Manya2804
| |
| Thursday, December 21, 2006 - 1:46 pm: |
| 
|
माझ्या team members नी या काव्यपंक्ती माझ्या कॅबीनच्या दारावर लावल्या होत्या... Books to the ceiling, Books to the sky, My pile of books is a mile high. How I love them! How I need them! I'll have a long beard till I read them.... - Arnold Lobel
|
शोनू, शिवाजी मंदिरला पण तळमजल्यात मॅजेस्टीकचे दुकान आहे. पार्ल्यातल्या पोस्टी मी आत्ता वाचल्या तेव्हा लक्षात आले.
|
Bee
| |
| Friday, March 02, 2007 - 4:26 pm: |
| 
|
मला आवडलेली पुस्तके मी संग्रही न ठेवता ग्रंथालयाला देऊन टाकली. थोडी जवळ आहेतच पण तरीही जी आधी संग्रही ठेवली होती ती ग्रंथालयाला देऊन टाकली. कारण एकतर परदेशात मराठी पुस्तके बाजारात मिळत नाही. दुसरे असे की मी खुद्द इथल्या मराठी ग्रंथालयाचा स्वयंसेवक आहे. तिसरे असे की ग्रंथालय नेहमी पुस्तके गोळा करते टाकून देत नाही. पण मला दिवाळी अंक कुणालाच द्यावेसे वाटत नाही. कारण त्यातील एक एक लेख मला फ़ावल्या वेळात परत परत वाचावेसे वाटतात.
|
Asami
| |
| Friday, March 02, 2007 - 4:37 pm: |
| 
|
कठीण प्रश्न आहे. बहुधा पोरीला वेड लावेन तोपर्यंत ( मराठी ) वाचण्याचे
|
Seema_
| |
| Friday, March 02, 2007 - 5:17 pm: |
| 
|
मी माझी पुस्तक कुणालाही देणार नाही . वाचायला देईन पण कायमची नक्कीच नाही . इथे मराठी पुस्तकांची free library सुरु करावी अस मनात आलेल मध्ये माझ्या . ( MM मध्ये काहीजण देतात ही पुस्तक library सारखी वाचायला अस मी ऐकलय ) पण नंतर माझ्या लक्षात आल कि तो उपद्व्याप करणही मला जमणार नाही . मैत्रिणी,बहिण वाचायला नेहमीच पुस्तक नेत असतात . कधी कधी तर परत पण देत नाहीत . थोडा वेळ वाईट वाटुन घेते . पण देण्याची सवय जात नाही . पण पुस्तक कुणालातरी कायमची देण्याची कल्पनाही मी करु शकत नाही . वाचायला हवी तर घेवुन जावीत . अगदी पान फ़ाटेपर्यंत वाचली लोकानी तरी चालेल . पुस्तकांऐवजी दागीने dresses , साड्या , यातल काहीही मागीतर तर चालेल मला . लगेच देवुन टाकेन . मी वर गेल्यावर त्यांच काय होईल हा मी विचार अजुन केलाच नाही . तिकडे अगदी रिकाम्या हाताने आणि मनाने जायचा माझा विचार आहे . आणि अजुन १०० वर्ष तरी तो योग नाही . माझी अभ्यासाची पुस्तक मात्र मी ताबडतोब परीक्षा झाल्याच्या दुसर्या दिवशी कुणालातरी ( फ़ुकट ) देवुन टाकते .
|
Shonoo
| |
| Friday, March 02, 2007 - 5:26 pm: |
| 
|
माझ्या मुलांना इंग्रजी वाचनाची आवड लागली तरी मी धन्य होईन. लेकीला सध्यातरी पुस्तकं वाचायला आवडतात. धाकटा बैलोबा आहे तो फक्त पानं उचकटून गब्बर सारखा हसत असतो :-( अजून तरी पुस्तक वाचून दाखवलेलं त्याला आवडत नाही. मराठी पुस्तकं माझी मुलं आवडीने वाचतील हे pipe dream आहे!
|
Karadkar
| |
| Friday, March 02, 2007 - 5:57 pm: |
| 
|
मी पुस्तकांचे काय करीन? खरोखर माहिती नाही. पप्पांनी गोळा केलेली पुस्तके माझ्याबरोबर घेऊन यायचा पण विचार चाललेला असताना माझ्या नंतर त्यांचे काय करायचे ठरवणे अवघड आहे. दागदागीने, साड्या पेक्षा माझ्या पुस्तकांची सोय लावताना मला वाईट वाटेल. कदाचित पाॅटरीचीही!!
|
Ajay
| |
| Friday, March 02, 2007 - 6:13 pm: |
| 
|
मायबोलीनं याबद्दल काही करणं शक्य आहे का? पुस्तकं देवाणघेवाणी साठी काही सोय करून दिली तर? पण पुस्तकं एकमेकाना पाठवण्याचा खर्च कसा निभावता येईल हा प्रश्न आहेच?
|
Sayonara
| |
| Friday, March 02, 2007 - 6:14 pm: |
| 
|
शोनू, प्रश्न विचारात टाकणारा आहे पण उत्तर माहित नाही आणि तुझ्याएवढा अजून स्टॉकही मी जमवलेला नाही.पण पुस्तकं वाचायला मात्र खूप आवडतं. अगदी जेवण करताना किचनमध्ये ओट्यावरही पुस्तक असतं. तुझी लायब्ररी मध्ये पुस्तकं देण्याची कल्पना छान आहे.
|
Ajay
| |
| Friday, March 02, 2007 - 6:28 pm: |
| 
|
किंवा आपल्याकडच्या वाचून झालेल्या मराठी पुस्तकांसाठी इथे प्रत्येकाने online garage sale ठेवला तर? प्रश्न त्यातून पैसे मिळवण्याचा नाही. पण तुम्हाला नको असलेले पुस्तक एखाद्याला खजीना वाटू शकेल आणि कमीत कमी ते त्याला पोस्टाने पाठवण्याचा खर्च निघू शकेल. दुसरे असे कि ज्याला खरोखरच आवड आहे तेच तो घेईल. म्हणजे ते चांगल्या घरात नांदायला जाते आहे याची खात्री असेल. फुकट मिळालेल्या गोष्टीची सगळ्यांनाच किंमत असते असे नाही. तुमच्या वैयक्तिक विभागात जर हे लिहिलेले योग्य वाटत नसेल तर मला माफ करा. पण नवीन पुस्तकं घ्यायची हौस काही फिटत नाही. आणि जुन्या पुस्तकांसाठी जागा नाही हा प्रश्न मला स्वत:लाही वारंवार पडतो. मी काही पुस्तकं इथल्या लायब्ररीलाही दिली आहेत. पण सगळ्याच लायब्रर्यांचे नेटवर्क सगळीकडे पोहोचत नाही (due to budget cuts etc) आणि न वापरली गेलेली पुस्तकं त्याही गराज सेल मधे लावतात हे मी अनुभवलेले आहे
|
Shonoo
| |
| Friday, March 02, 2007 - 7:46 pm: |
| 
|
मला स्वत:ला अजूनतरी एकही पुस्तक देऊन टाकवत नाही. आमचे नेने सर म्हणत असत there is no such thing as an ugly flower or plant ! वाचनाची आवड असणारे खरोखर कोणी असेल तर मी अनेकदा पुस्तकं स्वखर्चाने पाठवली आहेत आणि लोकांनी पण मला तशीच पाठवली आहेत. जपून वाचून, लवकर,सुस्थितीत परत करणे हे ही जिकिरीचंच काम आहे खरंय. पण मी करते आणि आज पर्यंत ज्यांनी माझी पुस्तकं मागवली अथवा नेली त्यांनीही ती (बव्हंशी) परत केलीयेत. पण माझ्या माघारी त्या पुस्तकांना कोणीतरी वाली असावा एवढ्यासाठी ह प्रपंच. लायब्ररीत देखील पुस्तकं धूळ खात पडतील आणि कधीतरी लायब्ररीतून ती सरळ कचर्याच्या ढिगावर जातील अशी भिती तर मलाही आहेच. इथे ज्यांनी ज्यांनी आपली मते मांडली त्याचं स्वागतच आहे. काही ना काही तोडगा चर्चेतूनच निघणार ना. online garage sale ची कल्पना आवडली. जर कोणाकडे अशी विकाउ मराठी ( किंवा इतर सुद्धा ) पुस्तकं असतील तर हितगुज वर जाहिरात टाकता येइल का? उगाच Dummies Guide to DOS 6 किंवा तत्सम पुस्तके लावू नयेत येवढी बारीकशी अट ठेवावी. वाजवी दरात ठेवल्यास गिर्हाइके नक्की मिळावीत.
|
Karadkar
| |
| Friday, March 02, 2007 - 7:48 pm: |
| 
|
अजय, गराज सेल ची कल्पना छान आहे. गूगल चेकाऊट, पेपाल सारखी सोय वापरुन थोडे सोयिस्कर होऊ शकेल.
|
काही वेळेला पुस्तक कुणी नेलेय हे पण आठवत नाही. नेणारा आणून देत नाही आणि आपल्याला आठवत नाही. कधी असे वाटते की आपण साठवून पण किती साठवणार? मोह वाईट.
|
Yogibear
| |
| Friday, March 02, 2007 - 8:12 pm: |
| 
|
वरिल सर्व वाचुन.... इथे बरीच मंडळी, पुस्तक library मधे देउन टाकतात, अर्थात technical/engineering वगैरे ची पुस्तक असतिल तर library सुद्धा फ़क़्त current use मधे असलेलिच पुस्तक घेतात. पण सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या सर्व libraries connected असतात ज्या मुळे तुम्हाला pittsburg मधे राहुन सुद्धा CA मधल्या library तले पुस्तक मिळू शकते.... असेच जर देशात सर्व Universities आणि Public/Private Libraries connect झाल्या तर काय मज्जा येइल....... when will this dream come true.... !!!
|
Karadkar
| |
| Friday, March 02, 2007 - 8:24 pm: |
| 
|
गजा मोह वाईट >> नानाची टांग 
|
Shonoo
| |
| Friday, March 02, 2007 - 8:43 pm: |
| 
|
कराडकर अगदी खरं बोललीस. पुस्तकात जीव अडकलेला असतो माझा. माझ्या घरी पुस्तकांच्या कपाटात एक लिस्ट असते कुठली पुस्तके कोणी नेली कुठल्या तारखेला नेली ती लिहून ठेवते. पण तरी काही पुस्तकं गहाळ होतातच.
|
Seema_
| |
| Friday, March 02, 2007 - 9:07 pm: |
| 
|
कल्पना मस्त आहे garage sale ची . आणखी एक करता येईल म्हणजे पुस्तक देवाण घेवाण चा एक group तयार करायचा . qualification म्हणजे min ५ तरी मराठी पुस्तक असावीत तुमच्याकडे . प्रत्येकान आपल्याकडे असलेली पुस्तकांची यादी लिहावी . आणि साधारण ३ / ४ week साठी exchange करावीत .
|
Lalu
| |
| Friday, March 02, 2007 - 9:23 pm: |
| 
|
शोनू, गराज सेलची आयडिया चांगली आहे. पुस्तक नुसते वाचायला हवे असेल तरी पाठवता येईल. खरं म्हणजे ओळखीच्या मायबोलीकरांमधे तशी पुस्तकांची देवाण घेवाण चालू असतेच, पण त्यात मायबोलीचा थेट संबंध नाही इतकेच. ढापू नका रे! ~D
|
Bee
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:19 am: |
| 
|
शोनू, तुझ्याकडे ७० ते ८० च्या काळातील मौज दिवाळी अंक असतील तर खास बी साठी जपून ठेव. पण मी ते अंक परत करणार नाहीये हे आत्ताच लक्षात घे अमेरिकेतल्या अमेरिकेत पुस्तकांची देवाणघेवाण करणे चांगली सोय आहे खरच. मागे अनुदोननी शोनूला पुस्तके पाठवली होती. शोनू, पुस्तके परत केलीस की नाही मग :-)
|
Dineshvs
| |
| Saturday, March 03, 2007 - 3:32 am: |
| 
|
शोनू, लोकसत्ताच्या पुरवणीत नेहमी अशी पत्रे असतात. ज्याना आपला संग्रह कुणालातरी द्यायचा असतो, अशी माणसे तिथे लिहित असतात. मला असे एखादे पत्र आढळले, तर लक्ष ठेवीन.
|