Login/Logout | Profile | Help |
Last 1|Days | Search | Topics
Archive through August 18, 2006

Hitguj » Rangiberangi » Members A-N » dineshvs » Feedback » Archive through August 18, 2006 « Previous Next »

Nalini
Sunday, August 13, 2006 - 3:44 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

शुभेच्छा बीबी वर गिरीचे अभिनंदन कधी करायचे? ईथेच करते. गिरी अभिनंदन. *

Dineshvs
Monday, August 14, 2006 - 5:25 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

माझ्याबाजुनेहि असेच आहे. मायबोलि समोर असलो, कि माझ्याही मनाला कधी उदासीनता स्पर्षु शकत नाही.
पण याचवेळी मला हेहि नमुद करायलाच हवे कि ईथे अनेक अनमोल रत्नं आहेत. फक्त त्यांचे पैलु आपल्यासमोर आलेले नाहीत.

चिंगी. मी बघतो काय करायचे ते. बरेच फोटो जमवलेत. फक्त अपलोड करायला प्रॉब्लेम आहे.

नलिनी, मी दोन्ही घरचा पाहुणा, त्यामुळे माझेच अभिनंदन कर तु.


Devsparsh
Monday, August 14, 2006 - 11:28 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, तुंम्हि असच लिहित रहा.

दिनेशदा हा मझा देवनाग्रित्ला पहिलाच मेसेज तुम्हला समर्पन


Nalini
Monday, August 14, 2006 - 12:23 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदादा, तुझेही अभिनंदन. गिरीचा मामेसासरा झालास म्हणून.
एकंदरीत गिरीचे अभिनंदन करण्याचा पहिला मान मीच पटकावला तर?
गिरी आता तुला जास्त लाड करवुन घेता येतील, नाही का?


Raina
Tuesday, August 15, 2006 - 2:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश- ओमानमधील स्त्रीजीवनावर लिहील्याबद्दल मन:पूर्वक आभार!
आणि ओमानच्या हवामानाविषयीचे वर्णन खूपच छान जमले आहे.


Arch
Tuesday, August 15, 2006 - 2:45 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, उन्हाळ्यावर खजूर हा उपाय? मला वाटायच खजूर उष्ण असतो.

Bee
Tuesday, August 15, 2006 - 4:11 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाही काही.. खजूर थंड असतं पोटाला.. शिवाय खारीक खाल्ली की भूकवाढ होते. ज्यांना अन्न जात नाही त्यांनी दुधात खारीकेची पुड खालून ते दुध प्यावे म्हणजे भूक लागते.

मी एक अजमावले आहे की परदेशात आपल्या भारतात जसे वाळवलेल्या खारका मिळतात तशा त्या इथे मिळत नाही. इथे मिळते ते फ़क्त ओले खजूर असतात. मला किती दिवसांपासून इथे खारका हव्या होत्या. मागे सत्यनारायणाची पूजा होती घरी त्यावेळी एका Indian stores मध्ये पूजेच्या खारका मिळाल्यात. पूजेच्या साहित्यातही आजकाल केवढी भेसळ असते. त्यातले ते बदाम, खारका, तांदूळ, हळकुंड, सुपारी सगळे अगदी जून जून झालेले असते. काय म्हणाव ह्या लोकांना खरचं..


Dineshvs
Tuesday, August 15, 2006 - 4:05 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

देवस्पर्ष, खुप छान वाटले. आता आणखी मेसेज येणार ना ?

आर्च, निसर्गाची किमया, तिथल्या उन्हाळ्यावर उपाय म्हणजे खजुर आणि लिंबु तिथे भरभरुन पिकतो.
खजुरामुळे आम्लपित्ताचा त्रास होत नाही. रमदानचा उपास सोडताना दुध आणि खजुर खातात. आपल्याकडे पण उपासाला खजुर खातातच.
बी, खारिक तिथेहि मिळत नाही.


Rachana_barve
Tuesday, August 15, 2006 - 9:51 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

खुपच छान लिहिताय दिनेश. मस्त वाटतय वाचायला.
मी कालच सहारावर discovery वर एक pgm बघितला. एके काळी सहारा हा हिरवागार सम्रुद्ध परिसर होता. पृथ्वीने मधे कधीतरी आपला ऍक्सीस बदलला आणि हळू हळू सहारा वाळवंट बनले. पण आजही त्या जुन्या खुणा दिसतात. निसर्गापुढे आपण किती क्षुल्लक ना? :-) पृथ्वीने नुसती हलकेच कुस बदलली तर एक पुर्ण परिसर बदलून गेला :-)


Bhramar_vihar
Wednesday, August 16, 2006 - 4:44 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशभाईंची स्मरणशक्ती ईतकी तल्लख कशी याचा उलगडा तनया ला दिलेल्या सल्ल्यावरुन झाला! ४० वर्षांपुर्वी सोनं ही भलतच शुद्ध असेल नाही :-)

Bee
Wednesday, August 16, 2006 - 4:55 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश माझ बरचसं वाचायच राहील आहे. तुमची लिहिण्याची गती आमच्या वाचण्याच्या गतीपेक्षा जास्त आहे नक्की. सध्या फ़लाज वाचले आणि खरच एक अनोखी माहिती मिळाली. ह्याव्यतीरिक्त वरील प्रतिक्रिया देखील मस्तच वाटतात वाचायला...

दिनेश, खारीक फ़क्त भारतातच मिळते असे तुम्हाला म्हणावयाचे आहे का मग?


Mepunekar
Wednesday, August 16, 2006 - 6:19 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेशदा, खुप छान लिहीलय, नेहेमीप्रमाणेच..
मी खजुराने लगडलेले झाड कधीहि पाहिले नाही, तुमच्याकडे एखादा फोटो असेल तर प्लिज इथे टाका ना


Lalu
Wednesday, August 16, 2006 - 6:41 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

छ्या! आम्ही कुठंतरीच येऊन पडलोय याची सारखी जाणीव करुन देतात! पण ते खजुराचे झाड किती का चिवट असेना, लावा एक उपटून आणून इकडे. काय बिशाद आहे जगायची! इथं जरा उन्हाळ्यात हौसेनं काय लावावं म्हटलं तर कित्ती लाड करावे लागतात त्या झाडांचे, तेव्हा कुठं ते जगणार. ~d
नेहमीप्रमाणेच छान. :-)


Bhagya
Thursday, August 17, 2006 - 12:26 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

वा! ओमानला जायची गरजच उरली नाही. 'इजिप्तायन' वाचताना असेच वाटते.' इतक्या तपशीलांसकट खूप कमी लेखक लिहू शकतात.
आणि इथे सगळ्यांचा आवडीचा खजुराचा प्रकार म्हणजे sticky date pudding . अहाहा! हे बघा चित्र.
date

Mepunekar
Thursday, August 17, 2006 - 5:15 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

Thank you very much दिनेशदा..आजच्या आज लगेच फोटो बघायला मिळाले.. खुप मस्त आहेत फोटो..स्पेशली तो खजुराने लगडलेल्या झाडाचा :-)..
धन्यवाद.


Vinaydesai
Thursday, August 17, 2006 - 4:01 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, ओमानची फेरी इथेच झाली.. आता जायची गरज नाही... चालू दे.... खूप छान वर्णन आहे..


Dineshvs
Thursday, August 17, 2006 - 4:30 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

नाहि रे विनय. मला कल्पना आहे, मी ते सगळे सौंदर्य शब्दात नाही पकडु शकणार. आणि प्रत्यक्ष अनुभवाला पर्याय नाहीच.

Prajaktad
Thursday, August 17, 2006 - 7:29 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

ओमानचे वर्णन मस्तच चाललय... खजुराचे झाड मी पहिल्यांदाच पाहिले..
विलायती चिंचांचा गर तुरट्-गोड लागतो.


Arch
Friday, August 18, 2006 - 2:08 pm:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

दिनेश, आखाती देशात कधी जावस वाटल नाही. पण ओमानच वर्णन वाचून मात्र विचार बदलायला लागेल. आता त्याच श्रेय तुमच्या वर्णनशैलीला द्यायला लागेल.

तुमची स्मरणशक्ति मात्र प्रचंड आहे. मी India त गेल्यावर माझा इथला tel no. पण विसरते.


Dineshvs
Saturday, August 19, 2006 - 1:19 am:   Edit Post Delete Post Print Post  Link to this message

आर्च, दुबईत शॉपिंग आणि मस्कतमधे भटकंती हे छान कॉंबिनेशन आहे. आणखी लिहितोच आहे.
फ़ोन नंबर्स माझ्याहि लक्षात रहात नाहीत.


चोखंदळ ग्राहक
महाराष्ट्र धर्म वाढवावा
व्यक्तिपासून वल्लीपर्यंत
पांढर्‍यावरचे काळे
गावातल्या गावात
तंत्रलेल्या मंत्रबनात
आरोह अवरोह
शुभंकरोती कल्याणम्
विखुरलेले मोती


हितगुज गणेशोत्सव २००६



 
Web maayboli.com

Topics | Last Day | Tree View | Search | User List | Help/Instructions | Content Policy | Notify moderators