|
Asami
| |
| Thursday, July 05, 2007 - 1:19 pm: |
| 
|
मेधा मागे तू books exchange बद्दल विचारले होतेस. हि घे थोडी अधिक माहिती
|
Bee
| |
| Monday, August 13, 2007 - 6:03 am: |
| 
|
बर एक सांग इरावती कर्वेंचं तू काय काय वाचलं आहेस?
|
Shonoo
| |
| Thursday, August 23, 2007 - 5:06 pm: |
| 
|
अगदी अलिकडे परिपूर्ती आणि बर्याच मागे, कॉलेजच्या उम्बरठ्यावर असताना युगांत वाचलंय. बाकी वाचायचा योग कधी येतो कोणास ठाउक? तू कोणती पुस्तकं वाचलीयेस?
|
Bee
| |
| Friday, August 24, 2007 - 4:39 am: |
| 
|
मला त्यांची खालील पुस्तके हवी आहेत. ती out of print असण्याची शक्यता अधिक आहे. मराठी लोकांची संस्कृती (१९५१), आमची संस्कृती (१९६०), हिंदूंची समाजरचना (१९६७), महाराष्ट्र: एक अभ्यास (१९७१), धर्म (१९७१), संस्कृती (१९७२), हिंदू समाज: एक अन्वयार्थ (१९७५) ही सगळी पुस्तक कुठे शोधावीत कळत नाही पण आस लागली आहे सारखी मिळवण्याची.. शिवाय डॉ. उषा कोटबागी ह्यांनी लिहिलेले त्यांच्यावरचे एक पुस्तक वाचायचे आहे. तुला भरपूर वेळ असेल तर त्यांचा तो आसामवरचा लेख उतरवून काढ ना इथे प्लीज युगांत मी दोनेक वेळा वाचले आहे. आता परत एकदा वाचावेसे वाटते आहे.
|
Bee
| |
| Monday, September 10, 2007 - 4:10 am: |
| 
|
शोनू, तू आचवलांची कुठली पुस्तके वाचलीस अद्याप?
|
Shonoo
| |
| Monday, September 10, 2007 - 11:51 am: |
| 
|
किमया वाचलंय फक्त, मायबोलीकर जय ने कॅनडा मधल्या त्याच्या युनिव्हर्सिटीच्या लायब्ररीतून पाठवलेलं. तेंव्हा कॉपी करून घ्यायचा कंटाळा केला होता :-(
|
Bee
| |
| Tuesday, September 11, 2007 - 7:10 am: |
| 
|
कोण जय.. पेशवा म्हणते आहेस का? मला त्यांची सर्व पुस्तके वाचायची आहेत. जसे की जास्वन्द, पत्र, अब्दुल गब्दुल, भिंत.. मला वाटतं पुढची २ नाटकं आहेत. आपुलकी मधे पुलंचा आणि सोयरे सकळ मधे सुनिताबाईंचा लेख आहे आचवलांवर. पण सर्वात छान लेख मौज २००१ की २०००, मधील दिलिप चित्रेंचा. लेख म्हणजे त्यांचे व्यक्तीचित्रण.. तू वाचलेत का हे लेख?
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|