Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through September 19, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through September 19, 2006 « Previous Next »

Dineshvs
Saturday, August 26, 2006 - 2:36 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरु, राशीचक्रातली वृषभ रास ऐकली आहेस ना ?

Sunidhee
Wednesday, August 30, 2006 - 10:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

कित्ती गो sssss ड फोटो आहे..... बाकी वर्णन नेहमीप्रमाणेच सुन्दर!!! दिनेश ह्यांनी आता त्याना काय माहित नाही ह्यावर एक लेख लिहावा !!! ४ ओळि लिहिता आल्या तरी खूप झाल. :-)

Dineshvs
Thursday, August 31, 2006 - 2:39 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

सुनिधी, याचे सगळे श्रेय माझ्या मॉडेलला बरं का !

तश्या मला बर्‍याच गोश्टी माहित नाहीत
मला वैभव निनावि सारख्या कविता कश्या करायच्या त्या माहित नाहीत.
मला आदित्य, ग्रेस सारखे फोटो कसे काढायचे ते माहित नाहीत.
मला नलिनी, भाग्यश्री, चंपक यांच्यासारखा अभ्यास करणे माहित नाही.
मला रचना सारखी चित्रे काढणे माहित नाही.
मला GS1 लालभाई यांच्यासारखे वैचारिक लिहिणे माहित नाही.

मला ललिता आणि प्रिया यांच्यासारखी गाणी लक्षात ठेवणे माहित नाही.
हि यादी आणखी खुप वाढवता येईल. पण चार ओळी, खुप झाल्या नं.
BTW या सगळ्यांबद्दल मला असुयायुक्त आदर आहे.


Avikumar
Thursday, August 31, 2006 - 7:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, आम्हालाही तुमच्या लिखानामुळे तुमच्याबद्दल असुयायुक्त आदर आहे! :-)

Rachana_barve
Friday, September 01, 2006 - 1:55 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश तुम्ही कसल सुरेख लिहिता. आम्हाला अगदी त्या त्या ठिकाणी नेऊन पोहोचवता. तुमच श्बदचित्र हेवा करण्यासरखच असत :-) तुमचा मॉडेल गोड आहे अगदी :-)

Sunidhee
Wednesday, September 06, 2006 - 6:17 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अरेच्चा खरेच लिस्ट आली की. :-)

Leenas
Thursday, September 07, 2006 - 7:07 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, तुम्ही खरच छान लिहिता, रेसीपिज इतकेच प्रवासवर्णन लिहीण्यावर प्रभुत्व असणे म्हणजे नक्कीच great

Asmaani
Saturday, September 09, 2006 - 7:12 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, उंट आणि सूर्य खूप छान आहेत. एक request होती. looking for receipies मधे, ४ sept ला मी एक प्रश्न विचारलाय. sanash_in_spain(i think ashwini) ने मला उत्तर दिलय. पण तुमचेही मत सांगाल का प्लीज?

Pooh
Tuesday, September 12, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश,

ओमान मधल्या सर्वसामान्य लोकांना साधारण पगार किती असतात याची काही कल्पना देऊ शकाल का?

टॅक्सेस नाहीत आणि एवढी स्वस्ताई म्हणजे पगार पण त्यामानाने कमी असतील असे वाटते आहे.


Dineshvs
Wednesday, September 13, 2006 - 3:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Pooh नक्कीच लिहिन याबद्दल. Asmaani गेल्या आठ दहा दिवसात, जरा कमी भेटी झाल्या ईथे. प्रश्ण परत विचारणार का ? ईथे लिहिला तरी चालेल.

Asmaani
Wednesday, September 13, 2006 - 3:07 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, माझा प्रश्न looking for reciepes मधून गायब झाला आहे. any way . सगळं पुन्हा लिहिते.
इथे indian store मधे fozen पराठे मिळतात. पण ते मैद्याचे असतात. आणि चवीलाही फार चांगले नसतात. शिवाय तुपकटही असतात फार. तर माझा प्रश्न असा आहे की स्वयंपाकाचा कंटाळा, कधीतरी एखाद्या trip हून रात्री उशीरा येणे वगैरे imergencies साठी असे काही पदार्थ घरी करुन frozen मधे ठेवता येतील का? किती टिकतील? विशेषत्: गव्हाचे भाज्या भरुन stuffed पराटे असे frozen मधे ठेवले तर किती टिकतील? त्याता preservatives घालावे लागतील का? शिवाय ते पूर्ण fry करुन ठेवावेत की कच्चे.


Dineshvs
Wednesday, September 13, 2006 - 4:58 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे पराठे माझ्याहि घरी खुपदा असतात. त्यात अनेक प्रकारहि उपलब्ध आहेत.
त्यामधे फारच प्रमाणात तेल असते हे खरे आहे.
मी स्वतः खुपवेळा आपले साधे घडीचे पराठे वैगरे करुन ठेवतो. नुसती कणीक भिजवुन ठेवण्यापेक्षा असे पराठे करुन ठेवणे चांगले. एकदा लाटायचा मुड लागला, कि भराभर लाटुन होतात. हे पुर्ण न भाजता, गुलाबी डाग पडेपर्यंतच भाजतो आणि मग एका वेळेस लागतील तिथके प्लॅष्टिकच्या थैलीत पॅक करुन फ़्रीजमधे ठेवतो.
पण ते जर फ़्रीजरमधे ठेवले तर त्याचे तुकडे पडतात, पण जर चिलरमधे ठेवले तर व्यवस्थित राहतात. पण मी सात आठ दिवसापेक्षा जास्त ठेवत नाही.आयत्यावेळी हे १५ मिनिटे आधी बाहेर काढुन तव्यावर मंद आचेवर भाजतो.
मुगाची खिचडी पण मी करुन ठेवतो. भाज्या, तुरीची डाळ, राजमा, बटाटे असे सगळे उकडुन ठेवलेले असतेच. आयत्यावेळी पुढची प्रोसेस करता येते. तुरीची शिजवलेली डाळ तर आयत्यावेळी खुपच कामाला येते.
व्हाईट सॉससाठी मी दुध पावडर आणि मैदा बटरमधे भाजुन ठेवतो. कांदा कापुन परतुन ठेवलेला असतो.
मी ओल्या काजुच्या उसळीत लिहिलेल्या मसाल्याचे गोळे तयार असतात. तेहि आयत्यावेळी कामाला येतात.


Robeenhood
Thursday, September 14, 2006 - 2:14 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा वा जितके सुन्दर समाजजीवन तेवढेच सुन्दर लिखाण! काय योग आहे वाचकांचा!

Dineshvs
Thursday, September 14, 2006 - 4:18 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

रॉबीन, हाच विषय दिवाळी अंकासाठी घेतल्याने, माझी संधी हुकली कि.

Anilbhai
Thursday, September 14, 2006 - 5:47 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अस म्हणुन कस चालेल. अजुन किती तरी देश बाकी आहेत की. गोव्या बद्दल अणखी लिही की. :-)


Asmaani
Sunday, September 17, 2006 - 7:27 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, thanx . मी आता ट्राय करुन बघेन असे frozen पराठे.

Bhagya
Monday, September 18, 2006 - 1:14 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! इतकी जबरदस्त तयारी असेल स्वयंपाकाची तर काय पाहिजे? म्हणून तर घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही छान छान खायला मिळत असेल, हो ना दिनेशदा?

Meggi
Monday, September 18, 2006 - 11:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, दुबई बद्दल लिहा ना, अशी संधी हुकवुन कशी चालेल :-)

Dineshvs
Monday, September 18, 2006 - 1:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

भाग्य, पाहुण्याना नेहमी ताजे जेवण असते गं.
Meggi दुबईमधे माझे बरेच वास्तव्य झाले खरे, पण नाही आवडला तो देश.
मस्कतबद्दल अजुन लिहायचे आहे बरेच.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators