|
Dineshvs
| |
| Wednesday, January 03, 2007 - 12:16 pm: |
|
|
बरोबर, माझ्या आजोळचे हे शेत. काजळी नाही, संध्याकाळच्या धुसर प्रकाशामुळे मागची झाडे तशी दिसताहेत. आज एक लावणी लिहिली ना, म्हणुन हा फोटो टाकला.
|
Nalini
| |
| Wednesday, January 03, 2007 - 6:44 pm: |
|
|
हे असे तुरे जर ऊसातुन निघाले तर त्याला काजळी पडणे असे म्हणतात. कारण तो ऊसच काळा पडतो. जर ऊस असा छोटा असेल तर मग कापून जनावरांना घातला जातो. आणि जर पुर्ण वाढलेला असेल तर ऊसाची तोड करताना, ऊस तोडीवाले तो ऊस बाजुला काढुन टाकतात.
|
Dineshvs
| |
| Thursday, January 04, 2007 - 2:01 am: |
|
|
नलिनी, परवा प्रवासात खुपदा सगळ्या वाफ्यातल्या उसालाच तुरे आलेले बघितले. ( नगरला आणि कोल्हापुर, बेळगावला देखील. ) म्हणजे हे सगळे पिक वाया गेले म्हणायचे का ? सगळ्याच उसाला तुरे येत नाहीत का ? गदीमांच्या लावणीत तर या तुर्याचे कौतुकच केलेय. आमच्याकडे उस आतुन लाल निघाला तर त्याला कोल्हा लागला, असे म्हणतात.
|
Shyamli
| |
| Thursday, January 04, 2007 - 1:21 pm: |
|
|
अभीनंदन दिनेशदा, लिहीत रहा असच सातत्यानी आम्ही वाट बघत असतो तुमच्या लिखाणाची मन:पुर्वक शुभेच्छा
|
Aashi
| |
| Thursday, January 04, 2007 - 11:42 pm: |
|
|
वा अगदी लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या, दिनेशदा! थोड्याफ़ार फ़रकाने अगदी अस्सच. फ़रक फ़क्त की आम्ही शेतात जायचो मामाच्या मदतीला. आबा हा शब्द तर किती वर्षानी उcचारला. पुढच्या भागाची वाट पहातोय. फारच छान चालु आहे तुमचे लिखाण
|
Mandard
| |
| Friday, January 05, 2007 - 5:15 am: |
|
|
कराड तालुका आहे जिल्हा नाही बाकी आपले सर्व लेख उत्तम परवाच ओमान हुन आलो मला
|
Dineshvs
| |
| Friday, January 05, 2007 - 8:30 am: |
|
|
आभार मंदार, चुक सुधारली आता. कर्हाडमधले मलकापुर अगदी हमरस्त्यावरच लागते.
|
Psg
| |
| Monday, January 08, 2007 - 6:35 am: |
|
|
आजोळच्या आठवणी मस्त लिहिल्या आहेत.. nostalgic वाटले..
|
Bee
| |
| Monday, January 08, 2007 - 6:57 am: |
|
|
दिनेश, मलकापुरच्या आठवणी मस्त लिहिल्या आहेत. पण मला वाटतं मलकापुर बुलढाणा जिल्यात येत नसून जळगाव जामोद मधे येतं. चु. भु. दे. घे. आत्ताच्या भारतभेटीत मी लोवर परेलला गेलो होतो. मला माहित नव्हतं लोवर परेल मधे इतका मराठीपणा आहे. वेगवेगळ्या चटण्यांची आणि लोणच्यांची एका ओळीने दुकाने लागलीत. भरपुर प्रकारच्या स्वादिष्ट चटण्या विकत घेतल्यात. तेंव्हा डोक्यात तुमचाच विचार आला की दिनेश ह्यांनी लोवर परेल बद्दल हे सर्व काही का नाही लिहिलं
|
Nalini
| |
| Monday, January 08, 2007 - 6:41 pm: |
|
|
दिनेशदादा, खुपच छान म्हणजे नेहमीप्रमाणेच वाचनीय. खुप आठवणी गर्दी करायल्या लागल्यात.. आंब्याच्या झाडांवर खेळलेल्या सुरपारंब्या, झाडावर चढुन खालेल्या चिंचा, विहिरीतुन शेंदलेले पाणी, अगदी गोटी आंबा सुद्धा डोळ्यासमोर ऊभा राहिला, नकळत जिभेवर चव सुद्धा! रोट बनवुन आणायला जायचे तेव्हा तर माझा नंबर लागून माझे रोट भट्टीतुन बाहेर येईपर्यंत मी बेकरीतच थांबायचे. माझ्या आईकडे धुणे धुवायला कधी असे लांब जावेच नाही लागले पण मामच्या घरी गेले की मामीसोबत जायला मजा यायची.
|
Prajaktad
| |
| Monday, January 08, 2007 - 8:21 pm: |
|
|
दिनेशदा ! तुमच्या लेखाने अनेक आठवणींचे मोहोळ उठले.बालपणिच्या अनेक सुंदर आठवणी जाग्या झाल्या.
|
Madhura
| |
| Monday, January 08, 2007 - 9:40 pm: |
|
|
वा! काय छान लिहिलेय आजोळचे वर्णन.
|
Bee
| |
| Tuesday, January 09, 2007 - 8:48 am: |
|
|
दिनेश, भुतकाळ रंगविन्यात तुमचा छान हातखंड निर्माण झाला आहे. मज्जा आली वाचून.
|
Jo_s
| |
| Tuesday, January 09, 2007 - 11:09 am: |
|
|
दिनेश नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन काही महीन्यांपुर्वी कोकण ट्रिप करुन परतताना मार्लेश्वरला गेलो आणि नकाशात देवरुख, साखरपा, मलकापूर असा रस्ता आहे त्याप्रमाणे पुण्याला यायला निघालो. घाट संपला आणि रस्ता चुकलो. मलकापूर काही येईचना. कसेबसे विचारत दगड गोट्याच्या कच्च्या रस्त्याने कोल्हापूर् हायवे पर्यंत आलो.
|
Bee
| |
| Thursday, January 11, 2007 - 4:54 am: |
|
|
दिनेश, पाण्यावरची रांगोळी खूप आवडली. मी तुम्हाला एक सांगायचे विसरलो की मुंबईहून ९ डिसेंबरला मी तुम्ही गेल्या वर्षी जे मला फ़ोन नंबर्स दिले होते तिथे फ़ोन केला मात्र कुण्या बाईने फ़ोन उचलून म्हणाली की हा चुकीचा नंबर आहे. गेल्या वर्षी भेट घडू शकली नव्हती म्हणून ह्यावर्षी वाटले भेटू पण फ़ोन लागला नाही तुम्हाला. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी अगदी पहाटे ७ लाच फ़ोन लावला.
|
Bee
| |
| Tuesday, January 16, 2007 - 3:16 am: |
|
|
दिनेशदा, प्लीज विदर्भात केलेल्या प्रवासाबद्दल वेळ काढुन लिहा ना काहीतरी. तुमचे अनुभव मला वाचावेसे वाटतात म्हणून एक विनंती करतो आहे..
|
दिनेशदा पाण्यावरची रांगोळी अप्रतीम आहे...आणि आजोळाच्या गप्पाही...!!! बी पहाट चार ला नाहितर ५ ला असते.. ६ आणि ७ हे सकाळी असतात.
|
लोपे, दिनेशला दाद देणे ही चांगलीच बाब आहे. पण तुझी विषामृत ही कथा पूर्ण करणे ही ही बाब चांगली आहे असे तुला वाटत नाही काय? थाम्ब मी आता admin कडे तुझी कागाळी करतो... बी ची पहाट कदाचित ६ वाजता होत असेल तर?
|
थाम्ब मी आता admin कडे तुझी कागाळी करतो... >>>. सगळ्या bb वर करुन झाली कागाळी आता admin च राहिले होते, करा करा.. .. (तुम्हि खरोखरच वाचता आहात का कथा?) आणि गुरुजी आपल्या शिष्याने सकाळी सहा नाही लिहिलेले सात लिहिले आहे..
|
Nalini
| |
| Thursday, January 18, 2007 - 5:42 pm: |
|
|
admin कडे कागाळी केल्याने लोपा ती कथा पूर्ण करणार आहे का? मग त्या कागाळीला माझे पण अनुमोदन. रॉबिनहूड, मी अजून तुमच्या मेलची वाट पहात आहे. लोपा, घे बरं आता मनावर, ती कथा पूर्ण करायचे.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|