|
Dineshvs
| |
| Tuesday, October 17, 2006 - 2:36 am: |
|
|
कांदा किसुन कडवट व्हायला बहुतेक किसणी कारणीभुत असावी. त्यावर आधी काय किसले होते ? आधी गाजर वैगरे किसले असेल तर असे होवु शकते. कांदा बारिक कापुन, चुरुनहि या भाकरीत वापरता येईल. भाग्य, तुला फोटो !
|
Bee
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:25 am: |
|
|
दिनेश, ह्या भाकरीला तेल लावायची गरज आहे का?
|
Lajo
| |
| Tuesday, October 17, 2006 - 6:29 am: |
|
|
नाही हो दिनेश. मला जरा इकडे तिकडे वास लागलेला आवडत नाही त्यामुळे माझी लसुण आणि कांद्यासाठी वेगळीच किसणी आहे. हाच कांदा भाजल्यावर BBQ वर छान गोड होतो. मी पुढच्या वेळेस किसायला पांढरा कांदा वापरुन बघीन. बघु काही फरक जाणवतो का?
|
Nalini
| |
| Wednesday, October 18, 2006 - 10:06 am: |
|
|
दिनेशदादा, हे बॅसिल माझ्या बागेत पण आहे. सई, तुला मेल करते आज - उद्या. भाग्या, जरा ईकडे भेट देतेस का? /hitguj/messages/103383/117677.html?1161165800
|
दिनेशदा.. मीना प्रभुंची ओळख करुन दिल्याबद्दल thank you .. त्यांची पुस्तके मागवते आता..!!!
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 25, 2006 - 9:13 am: |
|
|
लोपा, हि घे यादी. मेक्सिकोपर्व, माझं लंडन, दक्षिणरंग, चिनीमाती, ईजिप्तायन, तुर्कनामा आणि ग्रीकांजली.
|
मी प्रभूंची सगळी पुस्तके वाचली आहेत... मजा येते, अगदी जगप्रवास तिथल्या संस्कृतीनिशी होतो...
|
Raina
| |
| Monday, October 30, 2006 - 9:32 am: |
|
|
वा! दिनेशदा- स्वाक्षरी मस्त. त्यांच वय साठीच्या आसपास वाटतय फोटोवरुन. बाई महान आहेत खरंच. चंद्रावर सुद्धा जाऊन येतील.
|
Dineshvs
| |
| Monday, October 30, 2006 - 3:43 pm: |
|
|
साठीच्याहि पुढे असतील. पति सुधाकर प्रभु हे सत्तरीचे आहेत. हि आवड त्याना कशी निर्माण झालीय याचा कधी उल्लेख वाचला नाही. पण त्या नॉर्वे आणि सहारा वाळवंट दोन्हीकडे जाऊन आल्या आहेत. चंद्र तो कितीसा दूर ?
|
अरेरे,एका महिलेच्या वयाबद्दल चर्चा खुले आम व्हावी ना? शो. ना. हो!
|
Dineshvs
| |
| Monday, October 30, 2006 - 4:58 pm: |
|
|
रॉबीन, एक प्रसन्न व्यक्तीमत्व. मला त्यांच्याबद्दल असे लिहायला काहिहि वाटत नाही. उत्साह म्हणशील, तर अगदी तरुणीलाहि लाजवेल असा. त्या पी एच डी, डॉक्टर नाहीत तर वैद्यकिय डॉक्टर आहेत. शिवाय पट्टीच्या पोहणार्या आहेत. रसिक खवैया आहेत. चहा, कॉफ़ी आणि दारु सोडल्यास, त्याना काहिही वर्ज्य नाही.आणि मराठीतल्या तमाम लेखक मंडळींच्या त्या लाडक्या आहेत.
|
Bhagya
| |
| Monday, October 30, 2006 - 9:41 pm: |
|
|
दिनेशदा, त्यांचे एकच पुस्तक वाचले आहे, आणि ते पण तुझ्या सांगण्यावरुन. त्या खरंच महान असाव्यात. आणि साठीच्या वयात इतका उत्साह असावा? खरच कौतुक आहे.
|
Prady
| |
| Monday, October 30, 2006 - 10:17 pm: |
|
|
दिनेश दा तुमच्या पानावर मेसेज मात्र लाजो साठी. तिच्या कांद्याच्या प्रश्नासाठी. इथल्या कांद्याचा रस हा कडवटच असतो. त्यामुळे ग्रेव्ही नेहेमी कडवट होते. ह्या साठी कांदा एकतर पाण्यात उकडून घ्यावा आणी मग तो वाटावा ( कांदा उकळलेलं पाणी वापरू नये) किंवा आधी कांदा थोड्याशा तेलात परतून घ्यावा मग वाटावा. कडवटपणा येत नाही पदार्थाला. दिनेशदा सॉरी हं. खूप दिवसांनी तुमच्या पानाला भेट दिली तेव्हा लाजोचा प्रश्ण दिसला आणी राहावलं नाही म्हणून उत्तर दिलं. तुमचं लिखाण as usual छानच.
|
Bhagya
| |
| Monday, October 30, 2006 - 11:52 pm: |
|
|
आणी पी एच. डी डॉक्टर खर्या खुर्या डॉ. पेक्षा कमी असतात? क्लिप आर्ट रडका चेहरा.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 31, 2006 - 1:44 am: |
|
|
नाही भाग्या, तसे नाही. पण या दोन डिग्रींमधे फरक कळावा म्हणुन. आणि आता चुक सुधारली आहे बघ. पुर्वी मराठी नाटकात, डॉ. कशिनाथ घाणेकर, डॉ. गिरिश ओक, डॉ श्रीराम लागु, डॉ ज्योत्स्ना कार्येकर, डॉ उत्कर्षा नाईक, डॉ मोहन आगाशे आणि डॉ वसंतराव देशपांडे अशी बरिच मंडळी होती. त्यामुळे गोंधळ उडायचा. यापैकी काहि असे होते तर काहि तसे. Prady उत्तर दिले ते बघुन छान वाटले. देशोदेशीचे कांदे असेच. ओमानचा कांदा पण भला मोठा. एक कांदा सहज २०० ग्रॅम्स्चा असायचा. तो ओला असताना पांढरा आणि सुकला कि लाल व्हायचा. चवीला आपल्या कांद्यांपेक्षा पाणचट असायचा.
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:39 am: |
|
|
काहो दिनेश, तुम्हाला बरी ही सही मिळाली. कशी ती सांगा बघू.
|
Bee
| |
| Tuesday, October 31, 2006 - 6:57 am: |
|
|
चंद्रावरच काय सुर्यावर जायलाही मला आवडेल पण इतका वेळ आणि पैसापाणी नको का? की फ़ुकट मिळतं इथे जायला..
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 31, 2006 - 8:39 am: |
|
|
डॉ मीना प्रभु स्लाईड शो करतात. त्यावेळी भेटल्या होत्या त्या. त्या डॉक्टर असल्याने, ममी करायची सगळी प्रोसेस छान समजाऊन सांगतात.
|
Bee
| |
| Wednesday, November 01, 2006 - 3:24 am: |
|
|
अबोलीचा रंग डोळ्यात भरतो आणि साधेपणा मनात उरतो. असे म्हणतात कोरंटीचे एक फ़ुल शिवाला वाहिले की एक तोळा सोने वाहिले असा त्याचा अर्थ होतो आणि एक पांढरे फ़ुल वाहिले की एक तोळा चांदी वाहण्यासारखे आहे. गोकर्णीची फ़ुलही देवघरात प्रसन्न वातावरण निर्माण करतात. झेंडूचे अख्खे फ़ुल अर्पण करण्यापेक्षा त्याच्या पाकळ्या छान दिसतात.
|
Dineshvs
| |
| Wednesday, November 01, 2006 - 6:49 am: |
|
|
बी, ईथे अबोलीला पिशी म्हणतात. पीशी म्हणजे वेडी, वेड्यासारखी फुलते म्हणुन ती पिशी. ईथे भडक केशरी रंगाची, पिवळी आणि निळी अबोली पण दिसते.
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|