Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 24, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through August 24, 2006 « Previous Next »

Bee
Wednesday, August 23, 2006 - 9:06 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश :-) धन्यवाद! ज्यांना ज्यांना तिळ हवे आहे त्यांनी खरच घेऊन जावे माझ्याकडुन फ़क्त जे काही कराल त्यात माझाही थोडा हिस्सा :-)

मूडी, हे बघ दिलेत की नाही धन्यवाद.. :-) आणि तुलाही धन्यवाद इतक्या गोड शब्दात समजावून सांगितल्याबद्दल.. :-)


Moodi
Wednesday, August 23, 2006 - 9:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी खवचटपणा नको. तुझी पोस्ट मला अशी वाटतेय. घ्या दिनेश मानले तुमचे आभार(एकदाचे) मूडीने सांगीतले म्हणून.

Bee
Wednesday, August 23, 2006 - 9:35 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तसे मुळीच नाही मूडी! मी मनातून त्यांचे आभार केंव्हाच मानले जे इथे व्यक्त करता येत नाही. माझा आळशीपणा म्हण, त्यामुळे ती एक आभाराची ओळ लिहिली नाही मात्र हे सर्व दिनेशच्या बाबतीत व्यक्त करण्याची गरज वाटत नव्हती. तुला किंवा इतरांना मी thanksless वाटू नये म्हणून तुमच्याखातर मी धन्यवाद लिहिले हे मात्र नक्की आहे. दिनेश मला ओळखतात, त्यांचा माझ्याबद्दल गैरसमज झाला तर माझा समंजस व्यक्तीवरचा विश्वास उडून जाईल.. तुलाही मी कुठे दर वेळी आभार वगैरे लिहितो.. तू इतकी समंजस क्षमाशील आहे की चूक भूल विसरून जातेस :-)

दिनेश, मी पावकिलोची सुके खोबरे आणि लसूण घालून चटणी करुन बघतो. तिळ खूप उष्ण असतात म्हणून आणि एकतर चटण्या संपत नाही म्हणून, जरा कमी प्रमाणात करुन बघतो. हेच जर काळे तिळ असते तर नक्की लवकर संपले असते. पण ह्या काळ्या तिळाचे काही वाटण बिटण केले तर काळीकुट्ट आमटी खावी लागते. ते बर वाटत नाही.


Moodi
Wednesday, August 23, 2006 - 9:42 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बी आभार मानण्यात उशिर झाला तरी चालतो पण आळशीपणा करु नये. मी पण बर्‍याच वेळा चुकते, पण उशिर झाला की चूक दुरुस्त करतेच. आणि विरोधासाठी विरोध मी तुला कधी केला नाही. उगाच टीपीला विषय पाहीजे म्हणून एखाद्याच्या कथा कादंबर्‍या घ्यायच्या किंवा चूका शोधायच्या आणि त्या चघळत बसायच्या असे मी कधी करत नाही. त्यामुळे निदान असे शब्द माझ्या बाबतीत तरी वापरु नकोस. आणि मी कसली क्षमाशील? साधारण माणूस म्हटलेस तरी पुरे. :-)

Moodi
Wednesday, August 23, 2006 - 9:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

काही सांगणार नाही म्हटले तरी सांगतेच( जीत्याची खोड मेल्याशिवाय जात नाही म्हणतात, तशीच मी). ते थोडे तीळ, चिवड्यासाठीच्या पंढरपुरी डाळ्या, सुके खोबरे, भाजलेले शेंगदाणे याची कोरडी पावडर करुन ती वाटणात वापर ग्रेव्हीसाठी. तीळ कमी घे, ते कडू असतील. दिनेश सॉरी पाककृती विभाग इथे आणल्याबद्दल, या बी ला हाणा आता.

Bee
Wednesday, August 23, 2006 - 9:47 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

उगाच टीपीला विषय पाहीजे म्हणून एखाद्याच्या कथा कादंबर्‍या घ्यायच्या किंवा चूका शोधायच्या आणि त्या चघळत बसायच्या असे मी कधी करत नाही.>>>>>>मीही असे कधी केल्याचे आठवत नाही मूडी. तुझा बोट माझ्याकडे तर नाही :-)

तू साधारण क्षमाशील आहेस :-)


Moodi
Wednesday, August 23, 2006 - 9:50 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही तुला नाही. तू विरोधाला विरोध म्हणालास ना म्हणून म्हटले.

Jadhavad
Wednesday, August 23, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आलो रे बी मी तिळ घ्यायला, का तु येतोस शेन्टॉन वे ला?
अमित


Zakki
Wednesday, August 23, 2006 - 10:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

तुमचे लिखाण मी नेहेमीच वाचतो नि मला आवडते. पण त्याची दाद कुठे लिहायची ते कळत नव्हते. वर भलतेच विषय चालू आहेत म्हणून शंका वाटली. असो. लिहीत रहा! धन्यवाद!

Moodi
Wednesday, August 23, 2006 - 10:18 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

झक्की होते असे कधी कधी. तुम्ही नाही का सारखे पुण्यावर बोलता तसेच आम्ही पण काही वेळेस करतो. रागवु नका लहानांवर. दाद इथेच द्या हो.

Surabhi
Wednesday, August 23, 2006 - 10:37 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ओमानच्या खाद्यसंस्कृतीचे वर्णन खरच कीती अप्रतिम केलेत!
मालवणी खाज्याच्या रेसिपी साठी Thank-you.
रचनाने म्हटल्याप्रमाणे ते हल्ली हातगाड्यावर उघड्यावर विकतात आणी त्याला जो भडक लाल रंग फासलेला असतो ना की बघूनच खाणार्‍यची ईच्छा मरून जाते. आता घरी करून पहायला हरकत नाही!

Dineshvs
Wednesday, August 23, 2006 - 3:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

किरण, गर्वाने नाही पण एक नवल म्हणुन सांगतो माझ्या स्मरणशक्तीचा प्रकार फोटोग्राफिक आहे. म्हणजे मला एखादे नाटक त्यातल्या नेपथ्यासकट आठवते. त्यामुळे हि सगळी दृष्ये डोळ्यासमोरुन तरळुन जातात. पण तरिहि त्यात खास काहि आहे, असे मला वाटत नाही.

बी, तुझ्या विश्वासाला पात्र ठरण्याचा मी कायम प्रयत्न करेन. मूडि, असुदेकि, तोहि आपलाच आहे.

झक्की, तुम्ही वाचताय हे वाचुनच मला बळ आले.


Rupali_county
Wednesday, August 23, 2006 - 11:45 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा

अतिशय छान लिखाण..खरच जाउन यावस वाटत ओमानला..

वाचून खरच छान वाटल.

अजून येउ द्या...



Badbadi
Thursday, August 24, 2006 - 4:20 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, हे वाचताना तुमची आठवण झाली म्हणून खाली लिन्क देत आहे. वेळ असेल तेन्व्हा वाचा..

http://bhatavimuktaunad-pamya.blogspot.com/2006/08/raatavaa.html

Bee
Thursday, August 24, 2006 - 8:04 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

बडे, मला आवडली वरची लिंक. दोनच लेख पण नितांत सुंदर आणि वेगळे.. अगदी मारुती चितमपल्लीची आठवण झाली..

दिनेश, ह्या झाडाचे नाव सांगाल का? मी लहानपणापासून ह्या झाडाला बघत आलो आहे. इथेही माझ्या ऑफ़ीसमध्ये हे झाड आहे आणि फ़ुले इतकी सुंगधी आणि गोड असतात की परत परत वास घ्यावासा वाटतो. तसेच फ़ळेही चवीला छान लागतात. आम्ही ह्या झाडाच्या काळ्याफ़ळांना 'कामूनी' म्हणायचो बालपणी. माझ्या ऑफ़ीसमध्ये जे झाड आहे त्यांना पिवळीलाल फ़ुले धरतात. अजून असे कितीक रंग असतील ह्या फ़ुलांचे तुम्हीच जाणे..

Yuwaraaj

Badbadi
Thursday, August 24, 2006 - 8:22 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

हे तर घाणेरी किंवा टणटणी चे झाड आहे ना!!!

Bee
Thursday, August 24, 2006 - 8:32 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ही दोन्ही झाडे मी कधी ऐकलेली नाही. घाणेरी हे एका जागेचे नाव आहे वर्‍हाडात.

बडे, असे छान छान ब्लॉग्स मलापण पाठवत जा आठवणीने. आधीच तुला मणभर आभार देऊन ठेवतो.


Moodi
Thursday, August 24, 2006 - 9:00 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

अहो दिनेश मी तरी त्याला कुठे परका समजतीय? म्हणून तर ४ वेळा भांडुनही परत बोलतेच ना.

बडे लिंकबद्दल थॅंक्स, मस्त लिहीलेय त्याने पण.
खरे तर वृक्षवल्लीवर पण एक नवीन सदर सुरु करायला हवे, छान माहिती मिळेल. तुमचा ओमान होऊ दे मग सुरु करु.
बी फोटो मस्त आलाय, पक्षी तर फार गोड आलाय.


Bee
Thursday, August 24, 2006 - 9:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

मूडी, तो पक्षी मी वरच्या लिंक वरूनच इथे आणला कारण ते झाड मला दिनेश ह्यांना दाखवायचे होते. तिकडे जावून तू वाचशीलच. पम्याला, ज्यानी हा फोटो घेतला, धन्यवाद!

Gajanandesai
Thursday, August 24, 2006 - 9:52 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आम्ही याला नारिंगीचे झाड म्हणतो. आणि त्याला जी छोटी छोटी फळे लागलेली दिसताहेत त्या चांगुण्या. रानमेव्यातलाच एक प्रकार (पिकलेल्या चांगुण्या खाल्ल्यावर जीभ काळी कुळकुळकुळीत होते म्हणून मजा वाटायची). दुसरे एक शिवर म्हणून झाड असते आमच्याकडे. त्याला कापूस लागतो. आणि फांद्यांवर जाडच्या जाड शंक्वाकृती ( conical ) काटे लागतात. फणसाला असतात तसे पण त्यापेक्षा बरेच मोठे आणि कठीण असतात. ते काटे या नारिंगीच्या पानात घालून खाल्ल्यावर जीभ नारिंगी रंगायची. हे आमचे खाऊचे पान! अर्थात विडा!

मला वाटते या झाडाचा एक फोटो दिनेशनी पण टाकला होता पूर्वी.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators