|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, झनियाची फ़ुले कुठली असतात? बर्याचदा गावाबाहेर बस गेली की छान गुलाबी रंगाची आणि सहा सात पाकळ्या असलेली फ़ुले दिसतात ती कुठली असतात. त्यांचा वासही छान असतो आणि हे फ़ुलझाड सरळ रेषेत वाढते. फ़ुलांन्चा देठही वेणीत खोवता इतका लांबसर असतो.
|
Surabhi
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:36 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, तुम्ही कुठे असता? पिशी हा कोंकणी शब्द!!!! गोव्याला ला मंगेशीला आणि कवळ्याला शांतादुर्गेच्या देवळाबाहेर कसले सुंदर अबोलीचे वळेसर असतात त्याची आठवण झाली!!
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:43 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पुर्वी शेवंतीच्या वेण्याची भारी फ़ॅशन आली होती विदर्भात. ज्याच्या त्याच्या घरी जावे संध्याकाळी हिवाळ्यात शेवंतीचे गजरे माळणे सुरु. त्याचवेळी लाल जिलेटीन कागद गुंडाळेले choclates पण दुकानात प्रसिद्ध झाले होते. वेणींच्या मधे हा जिलेटिन घालून शेवंतीची चापट वेणी केली जात असे.
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 7:44 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
पिशी हा शब्द मराठीत आहे. तो विदर्भात देखील बोलतात. कोकणी हक्क बजावू नका :-)
|
Nalini
| |
| Wednesday, November 01, 2006 - 1:22 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदादा, अबोली खुपच सुंदर. मी पाचवीत असताना मावशीकडे सुट्टीसाठी गेले होते. तिच्याकडे मी प्रथमच अबोली पाहिली. मला खुपच आवडली. मग तिच्याकडुन येताना मी अबोलीचा आणि काटेकोरंटीचा वानवळा आणला. काटेकोरंटीचा(त्याला असणार्या काट्यांमुळे) बिमोड करायला मला ६-७ वर्ष लागले. कारण ह्या दोन्ही बियांना पाण्याचा थोडा जरी स्पर्श झाला तरी फुटुन तडतड करत चोहोबाजुला उडतात. गुलबक्षीचे फुल पण मस्त दिसते. बी, मी तर असे ऐकुन आहे की गोकर्णाचे एक फुल एक तोळा सोन्यासमान माणले जाते म्हणून महादेवाला गोकर्ण वाहिला जातो आणि महादेवाला तो आवडतोही. तसेच ऋषीपंचमीला तर महादेवाला खास करुन पांढरा धोतरा वाहिला जातो. माझ्या गावी तर दिवाळीला लक्ष्मीपुजनासाठी खास शेवंतीची वेणी आणली जाते. घरातल्या बायकांना वेणीची आवड असेल तर त्यांनाही खास वेणी आणली जाते. ह्यात चमचम पेपर घातलेले असतातच पण सुपारिचे फूलं पण घातलेले असतात. टणटणीच्या फुलांची ही वेणी खुप छान होते. ह्या फुलांना लांब दांडी असल्याने ही वेणी करायला काडी घ्यावी लागत नाही. टणटणीच्या पाल्याचा रस जर जखमेवर लावला तर जखम पिकत नाही आणि लवकर बरी होते.
|
Lopamudraa
| |
| Wednesday, November 01, 2006 - 2:09 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
अबोलीला पिशी म्हणतात.. अरे वा.. म्हणजे वेडीपिशी झाली हा शब्द अबोली वरुन आलाय वाटत. फोटो सुंदर आहे
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 01, 2006 - 4:34 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
कुणाला सांगुन खरे वाटणार नाही, हि अबोली मुंबईत बघायला मिळाली. तीहि एका बसस्टॉपच्या कडेला. सुरभी, पिशी, रतन अबोलीचे वळेसार हे सगळे गोव्यातले प्रकार. माझा संचार सगळीकडेच असतो. याच देवळाबाहेर अगदी शंकासुर, रुक्मीणी, बुच, मधुमालती, गुलबक्षी अश्या अनेक फ़ुलांचे हार विकायला असतात. मधुमालती, गुलबक्षी आणि बुचाच्या फुलांचा गजरा करायला तर सुताचीहि गरज नसते. बी, झिनिया माझ्या मते सिंगल पाकळ्यांचा डेलियाच असावा. यात गुलाबी राणी रंगाच्या दोनचार छटा दिसतात खर्या, पण वास नसावा. ( कदाचित तु दुसरेच कसले तरी फुल म्हणत असावास. ) याच दिवसात एक लालभडक पाकळ्यांचे आणि पिवळा गोंडा असणारे डेलियासारखे झुडुप सगळीकडे फुलेले दिसते. यातले दोन्ही रंग अगदी गडद असतात. आणि झाडहि सहज पुरुषभर उंचीचे. याच वर्गातले एक झाड असते, म्हणजे दीपमाळ Leonotis nepetifolia दीपमाळेपेक्षा, कुवैतमधल्या टिव्ही टॉवरसारखे दिसते हे. हिरव्या उंच देठाला, अंतरा अंतरावर हिरवे काटेरि गोल असतात, आणि त्यातुन अगदी लहान लहान फुले डोकावतात. पण याची शोभा दुरुनच साजरी, कारण या गोलकाला खुप काटे असतात. परवा कात्रजच्या घाटात, सोनकुसुमांची Cosmos bipinnatus खुप झाडे बघितली. यात दोन छटा. एक हळदीची तर दुसरी आंबे हळदीची. काहि फुले एकेरी पाकळ्यांची तर काहि भरगच्च पाकळ्यांची. देठहि लांबलचक. आणि माती चांगली असेल तर फुलावर वेगळाच तजेला असतो. नलिनी, सुपारीचे फुल असे तु ज्याला म्हणालीस, त्याला काहि जण गोंडा पण म्हणतात. खरे तर तो पुष्पकोष असतो. अगदी कणभर अशी पांढरी फुले असतात त्यात. यात पांढरा आणि जांभळा असे दोन प्रकार. आणि लोपा, तसे नसावे बहुतेक. वेड्यासारखी फुलते म्हणुन ती पिशी. तिच्यासारखे वेड नाही. अबोलीच्या फुलात मुळातच पाण्याचा अंश खुपच कमी असतो. त्यामुळे सुकली तरी रंग फिकुटत वा काळवंडत नाही. नलिनी खास तुला विचारायचे आहे. तुमच्याकडे एरंड आणि कडुनिंब भरपुर ना म्हणुन. मी आत्ताच वाचले कि एका काडीत एरंडाची बी आणि लिंबोणीची बी असे ओवले आणि पेटवले, कि तो प्रकार बराच वेळ जळत राहतो, आणि प्रकाशहि देतो. मी वाचलेला उल्लेख अगदी करुण, म्हणजे रात्रशाळेतल्या अभ्यासाबाबत होता.
|
Shonoo
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:27 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश रुक्मिणीचं फूल कसं असतं? फोटो टाकता येईल का? आणि सुरंगीच्या गजर्यांचा उल्लेख राहिला ना! किती सुकल्यावर देखील गंध टिकून रहातो. इथली फुलं दिसायला कितीही सुंदर असली तरी आपल्या इकडल्या फुलांसारखा सुगंध नसतो. किति मोठ्ठाली फुलं असतात मॅग्नोलिआ ची. पण गंध शून्य. आणि केसात फुले माळण्याची पण प्रथा नाही. मला वाटते, भारत, सिन्गापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया सोडून इतर कुठेही केसात फुले माळायची पद्धत नसावी. भारतात देखील माझ्या उत्तर भारतीय मैत्रिणींना केसात गजरे माळणे अकुलीन वाटत असे. मी 'अमेरिकेची' असून देखील सकाळ संध्याकाळ आवर्जून गजरे माळते या एका पॉइन्टवर अनेक आजे आणि मावस, मामे इत्यादी सासवांची लाडकी आहे. त्यात आणि पुन्हा दोन चार प्रकारचे गजरे करताही येतात म्हणून मी फारच आवडती सून आहे! किती जणींच्या बागेतून जाई, मोगरा, सायली आणि सोनचाफ्याची फुलं येत असतात माझ्या साठी मी तिथे असले की. हिवाळ्यात मुम्बैमधे बटशेवंतीच्या पण वेण्या मिळत असत. लहानशी, घट्ट पाकळ्या असलेली ही फुलं फार वजनदार नसल्याने पोनीटेल वर पण गजरा नीट रहात असे.
|
Arch
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:49 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, जरा त्या चुर्मा लाडूच्या BB वर विचारलेल्या प्रश्णाच उत्तर द्या न. नलिनी agrees with me पण तुमच्याकडे दुसरी tip असली तर बघायच होत.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 1:54 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
शोनू, सुकल्यावर गंध असतो ती बकुळी. सुरंगीचे फ़ुल दुधी पाकळ्यांचे व पिवळ्या केसरांचे. हि फ़ुले झाडालाच, गजर्यासारख्या दांडीवर लागतात. अश्याच एका रेडीमेड वेणीला सीतेची वेणी म्हणतात. डोक्यात फुले माळायची पद्धत कोकणात पुर्वापार होती. आणि हि रुमीणीची एक जात. याला ईक्झोरा पण म्हणतात. यात बरेच रंग आहेत. याला खोटा अशोकहि म्हणतात, कारण खर्या अशोकाची फुले अशीच असली तरी त्याला लांब पुंकेसर असतात.
![rk](/hitguj/messages/58489/118832.jpg)
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 3:00 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
नलिनी, कोरंटीचा पिवळा रंग म्हणजे जणू सोन्याचा रंग आणि पांढरा कोरंटी म्हणजे त्याचा रंग चांदीसारखा. ह्या रंगामुळे सोने चांदीची त्याला मिळालेली उपमा मला पटली आणि आवडली. पण गौकर्णीचा जांभळा रंग सोने किंवा चांदीची उपमा घेऊ शकत नाही. हे फ़ुल महादेवाला प्रिय आहे हे मात्र एकदम बरोबर. गौकर्णीच्या शेंगा खातात असे वाटते. लोपमुद्रा, अबोलीवरुन पिशी नाव आले आहे हे एकदम चुकीचे आहे. तू अन्वय लावायाचा प्रयत्न केलाच नाही. एखादी वेडीपिशी बाई भान सोडून जशी आपल्यातच दंग असते. तिला हवे ते करते. हसते रडते गाते ओरडते सर्व काही विसरून जाते. ह्याला पिसाटपणा म्हणतात. अबोली फ़ुलायला लागली की ती इतकी फ़ुलते की तिला थांब थांब म्हंटले तरी ती थांबत नाही. म्हणून कदाचित तिला पिशि हे नाव पडले असेल. तसे बघितले तर अबोलीचा अर्थ न बोलणारी. सर्वच फ़ुले बोलत नाही. हीला अबोली नाव का पडले त्याची काहीतरी कथा असेल. दिनेश, ही रुक्मिणी किती परिचयाची आहे पण तिचे नाव माहित नव्हते. वरील फ़ुलझांडाचे फ़ुलासहीत पानासहीत फोटो टाका अशी एक आवर्जुन केलेली विनंती!
|
दिनेशदा.. अस आहे का.. माहितच नव्हते..पटले एकदम.. माझ्या आवडत्या फ़ुलाबद्दल(माझ्या नावाबद्दलही(अबोली या) मला एव्हढी महिती नव्ह्ती)खुप छान वाटले वाचायला. माझे आजोबा मुळ कोकणातले त्यांनाही खुप फ़ुलांची आवड होती.. मळ्यात आणि घरातही त्यांनी गुलबक्षी,अबोली,गुलाब खुप लावले होते.. हातभर मोठ्ठे गजरे कराय्चो.. आणि एव्ह्ढ्याशा केसात माळायचो.. flowerpot करुन घ्यायचो थोडक्यात.. बुचाचे आणि मधुमालतीचे गजरे विणायलाही मला खुप आवडते.
|
Bee
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:19 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेशदा ह्या लोपमुद्रा नावाच्या पिशीला जरा ठिकाणावर आणा बघू.
|
Lalitas
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:46 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, या रुक्मिणीला गोव्यांत "पिटकुळी" म्हणतात असं मला वाटतं. माझ्या आठवणीप्रमाणे याच्या कळ्या गोव्यांत मंगेशीला व कवळ्याला शांतादुर्गेच्या देवळांत प्रसादाच्या पाटावर लावतात, बरोबर?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 7:57 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
प्रसादाच्या पाटावर म्हणजे कौल लावायला ना, ललिता ? बाकि जायांची पुजा वैगरे आठवतेय का ? बसमधे एकीने जरी हा गजरा माळला असेल तर सगळे बस सुगंधित होते. बहुतेक लोकल बसमधे ताजी फ़ुले वाहिलेली असतात. अगदी तरुण मुली सोडल्या तरी बहुतेक बायका, एखादे तरी फुल केसात माळतातच. आणि ईतके कौतुक करुन, झाड कधीच फुलांशिवाय दिसत नाही. प्रत्येकाच्या दारी, फ़ुललेले झाड हवेच.
|
Lalitas
| |
| Thursday, November 02, 2006 - 10:39 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
हो कौल लावायलाच मला म्हणायचं होतं.... जायांची पुजा म्हणजे काय?
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:15 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ईकडे ज्याला जायांची फुले म्हणतात त्याला मुंबईला सायली म्हणतात. गुलाबी रंगाच्या पुसट रेषा असणारी पांढरी कळी असते. त्याचे गजरे या दिवसात पानात बांधुन विकायला येतात. या कळ्या संध्याकाळी उमलतात, आणि खुप घमघमाट सुटतो. म्हार्दोळच्या देवीची या फुलानी पुजा बांधतात. दोन दिवस या परिसरातील कळ्या गोळ्या केल्या जातात आणि त्याचे गजरे करुन संपुर्ण देऊळ सजवतात. त्या उमलल्या कि सगळा परिसर सुगंधी होतो. हा सन्मान देवीपेक्षा फुलांचाच, नाहि का ?
|
Lalitas
| |
| Thursday, November 02, 2006 - 11:25 am: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश, "जाया फुलां" असं लिहिलं तर मला नक्की "जाईची फुलं" हे समजलं असतं! कोकणींत जाई "जाया" होते. म्हाड्डोळची देवी आमची पालवी अहे... तिथे जायलाच लागतं, पण तुम्ही वर्णन केलेला सोहळा पाहण्याचं सौभाग्य अजुन मिळालेलं नाही
|
Shonoo
| |
| Thursday, November 02, 2006 - 12:45 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
दिनेश बाहेरून जराशी गुलाबी झाक असलेली ती चमेली ना? त्याची पानं थोडीशी कढीपात्त्याच्य पानांसारखी असतात. सायली मला वाटते बाहेरून आतून पांढरी शुभ्र असते. जाई पेक्षा ही थोडी मोठ्या कळ्या असतात सायलीच्या आणि चमेलिच्या ही. बकुळीचा वास तर वर्षानुवर्षे रहातो. नाशिक मधे शिकतानाची दोन चार फुलं अजुनही माझ्या कडे आहेत ( २२-२३ वर्षे झाली). त्या फुलांचा सुगंध आणि त्यांच्याशी निगडीत सुगन्धी आठवणी म्हणजे खजिना आहे माझा. आम्हाला कॉलेजात असताना polyalthea longifolia म्हणजे खोटा अशोक असं शिकवलं होतं. लाम्ब नाजूक पानांच हे झाड फार लवकर, उंच वाढतं. पुष्कळदा त्याची पानं तोरणात पण वापरतात. पार्ल्याला एक दोन घरी खर्या अशोकाची झाडं दिसायची पूर्वी. पण एकंदरीत मुम्बैमधे अशोक आणि कदम्ब दुर्मिळच. कलकत्त्यात मात्र ही दोन्ही झाडं विपुल. गदिमांनी एका प्रवासात सर्व मित्र बाभळ दिसली की ' बाभूळ झाड उभेची आहे' ही ओळ म्हणायचे अशी आठवण लिहिली आहे. त्या धर्तीवर मी आणि माझी बहिण कलकत्त्यामधे फिरताना आठवडाभर 'अशोक किती फुललाय त्याला काही सीमा?' असं म्हणत होतो.
|
Dineshvs
| |
| Thursday, November 02, 2006 - 4:35 pm: |
| ![Link to this message](/hitguj/icons/ln.gif)
|
ललिता, पुढच्या वेळी हा मुहुर्त साधुनच या. त्रिपुरारी पोर्णिमेला साखळीचा उत्सव या रविवारी आहे. सोनू, वर्णन बरोबर आहे. आता बहर ओसरलाय, अगदी मुष्किलीने एक कळी मिळाली आज. फोटो तितका खास नाही, पण कल्पना येईलच.
![jaya](/hitguj/messages/58489/118875.jpg)
|
|
चोखंदळ ग्राहक |
![](/images/dc.gif) |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|