Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 26, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through August 26, 2006 « Previous Next »

Bee
Thursday, August 24, 2006 - 10:13 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

पण गजानन, असे जर काटे खाल्ले तर जीभेला वेदना होत असतील.. हा कसला खाऊ मग.. आम्ही तर ह्या झाडांची फ़ळे आणि वावडींग ला जी फ़ळे लागतात ती फ़ळे घरी आणून त्याची गर्द जांभळी शाई करत असू आणि चित्रकलेच्या वहीत रंगही त्याचेच भरायचो. मी ती शाई पेनात पण भरायचो. आम्हाला जांभळ्या रंगाची शाई वापरणे बंद केले होते बाईंनी पण तरीही माझा त्या शाईवरचा मोह गेला नाही.

Gajanandesai
Thursday, August 24, 2006 - 10:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी, ते काटे सुईसारखे वगैरे अणकुचीदार अजिबात नसतात.
जाडच्या जाड, शंकूच्या आकाराचे, फणसाला असतात तसे पण त्यापेक्षा बरेच मोठे आणि कठीण असतात.

थोडीशी काळजी घेऊन तोंडात न टोचता चावता येतात..

Dineshvs
Thursday, August 24, 2006 - 10:49 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हि घाणेरीच. याला अगदी घाण वास येतो रे. निदान उग्र तरी असतोच. याचे दोनशे वैगरे प्रकार आहेत.
ग्रामीण भागात याला रायमुनिया असेहि म्हणतात. जंगलातली याची जाळी ईतकी दाट असते, कि अख्खा वाघहि लपुन बसु शकतो.
याची फळे हरिणवर्गी प्राण्याना आवडतात.
खरे तर हे झाड ऑस्ट्रेलियातुन CBDG आले. सर्व भारतभर याचा प्रसार झालाय. याला नष्ट करायचे सर्वच प्रयत्न फसले आहेत. एखादा जैविक अपघातच हे झाड आता नश्ट करु शकेल. तसे प्रयत्न चालु आहेत.

गजाननने लिहिले ते शिवर म्हणजेच सावर, किंवा काटेसावर. संस्कृतमधे शाल्मली. याचे काटे बोथट असतात. माझ्या वडीलांच्या लहानपणी पण काथाला पर्याय म्हणुन खात असत.




Gajanandesai
Thursday, August 24, 2006 - 11:24 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

याला अगदी घाण वास येतो रे. निदान उग्र तरी असतोच. याचे दोनशे वैगरे प्रकार आहेत...

....सर्व भारतभर याचा प्रसार झालाय. याला नष्ट करायचे सर्वच प्रयत्न फसले आहेत. एखादा जैविक अपघातच हे झाड आता नश्ट करु शकेल. तसे प्रयत्न चालु आहेत.
<<<

दिनेश ही माहिती, वर टाकलेल्या फोटोतल्या झाडाविषयीच देताय का?


Giriraj
Thursday, August 24, 2006 - 11:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला तर घाणेरीचा वास खूप आवडतो!

बी,तू 'अलिफ़ लैला' किंवा 'अरेबियन नाईट्स' वाचले आहेस का रे?


Limbutimbu
Thursday, August 24, 2006 - 11:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

घाणेरी नष्ट करायची? (दचकलेला चेहरा) अरे हे कॉन्ग्रेस गवत नाही हे रे भो!
याच्या पानान्चा काढा अस्थम्यावर घेतात!:-)
याच्या फुलात अफाट मध असतो! लहानपणी ही फुले आम्ही चोखत असु, ठिपका ठिपका मध प्रत्येक फुलात मिळायचा,जर कुणा फुलपाखरु किन्वा मधमाशीने, मुन्गीने ढापलेला नसेल तर! त्या फुलाच्या दान्डक्यातली मुन्गी जीभेच्या तोकाला सटकुन चावल्याचे स्मरते!
याची फळे अन्गठा आणि मधले बोट यात धरुन मधल बोट सपाक्किनी नेम धरुन उडवुन ती फळे मारायचो. क्षणार्धात कृती होत असल्याने कुणालाच कलायचे नाही की कोण मारले.
कुम्पणी करता ही वनस्पती अगदी आदर्श असते, गुरे तोन्ड लावित नाहीत! तसेच या झाडीत डास वगैरे ही होत नाहीत!


Dineshvs
Thursday, August 24, 2006 - 12:20 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, मी त्याच झाडाबद्दल लिहित आहे. अगदी चितमपल्लीसाहेबांचा हवाला देऊन.


Dineshvs
Thursday, August 24, 2006 - 3:37 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझे आवडते लेखक, मारुति चितमपल्ली यांच्या पाखरमाया ( प्रकाशक, साहित्य प्रसार केंद्र, सीताबर्डी, नागपुर, मुल्य १०० रुपये ) या पुस्तकातील माहितीवर पुर्णतः आधारित.

मला वाटतय कि मी घाणेरीबद्दल लिहिलेल्या सत्यस्थितीमुळे, माझ्या मित्रांचा विरस झालाय.
माझ्या लिहिण्यात एक बारिकशी चुक झाली, ती म्हणजे मी दोनशे जातींचा उल्लेख केलाय, त्या ऐवजी पन्नास अशी संख्या हवी होती.

लॅन्टाना हे खरे तर मुळ शोभेचे झुडुप. मराठीत घाणेरी, टणटणी अशी नावे आहेत आणि मी वर लिहिलेला रायमुनिया हा शब्द, मेळघाटातील कोरकु, या समाजाचा.

चिखलदरा ईथे पाद्री लोकानी, बंगल्याभोवती लावण्यासाठी म्हणुन हि झाडे आणली. पण हि वनस्पति ईतक्या वेगाने पसरली, कि तिथल्या जंगलाच्या व्यवस्थापनात, ती एक मोठी समस्या होवुन बसली आहे.

१९७२ साली तिथे व्याघ्र प्रकल्प सुरु झाल्यापासुन, तिथे नियमित होणारी वानिकीची कामे थांबली. आरक्षित क्षेत्र असल्याने, सर्व प्रकारचे संरक्षण मिळाले, त्यामुळे ती अधिकच फोफावली. जंगलात स्थलांतर करणार्‍या वन्य पशु पक्ष्यानी याला हातभार लावला. याच्या काळ्यानिळ्या रंगाच्या बेरीना कामुन्या म्हणतात. अस्वल, कोल्हे, खोकड, चांदी अस्वल, तृणभक्षी प्राणी, तसेच अनेक फ़लाहारी पक्षी यांचे हे आवडते खाद्य आहे. त्यांच्या विष्ठेतुन याच्या बियांचा अतोनात प्रसार झाला आहे.

मेळघाटात पुर्वी, बांबुची दाट बेटे होती. पण या घाणेरीमुळे बांबु नष्ट झालाय. बांबुला फ़ुलोरा आला कि तो मरतो, पण त्याच्या बिया जमिनीवर पडलेल्या असतात. पण मेळघाटात, अश्या फ़ुलोर्‍यानंतर आलेल्या पावसात, बांबुच्या बिया रुजण्यापुर्वीच, घाणेरी फ़ोफ़ावली. ती साफ़ करुन नविन लागवड करण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात, आणि ती जमिनीसकट कापली तरी हे झाड ईतके चिवट असते, कि त्याच्या मुळ्यातुन नविन रोपं फ़ुटतात. हि वनस्पति समूळ नष्ट करणे, आता आर्थिकदृष्ट्या अशक्य आहे.

शहरात आणि बागेत हे झाड जरा वेगळ्या रितीने वाढते. भरपुर पाणी मिळाल्याने, याच्या फ़ांद्या लांब व विरळ असतात. शोभेचे प्रकार तर जमीनीलगतच वाढतात. मात्र जंगलातले झाड वेगळ्या तर्‍हेने वाढते. तिथे फ़ांद्या दाट असतात, व चिवटहि असतात.

या दाट जाळीत, वाघ विश्रांति घेतो. गरुडाचा पाठलाग वाचवण्यासाठी एखादा मोरहि या जाळीत शिरतो. हे झाड ईतके चिवट असते, कि अस्वल यावर आपले पाय ठेवुन,आपला पुर्ण भार टाकुन, याची फ़ळे खाते. पण या पानांचा उपयोग, जर जनावरांसाठी चारा म्हणुन झाला असता, तर त्यावर नैसर्गिक नियंत्रण राहिले असते. ( मला गजाननने लिहिलेला, या पानाचा खाण्यासाठी होणारा प्रयोग, याबद्दल शंका वाटतेय. )

उन्हाळ्यात रायमुनियाची पानगळ झाली कि, त्याच्या फ़ांद्या कडकडीत सुकतात. ठिनगी पडली कि सरसरुन पेटतात. ( आदीवासी स्त्रीया हे जळण म्हणुन वापरतात. पण फांद्या काटेरी आणि ओरबाडणार्‍या असल्याने, ती तोडणे कष्टाचे असते. ) यामुळे ईतर वृक्ष, आणि वन्य पशुपक्षी यांचे बळी जातात.

खरे तर मेळघाटात हि वनस्पति अनवधानाने आली. पण ज्या ऑस्ट्रेलियातुन हि वनस्पती आली, तिथे तिच्यावर नियंत्रण ठेवणारे जीवहि आहेत. पण आपल्याकडे मात्र अश्या जीवांच्या अभावाने, तिला मोकळे रान मिळाले आहे.

( आपल्या भाग्यश्रीने Bhagya मागे एकदा तिथल्या वेड्या बाभळीचा फोटो पोस्ट केला होता. तिथे सुबक ठेंगडे असणारे ते झुडुप, ईथे काय विलक्षण वेगाने वाढते, ते बघायला हवे. या विलक्षण वेगामुळे, वनखात्याने आपली अब्रु झाकण्यासाठी त्याची भरमसाठ लागवड केलीय. आणि त्या झाडाने बाकिची झाडे गिळंकृत केली आहेत. बरे हि झाडे भराभर वाढल्याने, खोड अगदीच कमकुवत असते आणि जराश्या वादळात कोसळते. ते सरळ वाढत नसल्याने, तसा काहि उपयोगहि नाही. यावर फारसे पक्षीहि दिसत नाहीत, कि वेटोळ्यासारख्या दिसणार्‍या याच्या शेंगा कुणी प्राणी खातहि नाही. )

या घाणेरीची फुले सुंदर दिसतात, यात अनेक रंग उपलब्ध आहेत, हे मान्य, पण ते झाड आपली जैविक विविधता, नष्ट करत असेल तर काय फायदा ?
देहराडून येथील वानिकि संशोधन केंद्रात रायमुनिया, जीवशास्त्रीय नियंत्रणाद्वारे नष्ट करता येईल का, यावर संशोधन चालु आहे, पण त्याला अजुनहि यश आलेले नाही.

घाणेरीमुळे इथल्या बदलत्या वनश्रीची अंतिम अवस्था जवळ आली असल्याचे वनतज्ञांचे मत आहे. पण आता हे सगळे मानवाच्या हाताबाहेर गेले आहे.




Dineshvs
Thursday, August 24, 2006 - 4:59 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गिरु, आलिफ़ लैला चा अर्थ एक हजार एक, असा आहे. त्या लैलाशी काहि संबंध नाही.
आणि तशीहि लैला कुरुप होती रे दिसायला. फक्त मजनुला ती सुंदर दिसत असे.


Limbutimbu
Friday, August 25, 2006 - 3:09 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशभाव, नीटपणे समजावुन सान्गितलेत :-) हा विषय मला माहीत नव्हता!
पण निसर्गच त्यावर उत्तरही शोधेल!


Bee
Friday, August 25, 2006 - 4:03 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

इतके चांगले झाड नष्ट करणार आहे.. अरेरे.. दिनेश ह्या फ़ुलांचा किती छान गंध येतो तुम्हाला न यायला काय झाले कळत नाही. मी म्हंटलय ना वर फ़ळांना कामुन्या म्हणतात पण माझ कुणीच ऐकत नाही.
दिनेश चांगली माहिती दिलीत. मी आधीच म्हंटलय तुम्हाला की तुम्ही निसर्गपर लेख खूप छान लिहू शकता. तसे सगळेच लेख तुम्ही छान लिहिता पण निसर्गपर लेख A-one!

बर मोर त्या गरुडाचा पाठलाग का करतो आणि गरुड इतका खाली कशाला येतो. मला तर माहिती आहे की गरुडाचे कोटरे खूप उंचावर असते आणि गरुड फ़क्त वेगाने झेप घेऊन आपले भक्षक वर उचलतो आणि वरच्यावरच फ़स्त करतो.


Dineshvs
Friday, August 25, 2006 - 4:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मोर नाही रे गरुडच पाठलाग करतो मोराचा. बोजड पिसार्‍यामुळे मोराला उडणे जरा कठीणच जाते. आणि गरुडाचा प्रतिकार तरी कसा करणार तो ?
बाकि गरुड माकडाच्याच काय, कांगारुच्या पिल्लाला देखील उचलुन नेऊ शकते. नॅशनल जिओग्राफिक वर दाखवले होते तसे.


Gajanandesai
Friday, August 25, 2006 - 5:16 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, विरस वगैरे नाही हो. पण तुम्ही त्याचा वास 'अगदी घाण', 'उग्र' वगैरे म्हटल्यावर तुम्हालाच काय पण मलाही माझ्या घ्राणेंद्रीयाची शंका आली :-). May the plant I wrote about be different from the one you described..
असा घाण वास असलेली झाडे शोभेकरता लावल्यावर त्या परिसरात दुर्गंधी पसरत नाही का असेही वाटले.

असो, तुम्ही वेळ काढून वरील माहिती इथे दिलीत त्याबद्दल अनेक धन्यवाद.


Bhagya
Friday, August 25, 2006 - 5:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हो, दिनेशदा ने उल्लेख केलेल्या वेड्या बाभळीचे बरेच दुष्परिणाम आहेत. इथे त्याला common wattle अथवा black waatle असेही म्हणतात. सध्या या वेड्या बाभळी इथे जोरात फ़ुलल्या आहेत. यांचा फ़ुलोरा बघायला छान असतो, पण त्याच्या परागकणांमुळे अनेकांना allergy होते.
आणि इतकेच नाही, तर ही झाडे दुसर्‍या झाडांना रुजू देत नाहित, आणि पाण्याची पातळी पण या झाडांमुळे खालावते. वाचा:
Black wattle (Acacia mearnsii) is a fast growing leguminous (nitrogen fixing) tree. Native to Australia, it A. mearnsii is often used as a commercial source of tannin or a source of fire wood for local communities. It threatens native habitats by competing with indigenous vegetation, replacing grass communities, reducing native biodiversity and increasing water loss from riparian zones.
संदर्भ :
http://www.issg.org/database/species/search.asp?st=sss&;sn=&rn=United%20States%20 (USA)&ri=18909&hci=-1&ei=-1&fr=1&sts=sss
आणि इथे या native झाडांचे असे दुष्परिणाम फ़ारसे आढळत
नाहित हे पण खरे आहे. मारुती चितमपल्लिंच्या चकवाचांदण या पुस्तकात पण ही माहिती आहे.

Bhagya
Friday, August 25, 2006 - 5:34 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हा बघा फोटो black wattle चा. अशी सगळीकडे फ़ुलली की दिसते मात्र छान. babhul

Dineshvs
Friday, August 25, 2006 - 10:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

गजानन नक्कीच ते झाड दुसरे असणार, मी फोटोतल्या झाडाबद्दल लिहिले.
भाग्य, असाच त्रास ईथे सप्तपर्णी फ़ुलली कि होतो. खास करुन दमेकर्‍याना, त्याचा त्रास होतो.


Vnidhi
Friday, August 25, 2006 - 3:50 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आपण खुपच सुंदर लिहीता....धन्यवाद...

Moodi
Friday, August 25, 2006 - 4:02 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश खरच आपण शर्मिलाने काढलेल्या सदरात वृक्ष वनस्पतींची माहिती देऊच. इथे पण छान माहिती दिलीय तुम्ही.
ओमानी संस्कृतीचे(घराचे) फोटो पाहुन मजा वाटली. एक ठरावीक बांधणी, अरबी झलक. अजून आधीचे वाचन चालूच आहे. बाकी मस्तच.

भाग्या तुझ्या परदेश दौर्‍याबाबत कधी लिहीणार आहेस? फोटो मस्त आलाय गं.


Giriraj
Saturday, August 26, 2006 - 10:38 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मला माहितेय त्याचा अर्थ म्हणूनच मी विचारले बी ला! त्यात कश्या एका गोष्टीतून पुढची गोष्ट उलगडते तसेच आहे या बी चे... एका प्रश्नाचे उत्तर दिले की त्यातून एखादा प्रश्न तयार करतोच तो!
:-)


Limbutimbu
Saturday, August 26, 2006 - 10:56 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

>>>> एका प्रश्नाचे उत्तर दिले की त्यातून एखादा प्रश्न तयार करतोच तो!
नशिब समज गिर्‍या की तो गणितिय पद्धतीने म्हणजे एकातुन एकच निर्माण करतो, भुमितीय पद्धतीने नाही जसे की एकातून दोन, दोनातून चार, चारातून आठ.....!

चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators