|
Nalini
| |
| Saturday, December 02, 2006 - 11:20 am: |
|
|
हो दिनेशदादा, हिच ती. पण ती जेव्हा शेतात असते तेव्हा ती कमरेईतकी नाही वाढत. चारीला, ओढ्याला असते तेव्हा ती बरीच वाढलेली असते. हरळीसारखे हिलाही मरण नाही.
|
Dineshvs
| |
| Saturday, December 02, 2006 - 5:10 pm: |
|
|
मला खात्री नाही. पण एक असेच गवत असते. त्याचा दांडा त्रिकोणी असतो. त्याचा दांडा दोन्हीकडुन जरासा कापुन ओढला, तर त्याच्या त्रिकोणी आकारामुळे, एक फ़्रेमसारखा आकार होता. लहानपणचा एक खेळ. एकमेकांवर प्रेम असेल तरच हि फ़्रेम तयार होते, नाहितर तो दांडा तुटुन जातो. साधारण असेच, पण जरा उंच आणि गोल दांड्याचे एक गवत आफ़्रिकेत आढळते. त्याच्या टोकाला गोलाकार तुरे येतात. हाहि दांडा खुप लवचिक असतो. याचे अगदी पातळ काप काढुन वरुन वजनी ड्रम फ़िरवला तर कागदासारखा प्रकार तयार होतो. पहिला कागद तो हाच. प्राचीन इजिप्तमधे तो तयार करत असत. अजुनहि गल्फ देशांत अश्या तयार केलेल्या कागदावार काढलेली चित्रे मिळतात.
|
Savani
| |
| Saturday, December 02, 2006 - 7:43 pm: |
|
|
ह्या लव्हाळी वर एक म्हण आहे न काहीतरी.. महापुरे वृक्षे जाती.. मला आठवत नाहीये पुढचं दिनेशदा तुम्हाला आठवत असेल.
|
Hems
| |
| Saturday, December 02, 2006 - 8:17 pm: |
|
|
अरे , क्या बात है दिनेशदा !! तुम्ही फ़ारसी लिपीची ओळख करून देण्याचं हे बेश काढलयत. आता रोज येऊन तुमच्या घरात डोकावणार हे ठरलच ! " मुस्लीम धर्मात मुर्तीपुजा नसल्याने, त्यांच्यासाठी सुलेखन हा एक भक्तीचा मार्ग आहे. " हे वाचून मला " इथे ओशाळला मृत्यू " मधला औरंगजेब आठवला .. सतत कुराण गिरवत बसलेला दाखवायचे त्या नाटकात. रत्नागिरीत स्थानिक कलाकारांनी देखणा प्रयोग सादर केला होता ते एकदम आठवलं !! फ़ारसीबद्दलच्या पुढच्या भागाची वाट बघतेय !
|
सावनी खरे तर ती म्हण नाही. तुकारामबाबाच्या अभंगातली ओळ आहे पण तिला सुभाषिताचा दर्जा प्राप्त झालाय... महापुरे वृक्ष जाती तेथे लव्हाळी वाचती.. असे आहे ते..
|
( सिंधुचे, हिंदु कुणी केले ?) स चा असा गोंधळ घालणारे, हुरतवासी>>>>>>> क्या बात है. मी ह्यावर खरच एक छोटा लेख लिहीनार होतो. सप्त सिंधु चे पुढे हफ्त हिंदु व स्पप्ताह चे हफ्ता कसे झाले व आपण हिंदु कसे झालो ह्यावर सावरकरांनी ऐक मोठा लेख लिहीला आहे.
|
Savani
| |
| Monday, December 04, 2006 - 1:45 pm: |
|
|
हो रॉबीन, खरच की. धन्यवाद.
|
पणजी! सहीच... खरंच अशा talented लोकांना काळाचं बंधन नसतंच.
|
अरे हो ही आयडीया मस्तय सांगतो नक्की
|
दिनेशदा कमळाचे फोटो अप्रतीम आहेत.
|
Dineshvs
| |
| Tuesday, December 19, 2006 - 4:23 pm: |
|
|
लोपा असा कमळाच्या थेट वरुन सहसा फोटो घेता येत नाही. काल सारसबागेत अगदी पुलाच्या खाली ते होते, म्हणुन तो कोन साधता आला.
|
दिनेश, "समाप्त" म्हणजे अरबी सुरस कथाच, बरोबर ना?
|
Nvgole
| |
| Friday, December 22, 2006 - 8:10 am: |
|
|
दिनेश, तुमच्या लिखाणाचा मी एक कायमचा आशिक आहे. तुम्ही भरभरून पाहावं. म्हणजे आम्हाला लिखाणातून अनुभवायला मिळेल. चित्तवेधक, सुरेख माहिती. सुंदर निरूपण. आवडले. खरेच खूप आवडले. एक बारीक सूचना. 'ही' जेव्हा शब्दाच्या शेवटले अक्षर असते तेव्हा नेहमीच दीर्घ लिहावे.
|
Dineshvs
| |
| Friday, December 22, 2006 - 3:53 pm: |
|
|
Nvgole माझे भाग्य आहे ते. आता सांगुन कुणाला पटणार नाही, पण मायबोलिवर येण्यापुर्वी अनेक वर्षे मराठी लेखनाशीच काय, वाचनाशीही माझा संबंध नव्हता. त्यामुळे हाताला शुद्धलेखनाचे वळणच नाही जडले कधी. आता प्रयत्न करायला हवा.
|
Jayavi
| |
| Saturday, December 23, 2006 - 4:26 am: |
|
|
दिनेश, तुमच्या ह्या रंगीबेरंगी लिखाणाच्या पहिल्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा! तुमचं सर्वांगसुंदर चौफ़ेर लिखाण आम्हाला असंच वाचायला मिळो.
|
Jo_s
| |
| Saturday, December 23, 2006 - 3:40 pm: |
|
|
दिनेश गोळे काकांना अनुमोदन सगळच नेहमीच जमतं अस नाही, पण जमेल तेव्हा मी "Dineshvs" हे पान वाचतोच. सुंदर वर्णनं, मार्मीक उदाहरणं, मोजक्या शब्दात बरच काही. . . तुम्हाला असच लिहायला आणि आम्हाला वाचायला मिळत राहो हीच प्रार्थना. सुधीर
|
Nvgole
| |
| Saturday, December 23, 2006 - 4:39 pm: |
|
|
दिनेश, आपणा सर्वांवर मायबोली आणि मनोगताचे अनंत उपकार आहेत. हे खरेच. एरव्ही आपण आपले अनुभव मौलिक असूनही कधीच ग्रथित करू शकलो नसतो. मात्र तुमची गणना प्रथितयश साहित्यिकांमध्ये जरी होत नसली तरीही तुमच्या अनुभवाचे मोल अपार आहे. जग पाहण्याची दृष्टी तुम्हाला आहे. मायबोली, मनोगतासारखी संकेतस्थळे जसजशी संख्येने आणि गुणवत्तेने वाढतील तसतसे प्रथितयश लेखकांमध्ये इथल्या लेखकांचे नाव येणे अवश्य घडून येईल. आणि तेव्हा इथले लेखकच नक्की बाजी मारतील. हा मला विश्वास वाटतो. कारण ते प्रथमत: आयुष्यात यशस्वी झालेले असतात. मग लेखनात. असो. तुमच्या मायबोलीय लेखनाचा कट्टर चाहता मी नेहमीच राहेन.
|
वा! किती सुन्दर जिव्हाळा! (नाहीतर तो V&C चा बी बी!)
|
Satishm27
| |
| Sunday, December 24, 2006 - 10:43 am: |
|
|
दिनेशदा, तुमच्या लेखनीचे,फोटोग्राफीचे इथे अनेक चाहते आहेत!!!!!! ते असेच अविरत चालू राहु द्या!!!! तुम्ही माडंलेली कल्पनाही छान आहे.
|
Nalini
| |
| Wednesday, January 03, 2007 - 11:07 am: |
|
|
दिनेशदादा हे शेत ऊसाचे का? मग ही काजळी? हे तुरे बाहेर पडले की उस काळा पडतो.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|