत नाहीतर "अन्धश्रद्धा निर्मुलन" किन्वा "जादुटोणा प्रतिबन्धक" कायद्यान्चा बडगा वापरला जातो! :-) (कायद्याची नेमकी नावे माहित नाहीत)
एकुण उदाहरणावरुन ज्यास जसे पेलेल, झेपेल तेवढे समजुन घ्यावे!:-)


Mahaguru
Monday, February 26, 2007 - 5:51 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, जादुगाराच्या करामती बऱ्याच वेळा पाहिल्या पण फार कमी वेळा त्यातली हातचलाखी ओळखु शकलो. असो, कलाकाराची कदर केल्याबद्दल अभिनंदन !

Chingutai
Monday, February 26, 2007 - 8:10 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

व्वा दिनेशदा
बर्याच दिवसानी वाचला तुमचा लेख........मस्त वाटल. पन्हाळ्याला जाताना हटकुन आठवण होइल:-)

-चिंगी


Maku
Monday, February 26, 2007 - 8:17 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हाय दिनेश दादा

मि तुमचे लिखाण एका दमात वाचुन काढाले. केनिया बद्दल तर चान्गलेच लिहिले आहे. पण माफ़ करा काही ठीकाणि मला ते रटाळ वाटले .
अजुन एक माझे म्हनने आहे की ईथे जुने लोकांना चान्गला अभिप्राय मिळतो. sorry तुमची जागा वापरल्याबद्दल.
नविन लोकांना Hi Hello पण करत नाही ईथे लोक.

चुकले असेल तर दिव घ्या.

माझे प्रामाणिक मत सान्गितले. नाहीतर सगळे माझ्या आंगावर येतिल ओरडायला .

Dineshvs
Monday, February 26, 2007 - 12:03 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार इशिका,
अभिप्राय असाच प्रामाणिक असायला हवा. माझे लिखाण थोडे सविस्तर असते हे मान्य, त्यामुळे ते जरा फुरसतीने वाचावे लागते एवढेच. तरिही नेमका कुठला भाग रटाळ वाटला, हे कळवले तर मी अवश्य सुधारणा करेन.

माझ्या लेखनाला मिळणारा प्रतिसाद हा लेखनाच्या दर्ज्यापेक्षा, माझ्यावरच्या प्रेमाखातर असतो, हे तर मी अनेकवेळा जाहिररित्या मान्य केलेय.
ईथे सातत्याने लिहुन विश्वास संपादन करावा लागतो. हळुहळु प्रत्यक्ष भेटीगाठी होतील, प्रायव्हेट ईमेल्स होतील, मगच थेट प्रतिसाद मिळतो.
नव्या सभासदांच्या स्वभावाचा अंदाज नसतो तर कधी, अस्तित्वाबद्दलच शंका असते, म्हणुन जपुन प्रतिक्रिया दिल्या जातात.
सातत्याने लिहिले, कि हा बुजरेपणा जातो.
आता मीच उत्तर दिल्याने, कुणीहि अंगावर ओरडणार नाही.


Mandard
Monday, February 26, 2007 - 1:00 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशजी एकदम बरोबर उत्तर दिलेत. मी पण तसा नविनच आहे. कोणी हाय हालो करत नाहीत लगेच पण मदत जरुर करतात. बाकी लक्षवेधासाठी व्ही आणि सी आहेच. असो.

दिनेशजी त्या जादुगाराचे नाव काय.


Zakasrao
Friday, March 02, 2007 - 6:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा आता हजार धावा पुर्ण करा बघू लवकर.
वाट बघतोय. बाकि जादुगरचा किस्सा छानच


Zakasrao
Monday, March 05, 2007 - 5:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अभिनन्दन दिनेशदा आज तुमच्या १००० post दाखवत आहे.

Dineshvs
Monday, March 05, 2007 - 7:01 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झकासराव, माझे मायबोलीकर या अभिनंदनाचे खरे हकदार आहेत, कारण या संख्येत त्यांचीहि पोस्ट्स मोजली जातात.

Swa_26
Thursday, March 08, 2007 - 10:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कालच तुमचा BB पुन्हा वाचुन काढला. अप्रतिम... हा एकच शब्द fit होउ शकतो ह्या सार्‍याला. आणि तो फोटो मननचा आहे का?
दिनेशदा... मला एक विचारायचे होते तुम्हाला... मी तुमचे हे सारे लेखन save करुन घेऊ शकते का??? म्हणजे मला ते माझ्या आईला दाखवता येईल... (घरी PC आहे पण नेट नाहीय..) if you don't mind ... तिला मी घरी गेल्यावर मी वाचलेले सांगत असते ना, त्यामुळे तिलापण उत्सुकता लागली आहे.

अजुन एक... तुम्ही डायरी लिहिता का? कारण मग एवढे सगळे तपशील लक्षात कसे राहतात?

सध्या तुम्ही आहात कुठे? मुंबईला कधी येणार? केव्हा आलात तर एक halt माझ्या घरी घ्यावा लागणार आहे... नक्की. आता माझ्याबरोबर माझ्या घरचे पण तुम्हाला ओळखु लागले आहेत.


Badbadi
Thursday, March 08, 2007 - 10:29 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तो जादूचा प्रयोग "चोखी ढाणी" मध्ये झाला का?

Dineshvs
Thursday, March 08, 2007 - 4:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नमस्कार स्वाती, आईच्या पसंतीला जर हे लेखन आले, तर ती माझ्यासाठी मोठी भाग्याची गोष्ट ठरेल. त्यांच्या काही सुचना असतील तरी जरुर लिही.
त्याना भेटायला मलाही आवडेल. ईमेल करतोच आहे.
मी डायरी वैगरे लिहित नाही. पण उत्तम स्मरणशक्तीची नैसर्गिक देणगी लाभलीय मला.
फोटो मननचाच आहे. त्याच्या आईनेच मला आणि त्याला रंगवले होते.
बडबडी, त्या रिसॉर्ट मधे व्यवस्थापन ईतके गचाळ होते, कि आम्हाला तत्वाचा लढा द्यावा लागला. झालेला अपमान आणि अन्याय सहनशक्तीच्या पलिकडचा होता. ( तिथे माझे वेगळेच रुप मित्रमैत्रीणीना बघायला मिळाले. ) म्हणुन जाणुनबुजुन त्या जागेचा उल्लेख केला नाही.
अगदी अपप्रचाराचीदेखील प्रसिद्धी द्यायची ईच्छा नाही.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators