Yog
| |
| Tuesday, October 10, 2006 - 2:52 am: |
|
|
दिनेशराव, पुस्तकाच जरा मनावर घ्या...
|
Rahul16
| |
| Tuesday, October 10, 2006 - 3:22 am: |
|
|
aaj kal hitguj ughadalyawar ...dinesh ni kay lihile aahe he pahayala 'Rangiberangi' war yeto... kahi navin disale tar khup aanand hoto... dinesh chya likhanachi saway hot chalali aahe. thanks dinesh for giving us such a wonderful experience
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 10, 2006 - 5:48 am: |
|
|
योग, राहुल तुमच्या शब्दांशिवाय, आनंद तो आणखी काय वेगळा असतो रे ? योग, मला या निमित्ताने सगळे लिखाण एकत्र करु दे. मग बघु पुस्तकाचे.
|
दिनेश दा अगदी डोळ्या समोर आली तुमची सहल...वा खरच मजा आली वाचून!
|
Bee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 2:09 am: |
|
|
दिनेश, मी शोनूला जे म्हणतो ते बरोबर आहे का? शोनू, एक पर्जन्यवृक्ष असतो. त्याचेच दुसरे नाव आहे शिशिर. हा वृक्ष जे किडे पोसतो ते किडे आपल्या शरीरातून एक प्रकारचा द्रव सोडतात जेणेकरुन झाडाखाली सतत ओलसरपणा असतो. म्हणून ह्या वृक्षाचे नाव आहे पर्जन्यवृक्ष. शिशिर आणि शिरिष हे दोन्ही वृक्षाची नावे देखील आहेत. मी दिनेश कडून वदवून घेतो एकदा :-)
|
Dineshvs
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:35 am: |
|
|
शिशिर हा ऋतु. शिरिष आणि पर्जन्यवृक्ष हे दोन वेगळे वृक्ष आहेत. शिरिषाला पोपटी तर पर्जन्यवृक्षाला गुलाबी फुले येतात. रुपाने ते सारखीच असतात. पर्जन्यवृक्षाच्या शेंगा भरीव काळ्या आणि चिकट गराच्या असतात. शिरिषाच्या शेंगा चपट्या आणि सोनेरी रंगाच्या असतात. किडे आणि पाऊस हे दोन्ही जाडांच्या बाबतीत घडते. पजन्यवृक्ष बाहेरुन आलाय, तरिही तो जास्त भरभर आणि सहज वाढत असल्याने तो जास्त दिसतो.
|
Bee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 4:10 am: |
|
|
दिनेश, छान माहिती सांगितली. मी पर्जन्यवृक्षाबद्दल शरदीनी डहाणुकरांच्या पुस्तकात वाचले होते. इथे सिंगापोरमध्ये गुलाबी शिशिर जागोजागी आढळतील. फ़िकट पोपटी शिशिर मी अकोल्यात पाहिला होता. मुंबईतही गुलाबी शिशिरच अधिक दिसतो. धन्यवाद..
|
Raina
| |
| Wednesday, October 11, 2006 - 9:29 am: |
|
|
दिनेश कासव प्रकरण ultimate लिहील आहे तुम्ही. खूप आवडलं वाचायला.
|
Bee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 9:42 am: |
|
|
मलाही आवडल ते कासव प्रकरण.. दिनेश तुम्हालाही दिवाळीच्या शुभेच्छा! दिवाळी अंकात तुमच्याकडूनही काहीतरी वाचायला मिळेल अशी अपेक्षा!
|
दिनेश.. अल्टिमेट.. कासवाचे प्रकरण म्हनजे कळस.. आहे.. डोळ्यासमोर सगळी इवली इवली पिल्ल उभी राहीली... फ़ार सुंदर सगळा प्रकारच आश्चर्य जनक होता.... आमची सफ़र घडवुन आणली.. त्याबद्द्ल धन्यवाद..!!! अजुन लिहा.. तुमचे अनुभव म्हणजे.. खजीना आहे...!! जो आम्ही लुटुन नेतोय.तुम्ही पण मनापासुन अनुभव शेअर करताय....!!!
|
Maitreyee
| |
| Wednesday, October 11, 2006 - 8:56 pm: |
|
|
बी, काय रे तुझ्या प्रश्नाची उत्तरे वाचतोस की नुस्ते प्रश्न च विचारतोस दिनेश नी सांगितल आहे ना वर, तरी तुझा शिरीष आणि शिशिर चा घोळ तसाच का!! बाकी त्या कासवाच्या पिल्लांबद्दल उगीचच हळहळ वाटते खरी पण सही असेल दृष्य, छोटी छोटी पिल्लं पूर्ण किनार्यावर..
|
Bee
| |
| Thursday, October 12, 2006 - 2:06 am: |
|
|
खरचं की ग मैत्रेयी.. ऐवढी 'जलनेती' उर्फ़ 'नैत्रस्नान' करुनही चुकीचे वाचले आणि लिहिले मी :-) मैत्रेयी, तू national geographic कधी बघत नाहीस का.. त्यात किनार्यावर बिळातून कासवांची पिले बाहेर पडताना दाखवतात. पण मला कधीच लक्षात आले नाही की ती विरुद्ध दिशेला गेली तर पक्षांचा घास बनतील. खरच काय ही निसर्गाची निर्मिती काही कळत नाही..
|
Saee
| |
| Thursday, October 12, 2006 - 7:53 am: |
|
|
नलिनी, मी मुखपृष्ठांची वाट बघतेय.
|
Vnidhi
| |
| Friday, October 13, 2006 - 8:44 pm: |
|
|
लहानपणी आम्ही,पर्जन्यवृक्शाच्या शेंगांचे(चिक्कीची शेंग) ball बनवत असु.एकदम कडक ball होत असे..
|
Dineshvs
| |
| Saturday, October 14, 2006 - 5:07 pm: |
|
|
Vnidhi अरे वा, मला हा उपयोग माहितच नव्हता. याच्या शेंगा ईतक्या चिवट असतात कि झाडाखाली रस्ता असेल तर त्यावरच्या डांबराशी स्पर्धा करतात. हजारो गाड्या त्यावरुन गेल्या, कि त्यांचा चेंदामेंदा होतो, पण बिया तश्याच राहतात. अश्या शेंगांच्या सड्यामुळे रस्ता मात्र खडबडीत होतो.
|
Farend
| |
| Monday, October 16, 2006 - 7:02 pm: |
|
|
वा दिनेश, आणि थाळी उचलली की वाचायला क्रिकेट! जरी झिम्बाब्वेचे असले तरी
|
Supermom
| |
| Monday, October 16, 2006 - 9:23 pm: |
|
|
दिनेश, भाकरीच्या पिठातच कांदा चिरून मिसळलाय का? रेसिपी टाका ना.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 17, 2006 - 12:34 am: |
|
|
ज्वारीच्या पिठात किसलेला कांदा, कोथींबीर आणि मिरचीचा ठेचा घालायचा. चवीपुरते मीठ घालायचे. थेट तव्यातच थापायची. मंद आचेवर एका बाजुने झाली कि परतुन टाकायची. झाली कांदा भाकर.
|
Lajo
| |
| Tuesday, October 17, 2006 - 2:19 am: |
|
|
भाकरी मस्तच दिसतेय आणि मडक्यातलं दही आ हा हा.... मला एक दोन प्रश्न विचारायचे आहेत इथला कांदा किसला की कडवट होतो. त्याला कारण काय असावे? आणि त्यावर उपाय काय? माझी दोन्-तीन वेळेला किसलेला कांदा घालुन केलेली ग्रेव्ही कडवटसर झाली आणि शेवटी फेकुन द्यायला लागली. त्यामुळे हल्ली मी कांदा किसणे हा विचारच मनात आणत नाही.
|
Bhagya
| |
| Tuesday, October 17, 2006 - 2:19 am: |
|
|
ज्वारीची कांदा भाकर? दही? ताजे बेसील? आणि मला?
|