|
Surabhi
| |
| Saturday, August 19, 2006 - 5:28 am: |
|
|
दिनेश, फोटो मस्तच! आणि ओमान तर त्याहूनही! माझ्या एका मस्कतमधे राहिलेल्या मैत्रीणीला हे वाचायला सांगीतले होते तर ते वाचून ती एवढी खूष झाली की लगेच फोन करून आमच्या ओमानवरच तासभर गप्पा झाल्या!
|
Jayavi
| |
| Sunday, August 20, 2006 - 4:48 am: |
|
|
दिनेश गडाच्या वाटेचे दोन्ही फोटो अप्रतिम! इथल्या ५० डिग्रीच्या तापमानात इतका सुरेख गारवा मिळाला ना..... बाकी तुमचं लिखाण.... हाच एका कादंबरीचा विषय होऊ शकेल. तुम्ही हे सगळं कसं manage करता? तुमच्याबद्दल फ़ार फ़ार कुतूहल आणि प्रचंड आदर वाटतो. You are amazing Sir!
|
Bhingri
| |
| Sunday, August 20, 2006 - 9:15 am: |
|
|
दिनेश मामा, मस्त आले आहेत फोटो
|
Dineshvs
| |
| Sunday, August 20, 2006 - 12:46 pm: |
|
|
प्राजक्ता, ह्या विलायति चिंचा आता कुणी खातच नाही. jayavi छानच वातावरण होते तेंव्हा तिथे. आणि मी कुणालाहि ईमेलवर उपलब्ध असतो. अगदी हाडामासाच माणुस आहे मी, फक्त रंगीबेरंगी दिवसांचे आयुष्य जगलो, जगतोय. भिंगरि, तुझा फोटो ताईला पाठवला आहे.
|
Kiran
| |
| Sunday, August 20, 2006 - 5:54 pm: |
|
|
दिनेश, लिखाण आणि फोटो नेहमीप्रमाणे सुंदर. खरच एवढे तपशील ध्यानात ठेवणे फारच अवघड काम आहे बुवा!! आपण भेटलो आहोत त्याचा मला अभिमान वाटतो
|
Bhingri
| |
| Monday, August 21, 2006 - 7:06 am: |
|
|
मला पण पाठवा की फोटो.. फ़क्त ताई लाच का? .. माझा ID तुम्हाला मिळेलच....
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 7:25 am: |
|
|
किरण, आपल्या भेटीचा तर मलाहि अभिमान वाटतो. पण तुम्ही सगळे लोक माझ्या स्मरणशक्तीचे एवढे कौतुक का रे करता ? लिहायला बसले कि आठवतेच. आणि सगळ्याच बाबतीत नाही रे माझे डोके चालत. भिंगरि ईमेल पाठव.
|
Giriraj
| |
| Monday, August 21, 2006 - 7:55 am: |
|
|
आणि मला पण पाठवा या भिंगरीचे वाकड्या तोंडाचे फ़ोटो
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 9:24 am: |
|
|
दिनेश, माझ्याकडे काळे तिळ खूप उरले आहेत. मूडीने मला थोडेच सांगितले होते आणायला पण मी मात्र नंतर मिळतील की नाही म्हणून अगदी हावरटाप्रमाणे एक किलो काळे तिळ आणले. त्याचे मी आता लोणचे टाकू का :-) काहीतरी सुचवून बघा..
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 9:43 am: |
|
|
आईगं!!! लोणचं? अरे बी आता देशात जाणार असशील तर परत ने ते तीळ. नाहीतर रोज सकाळी छोटा चमचाभर चावुन खाऊन त्यावर साधे पाणी पी. कशासाठी ते नाही आत्ता सांगत उगाच दिनेशना त्रास, त्यांना ओमान सोडुन आयुर्वेदावर लिहावे लागेल. बीबी चुकलास.
|
Bee
| |
| Monday, August 21, 2006 - 9:57 am: |
|
|
दिनेशनीच सुरवातीला सांगितल होतं इथे की हव ते आग्रहानी मागून घ्या. मग बीबी चुकन्याचा प्रश्न येतो का ठमे :-) तिळ काय देशातही मिळतात. अगदी इन्च इन्च जागा राहत नाही जाताना..
|
Moodi
| |
| Monday, August 21, 2006 - 10:06 am: |
|
|
बरं बरं द्या हो दिनेश ह्या बबडुला जे काय मागतोय ते. आणि देशातुन मी कायम गावठी पांढरे तीळ आणते वड्यांसाठी आणि बाकी गोष्टींसाठी, ते पॉलीशवाले चुक्कुनही आणत नाऽऽऽही
|
Dineshvs
| |
| Monday, August 21, 2006 - 4:05 pm: |
|
|
गिर्या तुझी शेंडी आता माझ्या हातात आहे ते विसरु नकोस. बी तु साधेच काळे तीळ आणलेस कि, कारळे. कारण काहि जण त्याना पण काळे तीळ म्हणतात. साध्या तिळापेक्षा याची चव जरा nutty असते. पण तरिही जिथे जिथे साधे तिळ वापरु तिथे तु हे तीळ वापरु शकतोस. अळुवडी, ढोकळ्याची फ़ोडणीत, एरवीहि फ़ोडणीत, भाजुन कुट करुन रस्सा भाजीत वापरु शकतोस. काळा मसाला करु शकतोस. चिक्की करु शकतोस, मालवणी खाजा करु शकतोस. भाकरी करत असलास तर वरुन लावु शकतोस. खमंग भाजुन त्यात हवे तर खोबरे, लसुण, हिंग, जिरे, मीठ व तिखट घालुन चटणी करु शकतोस. आणि माझ्याकडे काळे तिळ आहेत असे जरा मोठ्याने म्हणालास, कि चारजणी मला हवे होते जरासे, असे नक्कीच म्हणतील.
|
Farend
| |
| Monday, August 21, 2006 - 10:07 pm: |
|
|
दिनेश खाद्यजीवन आवडले, वाचूनच भूक लागली आपला देश सोडला की दुसरीकडे आपले पदार्थ मिळाले तरी 'ती आपल्याकडची चव' सोडून द्यावी लागते. तुम्ही तो पोळी सारख्या पदर्थांचा उल्लेख केला आहे, तसा इथे (कॅलिफोर्नियात) पिटा ब्रेड मिळतो, तो आम्ही सर्रास पोळी ऐवजी खातो. पण काही लोकांना अजिबात आवडत नाही. आता तो म्हणजे ४-५ पोळ्या एकावर एक ठेवल्या आणि त्यातल्या एक दोन एकमेकींना चिकटल्या तर जसा दिसेल आणि लागेल तसा असतो, पण मला तरी आवडतो. पनीर आणि टोफू चे तसेच, टोफू जास्त हेल्दी आहे म्हणून भारतिय भाज्यांमधे त्या ऐवजी आम्ही घालतो, पण पनीरची चव त्याला येत नाही म्हणून बरेच लोक खात नाहीत. मला असे बरेच लोक माहीत आहेत की जे ती 'अचूक चव' येत नाही म्हणून कुरकुरत बसतात तुमच्या लेखनावरून तरी तुम्ही हे जवळपासचे variations चालवून घेता असे दिसते. आणि तिथे राईस कुकर त्यात आंघोळ करण्याएव्हढे मोठे असतात? just kidding राग मानू नये
|
Bhagya
| |
| Tuesday, August 22, 2006 - 1:14 am: |
|
|
इतके सुंदर खाद्य पदार्थांचे वर्णन मी खूप कमी वेळा वाचलेय..खरच अप्रतीम आहे हे वर्णन दिनेशदा. आणि हे मला मान्य आहे की लिहायला बसले की सगळे आठवते, पण इतके छान लिहिता आले पाहिजे ना?
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 3:30 am: |
|
|
Farend ओमानची संस्कृति बरिचशी आपल्यासारखीच आहे. लिहिनच. तसा राईस कुकर असता तर काय छान झाले असते, एकाच दगडात कितीतरी पक्षी, मारता आले असते. आणि भाग्य, योग्य त्या व्यक्तिपर्यंय योग्य तो संदेश गेला आहे, म्हणायचं
|
Surabhi
| |
| Tuesday, August 22, 2006 - 9:28 am: |
|
|
दिनेश मालवणी खाजा कसा करायचा? जत्रेत मिळतो ना तो? घरी करता येतो? बोटाएवढे जाड शेव त्याला गुळाचे कोटिन्ग असते, ते ना की चिरोट्या सारखा असतो तो खाजा जरा रेसिपी द्याना please.
|
Dineshvs
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:25 pm: |
|
|
सुरभी, ईथे लिहिली आहे आत्ताच. /hitguj/messages/103383/91060.html?1156263760 चिरोट्यासारखा असतो तो बालुशाहि, त्याची कृति होती ईथेच.
|
Prajaktad
| |
| Tuesday, August 22, 2006 - 4:46 pm: |
|
|
साधे समोसे आणि डाळवडे. ( यालाच काहि जण बिस्कुट अंबाडा पण म्हणतात )>>>>किति फ़नी नाव ना?आपला मराठी संद्रभ लावला तर मजेशिरच वाटते. राजस्थानी गुलगुले सारखे " गोड दहिवडे " नाशिक भागात मिळतात.बालुशाही सारखे दिसतात पण कुरकुरित लागतात वरुन पाकाचे कोंटिंग असते , आणी नाव जरी दहिवडे तरी असतात अगदी कोरडे.
|
Kiran
| |
| Wednesday, August 23, 2006 - 1:47 am: |
|
|
दिनेश, लिहायला बसले की आठवते हे खरेच पण त्याआधी जे बघितले ते लक्षात ठेवले पाहिजे ना! त्यासाठी निरीक्षणशक्ती अफाट असावी लागते!!
|
|
चोखंदळ ग्राहक |
|
महाराष्ट्र धर्म वाढवावा |
|
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत |
|
पांढर्यावरचे काळे |
|
गावातल्या गावात |
|
तंत्रलेल्या मंत्रबनात |
|
आरोह अवरोह |
|
शुभंकरोती कल्याणम् |
|
विखुरलेले मोती |
|
|
|
हितगुज गणेशोत्सव २००६ |
|
|