अरे वा, बाहेर पाटी लागत नाही तोवर मंडळी जमली सुद्धा! मनापासून स्वागत आणि आभारही. पण मंडळी, अहो या रंगमंचावर काही सादर करण्याची तयारी झालेलीच नाही अजुन! तोवर कुणाला इथे आपले प्रयोग लावायचे असतील तर कळवा. अगदी आनंदाने जागा मिळेल इथे.
तोवर मोजुन पन्नास वर्ष अभिनय, दिग्दर्शक, निर्माता अशा विविध भुमिकांमधुन आपले मनोरंजन करणार्या आणि नुकतेच तब्बल ८३ व्या वर्षात पदार्पण करणार्या चिरतरुणाचे हे एक मोहक छायाचित्र. या माणसाची कामावरची निष्ठा, प्रेम, काटेकोरपणे वेळ पाळणं, संपूर्ण व्यावसायिकता हे गुण जरी बाणवता आले तरी खूप झाले! इतरांच्या आयुष्यात काही सुंदर क्षण निर्माण करणं मात्र याच्यासारख्या काही भाग्यवंतांनाच जमतं.
![Dev Anand](/hitguj/messages/58489/117029.jpg)