|
Bee
| |
| Friday, March 23, 2007 - 1:33 am: |
|
|
खूपच छान! युवराजचे आभार मानायला हवे खरे तर
|
Peshawa
| |
| Friday, March 23, 2007 - 2:00 am: |
|
|
yay yay! hood paNaa asaa asel tar kyaa baat hai!
|
Bee
| |
| Thursday, March 29, 2007 - 10:52 am: |
|
|
अरे पण इथे झक्की कुठे दिसत नाहीत ह्या टाल्कमधे
|
Deshi
| |
| Thursday, March 29, 2007 - 2:11 pm: |
|
|
हुडराव तुम्ही पण लाल का?
|
Zakasrao
| |
| Friday, March 30, 2007 - 10:11 am: |
|
|
हुड राव एक विनंती आहे. बघा बुवा जमतय का. मी हुमान वर फ़क्त दोन ओळीच लिहल तुम्ही त्यावर तुमच्या ह्या पानावर जरा detail मधे लिहा. तसेच काही हुमानं लिहुन काढा. तुमचा अनुभव मोठा आहे. तुमची शब्द संपदा बरीच आहे.आपल्या मायबोलीकराना हुमान विषयी जास्त माहिती होवु दे असे मला वाटते. बघा प्रयत्न करा.
|
नमस्कार जुन्नरकर.>>>>>> म्हणजे बघा बी आणि माझ्यासारख्या परप्रांतियाना हा नमस्कार लागू नाही म्हणायचा!! म्हणजे देवळात गेले तर हे म्हणणार मला सुख लाभू दे.. मग सगळ्याना सुख लाभू दे म्हटल्यावर मागणाराला मिळत नाही का? पण नाही स्वत्:पुरतेच मागायचे. ते शिवसेनावाले नाहीत का बोर्ड लावत'तमाम हिन्दू बांधवाना हे वर्ष सुखाचे जावो. म्हणजे हिन्दू नसणार्याना सुखाचे जावे अशी काही यांची इच्छा नसते!! सर्वाना सुखाचे जावो म्हटल्याने हिन्दूना सुखाचे जात नाही काय? पण नाही, देवाकडे मागणे मागताना देखील स्वार्थ आणि आपपरभाव सुटत नाही. तसेच हे.. फक्त जुन्नरकरानाच नमस्कार!! असो असो... सर्वे सुखिन्: सन्तु, सर्वे सन्तु निर्:मया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चिद दु:खम आपनुयेत... या वैदिक प्रार्थनेचे साने गुरुजीनी फार सुन्दर भाषान्तर केले आहे सर्वाना सुख लाभावे आरोग्य धन संपदा. व्हावे कल्याण सर्वांचे, कोणी दु:खी असू नये, हे खरे हिन्दू किंवा वैदिक धर्माचे स्पिरिट आहे असे मला वाटते.. हे आपलं प्रतिभाच्या पोस्ट पासून सुरू झालं म्हणून काही मला तिच्यावर टीका करायची नाहीये. ते केवळ निमित्तमात्र..
|
Runi
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:01 pm: |
|
|
रॉबीनहुड, तुमच्या घरातले तुमचे शेवटचे पोस्ट वाचता येत नाही, मला फक्त आकडे दिसत आहेत, बाकी त्या आधीचे मात्र सगळे नीट दिसतेय. रुनि
|
Bee
| |
| Wednesday, April 04, 2007 - 3:53 pm: |
|
|
ही ही ही ही हे नक्की काय आहे हो रॉबीनभाउ..
|
ही गम्मत सुरू झाली प्रतिभाच्या एका निरुपद्रवी पोस्ट मधून. तिने सहज जुन्नर बीबीवर नमस्कार जुन्नरकर असे म्हटले. त्यावर एक वाक्य टाकून गप्प बसणार होतो पण पुढे लिहित गेलो. बरेच दिवस हा संकुचित प्रार्थनेचा मुद्दा डोक्यात होता, नन्तर वाटले जुन्नर बीबीवर हे वाहून जाईल म्हणून कट पेस्ट इकडे केले. तर मुख्य पानावर सगळे आकडे आले. म्हणून तेच पोस्ट वर पेस्ट केले आहे... इथे मात्र ते दिसते आहे.... तर 'बी' हे असे आहे. तो आपला माझा मोनोलॉग आहे...
|
Farend
| |
| Wednesday, April 04, 2007 - 6:46 pm: |
|
|
मला वाटले सांकेतिक भाषेत आजचे 'आकडे' दिले आहेत
|
http://www.iit.edu/~laksvij/language/hindi.html इकडे जाऊन ते आकडे टाका म्हणजे वाचता येईल. जे इथे वरती आहे तेच दिसेल
|
Zakasrao
| |
| Thursday, April 05, 2007 - 7:05 am: |
|
|
अमेया पाहीले रे. मला वाटले हुड एप्रिल फ़ुल च्या मुड मधे आहे. हुड साहेब हुमान ची वाट बघतोय.
|
Shonoo
| |
| Thursday, April 05, 2007 - 11:45 am: |
|
|
रॉबीनहूड आपल्या बर्याचशा प्रार्थना, श्लोक, पूजा विधी हे सर्व एकट्या पूजका करता, किंवा फारतर त्याच्यातिच्या कुटुम्बा करता असतात. अगदी सा मां पातु सरस्वती भगवती सुद्धा 'माझ्या एकट्याचं' रक्षण करते. सर्वे भद्राणि पश्यंतु हे अभावानेच आढळतंय. एके काळी हे जरी वैदिक धर्माचं स्पिरिट असेल तरी त्यावर हजारो वर्षांच्या संकुचित स्वार्थाची पुटं चढली आहेत.
|
Dineshvs
| |
| Thursday, April 05, 2007 - 12:36 pm: |
|
|
देवा तू सर्वाना सुखी कर, सुरवात मात्र माझ्यापासुन कर. परवाच्या हास्यरंग मधली एक पाटी.
|
अफलातून! .... अस खरच झाल तर????? (नुस्त्या कल्पनेनेच पोटात गोळा आला) ) देवा, मला सुबुद्धी दे की मी तुझ्याकडे असल काही प्रत्यक्षात काय स्वप्नातही मागणार नाही
|
वपुंचे भदे आठवले एकदम!
|
Zakasrao
| |
| Monday, May 14, 2007 - 8:25 am: |
|
|
रॉबिन मस्त होती मेल. मला तर ते संजय नार्वेकर च नाटक आठवल " आता कस वाटतय " अस नाव असेल. एकदम धमाल आहे ते. रॉबिन तुम्ही हुमान वर माहिती लिहिणार होतात त्याच काय झाल? किती वेळा आठवण करुन देवु मी? लिहा हो तुम्ही छान लिहाल त्यावर.
|
>>>>> लावत'तमाम हिन्दू बांधवाना हे वर्ष सुखाचे जावो. म्हणजे हिन्दू नसणार्याना सुखाचे जावे अशी काही यांची इच्छा नसते!! हिन्दुतर जे हिन्दुन्चे नववर्ष वगैरे मानितच नाहीत त्यान्ना देखिल त्यात गोवले तर उगाच वन्देमातरम सारखा प्रश्ण उपस्थित व्हायला नको म्हणुन शिवसेनावाले तस करीत असतील तर ते योग्यच नाही का हुडा???? बाकी वैदीक धर्माचे ते "स्पिरीट" पसायदानातही उतरलेच होते ना बाराव्व्या शतकात? तरी पुढला इतिहास घडलाच ना??? जे वैदीक नाहीत, वेद मानित नाहीत त्यान्ना देखिल ही प्रार्थना लागु हे, पण.... हा पण जिथ तिथ आडवा येतो ना! जे वैदिकते वर हल्ला बोलु पहातील त्यान्चे निर्दाळन करायची शिकवण देखिल याच धर्माने दिली हे ना???? तस नस्त तर वैदिक देव देवता शस्त्र धारण करणार्या न रहाता वल्कले नेसुन जन्गलात सन्यस्त फिरणार्या दाखवल्या गेल्या असत्या, नाही का? आणि मग जे त्या सशस्त्र वैदिक देवतान्चे अनुकरण करुन जगायचा प्रयत्न करतात त्यान्ना या "सर्वसमावेशक प्रार्थनेचे" अस्थानी दाखले देवुन हतोत्साहीत करण्याची परम्परा कृष्णाच्या आधीपासुनची हे अस नाही का वाटत? अहो त्यामुळेच तर कृष्णाला हतोत्साहीत अर्जुनाला "चल उठ, सिद्ध हो" असे सान्गावे लागले ना??? एनिवे, तुमच्याच "एरीयात" येवुन तुमच्या मुक्त चिन्तनावर भाष्य करण्याचा किन्वा प्रश्ण विचारुन भन्डावुन सोडण्याचा मला अधिकार नाही! (नाहीतर बापुविरोधक अन माझ्यात फरक तो काय राहिला? ) DDD अगदीच रहावल नाही म्हणुन विचारल हो!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|