|
अरूण नलावडे आणि मंडळीनी केलेली 'वरात' पहून आत्महत्येचे विचार मनात आले...
|
>> दोन्ही अलूरकरांकडे ते झोपलेले नसताना मिळतात..

|
Bee
| |
| Saturday, September 30, 2006 - 2:14 am: |
| 
|
अरे मद्याला मुलगी झाली आणि तो नक्कीच busy असेल म्हणून मी त्याच्याकडे माझी जी CD आहे ती अजून परत आणली नाही. आमची घरं एकमेकांच्या घरापासून ही लांब आहेत. तेंव्हा थोडी वाट बघा. मग मी सर्व माहिती इथे लिहीन.. अर्थात माझ्या बीबीवर. प्रिया धन्यवाद! माझ्याकडे फ़क्त लताचे मराठी अभंग आहेत. हिंदी भजन इथे मला शोधून मिळाले नाही. सलिलदाच्या सीडीवर तर माझा किती दिवसांपासून शोध चालला आहे पण तू म्हणते आहेस ते collection इथे उपलब्ध झालेले नाही. रॉबीन, थोडा थांब.. देईन मग :-) मदभरीची MP3 मजजवळ देखील आहे. records वर गाणी ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे. इथे कुणी ऐकते का record वर गाणी.. असो धन्यवाद!!!!
|
Dineshvs
| |
| Saturday, September 30, 2006 - 2:27 am: |
| 
|
रॉबीन म्हणतोय ते वरात आणि रविवारची कहाणी खुपच छान आहे. नीलम प्रभु, श्रीकांत मोघे, आशालता वैगरे कलाकार आहेत. कट्यार आणि नटसम्राटचे चित्रीकरण दुरदर्शनकडे असायला पाहिजे. जुन्या संगीत नाटकांपैकी स्वयंवर, सौभद्र, कान्होपात्रा वैगरे उपलब्ध आहेत, पण त्यांचे चित्रीकरण अलिकडचे आहे. मेधा गोगटेचे मानापमान उपलब्ध आहे, पण मूळ कलाकारां ईतका दर्जा नाही गाण्याचा. सीडीवर मात्र बाल गंधर्व, छोटा गंधर्व यांचे गायन उपलब्ध आहे.
|
Bee
| |
| Saturday, September 30, 2006 - 2:53 am: |
| 
|
रॉबीन, तू भारतात आहे म्हणून मी तुला हे सांगतो. हे बघ, दादरला गेलास की ज्या बाजुला भरगच्च बाजार आहे त्या बाजुला उतर. ती पुर्ण की पश्चिम बाजू मला माहिती नाही. तुला IDEAL book store माहिती असेलच. तर त्या बोळीत तू शिरूच नकोस. main lane मधून जाताना रस्त्याच्या डाव्या बाजुला एक छोटे दुकान आहे. तिथे तुला जुने मराठी अभंग वगैरे मिळतील. तिथे ही CD तू शोधून बघ. त्यांच्याकडे खूप मोठा stock ठेवला होता त्यावेळी. अजुन असेल कारण मला इथे येऊन फ़क्त चारच महिने झालीत. बहुतेक ९५ रुपयाची आहे. त्या गल्लीत CD मिळण्याची खूप दुकाने खरच नाहीत तेंव्हा तू जर थोडा शोध घेतला तर तुला हे दुकान गवसेल. मी IDEAL मध्ये रविवारी गेलो त्यादिवशी ते बंद होते. मग निराशेपोटी बाहेर पडलो तर हे एक दुकान दिसले. तिथे ही CD मला मिळाली. पत्ता एकदम सोपा आहे.
|
Vaatsaru
| |
| Saturday, September 30, 2006 - 12:48 pm: |
| 
|
विषय निघालाच आहे तर... पु लंची वरात आहे माझ्याकडे, संपूर्ण आहे VCD/Mpeg स्वरुपात Quality अर्थातच फ़ार उत्तम नाही पण बघायला धम्माल येते 
|
Arun
| |
| Friday, October 06, 2006 - 3:35 am: |
| 
|
प्रिया : वार्यावरची वरात आणि एका रविवारची कहाणी च्या VCDs माझ्याकडे आहेत. एकूण ३ VCDs आहेत. ( original संचातील.) तू देशात आलीस की तुला मी त्या देऊ शकेन. किंवा कोणी ओळखीचे तिथे येणार असेल, तर त्यांच्याकडे देऊ शकेन .........
|
Priya
| |
| Friday, October 06, 2006 - 8:18 pm: |
| 
|
अरुण, अगदी मनापासून धन्यवाद. इतक्यात माझीही फेरी नाही होण्यासारखी आणि कोणी येणारेही नाही, पण तरी लक्षात ठेवेन. तू इतके आपुलकीने देऊ केलेस - खूप खूप आभार.
|
Manmouji
| |
| Monday, October 09, 2006 - 4:47 am: |
| 
|
अरुण मी पुण्यात रहतो. मला मिळु शकतिल काय?
|
Vaatsaru
| |
| Monday, October 09, 2006 - 7:35 pm: |
| 
|
मला बर्याच लोकांच्या विचारणा मिळाल्या 'वरात' मिळू शकेल का म्हणून मिळू अर्थातच शकेल, पण कसे ? ऍडमिन, काही उपाय करता येइल का ? मला वैयक्तिकरीत्या सगळ्याना पाठवणे शक्य होणार नाही
|
Mbhure
| |
| Monday, October 09, 2006 - 8:01 pm: |
| 
|
Original कट्यार... उपलब्ध नाही. मागे एकदा मी लिहीले होते की, दुरदर्शनवर नाटक सादर झाले होते त्याची व्हिडीओ कॅसेट होती. पण कोण्या अतिशाहाण्या केंद्रिय संचालकाने, अतिउत्साहाच्या (?) भरात्; दुसरी कोणतीही रिकामी टेप न मिळाल्यामुळे, त्यावर राजीव गांधींची, पंतप्रधान होण्याआधीच्या निवडणुकीची, सर्वात पहिली मुंबईची सभा (शिवाजी पार्कवरील सभा) टेप करुन नाटक पुसुन टाकले. त्यामुळे आता त्यातील " रागमाला " आणि मुळ जुगलबंदी (सुरत पिया की) अजिबात मिळत नाही. " सुरत पिया की.. " सोलो आहे पण.... त्यातल्या त्यात लागी कलेजवा कट्यार, दिन गेले भजावीण सारे (भार्गवराम आचरेकर) हे मिळू शकते. दुसर्या गाण्याचे रेकॉर्डिंग फार क्लियर नाही. ह्या नाटकाचा OST ची रेकॉर्ड काढली असेल तरच काही चान्स आहे.
|
Karadkar
| |
| Monday, October 09, 2006 - 8:02 pm: |
| 
|
वाटसरु, तुम्ही मला त्या फ़ाईलच्या साईझ सांगु शकाल का? काही करता येते का पहाते.
|
Dineshvs
| |
| Tuesday, October 10, 2006 - 2:31 am: |
| 
|
टिव्हीवर सादर झालेले नाटकहि मुळ संचात नव्हते. त्यात बकुल पंडित नव्हती. जान्हवी पणशीकर होती. माझे आजोबा, भार्गवराम आचरेकर यांचे एकच गाणे होते. टिव्हीवर अलिकडे सादर झालेले चंद्रकांत लिमये यांचे चांगले होते. त्यात लहान सदानंदाचा एक पुर्ण प्रवेश होता. ( आधी तो सादर झाला नव्हता ) त्यात गोरख कल्याण मधला तराणा, वैगरे अनेक गाणी होती. लिमयांच्या चाली किंचीत वेगळ्या होत्या.
|
Arun
| |
| Tuesday, October 10, 2006 - 3:25 am: |
| 
|
मनमौजी : हो. पुण्यात कुठे असतोस तू?
|
Manmouji
| |
| Tuesday, October 10, 2006 - 4:26 am: |
| 
|
अरुण, मी कोथरुड भागात रहातो.
|
Bee
| |
| Tuesday, October 10, 2006 - 8:46 am: |
| 
|
वाटसरू, पोष्टाचा आणि CD चा जितका खर्च येईल तितका मी तुम्हाला पाठवून देईन. मलाही मुळ नाटक हवे आहे. फ़ुलराणी हे नाटक देखील मुळ स्वरुपात आहे. ललित केंद्राचे सतीश आळेकरांकडे मुळ नाटकं असतात. त्यांनीच नक्षत्रांचे देणे मधला फ़ुलराणीचा भाग त्यांच्याकडे असलेल्या संचयमधुन दिला.
|
Arun
| |
| Wednesday, October 11, 2006 - 3:36 am: |
| 
|
मनमौजी : तुला मेल पाठवली आहे .......
|
|
चोखंदळ ग्राहक |
 |
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|