Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through December 01, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through December 01, 2006 « Previous Next »

Bhagya
Friday, November 03, 2006 - 12:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बाप रे! एक्-दोन दिवस आले नाही तर बरेच काही मिसलंय मी... फ़ुले हा तर माझा आवडता विषय....

म्हणून एक फोटो टाकतेय... दिनेशदा, बघून झाल्यावर हवं तर काढून टाका.
नीलगीरिची ही दोन झाडे फ़िरायला जाताना दिसली. एक लाल फ़ुलांनी नुसतं डवरलं होतं आणि एकाच्या पानातून नाजूक गुलाबी पांढरा फ़ुलोरा डोकावत होता.


2

1

Dineshvs
Friday, November 03, 2006 - 1:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, ते नीलगिरीचे माहेर ना ? तिथे त्याचे काहि उपयोग आहेत का ?
परवाच वाचले कि इथे वेड्या भाभळीच्या झाडावर कुठलाच पक्षी बसत नाही,त्यानी हे झाड वाळीत टाकलय तिथे पण असेच आहे का ?


Bee
Friday, November 03, 2006 - 10:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शोनू, दिनेश - इथे अनुदोनच्या वेबपेजवर मी चमेलीचे छायाचित्र बघितले. त्याला हिंदीत बहुतेक जास्मिन नाव आहे. हे चित्र बघुन, दिनेशनी दिलेली कळी जास्त मोठी आणि गुलाबी वाटते आहे.

दिनेश, कुन्दाची वेल असते की झुडुप? आमच्याकडे कुन्दा लावली तेंव्हा मला ते फ़ुलझाड वाटले. पण आता फ़ांद्या सरळ रेषेत वाढून तोल जातो आणि वेलीसारख्या कमानीवर चढवाव्या लागतात.



http://www.astro.caltech.edu/~vam/treeimages/chameli.jpg

Shonoo
Friday, November 03, 2006 - 1:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी

दिनेशच्या फोटोत आहे ती कळी. विद्युल्लता( अनुदोन) च्या फोटोत आहेत ती फुललेली चमेली. दादरला स्टेशन च्या बाहेर पश्चिमेला- घाऊक फुलांचा बाजार भरतो. तिथे संध्याकाळी मोगरा, चमेली, जाई वगैरे वजनावर मिळत असत. शंभर ग्रॅम किंवा पाव किलो फुलं आणून बिल्डिंगमधल्या सर्वांना गजरे वाटायचा कार्यक्रम असे.

मुम्बैत आमच्या घरी कुंदाचं झुडूप होतं साधारण ३-४ फूट उंच आणी तितकाच व्यास असेल असं गोलाकार. त्याला कोणी कधी मांडव वगैरे घातला नाही.

इंगजीत आणी बॉटनी मधे पण जाई, जुई, चमेली, सायली, मोगरा, बटमोगरा सर्वांना jasmine या एकाच नावाने ओळखतात. आम्हाला कॉलेजात Cook's flora नावाचे एक पुस्तक होते. त्यात फक्त ह्या सर्वांची वेगवेगळी ओळख करून दिली होती.


Surabhi
Friday, November 03, 2006 - 2:13 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इंगजीत आणी बॉटनी मधे पण जाई, जुई, चमेली, सायली, मोगरा, बटमोगरा सर्वांना jasmine या एकाच नावाने ओळखतात.>>>
शोनू, ह्याच गटात मोडणारी अजून एक प्रकारची फुले आहेत पण ती कधीच दादरला मिळत नसत. ती फक्त माटुंग्यालाच मिळत. केळीच्या गाभ्यापासून बनवलेल्या नाजूक धाग्याच्या साखळीत ती गुंफलेली असत. सगळ्यात जास्त घमघमाट त्या फुलांना असतो. सहसा उडुपी हॉटेलवाले त्या फुलांनी सकाळी देवाला म्हणजे तिरुपती बालाजीला त्याचा हार घालून पुजा करत. ह्या फुलांच्या माळा शेट्टी लोक फ्लाइटने साऊथहून मागवत असत व फक्त त्या लोकांसाठी त्यांची डिलीवरी होत असे.... त्याला मराठीत काय म्हणतात माहीत आहे का तूला? पिवळसर झाक व किंचीत तपकीरीसर देठ असतात ह्या फुलांना व आकार जाईसारखाच पण लांबट आणी हमखास साऊथ इंडीयन बायका ही फुले डोक्यात माळतात. वडाळ्याच्या GSB गणपतीची सजावट पण ह्या फुलांनी करतात. ह्यांना मदनबाणाची फुले म्हणतात का? मदनबाणाची फुले कशी असतात? की ही फुले फक्त दक्षिणेतच होत असतील?

Lalitas
Friday, November 03, 2006 - 2:57 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुरभी, या फुलांना "भटकळ मोगरा" किंवा दक्षिणेत "मल्लिगे" म्हणतात.

मदनबाण बटबटीत असतो आपल्या मोगरा व मल्लिगेहुनही!


Surabhi
Friday, November 03, 2006 - 3:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो हो ललिता.. मल्लिगे शब्द ऐकलाय मी!! पण त्या फुलांबरोबर शब्द ही विसरले बघ!! काय मस्त वास येतो त्यांना....फारच दुर्मीळ असायची ती फुले....

Shonoo
Friday, November 03, 2006 - 3:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Check this for all varieties of Jasmine.

http://www.bhatia-nurseries.com/favorite.htm

Dineshvs
Friday, November 03, 2006 - 4:56 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे जास्मिन कुळ अगदी अस्सल भारतीय. बाकि सगळी, अगदी जास्वंद सुद्धा बाहेरुन आलेली.
मला जरा तुम्ही लावलेल्या कुंदाबद्दल शंका आहे. याच कुळातला असला तरी, कुंदा रानोमाळ उगवतो. वैषाखात बहरतो. जरा मोठे फुल असते. याला मग अगदी बारिक काळी फळेहि लागतात.
आज तुळशीचं लग्न लागलं. आता मुहुर्त काढा बरं, गरजुंनी.

tv

Dineshvs
Saturday, November 04, 2006 - 5:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

विवाहानिमित्त आमचे वृंदावन असे सजले होते.
vr

Vnidhi
Friday, November 10, 2006 - 1:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

एखादी कादंबरी वाचावी...तशी तुमचे पुढचे post वाचायला उत्सुकता लागुन रहाते...

Swaateemumbhai
Saturday, November 18, 2006 - 9:40 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश धन्यवाद माझ्यासाठी दुधसागरराचा धबधबा टाकल्याबद्दल :-)

Saee
Tuesday, November 28, 2006 - 10:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो दिनेश. हा फोटो छान आहे. पण यापेक्षाही कितीतरी जास्त असतात. तुम्ही हा फोटो खालुन काढल्यामुळे फक्त पायर्‍यांवरच्याच पणत्या दिसताहेत आणि पाराच्या कडेच्या थोड्याशा. वरुन का नाही काढला? पारच आहे ना की देऊळ आहे? नीट कळत नाहेये.

Nalini
Friday, December 01, 2006 - 1:21 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, मला काही प्रश्न आहेत. १) नागरमोथा म्हणजे लव्हाळाच्या मुळाशी असतात त्यात ग़ाठी का?
२) नागरमोथा हा शिकेकाई सोबत दळून केस धुवायला वापरला जातो का? आणखी कुठे वापरला जातो?


Lopamudraa
Friday, December 01, 2006 - 1:28 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नलिनी.. नागरमोथा.. शेतात जाउन गोळा. करणे हा सुट्टितला माझा आवडता छंद होता. मागच्या वेळी.. भारतातुन येताना.. मी शेवगाव हुन नागरमोथा मागवला होता. खुप मोठ्थ्या छान मुळ्या होत्या.
केस धुतल्यावर सुरेख सुवास येत राहतो केसांना..


Nalini
Friday, December 01, 2006 - 1:34 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

लोपा, मलाही ह्या लव्हाळ्याच्या मुळ्या गोळा करायला खुप आवडायच्या. खास करुन त्याचा सुगंध मला खुप आवडतो. पण त्यालाच नागरमोथा म्हणतात का ह्याची खात्री करुन घ्यायची होती.

Pooh
Friday, December 01, 2006 - 2:26 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

calligraphy चा उच्चार कॅलिग्रफी असा होतो. कॅलिओग्राफी असा नही. बाकी छान चालू आहे. चालू द्यात.


Dineshvs
Friday, December 01, 2006 - 5:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार Pooh . नलिनी, लोपाने उत्तर दिलेच आहे. नागरमोथा प्रमाणेच, वाळा पण असेच सुगंधी मुळ असते.
पण लव्हाळे म्हणजे जनरल गवत असावे. महापुरे जेथ वृक्ष जाती, तेथ लव्हाळी वाचती, असा दाखला आहेच.


Gajanandesai
Friday, December 01, 2006 - 6:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, जनरल गवत म्हणजे सगळीकडेच (डोंगरावर, मोकळ्या रानावर) उगवते ते असे म्हणायचे असेल तर लव्हाळी हे जनरल गवत नाही. ती एक खास जात आहे आणि ती नदीच्या, ओढ्याच्या काठाला उगवते. अतिशय लवचिक. तिची काडी वाकवून मोडायची म्हटले तरी सहज मोडत नाही. कमीत कमी कमरे इतकी तरी वाढते. मुळापासून शेंड्यापर्यंत एकच पेरे, आणि शेंड्यावर पाकळ्यासारखी अतिशय चिंचोळी, वितीइतकी लांब तीन-चार पाने फुटलेली असतात. मध्ये तुरा असतो. पाण्याचा कितीही जोराचा प्रवाह असला तरी ही वनस्पती त्या प्रवाहाबरोबर (तात्पूर्ती) पूर्ण झोपेल, पण मोडत नाही.

व्रात्य मुलांना वठणीवर आणण्यासाठी अतिशय गुणकारी.
:o)

Dineshvs
Saturday, December 02, 2006 - 4:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आभार गजानन, हाहि गुण आहे का लव्हाळ्याचा ? उपयोगी पडेल मायबोलिवर. !!!
पण आता नलिनीने सांगायचेय, कि ती म्हणते ती लव्हाळी हिच का ?


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators